ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 3
क्रमशः
सगळे काही विसरून मग प्रीती परीक्षेचे अभ्यासाला लागते.. आर्यनही प्रीतीशी असलेले सर्व नाते तोडून तो ही जोमाने मग परीक्षेचे अभ्यासात रमून जातो आणि पाहता पाहता अखेर परीक्षेचा दिवस येतो. सर्व मित्र मैत्रिणी एकमेकांना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षेला जातात. प्रीतीला वाटत असते इतके दिवसाच्या दुराव्या नंतर तरी आज आर्यन आपलेशी बोलेल.. पण नाही आर्यन तिला सोडून बाकी सर्व मित्र मैत्रिणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन न बोलताच निघून जातो. इकडे आर्यनचे मनात देखील तेच होते निदान आज तरी प्रीती आपल्याशी मागचे सगळे भांडण विसरून पहिल्यासारखी बोलेल पण नाही तसे काहीच नाही होत. नंतर संध्याकाळी पेपर सुटलेवर पुन्हा प्रीती आणि आर्यन समोर समोर येतात पण ते दोघे एकमेकांशी काहीच नाही बोलत. काही दिवसातच त्या सार्वांचा कॉलेजचे शेवटचे वर्षातील शेवटचे पपेरचा दिवस उजेडतो. सर्वांनी मिळून शेवटचा पेपर संपलेवर सेंडऑफ पार्टी करण्याचे आधीच ठरवलेलं असते. आर्यनला आशा वाटत असते निदान कॉलेजचे शेवटचे दिवशी तरी प्रीती सार काही विसरून पुन्हा पहिल्या सारखी बोलू लागेल आणि असेच काहीसं प्रीतीचे मनात देखील असते. पण नियतीचे मनात काही वेगळंच होते..
काही अबोल शब्द
खोल मनात दडलेले ..
ओठांवर कधी न येता
हृदयात खोल वसलेले ..
कधी न व्यक्त करता
स्वतःला सावरणारे ..
तुझ्या स्मित हस्यात
मनाला सुखविणारे ..
शब्द काही अबोल
अबोलच रहावेत ..
न बोलता शब्दातून
भाव मनाचे तू वाचावेत ..
शब्दरूपी भाव डोळ्यातला
अर्थ तुज त्याचा उलगडावा ..
प्रीती सकाळी लवकर उठून परीक्षेची तयारी करून पेपर द्यायला निघते. प्रीती रिक्षातून पपेरला जाताना अचानक तिची तब्येत खूप बिघडते आणि ती त्या रिक्षातच उलट्या होऊन बेशुद्ध पडते. इकडे कॉलेजवर सर्व मित्र मैत्रिणी शेवटचे पेपर नंतर सर्वजण मिळून संध्याकाळी सेंडऑफ पार्टीला एकत्र जमण्याचे ठिकाण ठरवत असतात. कॉलेज मधील सर्व मित्र मैत्रीण जमलेले असतात पण प्रीती एकटीच नसते आणि आर्यनची नजर त्या घोळक्यात तिलाच शोधात असते. तो तिचे हॉस्टेल मधील त्यांचे ग्रुप मधील एका मैत्रिणीला विचारतो तिचेबद्दल तेव्हा ती त्याला बोलते "आर्यन हे बघ ती निघाली होती रे सकाळीच आवरून माझे समोरच परीक्षेसाठी.. कदाचित तिला तुझ्याशी बोलायचंच नसेल म्हणून ती आली नसेल तुला इथे पाहून.. हे बघ आर्यन तू सेंडऑफ पार्टीमध्ये तिच्यापासून लांबच रहा हा.. उगाच तुमचे दोघात पार्टीमध्ये पुन्हा काही भांडण झाले तर सगळ्यांचाच मूड ऑफ होईल पार्टीमध्ये.. चल बाय.. भेटू संध्याकाळी पार्टीमध्ये.. बेस्ट ऑफ लक.." असे बोलून ती निघून जाते परीक्षेला. आर्यन काही वेळ तेथेच थांबतो त्याला वाटत असते ती येईल.. पण ती पेपरची वेळ होत आली तरी नाहीच येत.. मग आर्यन परीक्षेसाठी आत कॉलेजमध्ये निघून जातो.
संध्याकाळी पेपर सुटलेवर आर्यन प्रीती त्याला न भेटल्याने दुःखी होऊन कोणालाच न भेटता होस्टेलवर जाऊन आपली बॅग पॅक करून त्याचे घरी मुंबईला जायला निघतो. रेल्वे स्टेशनवर पोहोचलेवर पुन्हा त्याचे मन प्रीतीशी बोलण्यासाठी तिचा मोबाईल नंबर डायल करते तोच दुसरे मन तो फोन कट करते. जर तिला आता आपल्याशी काहीच नाही बोलायचं, आपल्याशी काहीच नातं नाही ठेवायचं आहे.. तर मग मीच का? आणि कशासाठी? फोन करू तिला असे बोलून तो मोबाईल खिश्यात ठेवतो तोच मोबाईल ची रिंग वाजते. त्याला क्षणिक आनंद होतो त्याला वाटते तो फोन प्रीतीनेच त्याला केला आहे पण तो फोन त्याचे मित्रांचा असतो ते त्याला पार्टी साठी बोलावत असतात. आर्यन त्याचे सर्व मित्रांना मी पार्टीला येऊ शकत नाही मी मुंबईला निघालो आहे असे सांगून फोन स्विच ऑफ करून बॅगमध्ये ठेवून टाकतो. प्रीतीला देखील ते सर्वजण फोन करण्याचा प्रयत्न करतात पण तिचा फोन लागत नसतो मग कदाचित ती देखील कोणालाही न भेटताच तिचे गावी निघून गेली असेल असा सर्वांचा समज होतो व ते सर्व मित्र मैत्रीण सेंडऑफ पार्टीसाठी ठरलेल्या हॉटेलमध्ये जाण्यास निघून जातात. इकडे त्या रिक्षावाल्याने वाटेतच प्रीतीची तब्येत खूपच बिघडलेने त्याने तिला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले असते. त्यामुळे प्रीतीचा कॉलेजचे तिचे शेवटचे वर्षाचा शेवटचा पेपर चुकलेला असतो. पण याची तिला जाणीवच नसते. संध्याकाळ झाली तरी तिला शुद्ध आलेली नसते मग हॉस्पिटलमधील डॉक्टर साताऱ्याला तिचे घरच्यांना तिचे मोबाईल मधील फोन नंबर पाहून फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतात.
मुंबईला त्याचे घरी जाण्यासाठी निघालेला आर्यन खूप निराश हताश होतो. त्याच खूप प्रेम असते प्रीतीवर पण प्रीती त्याचेशी अशी वागत असलेने तो खूप डिप्रेस झालेला असतो. त्याला तिला खूप काही सांगायचे होते खूप काही बोलायचे होते तिच्याशी पण ती शेवटचे दिवशी त्याला न भेटल्याने त्याला तिचे मनात काय आहे याचा अंदाज आलेला असतो. म्हणूनच तिचे सारे आठवणी विसरण्याचा प्रयत्न करीत आर्यन तिने दिलेल्या एक-एक भेट वस्तू तो ट्रेनचे दरवाजा जवळ बसून ट्रेनमधून खाली फेकत असतो. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तो स्वतःशीच ठरवतो यापुढे आपण प्रीतीशी अजिबात संपर्क नाही करायचा तिच्याशीच नाही तर कॉलेज ग्रुप मधील कोणाशीच नाही बोलायचं आपण कोणाशीच नाही संपर्क ठेवायचा. असा मनात विचार करत तो आपला बॅगेतील स्वतःचा मोबाईल देखील फेकून देतो चालत्या ट्रेनमधून.
मग रात्री उशीरा प्रीतीचे आई-बाबा प्रीतीला पाहण्यासाठी साताऱ्याहून पुण्याला येतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटलेवर डॉक्टर त्यांना पुढील सहा-सात महिने तरी तिची पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला देतात. दुसरे दिवशी दुपारी प्रीतीला शुद्ध येते आणि तिचे लक्षात येत की तिचा कॉलेजचे शेवटचे वर्षाचा पेपर चुकला आहे. इतका दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेचे शेवटचा पेपर चुकलेने तिला तिचा निकाल तेव्हाच समजलेला असतो.. "आई बाबा.. मला माफ करा मी .. मी नापास होणार.. माझा शेवटचा पेपर चुकला.. मला काय झाले काहीच नाही कळले.. मला तुमचे स्वप्न नाही पूर्ण करता आले.." ती रडत रडत आई बाबांची माफी मागत असते. तेवढयात तिथे हॉस्पिटलचे डॉक्टर येतात आणि त्यांना पाहून प्रीती डॉक्टरांना विचारते "डॉक्टर मला काय झाले आहे?? अचानक मी अशी उलट्या येऊन बेशुद्ध कशी पडले.. मला कॉलेजच्या पेपरलाही नाही जाता आले.. काय झाले आहे मला..सांगा ना प्लिज.." यावर डॉक्टर तिला सांगतात "काही नाही बाळ.. ठीक आहेस आता.. तू स्वतःची काळजी घे, वेळेवर खात पीत जा, जास्त उपाशी नको राहू, जागरण नको करू.. काळजी करण्याचे कारण नाही, वेळेवर औषधे घे लिहून दिलेली, बाकी सगळे आम्ही तुझ्या आई बाबांना सांगितले आहे.. ते घेतील तुझी काळजी.." असे बोलून डॉक्टर प्रीतीचे आई बाबांना "तुम्ही हवे तर उद्या डिसचार्ज घेऊन तीला उद्या तुमचे घरी घेऊन जाऊ शकता.." असे प्रीतीचे आई वडिलांना सांगून निघून जातात. "काय झाले आहे मला आई-बाबा.? डॉक्टरांनी काय सांगितले आहे तुम्हाला.? सांगा ना.. काय झाले आहे ते ..??" प्रीतीचे ते प्रश्न ऐकून प्रीतीचे आई-बाबांचे डोळे पाणावतात..
प्रीतीचे आई बाबा तिचे कोणत्याच प्रश्नांची उत्तरे न देता हॉस्पिटलचे तिचे रूममधून बाहेर निघून जातात. दुसरे दिवशी सकाळी हॉस्पिटल मधून डिसचार्ज घेऊन तिचे आई बाबा प्रीती ज्या हॉस्टेलवर रहात असते तेथून ते तिचे सर्व साहीत्य घेऊन प्रीतीला तिला घरी साताऱ्याला घेऊन जातात.. घरी गेलेवर देखील तिची तब्येत थोडी खराबच असते तिच्या कोरड्या उलट्या आणि मळमळ संपूर्ण प्रवासात व घरी आलेवर देखील चालूच होती. प्रीती काही वेळानी तिचे आईचे रूम मध्ये जाते आणि आईला विचारते "सांग ना आई मला काय झाले आहे?? डॉक्टरांनी काय सांगितले आहे तुम्हाला?? तुम्ही हॉस्पिटलमध्येही मला काहीच नाही सांगितलं.. नक्कीच काही तर लपवताय तुम्ही माझेपासून.. सांग ना गं आई.. काय झाले आहे मला.. तुम्ही दोघे काय लपवत आहेत माझेपासून..? आणि आल्यापासून पहाते मी तुम्ही दोघेही खूप अस्वथ आहेत..
क्रमशः - भाग ४
- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर