SHIV SIHASAN PART 1 in Marathi Short Stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | शिव-सिहांसन भाग १

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

शिव-सिहांसन भाग १

शिव-सिहांसन भाग १

हि कथा पुर्णपणे काल्पनिक आहे...राजांचे सिंहासन कुठे आहे..हे कोणालाच माहिती नाही..फक्त काही संदर्भ आणि निवडक संदर्भ सोडल्यास कथा माझ्या कल्पना शक्ती वर लिहिली आहे...हि कथा प्रमाण मानू नये...मात्र दिलेले संदर्भ इंटरनेट वरून जरूर पडताळुन पाहावेत हि विनंति..कदाचित माझे संदर्भ चुकीचे असतील मला जसे मिळत गेले तसे मी वाचत गेलो..लिखाणात अनेक चुका असतील तरी त्या समजून घ्यावात आणि कथा लिहिताना कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही...तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी.. आणि रायगडचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर खाली दिलेली ३ पुस्तके आवर्जून वाचावीत.

दुर्गेदुर्गेश्वर रायगड - लेखक : प्र. के . घाणेकर

रायगडची जीवनकथा- लेखक शांताराम आवळसकर

दुर्गभ्रमणगाथा- गो.नी.दांडेकर

मिलिंद, प्रसाद ,भिवाजी आणि अमित...ह्या चौघांचा एकत्रित " किल्ले रायगडला " गेल्या ३ वर्षात मोजून ९७ व ट्रेक होता...पुरातत्व विभाग महाराष्ट्र आणि पुरातत्व विभाग दिल्ली आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडून योग्य त्या परवानग्या मिळाल्यानंतर...त्यांनी "किल्ले रायगडला" आपले दुसरे घरच बनवले होते ....चौघे एक ते दोन आठवड्याच्या अंतराने महाराष्ट्र आणि पुरातत्व विभाग...कामाला लागले होते...वय वर्षे ३० ते ३५ च्या आसपास...राहणार सर्व मुंबई (नाईलाजाने) पण जास्त सापडायचे..गड - किल्ल्यावर ...काहीतरी शोधताना आणि खोदताना...राजांबद्दल अभिमान होताच आणि महाराष्ट्राचे गड किल्ले आणि सहयाद्री तर जीव कि प्राण होता...आणि जी गोष्ट मनापासून करायला आवडते आणि त्यातच पुढे नोकरी...तो फिर पूछो हि मत.....

त्यात भिवाजी आहे त्या बजेट मध्ये सर्व मोहीम मॅनेज करण्यात एकदम वाकबगार ...मिलिंद सर्वांना sms करून कॉल करून किंवा प्रत्यक्ष भेटून माणसे जमावणार...प्रसाद मोहिमेसाठी लागणाऱ्या गाड्या म्हणजे दुचाकी किंवा फोर व्हीलर किंवा क्रेन मॅनेज करणार... आणि अमितकडे सर्व टीमची जेवणाची आणि राहायचाही व्यवस्था होती.

३ वर्षांपूर्वी त्यांच्या वरिष्ठांनी चौघांवर एक महत्वपूर्ण कामगिरी सोपवली होती..."किल्ले रायगड" च्या परिसरात आणि प्रत्यक्ष गडावर शोधकार्याची...जे काही शिवकालीन वस्तू सापडतील त्या...अरबी समुद्रात होणाऱ्या "शिव-स्मारकासाठी" त्या वस्तू उपयोगात येणार होत्या... तिथे त्या सर्वसामान्यांसाठी प्रदर्शनासाठी लावल्या जाणार होत्या....खूप काही सापडले होते...सोन्या-चांदीची नाणी...तोफगोळे,बंदुकीच्या गोळ्या,बंदुकी,भाले,तरवारी चार ते पाच तोफा, चिलखत, कितीतरी भांडी, कडी-कुलपे, मारुती गणपती अश्या देवदेवतांच्या पूर्णाकृती आणि अर्धाकृती मूर्ती...आसपासच्या गावातून कागदपत्रे ..जमिनीत गाडलेले १० ते १२ शिलालेख...कामगिरी जवळ जवळ फत्ते झाली होती...अजुन जास्तीत जास्त आठवडा...मोहीम आवरती घ्यायाला आदेश आले होते..पण चौघांच्या मनात काहीतरी वेगळेच होते...आणि त्यासाठीच आपल्या वरिष्ठांच्या हाता-पाया पडून अनेक विनवण्या करून आपली मोहीम १ महिना वाढवून घेतली होती... जिथे आपला ह्या सहयाद्रीचा राजा बसला होता आणि ज्यावर बसला होता असे ते "शिव-सिहांसन" ते त्यांना काहीही करून शोधायचे होते...

अनेक पुस्तके अधाशासारखी खाल्ली होती अनेक इतिहासकारांच्या भेठी-गाठी ...अनेक ग्रंथालये पालथी घातली होती...रायगडाचे अनेक नकाशे जुने नवीन...पाचाड,महाड, सांदोशी,वाघेरी, वाडी, छत्री निजामपूर आणि निजामपूर आणि रायगडाच्या आसपास असलेली अनेक गावे त्यांनी पिंजून कधी होती..."शिव-सिहांसनाबद्दल " काहीही बारीक सारीक माहिती ते जमवत होते..


प्रत्यक्षात खोदकामाला सुरुवात करण्यापूर्वी अमित,प्रसाद आणि भिवाजी काही डिटेल्स नजरेखालून घालत होते...ते असे

१) इ. स. ०६.०६.१६७४ रोजी "किल्ले रायगड"---राजांचा राज्यभिषेक झाला..

२) इ. स. २५.०३.१६८९ ते ०३. ११. १६८९ औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले...( म्हणजे जवळ जवळ ७ ते ८ महिने "किल्ले रायगड" ला वेढा पडला होता)

३) इ. स. ०३. ११. १६८९ ते १७०७-०८ औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत "किल्ले रायगड" वर म्हणजे "इस्लामगड" वर औरंगजेबाचा अंमल होता... त्या १८ वर्षात "शिव-सिहांसन" एक तर औरंगजेबाने फोडण्याची शक्यता जास्त होती..

४) इ. स. १७०७ ते १७३३ या २५ वर्षांचा काही हिशेब त्या चौघांकडे नव्हता...

५) इ. स. १७३३ ते १७७३ छत्रपती शाहू यांचा अंमल होता.

६) इ. स. १७७३ ला गड पेशवांच्या ताब्यात आला... अपाजी हरीच्या ताब्यात आला . त्याने सिहांसनास मुजरा केला आणि नजर म्हणून ५ रुपये सिहांसनापुढे ठेवले आणि पेशवांच्या कागदोपत्री सुद्धा सिहांसनासाठी लागणाऱ्या खर्चाचा वारंवार उल्लेख आला आहे त्यांनी १७९७ पर्यंत सिहांसनासाठी लागणाऱ्या कापडाची अतिशय व्यवस्थितरित्या नोंद केली आहे

७) इ. स. १७९६-९७ मध्ये नाना फडणवीस प्रथम महाड व नंतर रायगडावर आले आणि त्यांनी सिहांसनासमोर नगारखाना ठेवण्याची व्यवस्था केली.

८) इ. स. १८१८ मध्ये गड इंग्रजांनी जिंकला .....

म्हणजे याचा अर्थ इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यांस ते सिहांसन सापडले नव्हते ...प्रसाद बोलला... इ. स. ०६.०६.१६७४ ते इ. स. १८१८ असे १४४ वर्षे सिहांसन रायगडावरच होते...तेवढ्यात भिवाजी बोलला " इंग्रजांकडे गड हातात आल्यावर ५ लाखांची रोख संपत्ती मिळाल्याची नोंद आहे तेच कशाला राज्यभिषेक झाला ती पण नोंद होती..." तेवढ्यात अमित ने इंटरनेट वर राज्यभिषेकाची नोंद असलेला जुने वर्तमानपत्र दाखवले

बारीक सारीक गोष्टी नोंद करण्याची त्यांची सवयच होती....जर का कुठे सिहांसन सापडले असते तर त्याची नोंदही त्यांनी केली असती...आणि उपलब्ध कागदपत्रांवरून गडाच्या खाली सिहांसन नेल्याचा उल्लेख कुठेच सापडत नाही म्हणजे त्यामुळेच "शिव-सिहांसन" गडावरच असण्याची शक्यता जास्त होती... अमित ने आपले निरीक्षण मांडले...आणि तो धावत पळत येण्याऱ्या मिलिंदकडे पाहू लागला....नक्कीच त्याला काहीतरी सिहांसनाबद्दल माहिती मिळाली होती. अमित ने आधी मिलिंदला बसायला सांगितले.. तो बोलला आधी श्वास घे पाणी पी आणि मग बोल...मिलिंद दमला होता पण काहीतरी एकदम चमत्कारीत सांगणार होता....गडावर शिवकाळात आणि पेशेवेकाळात पिढीजात काम करण्याऱ्या शेडगे कुटुंबाला भेटून आला होता त्यांच्याकडून त्यानी एक पिढीजात ऐकत आलेली आख्यायिका ऐकली होती....

मिलिंदने आधी मोकळा श्वास घेतला आणि तो बोलू लागला... अमित, भिवाजी आणि प्रसाद तिघेही कान देऊन ऐकू लागले...