Avyakt - 10 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | अव्यक्त (भाग - 10)

Featured Books
Categories
Share

अव्यक्त (भाग - 10)

धुक्याची रात्र....

थंडीचा गारवा वाढतच चालला नुकत्याच शरद ऋतुचे आगमन झाले .क्षितिजाच्या पल्याड सुर्य जाऊन मावळतो तसा काहीसा न संपणारा न मिटणारा हा जीवनप्रवास अधोरेखित होतो रोज उजाडतो सुर्य पहाटेच्या किरणांसोबत दिवस ढळत जातो रात्र अधुक आपल्याच धुंदीत काळोख पसरवत पाऊलखुणाने विळखा घालते . त्या रात्रीची मी दिवानी ,मंदमंद वाहणारा तो वारा अंगाला स्पर्श करून जातो मोहात त्या रात्रीच्या मोहून घ्यावे स्वत:ला निसर्गांच्या सान्निध्यात बंद्धिस्त करावे ह्या मनाला किती अल्हादायक ही संजीवसृष्टी म्हणत मी एका भलत्याच शोधार्थात पडले .कुणा जीवाच्या नाही एका वेड्याच आणि खुळ्याच प्रश्नाच्या ..
पुर्ण चंद्र झालेली रात्र असते ती पौर्णिमेची .मोकळे आकाश ते न वास्तव्यास त्यांच्या चांदण्याचा सडा न ढगात लाजर्या चंद्राचे लडिवाळ ते रूप हसरे अशी रात्र ती अमावस्येची किर्रकिर्रर्रर्र घोगवणारा आवाज कर्णाला साद घालणार्या रातकिड्याचा .दृष्टिस जरा चमकावा काजवा रात्रीचा बाकी सारे काळोखात विलीन वृक्षवल्ली ,फुले ...रात्रीच असं सोंग मनाला पटतं माझ्या. काळोख्या त्या रात्री वर आकाशाकडे दृष्टिक्षेप करतं बघितले .प्रश्नाची नेहमीच कालवाकालव होते आजही मनाने असाच एक प्रश्न छेडला होता .रात्रीचे हे रूप साजेसे वाटते पौर्णिमेची ,अमावस्येची असते रात्र काळोखी ही तर असते का धुक्याची रात्र??? 
रोजपहाटे उठून धुक्याच्या रात्रीचा शोधार्थ बरेच काही गवसेल पण धुक्याची रात्र शोधता शोधता अख्खा हिवाळा मात्र संपला आशेच्या हिंदोळ्यावर जगत मनाला आस होती वाट होती त्याच वाटेवरून थबकणार्या पावलांना माझ्या ह्याच येणार्या हिवाळ्याची .तो प्रवास परत सुरू झाला शोधार्थात धुक्याच्या रात्रीचा पहाटे पाच वाजता नकळत तीच उमेद मनात ठेऊन जाग यायची .भन्नाट काळोख सर्व अवतीभोवती पसरलेला .अंगणातला पिंपळ झोपेत मग्न .आकाश कधी चांदण्यानी भरलेले असते त्या आकाशकडेच चांदण्यानी शिंपडलेल्या सड्याकडे बघण्याचा मोह काही आवरेना पण धुक्याच्या शोधार्थ आपली पावले त्या शोध मोहिमेकडे वळवली पण अंगाला मात्र गारवा भेदायचा धुक्याची रात्र अजूनही गवसली नव्हती पण त्या एका रात्रीच्या शोधात बरेच दुर्गुंन माझ्यातले गळून पडले .चांगल्या सवयी लागल्या त्या म्हणजे लवकर उठायचे .निसर्गांचा सहवास खरचं हवाहवासा वाटतो .पक्षाचा आवाज कानी गुंजतो . रस्त्याने जाताना भयाण शांतता .परसबागेच्या समोर कोणीनसतानाही आपणच एकटे ह्या आकाशाखाली उभे अशी भिती कुठेतरी गुडूप झालेली असते .रात्र आणि पहाट अंगणातला पिंपळ त्याच्या सोबत तर जणू मैत्री झाल्यासारखे भासते वाटतं ती सळसळणारी पानेही आपल्या सोबत हितगुज साधतात आणि त्यांच्या सोबत आपल्या अतर्रंमनाचा संवाद सुरू होतो ऐका वेगळ्याच विश्वात आपण रमतो . 
धुक्याचीही रात्र असते हे माझ्या मनाने जाणले होते आणि तो शोध माझा अद्यापही निरंतर त्याच वाटेवर होता . गेल्या आठवड्यात माझा पेपर होता कॉलेज जिल्हायात त्यासाठी ट्रेनचा प्रवास थंडीचा वरून मारा साडेपाच पावने सहा ट्रेनचा टाईम .एवढ्या पहाटे उठून ट्रेन पकडणे म्हणजे तारेवरची कसरत तरीही परिस्थिति सोबत जुळवून घेण्याची सवय होतं असते . चार वाजता उठूनही त्या दिवशी ट्रेन धाडधाड करत डोळ्यासमोरून गेली .पेपर होता त्या दिवशीचा आणि अशात ट्रेन चुकने म्हणजे किती वाईट वाटतं .क्षणभरासाठी मन खुप गहिवरून आले पण बिनधास्त जगण्याला मी जास्त महत्त्व देते .दुख: काय टिचभर त्यासाठी रडतं बसनं माझ्यात तो अवाजवी गुण नाही .सहा वाजले होते स्टेशनवर तिथे थांबण्यात अर्थ नव्हता .माझ्या सोबत माझी जिवलग मैत्रीण राशी होती .तिथून अँटोस्ट्याड कडे पावले वळवली सहावाजले तरी रस्त्याने किर्रर्र अंधार होता कोणीच नजरेस नव्हते पडतं दोनचार रस्तयाने जाणारे सोडले तर वर्दळ नव्हतीच .थंडी अंगाला भेदत होती खुप गारवा होता त्या दिवशी दिवसही लवकर उजाडत नव्हता .पेपरच्या टाईम पर्यत नऊ वाजेपर्यतरी आम्हाला सेंटर वर पोहचायचे होते .अँटोस्टँडवर ही आँटो नव्हते .स्पशेल जाणारा एक अँटो आला दोन माणसे आधीच बसुन होती .आम्हाला बसायला परवानगी दिली हे बरं झालं .अँटोतून जाताना दुरवरच काहीच दिसतं नव्हते .दिवस उजाडत होता पण शेताच्या कडेला धुक्याचा पंढरा थर जाणवत होता . कॉलेज मध्ये पोहचल्यावर गार्डंन मध्ये पानावर ते सुर्यकिरणाच्या प्रकाशात लाल तांबुस सोनेरी रंगाने माखलेली ती धुके चमकत होती त्या धुक्याच्या रात्रीची जाणीव करून देत होती.
शेवटी धुक्याची ती रात्र गवसली मला अशा नागमोडी प्रवासातून थंडीचा कडाक्यात धुक्याचीही रात्र असते निळीशार धुंदमखमली रात्र पांढरे धुके दवाच्या गोठण्यात पहाटेसाठी आपले अस्तित्व शाबूत ठेवते . आपल्या भेटीसाठी ही रजनी रोज येते नदीच्या शिवारात तिचीच चाहूल मंदमंद वाहणारा वारा उसळत्या लहरी सोबत वहात जाते ... 
शरद ऋतु 
म्हटलं की
शहारतं मन
थंडीचा लाटेनं
दवबिंदूच्या रंगात 
रंगून जातं शिवारं 
धुक्याच्या सोबतीनं ....!!!!!