Naa Kavle kadhi - 1-11 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी Season 1 - Part 11

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

ना कळले कधी Season 1 - Part 11

आर्या आणि सिद्धांत निघाले, आर्याला सिद्धांतच्या आईला भेटून फार छान वाटले. 'किती छान काम करतात ना काकू. म्हणजे मला ना अशा NGO वगैरे चालवणाऱ्या महिलांचा खरचं खूप अभिमान वाटतो', आर्या म्हणाली. 'हो! तिला आवड आहे ह्या कामाची.' सिद्धांत त्याच्या आई विषयी भरभरून बोलत होता. त्यावरून आर्याला कळून चुकलं की ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम ह्याच्या आईवरच आहे. इतर कोणाचा त्याने बोलतांना उल्लेखही केला नाही. आणि आर्यानेही त्याला बाकीच्या फॅमिली मेंबरबद्दल विचारलं नाही. त्याने आर्या ला घरी सोडलं आणि तो घरी आला. 'आला का आर्या ला सोडून? किती गोड मुलगी आहे ना आर्या?' सिद्धांत फक्त  हं म्हणाला. 'अरे मी तुझ्याशी बोलतीये.' 'हे बघ आई, मी लोकांना इतक्या लवकर judge नाही करत आणि ती काय काल परवा आलेली.' असं म्हणुन तो निघुन गेला. पण आर्याबद्दल सिद्धांतला वाटणारी  काळजी त्याच्या आईच्या नजरेतुन काही सुटली नाही. सिद्धांत आता विचार करू लागला, 'मी खरचं लोकांना पारखून घेतल्याशिवाय त्यांना कधीही जवळ करत नाही. मग आर्याच्या बाबतीत असं का? मला तिची इतकी काळजी, आपुलकी असण्याचं काहीही कारण  नाही.ते पण मी अजून तिला नीट ओळखतही नाही.आणि आमचं काही नात ही नाही, तसा नात्यांवर तर माझा विश्वासही नाही.कारण मी आता पर्यंत सगळ्या नात्यांमध्ये विश्वासघातच पहिला आहे. आर्या पण तशीच निघाली तर? नको.. मला कोणामध्ये ही गुंतायचच नाही आहे.'
        आर्या ला आज सिद्धांतच्या घरी त्याच्या आईला भेटून छान वाटत होते. सिद्धांत खरचं इतर मुलांसारखा नाही आहे. किती जबाबदार आणि caring  आहे तो. खूप कमी वयात खूप जास्त मिळवलंय त्याने.पण स्वभावाने दिसतो तसा तर अजिबात नाही.आर्या एक हुशार आणि दिसायला पण सुंदर असल्यामुळे college मध्ये तिला praposals आले होते पण ती ह्या कशातच अडकली नव्हती. तिने स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवले होते, तिला कळत होते की ती सिद्धांत मध्ये अडकत चालली आहे पण तिला कुठे तरी हे अडकणे आवडत होत.
         आज सिद्धांत ऑफिसला ठरवूनच आला होता, काहीही झालं तरी आता आर्याला दूरच ठेवायचं. आर्या ऑफिसला आली. ती सिद्धांतच्या केबिन मध्ये गेली तिथे विक्रांत पण होता, तिने सिद्धांत ला good morning wish केलं पण त्याने काहीच reply दिला नाही. त्याने चक्क तिला ignore केलं. आणि तो laoptop मधेच बघत होता, आर्याला वाटलं ह्याला ऐकू नसेल गेलं म्हणून तिने परत एकदा wish केलं, तो एकदम तिच्यावर ओरडलाच, 'आर्या कळत नाही का तुला? आपल्याला कोणी reply नसेल देत तर समोरचा व्यक्ती कामात असेल, आपण डिस्टर्ब नाही करावं.' 'सॉरी सर, मला वाटलं तुम्हाला ऐकू नाही आलं!' 'तुला  काहीही वाटेल गं, पण तुला दिसतं आहे नं मी कामात आहे तरीही!' 'सिद्धांत chill!! किती चिडतोय', विक्रांत त्याला मधेच थांबवत म्हणाला, 'आर्या तू जा बाहेर. तुझ्या कामाला सुरुवात कर.' विक्रांत ने तिला बाहेर पाठवले. 'सिद्धांत काय चाललंय तुझं? का ओरडलास तिच्यावर? आणि अस कोणतं important काम करतोय तू? फक्त mail चेक करतोय किती वेळचे! उगाचंच चिडायचं आपलं, काय चुकलं तिचं? दोन शब्द नीट बोलला असता काही गेलं असत का तुझं?', 'हे बघ विक्रांत, ती माझी junior आहे. तिला कसं बोलायचं ते मी पाहुन घेईन तू नको पडू ह्यच्यात. कळलं!' 'काल पर्यंत तिची किती काळजी घेत होता तू. तिला भेटायला गेला, ती ऑफिस ला नाही अाली तर चैन पडला नाही तुला आणि आज तिच्यावरच ओरडला काय वाटलं असेल तिला?',  'तिला काहीही वाटू दे मला फरक नाही पडत,' सिध्दांत म्हणाला. 'तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे सिद्धांत तू कधीही कोणावर विश्वास ठेवत नाही, तू विश्वासघात होईल ह्या भीतीने कधी नवीन नाते तयारच करत नाही.सगळेच सारखे नसतात सिद्धांत!' 'हे बघ विक्रांत, please सकाळी सकाळी ह्या विषयावर lecture नको आहे मला. already  आपलं खूप वेळा ह्या विषयावर बोलणं झालेलं आहे, तू कितीही बोलला तरीही माझे मतं बदलणार नाही आहे. तर हा विषय इथेच थांबव आणि तू तुझ्या कामाला लाग आणि मला माझे करू दे. ठीक आहे, निघ आता.' विक्रांत ला सिद्धांत च्या ह्या वागण्याची सवय होती. तो तिथून निघाला. जाताना त्याने आर्याकडे पाहिले, त्याला तिच्या कडे पाहून वाईट वाटले.
      आर्याला सिद्धांतचा रागच आला होता, 'काल रात्रीपर्यंत किती चांगला वागत होता हा.. आज अचानक काय झालं? आणि माझी काय चुकी होती विनाकारणच मला ओरडतो.पण मग ती काळजी.. ती आपुलकी.. हे सगळं काय होतं? तो खरा सिद्धांत की हा? पण हा त्याच्या आईशी किती प्रेमाने वागतो तेव्हा चा सिद्धान्त पूर्णपणे वेगळा असतो मग हा बाहेर असा का? माझंच चुकलं मी उगाचच इतका विचार केला त्याच्या बद्दल. पण आता नाही आता मी फक्त माझ्या कामावर लक्ष देणार बस्स!' सिद्धांतला आर्याला बोलल्याच वाईट वाटलं पण त्याने ठरवलेच होत की काहीही झालं तरीही नाही अडकायचं. खरं तर विक्रांत पण काही चुकीचं बोलत नव्हता, सगळेच सारखे नसतात! पण नकोच .....!!!
     सिद्धांत ला कुठेतरी अपेक्षा होती की आर्या त्याला परत येऊन बोलेल पण तिने तसं काहीही केलं नाही आणि त्याला ह्या तिच्या वागण्याचा खूप राग येत होता, आणि आर्या खूप practical  होती तिने लगेच स्वतःला नॉर्मल केलं आणि सगळ्यांसोबत हसून खेळून राहत होती. असेच दोन- तीन दिवस गेले. आर्या बाहेरून खूप नॉर्मल दाखवत होती पण तिला कुठेतरी वाटत होतं की सिद्धांत सॉरी म्हणेल. पण असं काहीही झालं नाही.इकडे सिद्धांत ला आर्याच्या वागण्याचा खूप त्रास होत होता. काहीच कसा फरक नाही पडत हिला. एकदा तरी मला बोलून बघायचं असतं. मीच का अपेक्षा ठेवतो पण? तिला तर काहीही फरक नाही पडत. सिद्धांत ह्या सगळ्यामुळे आणखीनच चिडचिड करायचा. आर्याच काम झालं. ती ते चेक करून घेण्यासाठी सिद्धांतच्या केबिन मध्ये आली. तो आपला छोट्या छोट्या चुका काढून तिच्यावर ओरडत होता. आर्या मात्र एकदम नॉर्मल होती तिला आता सिद्धांत च्या वागण्याची सवयच झाली होती. सिद्धांतला अपेक्षा होती की ही एकदा तरी काही तरी बोलेल, पण आर्या फक्त शांततेत ऐकतच होती. आता सिद्धांत ओरडलाच तिच्यावर, 'तुला काहीच फरक पडत नाही का ग?' 'सर, झाल्या असतील माझ्या कामात चुका मी next time पासून नाही करणार.'म्हणजे तुला खरच कळत नाही आहे का मी काय बोलत आहे?सिद्धांत म्हणाला. आता आर्याचा संयम सुटला नाही कळत मला, खरच नाही कळत आहे  तुमचं बोलणं, विनाकारण माझ्यावर राग काढणं, काय चुकी आहे माझी ? तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्यावर का चिडचिड करायचं? मी काय बिघडवल आहे तुमचं ? हे खरच कळत नाही मला.तुमचा mood असेल तेव्हा तुम्ही मला चांगलं बोलणार, mood खराब असला की माझ्या वर रागावणार काय अर्थ काढायचा ह्याचा?आर्या अस काही बोलेल ह्याची सिद्धांत ने कल्पनाच केली नव्हती.