Rahasyamay Stree - 9 in Marathi Moral Stories by Akash Rewle books and stories PDF | रहस्यमय स्त्री - भाग ९ 

Featured Books
Categories
Share

रहस्यमय स्त्री - भाग ९ 

रहस्यमय स्त्री - भाग ९



येवढं बोलून अमर गूगल मॅप वर बोधर् गाव सर्च करू लागला !!!

बोधर गाव इस्पितळा पासून २३ किलोमीटर अंतरावर होते.
इस्पितळातून बाहेर निघताना मोबाईल मध्येच बघून चालताना त्याची समोरून येणाऱ्या व्यक्तीशी धडक झाली !!!
त्यामुळे त्याचा मोबाईल खाली पडला ...

अमरच्या मनात धडकी भरली !!!
त्याने लगेचच मोबाईल उचलला व पाहिले तर मोबाईल कवरमुळे मोबाईलला काहीच झाले नाही .
मोबाईलला काहीच न झाल्याने त्याच्या जीवात जीव आला !!!

त्याचा राग अनावर होत होता , त्याने वर पाहिलं तर त्याने राग मनातल्या मनातच ठेवला कारण त्याची धडक सहाय्यक पवार यांच्याशी झाली होती !!!

पवारांनी रागाने त्याला पाहिलं व म्हणाले " मोबाईलच्या बाहेर ही जग असतं , मोबाईल हातात आल्यावर बाहेरच जग विसरायचं नसतं !!! "

अमर काहीच न बोलता आपल्या कार मधून बोधर गावाच्या दिशेने निघाला , माघे पवार आपल्या बाईक वर त्याचा पाठलाग करत होते !!!!

बोधर गाव येण्यासाठी अजून ११ किलोमीटर अंतर बाकी होते .
अमरने साईड मिरर वर काहीतरी पाहिलं व गाडी रस्त्याच्या बाजूला लावली ...
जशी त्याने गाडी थांबवली तशी दूरवर एक बाईक ही थांबली !!! अमर केव्हा पासून पाहत होता की बाईक त्याचा पाठलाग करत होती ....

त्याने अंदाज बांधला की अक्षयच्या सांगण्यावरून कोणीतरी त्याचा पाठलाग करत असेल . अमरने गाडी चालू केली तशी बाईक ही सुरू झाली ....
त्याच्या जवळ वेळ खूप कमी होता म्हणून पाठलाग कोण करतंय ??? का करतंय ???
याच्या विचारत न पडता त्याने गाडीचा वेग वाढवला ...

मागे पाहिलं तर दूरवर कुठे ती बाईक दिसली नाही !!! म्हणून त्याने आता सुटकेचा श्वास सोडला ,,,

गावात पोहोचल्यावर कार गावाच्या वेशीजवळ लावली व पायी गावात जाऊ लागला !!!

जाताना त्याला एक वृद्ध व्यक्ती दिसले . त्याने त्यांना विचारले " ' स्वप्नाली दिवेकर ' यांचं घर कुठे आहे ??? "

त्या वृद्ध व्यक्ती ने अमर जवळ खूपच विचित्र नजरेने पाहिले व तेथून काहीच न बोलता निघून गेला !!!

अमरला काही समजलंच नाही की तो वृद्ध असा का वागतोय !!!

त्याला वाटले जास्त वय झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल म्हणून वेगळा वागला असेल !!! पण त्याचा हा समज चुकीचा ठरला , जेव्हा त्याने एका मुलीला विचारले व त्या मुलीचे ही काही असेच हावभाव होते !!

अमर आता पूर्ण पणे गोंधळला होता , पण त्याने हार नाही मानली ...
त्याने एक सुशिक्षित दिसणाऱ्या मुलाला विचारले ...
" ' स्वप्नाली दिवेकर ' यांचं घर कुठे आहे ?? "

तोही तसाच चेहरा बनवणार तेवढ्यात अमर त्याच्यावर बडबडला .. " काय ??? प्रॉब्लेम काय आहे ?? का असा चेहरा बनवता आहात ??? "

मुलगा = " तुम्ही त्या मुलीचं या गावात नाव घेवू नका !!! तुमच्या काय माझ्याही जीवाला धोका निर्माण होवू शकतो !!!
आणि ज्या घरा बद्दल विचारता आहात त्या घरात कोणीच नाही राहत , परवाच विनायक मास्तरांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली , त्या आधी त्यांचे वडील , मग त्या मुलीची आई ... तुम्हाला या बद्दल कळलं नाही का ???
तरी पत्ता हवाच असेल तर तो असा आहे ' डाव्या हाताला वळून खालच्या अंगाची दुसरी गल्ली घेतली की तीसर घर , जर नाहीच समजल तर विनायक मास्तर म्हणून विचारा कोणीही सांगेल !! "

त्या मुलाचे शब्द ऐकुन अमरच्या पायाखालची जमीन सरकली !!! स्वप्नाली बद्दल जर कोणी सांगू शकत होते ते जा जगात नव्हते , त्याच्या शेजार्यांना त्यांच्या बद्दल विचारावं म्हणून त्याच्या घरा जवळ जायचे ठरवले !!!

अमरने त्या मुलाचे आभार मानले व डाव्या बाजूला असलेल्या रस्त्यावर चालू लागला . येवढं सर्व ऐकुन हे सर्व पाहून स्वप्नाली बद्दल जाणण्याची त्याच्या मनात तीव्र इच्छा होत होती मात्र तो गावात तीच नाव ही घेवू शकत नव्हता !!!

चालत असताना आशेचे शेवटचे किरण म्हणजे काजल बद्दल आठवले म्हणून ...
अमरने काजलला एक मिस कॉल दिला !!

शेवटी तो गंतव्य स्थाना पर्यंत पोहोचला , म्हणजे स्वप्नाली दिवेकर चे घर त्याच्या दोन पाऊल पुढेच होत !!!

एक जुना प्रशस्त वाडा , दरवाजा तसा उघडाच होता ...
त्या मुलाने तर सांगितल होत की घरात कोणी नाही मग घराचं दार उघड कसं म्हणून त्याने बाहेरून दरवाज्याची कडी वाजवली !!!

आतून एक पांढऱ्या शुभ्र कुर्त्या मद्धे एक माणूस बाहेर आला !!!
" कोण आपण ?? कोण हवंय !! "

अमर - " विनायक मास्तर "

विनायक - " हो मीच आहे बोला !! "

हे ऐकताच अमरला धक्का बसला , त्याला मनातल्या मनात वाटू लागलं की अख्खं गावच वेड आहे , त्या मुलाने खोटं सांगितलं की विनायक राव जिवंत नाहीत असं !!!
तो विनायक रावांना म्हणाला ...
अमर - " स्वप्नाली दिवेकर बद्दल माहिती हवी होती !!! "

विनायक ने अमरला एक नजर पाहिले , काही सेकंद थांबून म्हणाले " स्वप्नाली नावच इथे कोणीच नाही राहत , तुम्ही आता जाऊ शकता !!!
असं बोलून विनायक आत जात होते ...

तेवढ्यात अमर त्यांना थांबवत म्हणाला " मी सिद्धर्थ माहात्म्य , तुलींज पोलीस स्टेशन वरून आलोय ... स्वप्नाली बद्दल महत्त्वाचं बोलायचं आहे !!! "

विनायक एका जाग्यावर स्थिर झाले , मनात काहीतरी विचार करून अमरला आत बोलावलं . व दरवाज्याच्या समोरील खुर्चीवर बसायला सांगितले व म्हणाले " बोला काय येवढं महत्त्वाचं बोलायचं होत , ती जेव्हा पासून हे घर सोडून गेली आहे , तेव्हा पासुन माझ्या साठी मेली आहे !!! तिची कसलीही बातमी असेल ती निश्चिंत होऊन बोला " ...

अमर - " खूप दिवसांपासून स्वप्नाली दिवेकर यांचा तपास लागत नाही आहे , त्याच्याच बद्दल तुमच्या कडे माहिती गोळा करायला आलोय "

विनायक - " आमच्या घरात नाही आली ती , वाटलच तर घ्या तलाशी !! "

अमर - " तस नाही !!! मी आल्यानंतरही पाहिलं की कोणी स्वप्नाली च नाव ही घेत नाही , अस का ?? गावातल्या लोकांनी कोणी काही केलं तर नसेल ?? ..... "

विनायकच्या डोळ्यात अचानक पाणी आल , त्याने ते लपवत अमरला म्हणाले " हा जो वाडा इतका शांत व भयाण वाटतोय एके काळी याच वाड्यात आनंदच आनंद नांदत होता ...
मुलगी झाली म्हणून लोक मला सहानुभूतीच्या नजरेने बघायचे पण मुलगी झाली याचा मला जास्त आनंद होता !! मला अजूनही आठवत , ती पहिल्यांदा जेव्हा बोलली तर ' आई ' नाही तर ' बाबा ' अस म्हणाली होती ,
पहिल्यांदा चालायला लागली तेव्हा ह्याच कंजूस बापाने सर्व गावात जिलेबी वाटली होती !!!
तिला जर कुठे पडली तर तिच्या पेक्षा जास्त त्रास मला व्हायचा !

स्वप्नाली च शिक्षण पूर्ण झालं होत , ती घरात कमी अन बाहेर जास्त असायची कधी या मैत्रिणीच्या घरी तर कधी त्या , शिक्षित असल्याने मी तिला पूर्ण सुट दिली होती ,
आईची लाडकी होती ती !!! डाव्या हाताने अश्रू पुसत पुढे बोलू लागले ... बाहेर रोज एक जण सांगत असे ' मुलगी लग्नाच्या वयात आली आहे , लवकर उरकून टाका '
पण मी कोणाचं ऐकल नाही , येवढ्या लवकर तिला कोणत्याच बंधनात अडकवायच नव्हत , माझ्या मते तिने तीच आयुष्य जगावं व वाटेल तेव्हा लग्न कराव मात्र दैवाने दुसरच काही तरी लिहल होत ,

माझं घर स्वर्गा पेक्षा कमी नव्हत !!! स्वर्गाला नरक बनवणारा तो क्षण मला चांगलाच आठवतो .... ... दुपारी जेवणाच्या ताटावर बसलो होतो
स्वप्नाली चा रडतानाचा आवाज ऐकला व भरलेल्या ताटावरून उठून बाहेर गेलो .

बघतो तर काही गावकरी स्वप्नाली व सोबत एका मुलाला घेवुन आले होते ...

काय झालं ??? मी स्वप्नाली ला विचारले ...
याने ती अजुनच रडु लागली होती ...
त्यातील एक गावकरी म्हणाला " मास्तर तुमची मुलगी कुलकर्णींच्या शेतात ह्या माकडा सोबत बोलत होती " ...सांगत होतो उरकून टाका म्हणून , आता घ्या आल ना अंगाशी !!! "

मास्तर - " फक्त बोलतच होते ना त्यात काय वाईट आहे ?? "

" तुम्हाला नसल वाईट पण या गावाला वाईट आहे !! आधीच तुमच्या स्वप्नाली मुळ गावातल्या पोरींचे पंख फुटलेत !! "

मी स्वप्नाली ला घरात बोलावलं व , सर्व गावकऱ्यांना सांगितले " मी बघून घेतो पुढचं , तुम्ही जा आता !! "

गावकरी आपसात कुजबुज करून गेले ...

तिच्या मते गावात जर बोलले असते तर लोकांनी नावे ठेवली असती , म्हणून ते कुलकर्णींच्या शेतात बोलत होते ...

मास्तर - " एवढंच महत्त्वाचं बोलायचं होत तर घरी बोलवून बोलायचं होत !!! , असं लपून छपून बोलायची काय गरज ?? , तुला कधी कोणत्या गोष्टीसाठी नकार दिला आहे का ??? "

मग मी त्या मुलाला विचारले .. " काय रे तू कुठला , तुला इथे कधी पाहिलं नाही ... वयाने देखील स्वप्नाली पेक्षा मोठा वाटतोय तू ??? काय काम काडलस स्वप्नाली कडे जे तुम्हाला लपून भेटाव लागलं !!! "

मुलगा - मी अभिजित पानसे शेपवाडी गावात राहतो , आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत , सहज आलो होतो भेटायला ...

मला तो मुलगा शेपवाडी गावातील नाही वाटला !!! लहापणापासून शेपवाडी गावाला चांगलं ओळखून आहे व शेवटीं जनगणना , वोटिंग लिस्ट सर्व मीच करत असल्याने मला कळलं की तो मुलगा खोटं बोलतोय मी त्याला काही एक म्हटलं नाही व जायला सागितले !!!

व स्वप्नालीला बजावले की आज पासून त्या मुळाशी भेटायचं नाही वा बोलायचं नाही !!! मुलगी चुकीच्या दिशेला जाताना बघून तिचा मोबाईल मी स्वतः जवळ ठेवला .

व त्याच्याच तिसऱ्या दिवशी स्वप्नाली घरातून पळून गेली !!!
हातावर फुला प्रमाणे जपलेल्या मुलीचा वाईट विचार का बरं कोणते आई वडील करतील ???
वीस वर्षांच प्रेम सोडून वीस दिवसांच्या प्रेमासोबत पळून गेली !!
त्यांच्या चांगल्या भविष्या साठीच आम्ही धडपडत असतो ना !!! मग का नाही समजल हे तिला ???
का पळून गेली असेल ती ???
एकदा सांगितल असत तर अख्खं परिवार घेवून दुसऱ्या गावी राहायला गेलो असतो व तीच त्या मुला सोबत लग्न ही लावून दिल असत !!!
तिच्या शिवाय होत तरी काय आमचं ???
पण तिने एकदा सांगायला तरी हवं होत !!!

विनायक रावांचे अश्रू थांबतच नव्हते , खूप दिवसांपासून साठवेल दुःख आज बाहेर काढत असावेत म्हणून अमरने ही त्यांना थांबवलं नाही !!!

ते पुढे बोलू लागले ...
ती पळून गेल्याने गावात पळून जाण्याचे प्रमाण वाढले याच सर्व कारणांनी पंचांनी गावतल्या व्यक्तीने स्वप्नालीचे नाव देखील घेतल्यावर गुन्हा ठरेल असे बजावले !!
गावातून दिवेकर परिवाराला वाळीत टाकले गेले !!

हे स्वप्नालीच्या आजोबाला सहन झालं नाही व काहीच दिवसात हार्ट अटॅक मुळे ते दगावले !!!

गावात स्वप्नाली च नाव ही घेतल जात नव्हत ...
स्वप्नालीच्या या कृत्यामुळे गावात बालविवाह चे प्रमाण वाढले ...
जे शिक्षित होते ते मुलीचे वय अठरा वर्ष होताच लग्न लाऊन देवू लागले !!!

गावात स्वप्नालीच्या आईला पाणीही भरू दिले जात नव्हते , आम्ही रोज आमच्या शेतातील विहिरीतून पाणी घेवून येवू लागलो... गावात राहण अवघड झालं होत , बायका तिला येता जाता टोमणे मारत होते की
" हेच संस्कार दिले होते का मुलीला ??? "
चालताना नजर खाली टाकून चालावं लागायचं !! कित्येक दिवस मीच घरातून बाहेर पडलो नाही ...

तिला ही हे सर्व असहाय्य झाले व तिनेही स्वतःला जाळून घेतले !!!

बोलता बोलता विनायक रावांना ठसका लागला पाणी आणायला आतल्या खोलीत गेले !!

मी दरवाजातून बाहेर बघितले असता येणारे जाणारे लोक मला हसून पाहत होते ...

खूप वेळ पासून विनायक राव आतून न आल्याने अमर आत जाऊन पाहतो तर काय .!!!!!!

आत कोणीच नव्हत ... सर्व घरात पाहिलं पण कोणीच दिसले नाही !!!

तेवढ्यात फोनच्या रिंग ने अमरच्या काळजाचा ठोका चुकवला , त्याच्या मनात भीती ने घर केलं होत . तो धावत धावत बाहेर आला ...
मोबाईल मध्ये पाहतो तर काजलचा फोन आला होता पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता की अचानक विनायक राव कुठे गेले ???

त्याने कॉल उचलला ... काजल म्हणाली .
" गावाच्या वेशी जवळ हनुमानाच्या मंदिरा मध्ये मी वाट बघतेय तुमची " ...

अमर - " पाच मिनिटात पोहोचतो असे सांगून फोन कट केला व घाई घाईत वेशीच्या दिशेने धावू लागला !! "

अमर गुगल मॅप च्या मदतीने मंदिरा जवळ पोहोचला ...

त्याला मंदिरात काजल दिसली आत जाऊन त्याने तिला विचारले " तुम्ही स्वप्नाली बद्दल काही सांगणार होत्या ..

काजल - हो तेच सांगायला मी माहेरी आलेय ...( काजल चे सासर दोन गाव सोडून तसेच माहेर बोधर गाव होते , )
स्वप्नाली माझी खूप जवळची मैत्रीण ,
ती पळून गेली अन् दुसऱ्याच आठवड्यात माझं लग्न लावलं गेलं !!! तिच्यामुळे कोणाला पळून जाण्याची हिंमत मिळाली तर कोणाला घरातच बंदी बनून लवकर लग्न होण्याचा अभिशाप मिळाला ...

ती इथून गेली होती त्याच रात्री तिने मला कॉल केला होता तिने सांगितले होते की ... भाड्यावर खोली भेटत नाही आहे सर्वांना लग्नाचं प्रमाणपत्र हवंय !!! लग्नाचं प्रमाणपत्र येण्यासाठी अजून ३० दिवस लागणार होते म्हणून ते केसरी लॉज मद्धे थांबणार होते !!

पण तीन दिवसांनी तिचे आजोबा वारले म्हणून तिला फोन केला पण फोन बंद येत होता ...
जेव्हा तिची आई वारली तेव्हा पण तिचा फोन बंद येत होता ....
मात्र एके रात्री अनोळख्या नंबर वरून तिचा समोरून कॉल आला ... " त्यात ती हुंदके देत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण आजबाजूला माणसांचा आवाज आला व फोन कट झाला !!!
तिच्या सोबत खरच काहीतरी वाईट घडल आहे !! मी कोणाला सांगू ही शकत नव्हते कारण गावात तीच नाव ही घेण्याला बंदी होती !!! "

अमर - तुम्हाला स्वप्नालीचा शेवटचा कॉल ज्या नंबरने आला होता तो मोबाईल नंबर आहे का ?? "

काजलने तो नंबर अमरला दिला !!

अमरला एक प्रश्न पडला होता " तो म्हणजे स्वप्नाली कोणासोबत पळून गेली ??? म्हणून त्याने काजल ला विचारले ...

तर उत्तर मिळालं " अभिजित पानसे " !!!

अमरला खरंच आता विश्वास बसत नव्हता म्हणून त्याने तिला पुन्हा विचारले की लग्न सुद्धा अभिजित पानसे सोबत झाल ???

यावर काजल ने मान हलवून होकार दिला !!

अमरच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण झाले होते , की स्वप्नाली ने आपल्याच पतीला मारायला मला का सांगितले ??
त्या ४ मेलेल्या व्यक्तीशी तिचा काय संबंध होता ??
जर तिचा पती ' अभिजित पानसे ' असेल तर पहिल्या दिवशी दफन भूमिजवळ दिसल्यानंतर ती अस का म्हणाली की तो माझ्या साठी मेला आहे ?? आणि जर तिच्या साठी मेला असेल तर का मारायला सागितले ??

यात मी असं काय केलं होत ज्याची शिक्षा रेशमा भोगतेय !!!

काजल कडून अजून माहिती मिळावी म्हणून तो पुढे म्हणाला - " तीच नाव ही घेणं गुन्हा आहे हे कळलं , विनायक रावांनी आत्ताच सांगितले , अजून या व्यतिरिक्त काही माहिती तुमच्या कडे ??? "

काजल - " काय ??? मी आज माहेरी आल्याने मलाही आजचं कळलं की " विनायक काकांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली होती .. !!! "

अमर आता एकदम शांत झाला होता , त्याच्या तोंडून काहीच बाहेर पडत नव्हत ,
काजल मंदिराच्या बहाण्याने आल्याने तिच्या कडे जास्त वेळ नव्हता म्हणून ती निघून गेली , मात्र अमर अजून शांतच होता , जाताना तिने अमरला अभिजित पानसे व स्वप्नाली चा सोबत असलेला फोटो व्हॉट्स ऍप केला !!! .

काजल निघून वेळ झाला होता पण अमर अजून मंदिरातच होता , त्याने देवाला नमन केले व यातून बाहेर पडण्याची सद्बुद्धी व शक्ती मागितली व तो मंदिरा बाहेर आला ....

त्याला काहीच समजत नव्हते काय करावे अन् काय नाही !!!

त्याने कार स्टार्ट केली व इस्पितळाच्या दिशेने निघाला !!!

व काही अंतरावर पवार त्याचा पाठलाग करत होते !!!

बाजूने एक ट्रॅक खूप वेगाने गेले !!
पवार मनातल्या मनात म्हणतच होते " अती घाई संकटात नेई "
तेवढ्यात त्यांची नजर एका झाडाला आदळलेल्या कार वर गेली , रोडच्या कडेला चार पाच जणांचा घोलखा त्याच कारच्या आजूबाजूला होता !!! पवार यांनी बाईक बाजूला लावून धावत तेथे पोहोचले , बघतात तर काय ती कार अजून दुसऱ्या कोणाची नसून अमरची होती !!!

----------- पुढील भाग लवकरच ----------