Pralay - 17 in Marathi Adventure Stories by Shubham S Rokade books and stories PDF | प्रलय - १७

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

प्रलय - १७

प्रलय-१७

       ज्यावेळी आयुष्यमान हवेत उलटा लटकला .  त्याच्या मानेवरती काहीतरी टोचल्या सारखे वाटले .  हळूहळू त्याच्या सर्व जाणीवा व संवेदना बधीर होत गेल्या .  शेवटी डोळ्यापुढे संपूर्ण अंधार पसरला .  तो बेशुद्ध झाला . 

       ज्या वेळी त्याला जाग आली तो जमिनीवरती पालथा झोपला होता .  हात वरच्या बाजूला केले होते व लोखंडी हात बेड्या ज्या जमिनीत रुतलेल्या होत्या त्याच्यात अडकवले होते .  पायांच्या बाबतीतही तसंच होतं . त्याचे हात व पाय दोन्ही  गुंतवले होते . जमिनीला असलेल्या त्या बेड्या  मध्ये त्याचा हात व पाय गुंतवले होते . त्याच्यातून निसटणे अशक्य होते .  त्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती .  त्याने मान वळवून इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला पण काही नाही ,  सर्वत्र अंधार होता.......

     पण तेव्हाच त्याच्या कानी आवाजाची कुजबुज आली .  कोणीतरी त्याठिकाणी येत होतं . त्यांनं मान वळवून पाहिलं , अंधार असल्याने त्याला काही दिसले नाही . मात्र हळूहळू त्या माणसाबरोबर खोलीत उजेड  आला . त्यांच्याकडे मशाल असावी .  ती दोन लहान मुले  वाटत होती...

       हळूहळू खोलीतल्या गोंगाट वाढत होता .  ती दोन लहान मुले आपापसात वेगळ्याच भाषेत बोलत होती .  त्यांचं एकमेकात भांडण चाललं असल्यासारखं वाटत होतं.भांडता भांडता त्यातील एकाने कोणतीतरी साखळी ओढल्यासारखा आवाज आला . आयुष्यमान हळूहळू वर जात होता . त्याला इतका वेळ वाटत होतं की तो जमिनीवरती  आहे मात्र तो एका छळणीयंत्रावरती बांधलेला होता ...... त्याच्या हाता पाया वरील बेड्यांची य पकड सैल झाली .  त्याच्या समोर असलेली फळी काढून घेतली . त्याला आता खोलीतील सर्व देखावा दिसत होता.....

         जी दोन मुले भांडत होती ती दोन मुले नव्हती .  आयुष्यमानला आता कळलं की ते दोन बुटके होते .  ते दोघे नवरा-बायको असावेत असं वाटत होतं . त्या खोलीत एक दिवा व ते छळणी यंत्र सोडलं तर दुसरं काहीच नव्हतं .  एखाद्या तळघराच्या खोलीसारखी ती खोली वाटत होती . 

    बुटक्यांची प्रजात ज्यावेळी पहिल्यांदा प्रलय आला होता त्या वेळीच नष्ट झाली होती असं म्हणतात .  पाच ते सहा वितांचे हे बुटके असायचे .  पण हे दोन बुटके जिवंत कसे राहिले ...?  या जंगलात काय करत होते....? आणि त्यांनी आयुष्यमानला का पकडलं होतं हे काही कळायला मार्ग नव्हता.....? आयुष्यमान ला मोहीनीची आठवण येत होती . तिला शोधण्यासाठी तो निघाला होता , मात्र वाटेत या बुटक्यांनी पकडला . त्याला त्या बुटक्यांचा भयानक राग आला . तो त्यांच्यावरती संतापला . त्याने सैल झालेल्या बेड्यातून सुटायचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला .  ते बुटके त्याच्यावरती जोर-जोरात हसू लागले.... त्यामुळे आयुष्यमानला अजूनच राग आला .  तो रागाच्या भरात बोलून गेला.....
" आयुष्याच्या घटका भरल्या आहेत . तुमचा दोघांचा मृत्यू फार दूर नाही......
हे ऐकून ते दोघे पुन्हा जोरजोरात हसू लागले . त्यातला बुटका त्याच्या बायकोला उद्देशून म्हणाला ....

  " याचं मांस खायला मज्जा येईल असं वाटतंय . खूप गर्मी आहे याच्यात . कितीतरी वर्ष झाला आपण असलं मांस खाल्लेले नाही.....
     म्हणजे त्यांनी त्याला भक्ष्य म्हणून पकडलं होतं .  त्याला त्याच्याबद्दल , त्यांच्या इतिहासाबद्दल फार काही माहिती नव्हती  . पण ते नरभक्षी नव्हते हे त्याला माहीत होतं . त्यामुळे त्याला वाटलं हे बुटके त्याला घाबरवण्यासाठी मुद्दामून अशा गोष्टी करत आहेत  . त्यामुळे तो म्हणाला...
" बुटके कधीच नरभक्षी नव्हते . तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न केला , पण मी घाबरणारात्याला नाही.....
     त्यावेळी त्या त्याला खूप राग आला .  त्याचा चेहरा रागाने फारच विचित्र दिसत होता . बाजूला पडलेला लखलखता चाकू घेत त्याने आयुष्यमानच्या डाव्या हाताची करंगळी कापून बाजूला काढली....
        आयुष्यमान वेदनेने जोराने ओरडला .  त्याचा डावा हात बधीर झाला.  त्यातून पडणारा रक्ताचा थांबवत बुटका  म्हणाला
" मग तुला हे ही माहीत असेल की बुटके कधी खोटं बोलत नसतात.......
    असं म्हणत त्याने ती करंगळी तोंडात टाकली व करकरून चावत तो करंगळी मजेने खाऊ लागला  . आयुष्यमानचि डावा हात बधीर झाला होता .  तो पुन्हा बेशुद्ध होतो की काय असे त्याला वाटत होतं , आणि समोरचे दृश्य पाहून त्याला पोटात मळमळू लागले . त्याला ओकारी आली .  त्याच्या डोळ्यापुढे सारकाही फिरत होतं . त्याला खूप भीती वाटली . आयुष्यात पहिल्यांदाच इतका घाबरला होता.....

     वारसदाराच्या सभेत जाण्यापूर्वी ही नि सभेत गेल्यानंतरही त्याने बरेच अनुभव घेतले होते .  बऱ्याच गोष्टींना सामोरे गेला होता . पण त्याला इतकी भीती कधीच वाटली नव्हती .  तो मृत्यूलाही कधी घाबरला नव्हता , पण आता त्याला मृत्युंहुन भयानक भीती समोर दिसत  होती.....

     
       उत्तरेला असलेल्या सैनिकी तळाभोवती अंध भक्तांचा गराडा पडला होता . सर्वजण मध्यभागी गोळा झाले होते . बाजूला उभे राहून अंधभक्त त्यांची घोषणा देत होते . कोणताही अंधभक्त पुढे सरत नव्हता . 

" सिरकोडा इसाड कोते ....
फक्त हाच आवाज ऐकू येत होता .  शंभरच्या वर तरी अंधभक्त त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले असावेत....

    " दक्षिणेच्या देव जेव्हा जागृत होतो तेव्हा अंधभक्त तयार होतात पण दक्षिणेचा देव दक्षिणेकडे भक्त उत्तरेत काय करत आहेत .... " 
सुरक्षा प्रमुख रघूराम म्हणाला....
" अंधभक्त आणि दक्षिणेचा देव यांचा काही संबंध नाही .  ज्यांना थोडस तंत्र माहीत आहे .  तो भक्तांना जागृत करु शकतो .  नक्कीच आपल्यातल्याच कोणाचातरी काम आहे ,  ज्यांना हा उत्तरेतील सैनिक तळ नको आहे , त्यांनी भक्तांना पाठवलं असावं .....
    त्यावेळी भिल्लव म्हणाला....
"  म्हणजे महाराज विक्रमांना भक्तांना जागृत करण्याची किवा महाराज विक्रमांचे एखाद्या विश्वासुला भक्तांना जागृत करण्याची पद्धत माहीत आहे का काय.....

"  तुला काय वाटतं भिल्लवा महाराज विक्रम  ते स्वतः भक्त अंधभक्त असू शकत नाहीत......

त्यावेळी अद्वैत म्हणाला ...
   " ते काहीही असो.  ते फक्त पंधराजन होते . त्यांनी आमच्या तीनशे जणांच्या तुकडेच हाल बेहाल केलं होतं..... आता तर शंभरच्या वर आहेत . आपण यांच्याशी लढा देऊ शकत नाही .  हे अनैसर्गिक आहे.......

  त्यावेळी मंदार म्हणाला " म्हणूनच मी मघाशी म्हणालो होतो निसर्गाच्या विरोधात गेलं की निसर्ग त्याचा  हिसका बरोबर दाखवतो ....
असं म्हणत त्याने आपल्या पिशवीतून पुन्हा एकदा शिट्टी काढली आणि मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केली....... शिट्टीचा आवाज सर्व पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचावा म्हणून त्याने तिच्यासमोर ध्वनिवर्धक धरला होता . त्या ध्वनिवर्धकामुळे  शिट्टीचा आवाज फारच मोठा झाला होता . 
त्या शिट्टीची धून बाटी समाजाच्या बासरी प्रमाणानेच होती .  फक्त थोडासा फरक होता . ती धून ऐकताच भक्तांची घोषणा बंद झाली व ते हळू हळू शांत होवू लागले . आणि  आल्या पावली परतू लागले......

    त्याच वेळी कोणीतरी झाडावरून  तंत्रज्ञ मंदाररावरती चाकू फेकून मारला . त्या चाकूचा घाव मंदारच्या हृदयाजवळ झाला . तो  खाली कोसळला . त्याबरोबर  आल्या पावली परत निघणारे अंधभक्त पुन्हा मोठ्या आवाजात घोषणा देत पुढे सरकू लागले......

    सर्व सैनिक त्या गोलाच्या बाहेरच्या बाजूला झाले व आत सामान्य नागरिक होते .  अंधभक्त आता पुढे सरकत होते . एक सैनिक त्वेषाने चालून गेला ,  त्याने तलवारीचे घाव केले . अंध भक्ताने चपळतेने सर्व गाव चुकवले व त्याचीच तलवार घेऊन त्या सैनिकांचे शिर धडापासून वेगळे केले......

    त्या सैनिकाचे धडावेगळे झालेले शरीर पाहून सर्व सैनिकांना  राग आला . अधिरथ तावातावाने आपली तलवार घेऊन पुढे चालत गेला . त्याने एका अंधभक्त वरती वार केला . तो भक्त त्याचे वार चपळतेने चुकवायचा प्रयत्न करत होता ,  पण अधिरथ सारखा पट्टीचा तलवारबाज संपूर्ण राज्यात नव्हता . बराच वेळ त्यांचं ते द्वंद्व चालू होतं . अधिरथ वार करायचा आणि तो भक्त चुकवायचा .  शेवटी अधिरतने  त्या भक्ताचे दोन्ही हात खांद्यापासून वेगळा केले . नंतर त्याने त्याचे शीर धडापासून वेगळे केले . काही मिनिटांसाठीच हे द्वंद्व चाललं होतं . इतरांना फक्त जलद हालचाली दिसल्या होत्या .फक्त एका अंधभक्ता बरोबर लढूनच अधिरथ ला थकवा आल्यासारखे वाटत होते .तो चक्कर आल्यासारखं होऊन खाली पडला . आता त्याच्या वरती एकदम चार ते पाच अंधभक्त चालून आले होते . भिल्लव , अद्वैत व इतर सैनिक अधिरताचा बचाव करण्यासाठी पुढे सरले... त्याचवेळी आवाज आला .....
   " थांबा आपल्याला कोणतीही जीवित हानी नको आहे..... 
    त्यांच्यासमोर झाडावरती एक काळसर आकृती साकारली होती . ती काळसर  आकृती कसल्यातरी काळसर ढगावरती किंवा पक्ष्यावरती असल्यासारखे वाटत होते... तो आवाज खर्जातला होता.....
" महाराणीचा लहान पुत्र म्हणजेच  नवीन राजकुमार ,  फक्त त्यांना घ्या व माघारी फिरा .....इतर एकाचीही जीवितहानी आपल्याला नको आहे.......

    पुन्हा एकदा भक्त त्वेषाने पुढे सरले . वाटेत जो कोणी येत होता त्याला ते बाजूला सारत होते , नाही झाला तर बेशुद्ध करत होते आणि पुढे सरत होते . त्यांना आता कोणीच थांबवू शकत नव्हतं .  महाराणी शकुंतलेच्या कुशीत असलेल्या नवीन राजकुमारा वरती हे संकट आलं होतं......


   त्रिशूळांच्या सैन्याबरोबर सुरू असलेल्या जलधि राज्याचं युद्ध थांबलं होतं .  बऱ्याच सामान्य लोकांचे त्यात जीव गेले होते , जे सैनिक म्हणून त्यांच्यासमोर उभा राहिले होते  .  काळ्या भिंतीपलीकडे असलेली त्रिशूळ सैना आणि त्यामध्ये असलेले सामान्य लोक .  त्यांना कसेही करून त्यांच्या सामान्य स्थितीत आणायला हवं होतं .   हे कसं शक्य झालं आणि ते लोक भिंतीपलीकडील  सैन्यात कसे गेले  हेही शोधायला हवं होतं . सर्वजण पुन्हा एकदा एकत्र आले होते आणि काय करायचे याचा विचार करत होते .....? पलीकडे जाऊन एका  त्रिशूळ सैनिकाला धरून त्यांनी अलीकडे आणलं होतं . त्याला समोर उभा केलं होतं . पण तो पुन्हा पुन्हा बोललं तरीही शांतच राहत होता . तो बोलतच नव्हता जणू काही तो कोणाला ओळखतच नव्हता .  अलीकडे आणलेला तो सैनिक दुसरा दुसरा कोणी नव्हता तर राज्याच्या सेनापतीचा पुत्र होता , ज्याने अजून वयाची सोळावी ही ओलांडली नव्हती......

    त्याठिकाणी कोणाचीच काहीच बुद्धी चालत नव्हती .  सर्वांनी राजमहश्री सोमदत्तना काहीतरी बोलण्याची विनंती केली . त्यावेळी राजमहर्षी सोमदत्त उभारले व बोलू लागले......

    " कोणतीही गोष्ट नष्ट करण्यासाठी ती कशाची व कोणत्या गोष्टी पासून बनलेली आहे हे माहीत असणं गरजेचं असतं .  जर आपल्याला त्रिशूळाची सेना नष्ट करायची असेल किंवा आपल्या लोकांना आपल्या माणसात आणायचं असेल तर ते  त्रिशुळाचे सैनिक बनले कसे हे जाणून घ्यावे लागेल......
         त्रिशूळ तलवार व धनुष्यबाण या तिन्ही सेना भिंतीपलीकडे सम्राटाने बनवल्या होता । ज्यावेळी काळी भिंत बांधली ,  त्याच्याही आधी या अस्तित्वात होत्या . तो वेळोवेळी या सेना बनवायच्या नंतर तो या गरज संपल्यानंतर नष्टही करून टाकायचा.....
      
         तुम्ही त्या त्रिशूळ सैनिकाच्या पाठीवरती पहा ,  एक त्रिशूळाचा व्रण असेल .  " 

   सर्वांनी त्या सेनापतीच्या मुलाच्या पाठीवरती पाहिलं .  एक तापलेला त्रिशूळ पाठीवर ठेवल्यानंतर जसा  व्रण होतो तसा भलामोठा व्रण त्याच्या पाठीवरती होता.....

" तो  कसा बनवला गेला तसाच नष्ट करता येऊ शकतो .  त्यासाठी फक्त आपल्याला काळ्या महालाच्या शस्त्रागारात असलेला तो त्रिशूळ आणावा लागेल......
तो त्रिशूळ आणण्यासाठी आपल्याला गती हवी आहे आणि गतीसाठी उडत्या बेटांच्या मदतीशिवाय आपल्याला पर्याय नाही .....