Ayushyach sar - 8 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | आयुष्याचं सारं ( भाग -8 )

Featured Books
Categories
Share

आयुष्याचं सारं ( भाग -8 )


    पाऊसात भिजून विरलेलं नातं ..

ढग गडगडायला सुरुवात झाली .... रेवती बाल्कनीत उभी राहून कॉफी पीत होती एवढ्यात तिचा फोन वाजला .

आज बरेचं दिवसानंतर त्याचा फोन येताना पाहून रेवतीलाही ओशाळल्या सारखं झालं .... ती मनातच म्हणाली ,

" आली ना शेवटी माझी आठवण .... तू नाही राहू शकतं रे माझ्याविना ..." 

फोन उचलत विलंब न करता तिने कानाला लावला कॉफीचा घोट गिळत ती म्हणाली , " बोल ना आता .. " 

त्यावर जरा हळू स्वरातच तो म्हणाला , " मला तुला भेटायचं आहे आता .... " ती जरा भांबावलीच 

" आताचं भेटायचं आहे तुला ?? "

" हो ..... का , तुला यायचं नाही ? "

" येते ..... रॉयल कॉफी शॉप मध्ये भेटूयात ना ! "

" हो ये तिथेच .... " 

रेवतीने हातचा कप ठेवला .... पांढऱ्या रंगाचा सलवार त्यावर गुलाबी रंगाची ओढणी ओढतचं गाडीला किक मारली

आणि निघाली अनुपला भेटायला .... तिथे जाऊन गाडी पार्किंगवर लावत असताना अनुप टेबलवर येऊन निराश

चेहऱ्याने बसलेला तिच्या दृष्टिस पडला .... ती घाईतच अनुपच्या समोर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली ....

दोघही एकमेकांना नजरेने न्याहाळत होते पण कोणीच कुणासोबत काही बोलत नव्हतं ....

( सहा महिन्यापूर्वी झालेला वाद अद्यापही ह्यांच्यात ताजाच होता . )

विजा चमकत होत्या रेवती त्या विजाकडे टक लाऊन बघत होती आणि अनुप तिच्या नजरेत ... शेवटी स्मृतीभंग करत

रेवतीच अनुपला म्हणाली ,

" का असा बघतोय असा ?? " त्यावर अनुप म्हणाला , " कधी बघायला मिळणार नाही म्हणून .."

त्याचं हे बोलण रेवतीला विचित्रच वाटलं ,

" का ? आपण बोलायचं नाही भेटायचं नाही हे तुचं ठरवलं कॉल करून आज

इथे अचानक तुचं मला बोलवून घेतलं आणि तुचं परत म्हणतो कधी बघायला मिळणार नाही ?? तुझ्या मनात काय चालय अनुप

मला कळेल का ?? " 

रेवतीचा हात हातात घेत अश्रू दाटल्या डोळ्यांनी अनुप उद्गारला , " रेवती माझ लग्न ठरल्य ... " 

त्याचा हात क्षणार्धात रेवतीच्या हातून सुटला आणि ती जागेवरून ताडकन उभी झाली ... तशीच ती वेगाने आपल्या गाडीकडे निघाली

तिच्या मागेच अनुप गेला ....

" रेवती माझं ऐकून तर घे , माझ्या घरच्यांनी त्या मुलीसोबत माझं लग्न ठरवलं माझी इच्छा नाही ग तिच्यासोबत लग्न करायची ..." 

त्याच्याकडे एक कटाक्ष टाकत तिने गाडी चालू केली पण गाडी सुरु होत नव्हती .... एवढ्यात मुसळधार पावसाने जोमाने पडायला सुरुवात केली

दोघेही पावसात भिजत होते .... (चक्री वादळानेही तांडव घातलं होतं .)

रेवती अनुप सोबत काहीच बोलत नव्हती .... तिच्या मनात अनुप बदल रागही नव्हता जणू पावसासोबत तो विरघळून गेला असावा ... 

आतल्या आत ती रडत होती .... 

" रेवती अग ऐक ना पाऊस खूप येत आहे उगाच भिजू नको तुला सर्दी होईल ...." त्याच्या ह्या बोलण्यावर रेवती म्हणाली ,

" आताही एवढी काळजी करतो माझी ?? " 

" रेवती आता तू तुझ टाने मारत बोलण बंद कर पाऊस बघ किती येत आहे ... " 

" माझी गाडी बंद पडली अरे पेट्रोल संपल्य तू वाट बघत बसला असेलं म्हणून मी किती घाईत आली बघं ! ओह्ह्ह नो ." 

मनात अनुप म्हणाला , " आजही तुला माझी तेवढीच ओढ ..." 

तिच्या हातून गाडी घेतं एका आडोशाखाली लावतं अनुप म्हणाला , " लॉक करून राहूदे इथेच ... मी तुला ड्रॉप करून देतो . "

अनुपने आपली गाडी तिच्यासमोर आणत तिला बसायला विनंती केली ... रेवती बसली नकळत तिचे दोन्ही हात बसतांना अनुपच्या खांद्यावर स्थिरावले . 

अनुप शहरलाच आणि स्वतः सोबतच काहीबाही पुटपुटत म्हणाला , " मला पकडून बसायची सवय गेली नाही हिची ... आजही तेवढंच प्रेम करते ना माझ्यावर ? " 

दोघही मनातच एकांतात बोलतं होते पण ते शब्द ओठावर रेंगाळत ठेवत होते .... त्या शब्दांना वाचा फ़ुटूच नव्हते देत . 

" अनुप तू तरी तिच्यासोबत लग्न करून खुश होशील का ?? " ( रेवतीच्या मनात साचलेला प्रश्नाचा गाळ .)

दोघांच्या बोलण्यातही आज भयाण शांतता होती ....

रेवतीच्या घरा समोर गाडी आणत अनुपने थांबवली काही न बोलता ती उतरली .... अनुपची गाडी एवढ्यात सुरु नव्हती होतं तो उतरला आणि काय झालं म्हणून बघू लागला गाडीचे वायर जळले होते ... रेवती घराच्या दिशेने जायला निघाली ती सारखी मागे वळून बघत होती ... त्या भरधाव पावसात तिचे अश्रू पाऊसाने लपले होते ... अश्रुधारा ओघळत होत्या ती धावतच अनुपजवळ गेली ... अनुप तिच्याकडे वळताच तिने त्याला घट्ट आलिंगनात कैद केले ...

रडतच रेवती अनुपला म्हणाली ,

" अनुप त्या मुलीशी लग्न नको ना रे करू ... मी नाही जगू शकणार तुझ्याविना ! "

तिच्या कपाळावर आपले ओठ हलकेच टेकवत अनुप म्हणाला ," रेवती ... हेच ऐकायला मी आज तुला ताबडतोब बोलवून घेतले ! "

" तुझे आई बाबा तयार होतील ना माझ्यासोबत तुझं लग्न करून दयायला ... "

" आईला माहिती आहे ग तुझ्याबद्दल पण एवढ्यात आपल्यात झालेले वाद त्या मुळे मी गोंधळून गेलो आणि बाबाने त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत माझ लग्न ठरवलं ... "

" मग आता अनुप ... "

" तुझी साथ पाहिजे रेवती बाकी काही नको , तू सोबत अशील तर घरचे होकार देतीलच ..... "

रेवतीने आपला हात अनुपच्या हातात घट्ट केला .... आतापर्यंत होत असणाऱ्या अश्रुधाराची गळती बंद झाली तीने डोळे पुसतच अनुपला आपला होकार दर्शविला ...

पाऊस मात्र जोमाने बरसत आपल्या वृष्टीचा वर्षाव अनुप आणि रेवतीवर करत होता .... पाऊसात भिजून विरलेलं नातं मंगलाष्टाच्या बोहल्यावर चढलं

अनुप आणि रेवतीसाठी हा पाऊस म्हणजे एक अविस्मरणीय भेट ठरला .... !!

आजही ते त्या पाऊसाला खूप खूप धन्यवाद देतात ....

कोमल सुनंदा मानकर