Three Thousand Stitches-- Ek Vachananubhav in Marathi Book Reviews by suresh kulkarni books and stories PDF | Three Thousand Stitches-- एक वाचानानुभव !

Featured Books
Categories
Share

Three Thousand Stitches-- एक वाचानानुभव !

नुकतेच Three Thousand Stitches हे सुधा मुर्ती यांचे पुस्तक वाचून हाता वेगळे केले. या पुस्तकात त्यांनी त्यांचे काही अनुभव कथन केले आहेत. हे अनुभव वाचकांचे केवळ मनोरंजन करत नाहीत तर काही तरी पदरात टाकून जातात. श्रीमंत करून जातात!

सुधा मुर्ती या लेखिका म्हणून सर्वाना परिचित आहेत, पण त्या 'एक व्यक्ती' म्हणून किती मोठ्या आहेत याची कल्पना हे पुस्तक वाचून येते . पुस्तक वाचताना आपला मोठेपणा त्या वाचकावर लादत नाहीत. आपलीच एखादी लहान /मोठी बहीण आपली सुख -दुःखे, यश -अपयशाच्या कथा आपल्याशी 'शेअर ' करतेय असा भास होतो.

हे पुस्तक इंग्रजीत आहे. इंग्रजी बद्दल एकंदरच आपल्या मनात न्यूनगंड आहे. इंग्लिश बोलण्या इतकेच, वाचनाला सुद्धा आपण बिचकतो. पण या पुस्तकातली भाषा परकी वाटत नाही. अत्यंत सोपी, साधी आणि प्रवाही (म्हणूनच प्रभावी ), भाषा आहे.

सुधाजीनी इंग्रजीत लिखाण कसे सुरु केले याचा किस्सा ऐकण्या सारखा आहे. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेत, म्हणजे कानडी माध्यमात झाले. त्यांना एकदा 'न्यू इंडियन एक्सप्रेस ' या इंग्रजी वृत्तपत्रातून, साप्ताहिक स्तंभ लेखना साठी विचारणा झाली. त्या वर त्या म्हणाल्या कि मला इंग्लिश पेक्षा, कानडीतुन कथन करणे सोपे जाईल. त्यावर प्रसिद्ध पत्रकार (TJS George )म्हणाले कि, 'भाषा एक माध्यम /वहान आहे. तुमच्यातला कथा गुंफणारा लेखक महत्वाचा असतो. तेव्हा भाषेचा फारसा बाऊ न करता लिहिते व्हा, भाषा तुमच्या लिखाणाला आपोआप साहाय्यभूत होत जाईल!' आणि त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. तात्पर्य इतकेच कि, भाषा गौण लेखन /वाचन महत्वाचे.

१९९६ला इन्फोसिस फाउंडेश स्थापन झाली. सामान्य माणसांना मदत करण्याच्या उद्देशाने हि Non Profit संस्था काढण्यात आली. या विश्वविख्यात संस्थेच्या चेअरपर्सन आहेत, सुधा मुर्ती.

सुधाजीनी 'देवदासी पुनर्वसन आणि जागरूकता ' या स्फोटक प्रोजेक्ट पासून सुरवात केली. त्या वेळी त्या अननुभवी होत्या. एकी कडे छुपा सामाजिक विरोध, दुसरीकडे देवदासी, बोलणेतर दूरच, पण जवळ पण येऊ देईनात. ज्या देवदासींना त्यांना चपला, टमाटे फेकून मारले, ते, त्याच देवदासींना तीन हजार 'हातानी' प्रेमाचे प्रतीक म्हणून, एक -एक टाका घालून विणलेली चादर एका भव्य कार्यक्रमात 'भेट ' दिली, इथपर्यंतचा प्रवास Three Thousand Stitches या पहिल्या प्रकरणात आहे. पण खरी 'भेट 'होती ती ,या देवदासींनी, सुधाजींच्या मदतीने, या गलीच्छ प्रथे पासून करून घेतलेली सुटका, आणि समर्थपणे सामान्य, सन्माननीय जीवन जगण्याचा घेतलेला वसा! आज याच देवदासींची मुलं उच्य शिक्षित ( डॉक्टर ,इंजिनियर वगैरे) आहेत.!

काशी यात्रा केल्यावर ,आपल्या आवडीचे काही तरी सोडावे लागते, अशी आपली प्रथा आहे. Three Handful Of Water या प्रकरणात सुधाजीनी काय वर्ज केले? हे वाचून तुम्ही अवाक व्हाल ( मी झालोय !)

कपड्यावरून माणसांची 'किंमत' ठरवणार, स्वतःहास श्रीमंत आणि इतरांना Cattle Class म्हणून हिणवणारा एक वर्ग उदयास आला आहे. अश्याच एकाचा अनुभव, Cattle Class मध्ये वाचायला मिळतो .
भारतातल्या गरजू, गरीब महिलांना नौकरी आणि मोठ्या पगाराचे आमिष दाखून परदेशात कशी पिळवणूक आणि अडवणूक होते हे No Place Like Home मध्ये आहे. हे प्रकरण डोळ्यात अंजन घालणारे आहे.

सिनेमाचे वेड, तुमच्या, माझ्या प्रमाणे सुधाजीना पण आहे! Bollywood चा इतर देशातील प्रभाव, आणि त्याचा त्यांना आलेला अनुभव, A Powerful Ambassador मध्ये त्यांनी लिहलंय. मला हे प्रकरण 'मस्त ' वाटले.

इतकेच नाही तर अजून हि बरेच काही या पुस्तकात आहे. हि फक्त काही उदाहरणे आपल्या साठी दिलीत.

त्यांचा जन्म आपल्या सारखाच मध्यम वर्गीय, सुशिक्षत, संस्कारक्षम घरात, आणि वातावरणातला झाला , ('आपल्या सारखा 'या साठी लिहल कि मी हि साधारण अशाच वातावरणात वाढलोय -माझा जन्म १९५२ चा ) पण त्यांची 'झेप ' अफाट आहे! हे त्यांनी कसे साध्य केले? या साठी या पुस्तकातील काही प्रसंग सूचक आहेत.

तेव्हा इंग्रजीची भीती बाजूला सारून हे पुस्तक जरूर वाचा, वाचनानंदाची gurantee माझी!


Title of Book : Three Thousand Stitches
Author : Sudha Murty
Publication : Penguin Random House India 2017


--सु र कुलकर्णी . माझा पहिलाच प्रयत्न . परीक्षण कसे वाटले ? जरूर कळवा . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .