Ayushyach sar - 10 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | आयुष्याचं सारं ( भाग -10)

Featured Books
Categories
Share

आयुष्याचं सारं ( भाग -10)


कुठे शोधू रे मी तुला आता ?? 

म्हणतात कल्पने पेक्षा वास्तव खूप भयंकर असते . कवी लेखकच तो असतो जो फक्त काल्पनिकतेला वास्तविकतेच वळण देतो . पण वास्तविकता किती भयाण असते तिथे भावनेच्या दरीत कोसळून वेदनांचा तांडव होतो ... मला सख्खा भाऊ नाही पण त्याच्या  रूपात मला सख्खा भाऊ मिळाला होता . त्याची आणि माझी  ओळख म्हणजे कवी विश्वात जगणारी दोन पाखरे होतो . कवितेच्या डहाळीवरून भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी . ह्या लेखाच्या भावविश्वातून  ओळख झाली तो  माझ्या कविता लेख वाचून भरभरून दाद द्यायचा . आणि माझे विचार त्याला  आवडू लागले  . त्याला  मी दादा म्हणावं भाऊ मानावं हे सारखं वाटायचं तो  मला तसं नेहमीच ताई म्हणायचा . मी त्याला म्हणायची प्लिज मला ताई नको ना बोलू अरे मी तुझ्यापेक्षा खूप लहान आहे दादा . तरी तो  ऐकायचा नाहीस शेवट पर्यंत तो ताई बोलतं राहिलास . आम्ही एकमेकांना कधी बघितलं नाही आमची  भेट झाली नाही म्हणून तो मला भेटायलाही आला माझ्या हॉस्टेलवर पण मी तेव्हा त्याला  जाणून भेटली नव्हती . कारण मी त्याला  कधी बघितलं नव्हतं . तो माझ्या हॉस्टेल समोर येऊन निघूनही गेला . नंतर तोच  मला सांगत होता मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी म्हटलं त्याला  देऊन दे कुणालाही पण तो  म्हणाला मी ते तुझ्यासाठी घेतलं ते तुझ्यानावाने राहिलं तसंच पडून ते तुझं नाही तर कुणाचंच नाही . पण नंतर रक्षाबंधनला आमची  भेट झाली . त्याने माझ्याकडून राखी बांधून घेतली . मी त्याला म्हटलं दादा मी तुला भाऊ मानतेनं ह्या धाग्याने काही नसते होतं रे ! तरी तो  म्हणाला " कोमू ताई प्लिज एकदा राखी बांध मग मी तुला कधीच म्हणार नाही जास्त महागाची नको फक्त पाच रुपयाची राखी घेऊन ये माझ्यासाठी .." तेव्हा मी त्याला  ती राखी बांधली होती त्या नंतर दादा आपली कधी भेटच नाही झाली रे माझ्या आयुष्यात मी त्याला एकदाचं भेटली तिचं आमची  पहिली आणि शेवटची भेट होती .. ..

मला बहीण मानून खूप दूर निघून गेला तो  तिथे माझ्या भावना आणि माझं हे पत्र तरी त्याच्या  पर्यंत कसं पोहचेल ?? तुझा पत्ता तरी सांग दादा  माझ्या भावना न बोलताही ओळखणारा तू  दादा जवळ जवळ आठ नऊ महिने झालेत रे तुझा आवाज माझ्या कानापर्यत पोहचला नाही . आणि दोन तीन दिवसापूर्वी तुझी सारखी खूप आठवण सतावत होती म्हणून मी तुझ्या नंबर वर फोन लावला ... माझा फोन बिघडल्यामुळे तुझा नंबर ही फोन मधून डिलीट झाला होता . तो मी मिळवला आणि तुला कॉल केला रिंग गेल्या पण तुझ्याकडून मला काहीच प्रतिसाद नव्हता मिळतं दादा . 

तू तर माझा एक मिसकॉल बघून विलंब न करता कॉल करायचा . त्या दिवशी मला वाटलं दादा तू खूप रंगवलाय रे माझ्यावर . आणि तू खरचं एवढा रागवशील कि माझ्यासोबत कधी बोलणारचं नाही हा कधी मी विचारच केला नाही .. माझं आयुष्य किती तडजोडीच होतं हे तुला हि आठवतंय जेव्हा आई लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये महिनाभर भरती होती तेव्हा माझे सख्खे मामा नातलंग मला एका दिवसाला कॉल करून आई कशी आहे ? कोमल तू कशी आहेस ?? विचारायचे नाही तेव्हा तू मला कॉल करून विचारायचा आईची तब्येत विचारायचा तेव्हा मला बरं वाटायचं . असं वाटायचं चला सख्खी नाती दुःखात सोडून जातात तू तरी आहे . 

कॉलेज आणि आता जॉब ह्या धावपळीच्या जीवनात आज आठ महिन्याचा काळ जास्त लोटला तुला वेळ देता आला नाही . आठवण खूप यायची पण वाटायचं तू तुझ्या आयुष्यात सुखी असणार तू ह्या जगात वावरत आहे हीच माझी खोटी आशा ठरली ...

दोन दिवसापूर्वी मी तुला कॉल केला आईनेही उचला नाही त्या बोलायच्या माझ्या सोबत पण त्या दिवशी फक्त रिंगचं जातं होत्या .. आणि माझे कान तुझ्या तोंडून एकदा ताई शब्द ऐकायला आतुर झाले होते . आता मन घायाळ झालंय ...

तू मला आठवण आल्यावर कॉल करशीलच असं वाटतं होतच सारखं मनाला . पण तुझा कॉल न येता काल तुझ्या एका मित्राचा कॉल आला आणि तू अपघातात जागीच ठार झाल्याचं ऐकून धक्काच बसला ... 

वर्तमानपत्रात मी जेव्हा तुझ्या मरणाची बातमी वाचली तेव्हा डोळ्यातून अश्रूची गळती सुरु झाली . तुझा मित्र जेव्हा सांगत होता तेव्हा मी त्यांना हेच म्हटलं नाही कसं शक्य आहे दादा चा अपघात आणि त्यात त्यांना एकट्यालाच मरण आलं बाकी दोघे जखमी झाले . नियतीला ही तुला माझ्या पासून हिरावून घ्यायचं असेलं ..

दादा मी तुला बांधलेली राखी तू किती दिवस जपून ठेवली आपल्या डायरी मध्ये ... तुझा मित्र मला सांगत होता मी तुला बांधलेली ती राखी आता पण तू जपून ठेवली हे ऐकूनच खूप रडली रे मी आता तुझ्यासाठी दुखी होते तुला माहिती आहे मला भाऊ बहीण नाहीत मी आईबाबाला एकटीच आहे . तुझ्या नंतर दादा मी कुणाला राखीही नाही बांधली . आणि आता नियतीने माझ्यापासून माझा भाऊ हिरावून घेतला तर कुणाला दादा सुद्धा बोलणं खूप अवघड जाईल मला आणि मी कुणाला आता दादाही नाही बोलू शकतं .. पण माझं दुःख जाणून घ्यायाला तू नाहीस ... १४ एप्रिल २०१८ ला अंगुलीमाल उराडे एक लेखक कवी आणि माझं जगातलं अनमोल नातं ह्या विश्वातून कायमचा निरोप घेऊन अपघातात ठार झाला ...दादा तू असा अचानक कसा निघून जाऊ शकतो ? १७ मे ला तुझं लग्न ठरलं होतं .. तुझं पोलीस बण्याचं स्वप्न ?? ते हि तुझ्या सोबत ह्या आस्मंतात विलीन झालं . तू नेहमी म्हणायचं ताई हे जग खूप खराब आहे गं मला पोलीस होऊन गुन्हेगारीला नष्ट करायचं आहे .. न्यायव्यवस्थे बद्दलची विचारधाराणा आपली किती जुळायची खूप काही बोलायचं राहून गेलं दादा ... तू १४ एप्रिलचा ह्या जगाचा निरोप घेऊन गेला आणि मला तू जगातच नाही माझ्यापासून खूप खूप दूर निघून गेला हे तिथून १२ दिवसांनी कळलं . ते ही तू तुझ्या मित्राला माझ्या बदल सांगून ठेवलं माझी राखी डायरीत जपून ठेवली . कोमल मानकर नावाची तुझी कोणी बहीण होती आणि ती राखी मी तुला बांधली दिली होती हे मित्राला सांगून तू निघून गेला . त्याचं मित्राने तुझ्या फोन मधून माझा नंबर मिळवून मला तू हे जग सोडून गेल्याच सांगितलं ..तुझं मन त्या निरभ्र अवकाशा पेक्षाही खूप मोठ होतं .. तुझ्या उपकाराची मी आयुष्यभर ऋणी राहील पण त्याची परतफेड आता मला तुला करता नाही येणार पण तुझ्यासोबत मला अखेरचं बोलताही नाही आलं दादा ...त्यासाठी मला माफ करशील प्लीज दादा मी खूप अभागी आहे रे आधीच ह्या बहीण भावच्या नात्यात मला सख्ख नातं कधी गवसलं नाही . आज तू असता तर ही आसवं डोळ्यात नसती ..

  खूप रडतय बघं आज माझ मन पण कस सावरू मी स्वतःला तू तर खूप दूर निघून गेला मी तुझ्यापर्यंत पोहचू शकणार नाही . दादा तू सांगना कुठे शोधू रे मी तुला आता ??

  © कोमल प्रकाश मानकर