आर्या काहीही न बोलता तेथून निघून गेली.सिद्धांतला खूप वाईट वाटले, 'आपण उगाचच बोललो आर्या समोर. पण आर्या खरंच great आहे. आज मानलं तिला. दोघांच्या आयुष्यातही एकच कमी आहे. माझ्या कडे at least वडिलांच्या वाईट आठवणी तरी आहेत. पण तिच्या कडे तर त्याही नाही . तरीही ती कधीही परिस्थितीची तक्रार करत नाही, जे मिळालं त्यामध्ये खुश आहे. आपलं दुःख लपवून आनंदाने जगते आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. शी...... किती वाईट बोललो मी तिला. अस नव्हतं बोलायला पाहिजे, आणि काय चुकीचं बोलत होती ती,चुकी माझीच आहे प्रत्येक वेळेस अजाणतेपणे का होईना पण मी तिला दुखावतोच. आता नाही बोलणार ती माझ्याशी. कशी माफी मागू तिची. आणि तिने का प्रत्येक वेळेस तिने माफ करायचे?'
दोन-तीन दिवस असेच गेले आर्या खूप उदास वाटत होती. सिद्धांतला तिला कसें बोलावे काही कळतच नव्हतं. इतक्यात HR डिपार्टमेंटने कंपनी ची 2 nights 1 day पिकनिक organize केली . आणि सगळ्यांना compulsory होतं. आर्याला जाण्याची अजिबातच इच्छा नव्हती पण तिचे सगळे friends खूपच जास्त excited होते. त्यामुळे तिला स्वतःला उदास ठेवून त्यांच्या आनंदावर विरजण पाडायचे नव्हते. तिने पण सगळ्यांना ती आनंदी आहे असच दाखवलं. सिद्धांतला नाही म्हणता येणारच नव्हते, त्याने ठरवलं आता picnic मध्ये आर्याला सॉरी म्हणायचं. कारण तिथे तर ती avoid नाही करू शकणार. शनिवारी रात्री ते सगळे निघणार होते. आर्याचा stop सगळ्यात शेवटचा होता. आणि तिच्या आधीचा सिद्धांतचा. सगळे निघाले आणि गाडी आर्याच्या stop वर आली. सगळ्यांनी आधीच आपल्याआपल्या जागा धरून ठेवल्या होत्या, फक्त सिद्धांतच्या बाजूचीच सीट फक्त खाली होती. आर्याला आता तिथे बसल्याशिवाय पर्यायच नव्हता. सिद्धांत खिडकीच्या बाजूने बसला होता .आर्या म्हणाली, 'सर, मी खिडकीजवळ बसू का??', 'का?', सिद्धांत तिला म्हणाला. 'मला निसर्ग पाहायला खूप आवडतो.' सिद्धांतला हसायलाच आलं. त्याला हसताना पाहून आर्याने विचारलं, 'काय झालं हसायला?', 'अगं, रात्रीच्या वेळी तुला काय निसर्ग दिसणार आहे. बाहेर बघ सगळा अंधार आहे.' तरीही त्याने तिला त्याच्या जागेवर बसू दिलं आणि तो तिच्या बाजूला बसला. आर्याला सिद्धांत ने केलेली मस्करी आवडायची पण त्याचा mood क्षणात बदलतो हे ही तिला आता चांगलेच कळाले होते. सिद्धांत ला माहिती होत आर्या काहीच बोलणार नाही. आता आपण तिची मस्करी करूनही फायदा नाही ती नाही देणार कशालाच रिस्पॉन्स. कारण त्याला माहिती होत की आपण मनातून खुप दुखावले आहे आर्याला. 'आर्या निसर्ग खूप आवडतो ना तुला?', 'हो!! कारण त्याच्या जवळ गेल्यावर नेहमी आनंदच मिळतो. तो नाही दुखवत कोणाला.' सिद्धांत चा एकदम चेहराच पडला, आर्या ला कळलं आपण काय बोलून बसलो, 'म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं.' 'आर्या खरंच extremely sorry.. मी त्यादिवशी जे काही बोललो ते please मनावर घेऊ नकोस. मला खरंच तुझ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं.', 'सर.. its ok!! मी विसारलीये आता सगळं. plz आता नको ना हा विषय.', 'आर्या अगं पण', 'सर, खरंच नको आता.' सिद्धांत ला कळून चुकलं होत की आपल्यामुळे आर्या खरंच किती दुखावली गेली आहे. थोड्यावेळ कोणीही काहीही बोललं नाही. ac गाडी असल्यामुळे गाडी चांगलीच गार झाली होती. सिद्धांतने आपल्या वरचा fan बंद केला त्याला AC लागत होता पण आर्याला त्रास होतो म्हणून त्याने खरं तर बंद केला. आर्याला थोडं बरं वाटल. तिला खरं तर अजूनही थंडी वाजत होती. आणि तिचा डोळा लागला.
आर्याला मध्येच जाग आली, तिने पाहिलं तर सिद्धांत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला होता. त्याला इतकं शांत आणि निर्धास्त पाहून तिला त्याला उठवावं नाही वाटलं. खरं तर तिला ह्या जागी दुसरं कोणी असतं तर राग आला असता पण हा असाच राहावा असं तिला वाटत होतं. त्याच्याकडे बघून आर्या विचार करू लागली, 'किती निरागस वाटतो ना सिद्धांत, किती दुःख लपवून ठेवलं ह्याने आतमध्ये. किती त्रास सहन केलाय लहानपणापासून. मी उगाचंच राग ठेवलाय मनात. खरं तर, ह्याला माझ्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. अनपेक्षितपणे बोलला तो, चुकी कळल्यावर माफीही मागितली. मी का उगाचंच राग धरला? ते काही नाही मी उद्या सिद्धांत ला बोलणार.'