Rahasyamay Stree - 5 in Marathi Moral Stories by Akash Rewle books and stories PDF | रहस्यमय स्त्री - भाग ५

Featured Books
Categories
Share

रहस्यमय स्त्री - भाग ५



बाजूला असलेले साने म्हणाले " साहेब वायरलेस वर एक बातमी मिळाली आहे ,... सुबोध मोहिते यांचा मृत्यू झाला आहे "

दचकून चव्हाण म्हणाले " मृत्यू नाही खून !!!! , विष देवून मारलंय त्याला "

साने - " तुम्हाला कसं माहिती साहेब ?? तुम्ही पण ही बातमी वायरलेस वर ऐकली काय ?? "

चव्हाण -  नाही !!! चला कामाला लागा खूप काम करायचे आहेत " !! आणि स्केच आर्टिस्ट ला बोलवा ...

चव्हाण यांनी घडीत पाहिले तर सायंकाळ चे ५.४५ झाले होते , याचा अर्थ ते फक्त ३ तास झोपले होते ..

साने एक फोन लावतात व चव्हाण यांना सांगतात " साहेब स्केच आर्टिस्ट ३ तासात येईल !!!

चव्हाण - " चला तोवर घटनास्थळी काही पुरावे हाती लागतील की नाही ते बघू ..."

साने यांनी गाडी काढली व दफनभूमी मार्गे ते सुबोध मोहिते यांच्या बनत असलेल्या नवीन कन्स्ट्रक्शन साईट वर पोहोचले ...

तिथे एक चहावाला मुलगा तळमजल्यावर त्यांची वाट पाहत होता .!!

साने त्या मुलाला बघून म्हणाले " पोलीस स्टेशन मध्ये तूच फोन केला होतास ना "???

त्या मुलाने मान हलवून होकार दर्शवला !!!

साने त्या मुलाची विचारपूस करताना चव्हाण साईट वरील सर्व गोष्टी पाहू लागले होते !!
ते जिन्याच्या मदतीने पहिल्या मजल्यावर पोहोचून इकडे तिकडे पाहू लागले पण तिथे काहीच सापडल नाही म्हणून ते दुसऱ्या मजल्यावर पोहोचले .
त्यांच्या मागे तो लहान मुलगा व साने वर चढत होते .

चव्हाण यांनी दुसऱ्या मजल्यावर अस काही पाहिलं ज्यावर त्यांचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता !!! साईट वरील सर्व कामगार जमिनीवर पडले होते .
सर्वांच्या हातात चहाचा ग्लास होता . एका व्यक्तीचा ग्लास खाली पडला होता , चव्हाण यांनी तो ग्लास रुमालाच्या मदतीने उचलला तर लक्षात आल की तो ग्लास नवीन होता . सर्व ग्लास पाहिल्या नंतर स्पष्ट झाल की सर्व ग्लास नवीन होते .!!!

चव्हाण यांनी एका कामगाराच्या गळ्याला हात लावून पाहिले , त्याची नाडी तपासली यावरून त्यांना कळले की बाकी सर्व कामगार जिवंत आहेत पण बेशुद्ध आहेत , मात्र सुबोध मोहिते यांच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता आणि सुदैवाने त्याचा सुद्धा श्वास चालू होता मात्र खूप कमी प्रमाणात  !!!

हे सर्व बघून चव्हाण यांनी लगेचच ऍम्ब्युलन्स बोलावली  ...

हे सर्व पाहून साने यांचा राग अनावर झाला होता , साने त्या मुलाच्या अंगावर धावून गेले ." काय रे काय केलंस यांच्या सोबत , काय मिसळलस यांच्या चहा मद्धे !!!!"

चहावाला -" काही नाही साहेब मी चहा घेवून येत होतो , पण इथ सर्वांना अस बघितलं आणि तुम्हाला कॉल केला !!! "

साने त्या मुलाची कॉलर पकडून -  " रोज तूच यांना चहा द्यायचा ना....?? "

चव्हाण सानेंना थांबवत म्हणाले " याच्यात त्याचा हात नाही , जर असता तर तो इथे नसता थांबला ... यामागे कुणी आणखीनच आहे , याच्या येण्या आधीच कोणीतरी येवून यांना चहा दिली असेल !!!

चव्हाण त्या मुलाला जवळ बोलावून विचारू लागले ...
  " आज तुझ्या सोबत काही वेगळा प्रकार घडला का ?? "

मुलगा - हो साहेब पहिल्यांदाच कोणी मला ५०० रुपये टीप म्हणून दिले ...चहा न पिताच त्याने पैसे दिले होते , आणि येणाऱ्या लक्ष्मीला नकार द्यायचा नसतो म्हणून मी पैसे घेतले सुद्धा !!!

चव्हाण - अजून काय बोलणं झाल तुमचं ???

मुलगा - काही नाही साहेब , तो सांगत होता की माझ्या चहाची प्रशंसा सुबोध साहेबांनी केली होती म्हणून ती व्यक्ती माझ्या दुकानात चहा पिण्यासाठी आली होती , मात्र त्याने चहा घेतलाच नाही !!!
मला हे वेगळं वाटलं म्हणून मी त्याला सांगितले की " सुबोध साहेब चहा नाही कॉफी पिताता ..". तर ती व्यक्ती काहीच बोलली नाही व पैसे देऊन निघुन गेली !!!

चव्हाण - तू त्याला पुन्हा बघितल्यावर ओळखू शकतोस का ??

मुलगा - नाही साहेब त्याने हेल्मेट घातलं होत .

साने त्यांचं संभाषण ऐकुन मध्येच बोलला - " म्हणून त्याने चहा नाही घेतला , चेहरा दिसू नये म्हणून !! "

मुलगा - " पण साहेब तो एखाद्या नेपाळी व्यक्ती प्रमाणे बोलत होता !! "

हे ऐकुन चव्हाण यांना चागलाच घाम फुटला , त्यांना पडलेले स्वप्न आठवत होते ...
तेवढयात त्यांची नजर एका अश्या गोष्टीवर पडली , ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद वाटत होता ...
खाली एक पुरुषाचं पाकीट पडल होत . त्यात चारशे शहाण्णव रुपये होते . तसेच एक फोटो होता . बहादूर थापाचा तो फोटो बघून चव्हाण यांचं डोकं काम करत नव्हत !!!

ते साने पासून थोड्या अंतरावर गेले व त्यांनी एक फोन लावला ...

" तावडे साहेब , एक खूप मोठं संकट आल आहे !!!

दफन भूमी मद्धे ज्या वॉचमनला गाडल होत तो पुन्हा परत आला आहे , बदला घेण्यासाठी , एक स्वप्न पडल होत त्यात ती मुलगी सुद्धा होती !!! "

तावडे - " काय ?? मूर्ख झाला आहेस का ??
काहीही काय बरळतो आहेस ??
तुला माहिती नाही का , की फोन वर अश्या गोष्टी करायच्या नसतात ते ??? तसा पण मी माझ्या हातांनी दफन केलं होत तिला आणि त्याला  !!!! "

चव्हाण - " तो पुन्हा आला आहे , अख्या शहरात ज्याची दहशत होती अश्या राजाराम साहेबांचा काल खून झाला , तेथे त्याच पॅन कार्ड मिळाल , आणि आज सुबोध चा खून झाला तेथे याचंच पाकीट सापडलय ,आता माझी बारी आहे मग तुमची .... कोणालाच नाही सोडणार तो "

तावडे यांनी रागारागाने फोन ठेवून दिला !!!

साईट वर येवून काहीच मिनिटे झाली होती .

आणि तेवढ्यात ॲम्बुलन्स सुद्धा आली होती ...

सुबोध मोहिते यांना इस्पितळात दाखल केले  , चव्हाण साने सोबत इस्पितळात पोहोचले...
सर्व कामगार शुद्धीवर आलेच होते .
डॉक्टरांनी सुबोध मोहिते यांना मृत घोषित केले .
डॉक्टरांच्या मते त्यांना कॉफी मद्धे विष देवून मारलं गेलं होत ...

चव्हाण कामगारांकडे पोहोचले व एक एक करून सर्वांना एकच प्रश्न विचारू लागले .. - " तुम्हाला चहा कोणी दिला ... ??? "

कोणाला काहीच आठवत नव्हत !!!

पण शेवटचा चहा ज्या व्यक्तीने प्यायला होता तो म्हणाला " तोंडाला मास्क लावून आलेला माणूस होता , त्याने चहा आणला होता , आमच्यातून एकाने विचारल सुद्धा होत त्याला की " छोटू आज नाही आला चहा घेवून ?? "
यावर तो म्हणाला होता " छोटू आज सुट्टीवर आहे म्हणून मी आलोय चहा घेवून "
अस बोलून सोबत आणलेली कॉफी घेवून तो साहेबांकडे गेला . त्याने ३ चहा जास्त आणली होती . तो नवीन होता म्हणून आम्हाला संशय पण झाला नाही !!!"

चव्हाण - त्याचा चेहरा आठवतोय का तुला ??

व्यक्ती - " नाही साहेब चेहऱ्यावर मास्क होत  , तो सांगत होता सर्दी खोकला झाला आहे . कोणाला होवू नये म्हणून मास्क लावला आहे "

चव्हाण - त्याचा आवाज नेपाळी व्यक्ती सारखा होता ???

व्यक्ती - " नाही साहेब एखाद्या मराठी माणसा प्रमाणे होता ."

तेवढयात चौकितून पवार यांचा फोन आला " जय हिंद साहेब , स्केच आर्टिस्ट आला आहे "

चव्हाण -" त्याला चहा पाणी दे , तोवर मी आलोच "

विचारपूस करून चौकीच्या दिशेने निघाले . जाताना साने यांना जवळ पास असलेल्या चहाच्या ग्लास च्या दुकानाची चौकशी करायला सांगितली !!

चौकी मद्धे पोहोचल्यावर चव्हाण यांनी स्केच आर्टिस्ट ला स्केच बनवायला सांगितले ...

पवार यांना बसल्या बसल्या आळस आल्याने ते चौकीच्या बाहेर पडले ...

चौकीत स्केच आर्टिस्ट आणि चव्हाण दोघेच होते .
स्केच बनवून तो स्केच आर्टिस्ट निघून गेला , व चव्हाण एक टक फक्त त्या स्केचला बघत होते ...

बघता बघता रजिस्टर मध्ये घडामोडी लिहल्या ,!!

तेवढ्यात तेथे विशाल उद्याच्या वर्तमान पत्रकात बातमी घेण्यासाठी पोहोचला .. विशाल त्या स्केच ला पाहून चक्रावला , कारण ते स्केच अजून कोणाचं नसून अमर चे होते ...

विशाल ने चव्हाण यांना विचारले  " साहेब हा स्केच आपण का बनवला आहे ?? , याचा आणि या केस चा काही संबंध आहे का ?? "

चव्हाण यांनी सरळ उत्तर दिल...." कोणाला विश्वास नाही होणार पण मला पूर्ण विश्वास आहे , कुठे ना कुठे या व्यक्तीचा या खूनाशी नक्कीच संबंध आहे , आज एक वाईट स्वप्न पडल होत त्यात हाच सुबोध मोहिते यांना ठार मारत होत , आणि झोपेतून जाग आली तर खरंच सुबोध मोहिते यांचा खून झाला होता !!! "

विशाल - " काय ??? का करेल अमर असं ?? , साहेब तुमचा काही तरी गैरसमज होत असेल , अमर कधी कोणाचा खून नाही करू शकत !!
मला ही संशय वाटत होता पण खुनाचा नाही , तो नक्कीच काही तरी लपावतोय माझ्या पासून पण एखाद्याचा खून तर नक्कीच नाही !!!

चव्हाण - काय ??? तू ओळखतोस या व्यक्तीला ??

विशाल काही बोलेल तेवढ्यात चव्हाण यांचा फोन वाजला ... ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग त्यांनी वेळ बघितली तर १०.१० होत होते .

त्यांनी फोन मद्धे बघितले तर एका एसटीडी चा नंबर दिसत होता . चव्हाण यांना वाटले , एखाद्या खबरीचा फोन असेल म्हणून त्याने तो उचलला ... समोरून एखाद्या नेपाळया सारखा आवाज येवू लागला !!!!
" जर सुबोध मोहिते यांच्या खुनी बद्दल माहिती हवी असेल तर लवकरात लवकर अशोक नगर जवळील दफन भूमी मद्धे ये  "........ व फोन कट झाला !!!

चव्हाण ताबडतोब उठले व घाईघाईने विशालचा निरोप घेतला , बाहेर सगळी कडे अंधार पसरला होता .
पवार सुद्धा बाहेर नव्हते , व चौकीतील हवालदार राऊंड - अप साठी गेले होते , चौकीत कोणी ना कोणी असावं म्हणून लेडीज कॉन्स्टेबल ला सोबत न घेवून जाता चौकीत बसायला सांगितले!!! . चव्हाण वारंवार पवार यांना फोन करत होते .
पण फोन लागतच नव्हता....

शेवटी कंटाळून एकटेच पोलिस जीप मधून दफन भूमी मद्धे जायला निघाले ...

ताजी बातमी हाती मिळेल या आशेने विशाल सुद्धा त्याचा पाठलाग करू लागला !!!

दफन भूमीच्या बाजूला आपली जीप लावली व आत जाऊ लागले ... मोठ्या मोठ्या धांगा टाकत ते आत पोहोचले  , आत मद्धे कोणीच नव्हत ..

सूनसान अशी दफनभूमी बघून त्यांच्या घशाला कोरड पडली होती !!

दफन भूमी मद्धे सगळी कडे फोन केलेल्या व्यक्तीला शोधत होते पण तिथे कोणीच नव्हत !!! पण थोड्याच अंतरावर एक स्त्री त्यांना दिसली !! निरखून बघितल्यावर तीच रहस्यमय स्त्री तिथे उभी होती .
चव्हाण आता खूप घाबरले होते .
ते परत मागे वळून चौकीच्या दिशेने धावू लागले होतेच तोवर हातातील काठी ने अमरने मागून चव्हाण च्या डोक्यावर वार केला .

त्या वाराने चव्हाण खाली कोसळले ...स्वतःला सावरत होतेच तोवर अमरने दुसरा घाव घातला .

चव्हाण यांना काही सुचलच नाही , म्हणून आपली रिव्हॉल्वर काढली व अमरवर ताणली !!!

अमर सावध झाला !!!
रिव्हॉल्वर च्या भीतीने तो मागे मागे सरकू लागला !!

चव्हाणच्या सांगण्यावरून त्याने काठी खाली फेकली .

अमरला सर्व संपल्या सारखं वाटत होत , आपल्या बायकोला वाचवण्यासाठी त्याला चव्हाण ला मारणे गरजेचे होते पण आता सर्व संपल होत !!

चव्हाण त्याच्या हातात बेड्या ठोकतील तेवढ्यात मागून कुदळ येवून पोटाच्या आरपार झाली  ;!!

अमरला काहीच समजल नाही !!

चव्हाण खाली कोसळले , मागे वळून पाहिले तर त्याला विशालच्या रुपात बहादूर थापा दिसला !!!

अमरने वेळ वाया न घालून बाजूला असलेला एक मोठा दगड उचलला आणि चव्हाण यांच्या डोक्यात टाकला !!! चव्हाण त्याच घावाने ठार झाले , चव्हाण यांचा खेळ संपला होता .

अमरने विशाल ला विचारले " विशाल तू का मारलस त्याला ??"

विशाल - " विशाल नाही !!! " बहादुर थापा " . आणि का मारलं त्याच उत्तर तुला लवकरात लवकर मिळेल !!  तू इथून निघ आता बाकी मी बघतो !!!

अमरला सर्व एखाद्या स्वप्ना सारखं भासू लागल होत !!
दफन भूमीच्या बऱ्याच अंतरावर ठेवलेल्या कार च्या दिशेने तो धावत धावत पोहोचला !!! 
कार इस्पितळाच्या पार्किंग मध्ये लावून लगेचच इस्पितळात प्रवेश केला  !!

इस्पितळात पोहचल्यावर रेशमाची आई त्याच्यावर बडबड करत होती " सकाळ पासून इथे नव्हतास तू  !!! तुझं प्रेम कमी झाल आहे , मला तर वाटत तुझं प्रेम नव्हतच माझ्या मुलीवर .... जेव्हा पासून ती आजारी आहे तेव्हापासून तू आपले खरे रंग दाखवायला सुरु केलेस !!! "

अमरने काहीच उत्तर दिल नाही !!! 

आई लगतच्या बेड वर जाऊन झोपली , अमर मात्र रेशमाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणू लागला " आता फक्त दोनच बाकी आहेत , माझं किती प्रेम आहे हे कोणाला सांगायची गरज नाही "

अमर रेशमा जवळच खुर्चीवर बसला व कधी डोळा लागला त्याचे त्यालाच कळले नाही !!
सकाळी एक व्यक्ती त्याला उठवू लागली पण त्याला उठायची इच्छा होत नव्हती , काल खूप धावपळ झाल्याने तो पूर्ण पणे थकला होता !!

दिनांक - २८ मार्च २०१८
त्याने डोळे उघडले व पुढे बघताच दचकला !!!
एक व्यक्ती पोलिसांच्या वर्दी मद्धे त्याच्या पुढे उभी होती !!

   --------- पुढील भाग लवकरच ----------