HAMIBRRAO BAHIRJI AANI BAHADURKHAN in Marathi Detective stories by MILIND KALPANA RAJARAM DHANAWADE books and stories PDF | हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान

Featured Books
  • किट्टी पार्टी

    "सुनो, तुम आज खाना जल्दी खा लेना, आज घर में किट्टी पार्टी है...

  • Thursty Crow

     यह एक गर्म गर्मी का दिन था। एक प्यासा कौआ पानी की तलाश में...

  • राम मंदिर प्राण प्रतिष्ठा - 14

    उसी समय विभीषण दरबार मे चले आये"यह दूत है।औऱ दूत की हत्या नि...

  • आई कैन सी यू - 36

    अब तक हम ने पढ़ा के लूसी और रोवन की शादी की पहली रात थी और क...

  • Love Contract - 24

    अगले दिन अदिति किचेन का सारा काम समेट कर .... सोचा आज रिवान...

Categories
Share

हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान

नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता...सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले...स्वराज्य अवतरले होते...रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता...साधू-संत...लहान-थोर...बाया-बापड्या...सर्व संतुष्ट झाले होते...सर्व आसमंतात राजांचे आणि रायगडाचे नाव दुमदुमत होते...आता कोणाचीही वाकडी नजर होणार नव्हती स्वराज्याकडे...राजे निश्चिन्त आणि संतुष्ट मनाने..लिंगाणा, राजगड, तोरणा; मकरंदगड, प्रतापगड, वासोटा आणि सभोवताली पसरलेल्या स्वराज्याची पाहणी करत होते...हवेत गारवा पसरला होता...राजांनी अंगाभोवती लपेटलेली शाल अजूनच लपेटून घेतली...आणि टकमक टोकावरून जगदीश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागले...

जगदीश्वराच्या मंदिरात प्रसन्न शांतता पसरली होती...आता लावलेल्या कापूर आणि धुपाचा वास वातावरणात भरून राहिला होता...आत गाभाऱ्यात पुजारी मंत्रो-उच्चार करत होते...आवाज आतल्या आत घुमत होता...एक दैवी अनुभूती येत होती...एव्हाना राजांनी आपल्या नेहमीच्या पूजेला सुरुवात केली होती...त्या मंत्रो-उच्चाराच्या गजरात राजे थोडावेळ ध्यानस्थ बसले...आणि डोळे उघडून पुजाऱ्याच्या दिशेने नजर रोखुन बोलले...बोला बहिर्जी बोला...आज काय खास बातमी आहे... ते ऐकून बहिर्जीच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू पसरले...राजांनाही त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची सवय झाली होती...

राजे पक्की खबर आहे २४ पुण्यापासून कोसांवर भीमेच्या काठी औरंगजेब बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग बहादूरगडावर वस्तीला आहे...बादशहाला २०० जातिवंत अरबी घोडे आणि एक कोटींचा खजिना घेऊन चालला आहे...पण भीमेचे पाणी पावसाने वाढल्यामुळे..मुक्काम अजून ५ ते ७ दिवस होईल...सैन्य पण २००० ते ३००० आहेत...चांगली संधी आहे..हे ऐकून राज्यांच्या डोळ्यांत चमक आली...राजांनी लगोलग हंबीरराव मोहित्यानां सांगावा धाडला... हंबीरराव पण धावत धावत मंदिरात आले...गाभाऱ्यात फक्त राजे आणि पुजारी बघुन गोंधळून गेले...राजांनी सदरेत न बोलवता इथे का बोलविले ते समजेना...राजांनी बहिर्जीनी आणलेली खास बातमी सांगितली...राजांचे बोलून झाल्यावर तो पुजारी हंबीरराव मोहित्याच्या पाय पडायला पुढे झाला...ते बघून ते अजूनच गोंधळून गेले आणि नकॊ नको म्हणत अजून पाठी झाले...राजे ते बघून अजून हसायला लागले...हंबीररावांना काही कळेचना तेव्हा त्या पुजार्‍याने आपली दाढी काढली...तेव्हा हंबीरराव मोहित्यानां कळले..हे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी आहेत...

राजे,बहिर्जी आणि हंबीरराव मोहित्यांनी डावपेच आखले...९००० हजारांची फौज घेऊन बहादूरगडाच्या दिशेने बहिर्जी आणि हंबीरराव निघाले...पण आता फक्त २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने दौडत होती आणि त्याचे नेतृत्व बहिर्जी करत होते ?? मग सात हजारांची फौज आणि हंबीरराव गेले कुठे ??... असो ..ती २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने दौडत निघाली...मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला...आणि फक्त २०० ते ३०० सैनिक किल्ल्यात ठेवून गडाचे दरवाजे उघडून मराठ्यांच्या दिशेने निघाली आणि काय आश्चर्य !!! मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठे रणांगण सोडून चक्क पळत सुटले... ते बघून बहादूरखान आणि मोगली सैनिकांना अजून चेव चढला...ते दुप्पट वेगात मराठ्यांच्या पाठलाग करू लागले...मराठे वाट मिळेल तिकडे सैरावैरा धावत सुटले...कोणीच हाती आले नाही.. शेवटी कंटाळून बहादूरखान आणि मोगली सैनिक पाठी फिरले...गडाजवळ येऊन बघतात तर काय ??? जिकडे तिकडे आग लागलेली...तबेल्यात एकही घोडा नाही..करोडोंचा खजिना पण जागेवर नव्हता...बहादूरखान कोकलताश जफरजंग वेडा झाला.. २०० ते ३०० सैनिक काही जखमी झाले..काही बांधून ठेवले होते..
आता बादशहाला काय तोंड दाखवणार ?? काय नजराणा पेश करणार?? मराठे आहेत कि भुतं आहेत?? आपणचं त्याना पळवून लावले?? मग झाले काय ??
बहादूरखानाला एका सैनिकाने झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याने फक्त आपले डोके गच्चं धरून हताश होऊन बसला...

झाले असे

बहादूरखान खान फार दूरवर गेला आहे समजताच बहादूरगडाच्या आसपास लपलेली ७००० हजारांची फौज आणि हंबीरराव मोहिते...बहादूरगडावर चालून आली..तिथल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही... एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले...मराठयांनी मोगली छावणी पेटवून दिली आणि आल्या पावली माघारी फिरले.. सर्व लूट रायगडाच्या पायथ्याशी सुखरूप पोहचती झाली... आणि राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला