प्रलय-१८
भिती म्हणजे काय याचा खरा अर्थ आयुष्यमानला आता समजला होता . तो बुटका नक्कीच नरभक्षी होता . त्यांनं जेवढे म्हणून सुटायचे प्रयत्न करता येतील तेवढे केले होते , पण त्या बेड्यामधून सुटणे अशक्य होतं . तो बुटका आता मोठ्या चाकुला धार लावत होता . नक्कीच त्याचा मृत्यू त्याला जवळ दिसत होता .
त्यावेळीच आजूबाजूने चित्रविचित्र आवाज येऊ लागले . कोणतातरी प्राणीही जोरजोरात ओरडत असल्यासारखे वाटत होते . पण असा आवाज आयुष्यमान यापूर्वी कधीच ऐकला नव्हता . मात्र तो आवाज ऐकून ते बुटका व बुटकी जरा जरा घाबरल्यासारखे वाटले दोघेही पटकन तळघरातून वर निघाले . मात्र ते वर जाण्याआधीच तळघराचा दरवाजा तोडत काहीतरी आत आले . खोलीत अंधार असल्यामुळे नक्की काय होतं ते कळत नव्हतं . ते तळघराच्या पायर्या उतरत होती खाली आले . आयुष्यमान जवळ जात त्याने आयुष्यमान छातीवर काहीतरी टेकवले.....
खाली आलेला प्राणी होता . त्यांन आयुष्यमानच्या छातीवरती आपल्या शेपटीचा टोक टेकवलं होतं . त्याच्या शेपटीच्या टोकाला वर्तुळाकार होता . लोखंडासारखा तापलेला तो गोलाकार आयुष्यमान छातीवर टेकल्यानंतर आयुष्यमान वेदनेने जोरात किंचाळला . त्याच्या छातीवरती कसलीतरी चिन्ह तयार झालं होतं . त्या प्राण्याने त्याला ज्या छळणी यंत्रावर ती बांधलं होतं ते तोडून टाकलं . आयुष्यमान आता जमिनीवरती पडला होता......
ज्यावेळी त्या प्राण्याने आयुष्यमानच्या छातीवरती ते चिन्ह उमटलं . त्यावेळी आयुष्यमान च्या डोक्यात आठवणींचा कल्लोळ माजला . त्या आठवणी फक्त त्याच्या आयुष्यातील नव्हत्या , तर विचित्र होत्या . त्या कधी त्याने अनुभवल्या नव्हत्या . कितीतरी आठवणी होत्या ....एकामागून एक आठवणी त्याच्या डोक्यात नव्याने निर्माण झाल्या होत्या . अचानक आलेल्या या सार्या आठवणी मुळे तो चक्रावून गेला . त्याचं डोकं भणभणू लागलं . डोळ्यासमोर चित्र विचित्र दृश्ये दिसू लागली . आठवणींच्या डोंगराखाली त्याचा जीव गुदमरून चालला होता.....
' त्याला दिसत होती काळी भिंत . तिथे विक्रम उभा होता . बाजूला त्याचे सैनिक , ती भिंत पडत होती......
' त्याला दिसत होते अंधभक्त ते सामान्य नागरिकांना मारत होते......
' त्याला त्रिशूळ , तलवार आणि धनुष्यबाण सैना दिसत होत्या...
' त्याला संपूर्ण पृथ्वीचा राजा दिसत होता . त्याचे तीन राजपुत्र दिसत होते...
' त्याला पहिला प्रलयकाळ दिसला . ज्यावेळी सर्व माणसे एकमेकांची शत्रू झाली होती . पृथ्वीवरून माणूस ही प्रजाती नष्ट होणार होती . सर्वत्र त्याचं साम्राज्य असणार होतं . सर्वत्र प्रलय माजला होता........
ते दृश्य पाहून आयुष्यमानच्या डोक्याच्या ठिकऱ्या उडायच्या बाकी राहिल्या होत्या . तो वेदनेने बेशुद्ध झाला...........
जंगली सेनेच्या प्रमुखाचा तळ त्याठिकाणी होता . जंगली सेनेच्या अनेक टोळ्या संपूर्ण जंगलात विखुरलेल्या होत्या . त्या दोघींनी मुख्य तळावर जाण्यासाठी असलेल्या पाहऱ्याच्या तीनही टोळ्या पार केल्या . पण जेव्हा त्या आत गेल्या तेव्हा तेथील सैनिकांनी त्यांना बंदी बनवलं . दोघेही गुपचूप बंदी झाल्या.....
जंगली सैन्याची आता सभा होणार होती . त्यांना त्यांच्या प्रमुख समोर नेण्यात आले . आजूबाजूला सर्व नागरिक व सैनिक उपस्थित होते.....
" या दोघीसाठी तर कोणीही तयार होईल ........
बोला तुम्ही याठिकाणी कशासाठी आला आहात.....?
तुमच्या इकडे पुरुषांची कमी आहे काय.....?
त्या प्रमुखाच्या डोळ्यात वासना होती . बोलण्यात गर्व होता ...... आरुषीने सरळ मुद्याला हात घालतात बोलायला सुरुवात केली...
" तुम्ही माझ्या आदेशा खाली माझे सैनिक होऊन माझ्यासाठी लढायला येणार आहात . मी तुम्हाला आदेश देते , तुमचे सर्व सैनिक घेऊन आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला......
आरुषीच्या वाक्याबरोबर त्याठिकाणी हास्याचे फवारे उडाले . सर्वजण मोठमोठ्याने हसू लागले.....
" आमच्या येथे बायका फक्त झोपण्यासाठी , पुढचा वारस देण्यासाठी आणि आणलेलं अन्न बनवून घालण्यासाठी असतात . बाकी गोष्टी बोलायचा त्यांना अधिकार नसतो...... माझ्या राणीचा आदेश देखील येथील सैनिक मानत नाहीत , मग तू तर कोण कुठली......?
" मी शेवटचे सांगते आत्ताच्या आत्ता तुम्ही माझा राणी म्हणून स्वीकार करा ......अन्यथा तुम्हाला तुमच्या मृत्यूला सामोरे जावे लागले....
" आमच्या येथे राणी होण्यासाठी प्रमुखा बरोबर एक रात्र झोपावे लागते........
त्याठिकाणी असलेल्या प्रमुखाच्या शेजारी उभा असलेला एक सैनिक निर्लज्जपणे बोलला . त्याबरोबर पुन्हा एकदा सर्वजण हसू लागले . आरूषीने मोहिनी कडे बघितले .
" फक्त जो बोलला त्यालाच....
मोहिनीने काही क्षणासाठी डोळे झाकले....
जो सैनिक ते वाक्य बोलला होता त्याचं शीर धडापासून वेगळे झालं होतं .
जंगली सेनेकडे असलेल्या प्रमुख प्राण्यांपैकी एक प्राणी म्हणजे जुगलू.... ते सामान्यता छोटे असतात आणि प्रत्येक जंगली कडे एक जुगलू असतोच. ते सांगेल ते काम करतात . प्रत्येकाच्या पाठीवर असलेल्या दोरीला एक छोटीशी झोळी असते त्या झोळीमध्ये जुगलू असतोच ........
त्याचे शीर जेव्हा धडापासून वेगळे झाले आणि रक्ताचे शिंतोडे उडाले ; त्यावेळी सर्वजण अवाक् झाले भीतीने घाबरले....
" म्हणून मी म्हणते , तुम्हाला अजून जीवितहानी नको असेल ; तर आत्ताच्या आत्ता माझा राणी म्हनून स्विकार करा..... परंपरेने चालत आलेल्या मारुती घराण्याची मी वंशज आहे . या संपूर्ण पृथ्वीतलावर माझा अधिकार आहे . म्हणून मी तुम्हाला आदेश देण्यास पात्र आहे....
पण आरुषीचे हे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच आजूबाजूला उभे असलेले चार-पाच जंगली त्याच्यांवरती धावून आले . त्याबरोबर मोहिनी त्यांच्या त्यांच्या जुगुलुचा वापर करून त्या चारही जंगली लोकांची शीरे धडापासून वेगळी केली ......
त्याच वेळी आजूबाजूला असलेल्या सर्व चांगली लोकांनी संतापून आवाज काढायला सुरुवात केली . मोहिनीने तिचे डोळे झाकले . जंगली लोकांकडे प्रामुख्याने तीन प्रकारचे प्राणी होते . त्यातील एक म्हणजे जुगलू , दुसरे म्हणजे घोडे ... हे दोन प्राणी जास्त प्रमाणात होते . जेव्हा जंगली बाहेर भेटायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर हे दोन प्राणी हमखास असायचे . तिसरा प्राणी फक्त जंगलातच असायचा व जंगलातील तळाची सुरक्षा करण्यासाठी वापरले जायचा...
तिसरा प्राणी म्हणजे शिकारी कुत्रा . हे कुत्रे नेहमीच्या कुत्र्यापेक्षा मोठे होते....
जंगली लोकांचे घोडे इतर सर्व घोड्यापेक्षा पेक्षा हुशार असत . असे म्हणतात त्यांच्यावर ती लावून दिलेली लुट ते बरोबर त्यांच्या तळावर नेऊन सोडतात . त्यांना म्हणे ठिकाणांची नावे सांगितली की ती त्या ठिकाणी पोहोचवतात ......
मोहिनीने जेव्हा डोळे उघडले , त्यावेळी प्रत्येक जंगलीच्या गळ्यावरती तलवार होते , ती तलवार त्याच्या जुगलूनेच धरली होती.....।।।
" जर तुम्हाला हे जीवन नकोसं वाटत असेल तर तुम्ही हालचाल कराल अन्यथा मी जे बोलत आहे ते ऐकाल मारुतांची बारावी वंशज , मी मोहिनी संपूर्ण पृथ्वीतलाची राणी तुम्हाला आदेश देत आहे , तुमच्या सर्व टोळ्यांना व त्यांच्या सैनिकांना एकत्र करा ....आपण संसाधन राज्यावर आक्रमण करणार आहोत.....
त्यावेळी जंगली लोकांचा प्रमुख चालत पुढे येऊ लागला.....
" परंपरेने असलेले राजा आणि राणी आम्ही जंगली लोक मानत नाही . आम्ही राजा व राणीची निवड करतो . प्रत्येक टोळीचा प्रमुख प्रमुखाची निवड करतो . ज्यावेळी जुना प्रमुख म्हातारा होतो , त्यावेळी ही निवड प्रक्रिया असते . निवडीसाठी प्रत्येक जंगलीला युद्ध खेळावं लागतं . त्या युद्धात समोरच्याला हरवावे लागतं......
तेही नीतिमत्ता आणि नियमाने.....
प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही
कुणापुढे स्वतःचं मस्तक झुकवत नाही......
पुढचं बोलल्या अगोदरच आरुषीने मोहनीला त्याचं मस्तक उडवायला सांगितलं . त्याच्या जुगुलूने तलवार चालवतात त्याचं मस्तक धडावेगळे केले.....
सर्व जंगली मध्ये संतापाची लाट पसरली.....
पण कोणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही . त्याच वेळी प्रमुखाची पत्नी पुढे येऊ लागली तिचाही मस्तक धडावेगळे केले .......
प्रमुखाला असलेली दोन लहान मुले पुढे येण्याची धडपड करत होती पण जंगली लोकांनी त्यांना थांबवून ठेवणार सर्वांची मस्तके आरुषी पुढे झुकले होते पण त्यांच्या नजरेत संताप होता . संधी मिळताच ते आरुषीला मारायलाही मागेपुढे बघणार नव्हते .....
आरुषीने रुद्राला पुढे बोलावलं त्याच्याकडे हात करत ती म्हणाली......
" हा तुमचा नवीन प्रमुख असेल .....
पण आरुषीचं हे वाक्य पूर्ण होण्याअगोदर कुणीतरी चाकू फेकून मारला . आरुषीच्या खांद्याला जखम झाली..........
तो एक लहान मुलगा होता . दहा वर्षाचा असेल .
" मारुन टाक त्याला......
रागाने ओरडत आरुषी म्हणाली.......
" आरूषी नको..........
असं ओरडत रुद्र त्या मुलाकडे धावला तोपर्यंत एका जुगुलूने चाकू चालवत त्याचा गळा कापला होता . गळ्यातून पडणाऱ्या रक्ताबरोबर तोही जमीनीवर पडू लागला पण जमिनीवर पडण्या अगोदर रुद्राने त्याला त्याच्या मिठीत घेतले . रुद्रा रक्ताने भरून गेला . तो मोठ्याने रडत होता.
तो रुद्राचा मुलगा होता . त्याला एका जंगली मुलीपासून पासून झाला होता.....