Pausalyat twachechi kalji.. in Marathi Health by Anuja Kulkarni books and stories PDF | पाऊसाळ्यात त्वचेची काळजी-

Featured Books
Categories
Share

पाऊसाळ्यात त्वचेची काळजी-

पाऊसाळ्यात त्वचेची काळजी-

पाऊस प्रत्येकालाच हवा हवासा वाटत असतो.. ऊन वाढून वाढून आता अखेर पाऊस बरसायला लागला आहे. वातावरण प्रसन्न झाल आहे आणि पाऊसात करण्यासारख्या बऱ्याच योजना चालू झाल्या असतील. पण अचानक हवामान बदल होतो आणि त्याचा परिणाम आपल्यावर दिसायला लागतो. कित्येक जणांना नवीन फॅशन, नवीन स्टाईल ट्राय करण्यात रस असतो. पण फॅशन साठी हा ऋतू गैरसोयीचा ठरू शकतो. याचबरोबर, आरोग्यावर सुद्धा हवामान बदलाचा परिणाम होतो. अस पाहिलं गेल आहे की हवामान बदलामुळे त्वचा आणि केस ह्यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. आणि केस आणि त्वचा ही नेहमी उत्तम ठेवणे गरजेचे असते. पण पाऊसात त्वचेच्या आणि केसांच्या समस्या डोक वर काढतात. ते टाळण्यासाठी पाऊसात काय काळजी घेता येईल-

१. पाणी सेवन कमी न करणे –
"पाणी हेच जीवन" एक प्रचलित वाक्य. आपल्या शरीराला पाण्याची गरज ही नेहमीच असते. अगदी कोण्यात्याही ऋतू मध्ये शरीराला मुबलक पाण्याची आवश्यकता असते. पाऊसात तशी कमीच तहान लागते आणि साहजिकच पाणी कमी पिले जाते. पण हे टाळायला हवे. अनेक वेळा डॉक्टर देखील योग्य तितक्या प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीरातले पाण्याचं प्रमाण योग्य असेल तर त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो पाहता येतो. त्यामुळे पाऊसात पाण्यचे सेवन महत्वाचे असते. त्याचबरोबर, या काळामध्ये खासकरुन ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

२. तेलकट पदार्थ कमी खावे –
"पाऊस म्हणजे भजी" हे समीकरण आहेच! त्याचबरोबर, पावसाळा हा खवय्यासाठीचा ऋतू मानला जातो. मस्त पाऊस पडला की पहिली आठवण येते ती कांदा भजी ची! या दिवसामध्ये पाऊस पडला की हमखास कांदा भजी किंवा तळलेले पदार्थ खाण्याची खूप इच्छा इच्छा होते. स्ट्रीट फूड मध्ये तर तळलेल्या पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे ते खाण्याचा मोह होणे साहजिकच असते. पण हा मोह टाळला पाहिजे. कधीतरी तळलेले पदार्थ किंवा भजी खाल्ली तर त्याचा फार परिणाम होत नाही पण वारंवार तेलकट पदार्थांच सेवन तब्येतीसाठी अपायकारक ठरू शकते. शरीरामध्ये स्निग्धतेचे प्रमाण वाढलं तर अनेक वेळा स्थूलतेसारख्या समस्या निर्माण होतात. त्यासोबतच तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे परिणाम थेट त्वचेवर होऊ शकतो.

३. फळे आणि भाज्यांचे सेवन-

फळे आणि भाज्यांचे सेवन प्रत्येक ऋतू मध्ये करणे महत्वाचे असते. वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. पाऊसात उपलब्ध असलेल्या फळांचे सेवन केल्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. त्याचबरोबर, उत्साह टिकून राहण्यास सुद्धा मदत होते. त्याचबरोबर, भाज्यांच्या सेवनाने पोटाच्या समस्या सुद्धा कमी होण्यास मदत होते.

४. मेकअपचा वापर कमी करणे –
सुंदर दिसण्यासाठी मेकअप चा सहारा घेता जातो. मेकअप हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण इतर ऋतू पेक्षा पावसाळ्यामध्ये मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. पाऊसाळ्यात वातावरणातले आर्द्रतेचे प्रमाण वाढले असते. आणि अचानक झालेल्या बदलामुळे आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. आर्द्रतेमुळे त्वचेवर असलेली रोमछिद्रे बंद होतात. ही रोमछिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. आणि चेहऱ्यावर मुरुम, पुटकळ्या येण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर, अनेक वेळा त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये कमीत कमी किंवा शक्यतो मेकअप करणं टाळावं. त्या ऐवजी, तोंडावर पाणी मारणे, चेहऱ्याला मॉश्यरायझर चा वापर करणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी उत्तम ठरू शकते. त्याचबरोबर, घरी बनवलेले फेस पॅक वापरले तर त्वचेला फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे त्वचेच आरोग्य उत्तम राहते आणि तुम्ही सुद्धा आकर्षक दिसण्यास मदत होते.

५. पाऊसात केसांची काळजी घेणे–
पावसाळ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा परिणाम केसांवर सुद्धा होऊ शकतो. हवेतील धुळीचे कण केसांना चिकटू शकतात. ह्यामुळे आणि हवा बदलामुळे डोक्यात खाज येऊ शकते. डोक्यात कोंडा होणे यासारख्या समस्या सुद्धा पाऊसाळ्यात निर्माण होऊ शकतात. या समस्येपासून सुटका करायची असेल तर चुकून डोके भिजले तर केस शक्यतो लगेच कोरडे करावे. त्याबरोबर, केसांना तेलाचा मसाज केल्यामुळे फायदा दिसून येतो. केसांना नारळाच्या तेलाचा मसाज उपयुक्त ठरतो. त्याबरोबरच, केस स्वच्छ धुवून वाळवावे. केस आठवड्यातून २ वेळा धुवावे. शक्यतो केस जास्ती वाढवले नाही तर पाऊसा मध्ये केसांच्य समस्या कमी होण्यास फायदा होऊ शकतो. योग्य प्रमाणात पाणी पिल्याने केसांवर सुद्धा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येईल.

व्यवस्थित आहार, योग्य प्रमाणात पाण्याच सेवन आणि इतर काळजी घेतली तर पाऊसा मध्ये त्वचा आणि केसांच्या समस्येला समोर जावे लागणार नाही. त्यामुळे योग्य काळजी घेऊन पाऊसाचा आनंद घेता येऊ शकेल.

Happy Monsoon!!! :-)