Babhulvadit bhru lilya v netra adakari in Marathi Comedy stories by Pradip gajanan joshi books and stories PDF | बाभुलवाडीत भ्रू लीलया व नेत्र अदाकारी

Featured Books
  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

  • Nafrat e Ishq - Part 7

    तीन दिन बीत चुके थे, लेकिन मनोज और आदित्य की चोटों की कसक अब...

Categories
Share

बाभुलवाडीत भ्रू लीलया व नेत्र अदाकारी

मुंबई गोवा मार्गावर बाभुलवाडीकडे असा एक छोटासा बोर्ड लागतो. हायवे सोडून आत वळले की बाभुलवाडीची वाट लागते. वाट कसली हायवेला लाजवेल असा गुळगुळीत रस्ता.  गावात कायमची वर्दळ.   लोकांना हायवे पर्यंत एक किलोमीटरची सारखी येजा करण्याची सवय. गाव डोंगराच्या पायथ्याला असल्याने वस्ती विरळ. अस असलं तरी गाव सुधारणेच्या बाबतीत अन्य गावापेक्षा कांकणभर पुढचं. याच कारणांमुळे गाववर  अधिकारी वर्गाची भलतीच मर्जी. कुठलीपन योजना आली की त्यात या गावचं नाव पहिलं. सरपंच पण अक्टिव्ह. त्यामुळे गाव सतत चर्चेत.

गावाला एक सवय चांगली हुती. पहाटेच गावाला जाग यायची. तरणी, म्हातारी, नोकरदार, रिकामटेकडी सारी सुर्यदेवाच दर्शन कधी चुकवत नव्हती. गावाच्या मध्यभागी हनुमानच एक मंदिर हुतं. पहाटेच्या वेळी मंगल गाणी लावली जायची. त्या तालावरच माणसं सकाळची सारी काम उरकायची. तरण्या पोरी झीनत अमान गत घागर घेऊन नदीवर देवाला पाणी आणण्यासाठी जात. पैलवान गडी जोर बैठका काढण्यात मग्न. पहाटे साडे पाचलाच गावातील सर्व व्यवहार सुरू. अगदी गणा न्हावी, दत्तू चांभार, शंभू लोहार देखील त्याला अपवाद न्हवते.

गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही व्यवसायाचा शुभारंभ हा पहाटेच होत असे. त्याची वाच्यता आधी केली जात नसे. गाव जाग झाल्यावर नवीन बोर्ड गावात दिसला की समजायचं आजपसन गावात नवा धंदा कुणीतरी सुरू केला. सूर्य जसा जसा वर येईल तशी तशी हनुमानाच्या मंदिरावरील स्पीकरवर त्याची माहिती दिली जायची. तेंव्हा आख्ख्या गावाला ही बाब कळायची.

गावात पंधरा वीस जणांचं उनाड टोळकं हुत. सकाळी ही मंडळी प्रातर्विधीसाठी गावाबाहेर जात असत. गावच्या आधी बातमी कळावी म्हणून जाताना ती बॅटरीचा उजेड पाहून नवीन बोर्ड दिसतोय का याची चाचपणी करायची.

आज असच हे टोळकं पहाटे पहाटे गावाबाहेर चाललं हुतं. तेवढ्यात जंब्या वडार एकाएकी जागेवरच थांबलं. त्यांन बॅटरीचा फोकस पडला. एका स्लॅबच्या इमारतीवर त्याला एक डिजिटल बोर्ड दिसला. सारी मंडळी थांबली. बोर्डवरची अक्षरे वाचू लागली. “मेघना भ्रू लीला नेत्र अदाकारी क्लासेस. मर्यादित प्रवेश. आजच भेटा.” बोर्डवर भुवया उंचावलेल्या व एक डोळा मिटलेल्या सुंदर बाईचा फोटो होता.

त्यांना काय हाय हे नेमकं कळना. कसला तरी क्लास हाय याचा उलगडा झाला. आल्यावर सविस्तर बघू म्हणून ते आपल्या कामाला निघून गेले. बघता बघता आख्ख्या गावात ही बातमी झाली. स्पीकरवर माहिती दिली गेली. कोणालाच नेमका अर्थबोध होईना. कॉलेज्यात जाणाऱ्या पोरा पोरींना मात्र त्याचा लगेच उलगडा झाला. ती गालातल्या गालात हसू लागली. क्लासला जायचा सारेजण हट्टच करू लागले.

गावातल्या लोकांना माहिती देण्यासाठी मेघनाने सायंकाळी सर्वाना हनुमान मंदिरात निमंत्रित केले. वेळे आधी गावच्या गाव जमा झाला. गावचं सरपंच कार्यक्रमाच अध्यक्ष हुतं. शाळेचं हेडमास्तर प्रमुख पाहुणे हुते. मेघना बाई माहिती देण्यासाठी उभ्या राहिल्या. डोळ्यात काजळ, भुवया कोरलेल्या, गालाला लाली, ओठाला लिपस्टिक, चुडीदार पायात उंच टाचेची पादत्राणे असा थाट त्यांनी केला हुता. गावचं पाटील शाळेचं हेडमास्तर बाईचा कार्यक्रम म्हटल्यावर सफारीत आलं हुतं.

मेघनाबाई म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी मी एका तमिळ चित्रपटातील नटीची मुलाखत ऐकत व पहात होते. प्रेमात सफल होण्यासाठी केवळ दिसायला चांगले असून उपयोग नाही. मुलांना मुलींकडे व मुलींना मुलांकडे कटाक्ष टाकता आला पाहिजे. त्यासाठी डोळ्यांच्या भुवयांच्या गतीने हालचाली करता आल्या पाहिजेत. डोळा मारता आला पाहिजे. यात अवघड काही नाही सरावाने सारे काही जमू शकते. नुसतं ऐकून तुम्हाला कळणार नाही. मी प्रात्यक्षिकच करून दाखवते.

अस म्हणून त्या उठल्या. सर्वजण डोळे विस्फारून बसले. त्यांनी पुरुष व तरण्या पोराकडे पाहून भ्रू लीला म्हणजेच भुवयांच्या हालचाली केल्या. नेत्र अदाकारी केली म्हणजेच दीर्घकाळ डोळा मारला. तस सार वातावरण बदललं. शिट्ट्या वाजल्या. जोतो तीच नक्कल करू लागला. काहींना जमलं काहींना एक डोळा मारताच येईना. गावचं सरपंच शाळेचे हेडमास्तर खुश झाले. त्यांनी स्तुत्य उपक्रम असल्याचं जाहीर केलं.

दुसऱ्या दिवशी भृलीला नेत्र अदाकारी क्लासला प्रवेश घेण्यासाठी एकच गर्दी झाली.  तरण्यापेक्षा म्हातारेच पुढच्या रांगेत प्रवेश घेण्यासाठी होते. मेघनाबाईना प्रवेश कसा द्यावा हेच कळेना. त्यांनी एक नियमावली तयार करून लावली ती अशी. 1) कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना क्लासला प्रवेश दिला जाईल. 2) पुरुष व महिला यांचे पहिले दोन महिने भुवया हालचाली व डोळा मारणे याचे स्वतंत्र क्लास होतील. 3)काजळ डबी प्रत्येकाने आणावयाची आहे. भुवया ज्याच्या त्याने कोरून याव्यात. 4) पहिले दोन महिने प्रत्येकी 200 रुपये फी राहील. 5) त्यानंतर चार महिने पुरुष महिला यांचे सरावासाठी एकत्रित क्लास घेतले जातील. 6)या  चार महिन्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये फी घेतली जाईल. 7)घरी किंवा रस्त्यावरून जाताना भ्रू लीलया किंवा नेत्र हालचाली याचा सराव करावा. हा सराव करताना कोणाचा मार खावा लागला तर त्यास आमची संस्था जबाबदार राहणार नाही.  8)भ्रू लीलया येण्यासाठी पिंजरा चित्रपटातील संध्याचे “पापण्यांची तोरण बांधून तुमच्यासाठी” हे गाणे न चुकता रोज पहावे.  नेत्र हालचालींसाठी माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, हेमामालिनी, श्रीदेवी यांचे चित्रपट पहावेत.

मेघनाबाईंचा क्लास फुल्ल चालू लागला. गावात भ्रू लीलया व नेत्र हालचाली वाढल्या. घराघरात संशयाचे वारे वाहू लागले.  वर्षभरातच क्लास बंद करावा लागला पण प्रेमात नेत्र कटाक्ष गरजेचा असतो याची प्रचिती मात्र सर्वाना आली.