Radha ki meera- part 1 in Marathi Love Stories by pooja books and stories PDF | राधा कि मीरा - भाग १

The Author
Featured Books
Categories
Share

राधा कि मीरा - भाग १

ठिकाण- कोरेगाव पार्क,पुणे

वेळ- संध्याकाळ

ती तिच्या रुमच्या बाल्कनीत बसून समोर दिसणार्या नजारा अनुभवत होती.
"काय सुंदर दिसतोय हा सुर्यास्त. जांभळसर केशरी किरणं मनाला मोहवून टाकतायेत." अस ती मनात म्हणत होती.
इतक्यात तिला खालून आवाज आला .
" राधाराधा , खाली ये बघु बघ तरी कोण अालयं तुला भेटायला."
बर्‍याच वेळाने तिने उत्तर दिल.
ती- हो आलेच.
कारणं अात्ता कुठे तिला त्या नावाची सवय होत होती.
ती पटकन सावरून खाली गेली. तिला पाहताच ह्रषीकेश उभा राहीला . अाज तिला पाहुन पुन्हा एकदा तो तिच्या प्रेमात पडला . आज तिने नॉर्मल प्लेन पिच कुर्ती आणि
पांढरा प्लाझो घातला होता. कानात त्याला साजेस सिल्वर कानातले ,केसांची वेणी घातलेली तरिही तिच्या चेहर्‍यावर आलेल्या काही बटा तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होत्या. तीच्या तरतरीत नाकावर नोजरींग अजुनच छान दिसत होती.
तो तसाच बघत होता तिच्याकडे ती समोर आली तरी त्याला कळालच नाही. "हेय हैलो लक्ष कुठे आहे तुझं??" ती म्हणाली. "सॉरी , मी. . . ते. . . ते सोड आता कशी अाहेस तु
अॅक्चुली आज आपल्या एका मैत्रीणीचा बर्थडे आहे . तिने पार्टिसाठी तुला पण इनवाइट केलंय तु येनार ना ??"
"मी आणि पार्टी . . . पण तुला माहितीये ना ह्रषी i am not comfortable there. आणि पार्टीची थीम वेस्टर्न असेल ना."
ह्रषीकेश-" हो पण तरीही तु यावसं अस तिला फार वाटतंय प्लिज तिच्यासाठी तरी झालं गेल सगळ विसर आणि चल माझ्यासोबत तुलाही फ्रेश वाटेल मित्रांना भेटुन"
काहिश्या नाराजीतच तिने यायला होकार दिला आणि ती आवरण्यासाठी निघुन गेली.
खर तर राधा हि एक खुप साधी पण तितकीच स्मार्ट मुलगी होती. दिसायला चारचौघींप्रमाणेच पण उठावदार व्यक्तिमत्त्वं असलेली. तिचे वडील सुबोध सरपोतदार एक उद्योगपती होते तर आई रागिणी सरपोतदार ग्ृहिणी होती. राधा सध्या बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तिला पुढे जाऊन लॉ करायची इच्छा होती.
ह्रषीकेश राजाध्यक्ष राधाचा बेस्ट फ्रेंड होता. तो एकमेव असा मित्र होता ज्याच्याशी राधाच सध्या पटत होत.
"मला एक कळत नाहीये मला तर वेस्टर्न कपडे घालायला जास्त आवडत नाही तरिही माझ्या कपाटात तेच कपडे जास्त कसे काय? " राधाला हा प्रश्न नेहमीच पडायचा. तिने तो विचार बाजुला सारला आणि ती पटकन तयार होउन खाली गेली.
तिने मजेंटा कलरचा लॉंग गाऊन घातला होता. त्यावर मॅचिंग इअरींग घातल होत . मेकअप तर तिने नावालाच केला होता फक्त आयलायनर आणि हलकिशी लिपस्टिक. केस मोकळे सोडलेले. सोबत मॅचिंग पर्स .
ह्रषीकेश तर तिला पाहतंच राहीला.
राधा-"चलायचं ना आणि हो मी लवकर परत येणारे. आई मी येते गं."
काही वेळातच ते स्नेहाच्या घरी पोहोचले. ती जशी पार्टित आली तसे सगळे जण फक्त तिलाच बघत होते. ती दिसतही तशीच होती कि कोणीही पाहतच राहाव अशी.
तिला थोडं अॉकवर्ड वाटलं. जस तिला नेहमीच वाटायचं
खर तर मित्रांमध्ये जाऊन जस मोकळ वाटायला हव तस तिला कधीच वाटायच नाही तिला बर्‍याच गोष्टी खटकायच्या आणि म्हणूनच ती त्यांच्यापासून लांब राहायची आणि हे अलीकडे म्हणजे १-१/२ वर्ष झाले असचं चाललं होत.
राधा आत जाते आणि स्नेहाला विश करते आणि गिफ्ट देते .
ह्रषीकेश त्याच्या दुसर्‍या मित्रांशी बोलत असतो थोड्या वेळानंतर तो स्नेहाकडे जायला निघतो तोच त्याला राधा निघुन जाताना दिसते." हिला काय झालं अचानक " अस म्हणून तो तिच्या मागे जातो पण ती निघून गेलेली असते.

तुम्हाला काय वाटतयं का गेली असेल राधा अशी अचानक निघून. जाणून घेण्यासाठी वाट पहा पुढच्या भागाची.

(? मी पहिल्यांदाच काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुक झाली असल्यास माफ करा.)