Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 10 in Marathi Fiction Stories by Vinit Rajaram Dhanawade books and stories PDF | भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १०)

Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 16

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 2

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 15

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 1

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ -వీర - 5

    వీర ఒక్కసారిగా వెనక్కి తిరిగి చూస్తాడు, చూసి "వీడా, వీడికి ఎ...

Categories
Share

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १०)

पुढचा stop म्हणजे आकाशने बघितलेलं गावं ... ते सुद्धा तसं लांबच होतं, पण आकाशच्या calculation नुसार संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसाच आकाशचा अंदाज होता. परंतु निसर्गाला ते मान्य नसावं बहुदा. तो लहान डोंगर उतरून ते खाली येतंच होते. तेवढयात ,कुठून कोणास ठाऊक, जोरदार वारा सुरु झाला,अगदी अचानक. सगळेच घाबरून गेले. आकाश सुद्धा बावरून गेला. थोडयावेळाने सावरलं स्वतःला त्याने. पण तो वारा काही कमी होतं नव्हता.त्यात पावसाने सुद्धा सुरुवात केली. अजूनच भांबावून गेले सगळॆ. काय करायचे ते सुचत नव्हते आकाशला. गावं तसं लांबच होतं ते. तिथे पोहोचणं तर गरजेचं होतं. शिवाय त्या वादळापासून सुद्धा या सगळ्यांना वाचवायला हवे. आकाशने वर आभाळात बघितले. ढगांची अजूनच गर्दी होत होती. पावसाचा वेग वाढतच चालला होता.


यावेळेस कोणतातरी आडोसा घ्यावा हेच आकाशच्या ध्यानात आलं. परंतू एवढा मुसळधार पाऊस होता कि डोळेही नीट उघडता येत नव्हते. पावसाचे थेंब नुसते टोचत होते चेहऱ्यावर. एका हाताने चेहरा झाकत आकाश आजूबाजूला बघू लागला. थोडया अंतरावर , एका खडकाच्या , पुढे आलेल्या भागाने ,त्याखाली एक आडोसा निर्माण झाला होता, नैसर्गिक छप्पर. त्यावेळेस तीच काय ती सुरक्षित जागा होती. आकाशने हाताने खूण करून सगळ्यांना तिथे जमायला सांगितले. प्रचंड वारा, वादळ होतंच... त्या नैसर्गिक छप्पराखाली ते जमा झाले. अजूनही ते भिजतच होते,फक्त कमी प्रमाणात. एव्हडंस चालले होते ते, त्यात वाऱ्याचा ,पावसाचा सामना करून दमून गेले सगळे.


"शी !! यार.... आताच तर अंघोळ केली होती ना... लगेचच भिजवलं पावसाने. " संजना उगाचच चिडत म्हणाली. "असंच पाहिजे एका मुलीला... " सुप्री हसत म्हणाली. एवढच काय ती मस्करी आणि तेवढच हसू.. बाकी सगळे कुडकुडत उभे होते. गारठलेले ना सगळे. आकाशचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. तो वर आभाळात बघत होता. मोठ्ठ वादळ येणार बहुदा. बाजूला कोण आहे ते नीट दिसत नाही, एवढा पाऊस... त्या गावात कसं पोहोचणार... मागे गावात जाऊ शकत नाही... आणि पाऊस इतक्यात थांबेल असं पण वाटत नाही... आकाश विचार करत होता. पाऊस थांबला तरी इथे तंबू उभे करू शकत नाही. वरून डोंगरावरून काहीही खाली येऊ शकते. आकाशला काय करावं ते सुचत नव्हतं. थोड्यावेळाने एका मुलाने विचारलं,
" कधी निघायचं, काय करायचं... हे ठरवलं आहे का ?" आकाशने काही उत्तर दिलं नाही.
" मला वाटते, आत्ताच पुढे जाणे, बरोबर नाही. इथेच कुठेतरी थांबावं लागेल. " थोडयावेळाने आकाशच उत्तर आलं. तसा अजून एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला.
" हे जर असंच चालत राहिलं ना... तर घरी पोहोचणारच नाही आम्ही..."
आकाशने फक्त एकदाच पाहिलं त्याच्याकडे... जसं काही मीच यांना इथे पिकनिकला यायला सांगितले होते.
" ठीक आहे... चला मग, सरळच जायचे आहे आपल्याला... सांभाळून पाय ठेवा.. पाय घसरेल... so be careful... " आणि त्या मुसळधार पावसात पुन्हा निघाले सगळे. सगळीकडेच पाणी वाहत होतं. निसरडं झालेलं सगळं. सगळेच पडत होते, धडपडत होते. खरचटलं खूप जणांना. पण सांगणार कुणाला. आकाशचं न ऐकण्याचा परिणाम होता तो.


खूप जणांच्या पायाला लागला होतं, हातातून रक्त येत होतं. त्यात पावसाचा जोर अजूनच वाढत चालला होता. तरीही ते सगळे पुढे चालत होते. तर समोर अजून एक संकट उभं... नदी.... नदीच्या पलीकडे ते गावं. in fact, नदीपासून खूप दूर होतं ते गावं, नदीचं पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. आकाश नदी ओलांडण्यासाठी रस्ता शोधू लागला. नदी पासून हे सगळे खूप लांब उभे होते. तरीदेखील पाण्याच्या होणाऱ्या आवाजाने घाबरून गेले. " तुम्ही जरा वेळ इथेच थांबा... मी बघून येतो पुढचं.. " डाव्या बाजूला निघाला आकाश... थोडयाच अंतरावर पोहोचला आकाश.. जिथून पाणी खाली पडत होतं... एक लहानसा उभार होता तिथे... आकाश काळजीपूर्वक निरीक्षण करत होता. इतरवेळेस, पाऊस नसताना, तिथून प्रवास करणं अगदीच सोप्पं होतं. पलीकडल्या गावातली माणसं हाच रस्ता वापरात असतील नदी पार करण्यासाठी... पण पावसात तर ते निव्वळ अशक्य होतं. आकाश पुन्हा सगळ्यांजवळ आला. तिथून ती जागा दिसत होती. तिथे बोट दाखवत आकाश म्हणाला,
" तिथून जाणं खूप त्रासदायक होईल... शिवाय एवढं पाणी असताना तो रस्ता वापरणे धोकादायक आहे.. " आकाशचे ते बोलणं ऐकून सगळेच नाराज झाले.
" हा, पण पुढे एकदा पूल तरी असावा.. कारण नदी पार करण्यासाठी पूल असावा लागतो नदीवर.. तर आता सगळे उजव्या बाजूला चालत जाऊया.. पूल भेटला तर पलीकडे जाता येईल. " आकाश म्हणाला. पावसाचा जोर तसाच होता अजून. सोबत वारा. तो आधीच मुलगा परत म्हणाला.
" पण तुम्हाला माहिती आहे का... इथून पूल किती अंतरावर आहे ते किंवा पूल तरी आहे का ते माहिती आहे का ......" आकाशने नकारार्थी मान हलवली.
" मग इथूनच जाऊ ना... काय प्रॉब्लेम आहे... " शेवटी न राहवून आकाश बोलला.
" प्रॉब्लेम असा आहे कि तिथून आता तरी नदी पार करणं अशक्य आहे.. पाण्याला वेग प्रचंड आहे... नीट उभं सुद्धा राहू शकत नाही त्या वेगात... ",
"आता एवढं आलो ना, तर तेवढं तरी पार करू शकतो आम्ही... चला लवकर... ",
" हे बघा घाई करू नका.... पाऊस कमी झाला कि जाऊच आपण... ऐका माझं.... प्लिज... ",
" किती दिवस ऐकतोच आहे ना तुमचं... ते काही नाही.... मला लवकर घरी पोहोचायचे आहे बस्स... कोणी येत असेल तर चला माझ्यासोबत .... मी निघालो. " अस म्हणत तो निघाला. त्याला जाताना बघून अजून दोन मुली त्याच्या मागून निघाल्या.

आकाश त्याच्याकडे फक्त बघत राहिला. ते पुढे गेले तसा आकाश बाकीच्यांकडे बघत म्हणाला,
"अजून कोणाला जायचे असेल तर जाऊ शकतात ..... आणि ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी चला... " म्हणत आकाश निघाला. बाकी सगळे विचारात पडले. नक्की कुठे जायचे.... आकाश पुढे जाऊन थांबला. मागे वळून बघितलं तर बाकी सगळे अजून तिथेच थांबलेले... त्यांना बघून आकाश पुन्हा थांबला, त्या सर्वांकडे बघत. अचानक त्याला लांबून कोणीतरी पळत येताना दिसलं. अरेच्या !! हि तर मघाशी गेलेल्या मुलींपैकी एक आहे...आकाशने ओळखलं तिला. तसा तोही तिच्याकडे धावत पोहोचला. प्रचंड घाबरलेली ती, रडत होती. " काय झालं..... काय झालं..... आणि ते दोघे कुठे आहेत.. " संजनाने विचारलं. ती काहीच बोलत नव्हती. फक्त रडत होती आणि "त्या" दिशेला बोट दाखवत होती. आकाशने क्षणाचाही विलंब न करता , आपली पाठीवरील सॅक खाली टाकून दिली आणि त्या दिशेला पळत सुटला.


काहीच वेळात तो पोहोचला ,तसं समोरच द्रुश्य बघून स्तिमित झाला. ते दोघे, नदीच्या प्रवाहात होते. नदीच्या प्रवाहात वाहून आलेल्या एका लाकडी ओंडक्याला कसेबसे धरून होते ते. आकाशला बघताच दोघेही ओरडू लागले... "वाचवा !! वाचवा !!! "... डोकंच चालत नव्हतं आकाशचं... कदाचित नदी पार करताना... पाय घसरून दोघेही पाण्यात पडले... एक मागे राहिली म्हणून वाचली. पाण्याचा वेग वाढत होता. काहीतरी करावं लागेलंच... पट्कन नदीच्या पात्रात शिरला. सावकाश.... सांभाळून... हळूहळू... नदीतल्या दगडांना पकडत... त्यालाही उभं राहता येत नव्हतं त्या प्रवाहात... कसाबसा तो पोहोचला, तरी ते थोडे लांबच होते. पुन्हा बाहेर आला. आजूबाजूला बघितलं त्याने. समोरच एक मोठी वेल होती. तीच जोर लावून तोडली त्याने. तसाच पुन्हा नदीत शिरला. तोपर्यंत बाकीचे तिथे आलेले. ते सुद्धा घाबरले... " त्या वेलीच टोक घट्ट पकडून ठेवा... " आकाशने ओरडून सांगितलं. चार-पाच मुलांनी वेल पकडून ठेवली. आकाश त्या दोघांजवळ पोहोचला आणि वेलीचं दुसरं टोक त्याने त्या मुलीजवळ फेकलं. "पकड लवकर.. " तसं त्या मुलीने वेल पकडली. " घट्ट पकड.. " म्हणत आकाशने तिला ओढून घेतलं. त्याच्याजवळ आली तसं तिची बॅग पकडून तिला तसंच खेचत बाहेर आणलं आकाशने.... तिला काठावर आणलेलं बघून बाकीच्या मुलींनी तिला नदीपासून लांब नेलं.

परंतु तो ओंडका अजून त्या प्रवाहाचा वेग सहन करू शकला नाही. मधेच तुटला आणि त्या मुलासोबत वाहून जाऊ लागला. बिकट प्रसंग... आकाश ती वेल तिथेच टाकून धावत सुटला, नदीला समांतर असा.... त्याची नजर होती त्या मुलावर... तो मुलगा प्रवाहात तसाच खडकांना आपटत जात होता, मधेच पाण्याखाली जात होता, वर येत होता... आकाश पळतच होता, कसा बाहेर काढू याला... असा विचार चालूच असताना समोर नदीवर एक पूल दिसला... आकाशने पळण्याचा वेग वाढवला. तरीदेखील पूल लांबच होता. तोपर्यंत तो मुलगा वाहत वाहत पुलाजवळ पोहोचला देखील. आकाश आता पुलाजवळ पोहोचला होता. एका क्षणाला तो मुलगा पुलाखालून वाहत गेला. आकाशने ते पाहिलं आणि त्याने उडी मारली....


पावसाचा वेग वाढला होता. वारा थोडा कमी झाला होता , तरी नदीला पूर आलेला होताच... पाणी वेगाने वाहत होते... वर आभाळात ढगांची अजूनच गर्दी होत होती. नदीचं पाणी आता पुलापर्यंत पोहोचत होतं. आणि पुलाच्या दुसऱ्या बाजूला , आकाशने त्या मुलाला एका हाताने पकडून ठेवलं होतं.... दुसऱ्या हाताने पुलाची लाकडी फळी पकडली होती. एक पाय पुलाच्या दोरीत अडकला होता तर दुसरा अधांतरी लटकत होता. आकाशने त्याला कसंबसं पकडून ठेवलं होतं आणि तोही त्या पुलाच्या दोरीत अडकला होता. बिकट अवस्था दोघांची... त्यावेळात बाकीचेही धावत पोहोचले. ते द्रुश्य बघून थरकाप उडाला सगळ्यांचा... तसेच ते पुढे गेले. आणि त्या दोघांनाही बाहेर काढले. तो मुलगा तर घाबरून बेशुद्ध झाला. आकाशहि खूप दमला होता. सगळ्यांनी मिळून दोघांना नदीपासून दूर नेले. पावसाचा वेग कमी झाला तरी रिपरिप चालूच होती... तात्पुरता एक आडोसा उभा केला आकाशने आणि त्या खाली जाऊन बसले सगळे. दमलेले, भिजलेले, काही जणांना खरचटलेलं.. त्यात हे दोघे बुडता-बुडता वाचलेले. आकाश त्यांच्यापासून जरा लांबच बसला होता. सगळ्यांकडे बघत विचार करत होता... इथून आतातरी शक्य नाही पलीकडे जाणे, यांना कधी पोहोचवणार त्या गावात... आकाश टेन्शनमध्ये होता.

============================= क्रमश :