Ayushyach sar - 11 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | आयुष्याचं सारं ( भाग -11)

Featured Books
Categories
Share

आयुष्याचं सारं ( भाग -11)


बौद्ध  जीवन कर्म सिद्धांत ..


   माणूस हा आजच्या गतकाळाच्या आणि येणाऱ्या काळात जो काही असतो तो त्याच्या क्रमाने घडतो ... त्यांचे कुशल कर्म त्याला चांगल्या मार्गाने नेतात आणि त्याचे दुष्कृत्य त्याला वाम मार्गाने घेऊन जातात . 

  बुद्धाचा धम्म हा धम्म आहे विशिष्ट असा धर्म नाही धर्माचं स्वरूप त्याला इतर धर्मानी दिलं असलं तरी बुद्धाने धम्म म्हणून बुद्ध धम्माची स्थापना केली 

होती . धम्म माणसामाणसातील भेदभाव नष्ट करीत असेल तरच धम्म होतो .

   बुद्ध  जातिव्यवस्थेचा  घोर विरोधक होता .  त्याने स्वतःच्या धम्मात सर्व जातीधर्मातील उपासकांना आपला परिवाजर्क होण्याची परवानगी दिली . 

सिद्धार्थ क्षत्रिय राजा शाक्य कुळात जन्माला येऊन त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यावर आपल्या भिक्षु संघात शूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्यानाही तेव्हाच्या काळात आपल्या भिक्षु संघात प्रवेश दिला .  सर्वोतपरी ब्राम्हण , क्षत्रियांचे स्थान ब्राम्हणांपेक्षा कनिष्ठ पण वैश्यापेक्षा श्रेष्ठ , वैश्याचे स्थान क्षत्रियांपेक्षा 

कनिष्ठ पण शुद्रांपेक्षा श्रेष्ठ आणि शूद्र सर्वात शेवटी , निकृष्टतम ... बुद्धाने याच सिद्धांताचा पाळामुळा सहित विरोध केला . 

  जो धर्म एकाच्या सुखासाठी दुसऱ्याचे जीवन दुखी करतो किंवा दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःचे जीवन दुखी करतो आणि इतरांचेही जीवन दुखी करतो काय अश्या धर्माचा तुम्ही आदर करणार ??  माणूस धर्म हे सांगतो धर्म ते करायला सांगतो म्हणून माणुसकी विसरत चाललाय . धर्म आणि जातं नावाच्या गटारगंगेत भर वेगाने वहात जातं ..  या बंधनात असमानता ही जीवनाची स्वाभाविक स्थिती म्हणून स्वीकारली तर ते दुर्बल आहेत त्यांना या जीवन 

संघर्षात काहीही स्थान असणार नाही . ते नेहमीच शेवटी राहतील आणि इतर धर्म त्यांची पिळवणूक करून जगणं हिरावून घेतील . 

  या समानतेच्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकाराल काय ? ?

   काही ह्या नियमाला जीवनाचा स्वाभाविक नियम म्हणून स्वीकारतात . ते नियम ही त्यांच्यातल्याच कोणीतरी लादलेले असतात .  त्यांचा तर्क असा की या नियमामुळेच तो जीवनसंघर्षात टिकून राहील ... नाही माझ्या मते उध्वस्त होईल . 

हा संदेह आहे म्हणूनच धम्म समानतेची देशाना देतो .  एखाद्याला तुम्ही हीन वागणूक दिली तर कर्माचा सिद्धांतही त्याचा आणि तुमचा बदल जातो .

तुम्ही त्याचे गुन्हेगार ठराल आणि तो गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त होईल असच घडणारं ! 

 कर्म म्हणजे मानवीय कृती . विपाक म्हणजे या कृतीचा परिणाम . जर नैतिक व्यवस्था अकुशल असेल तर माणूस अकुशल  कार्य करतो असा त्याचा अर्थ होतो . जर नैतिक व्यवस्था कुशल असेल तर माणूस कुशल कर्म करतो आहे असा त्याचा अर्थ होय .  

 कर्म नियमाचा सिद्धांत प्रतिपादित करून बुद्धाला जे सांगायचे होते ते हे की , कर्माचा परिणाम पाठोपाठ होणे अपरिहार्य आहे . ज्याप्रमाणे दिवसा मागून रात्र येते , त्याच प्रमाणे कर्मापाठोपाठ कर्माचा परिणाम होतो . हाच कर्माचा सिद्धांत आहे . 

 कुशल कर्माच्या कुशल परिणामांपासून कोणीही वंचित राहू शकतं नाही . आणि अकुशल कर्माच्या अकुशल परिणांपासून कोणाचीही सुटका नाही .  

 म्हणून बुद्धाचा उपदेश असा की , कुशल कर्म करा ! 

 ज्याक्षणी आपण कर्म करतो आणि ज्याक्षणी परिणाम प्राप्त होतात यात काही काळाचे अंतर असण्याची शक्यता आहे . असे होणे समभावनीय आहे . 

     माणूस येतो आणि माणूस जातोच . परंतु विश्वाची नैतिक व्यवस्था मात्र विद्यमान असतेच . तदवतच कर्माचा नियमही विद्यमान असतोच . हाच नियम या नैतिक वेवस्थेचा आधार आहे .. 

 सुद्न्य व्हा , न्यायी व्हा आणि सुसंगत व्हा .

 मागितल्यावर थोडे तरी द्या ! 

 कुणाला दुखवू नका , हिंसा करू नका .

 चित्त विचार शून्य ठेवा , 

 तुमच्या मनाचा केंद्रबिंदू तुमचे चित्तच आहे .

   विजयाने वैरभाव उत्पन्न होतो . विजित दुखी होतो . कष्टिक होतो . शांत माणूस जयपराज्याची  चिंता त्यागून सुखाने निद्रिस्त होतो . 

कामतृष्णेसारखा अग्नी नाही . उपादान स्कधासारखे दुःख नाही . द्वेषासमान दुर्भाग्य नाही . निवार्णासारखे सुख नाही . 

द्वेषाने द्वेष कधीच शमत नाही . द्वेष प्रेमानेच शमतो . हे प्राचीन विधान आहे . माणसाने क्रोधाला प्रेमाने जिकावे . असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे . लोभाला उदारतेने जिंकावे .. असत्याला सत्याने ...

हाच बुद्धाचा जीवन मार्ग आहे .