Pathlag - 27 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग (भाग-२७)

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

पाठलाग (भाग-२७)

डिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला.

थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला.

“सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच कुठे ना कुठे तरी”, राणा

“राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला

“येस्स सर…”, राणा

“ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता?”

“नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा

“हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा

“ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण कनेक्शन.. म्हणजे तो इथे असताना त्याने कोणीतरी शत्रु निर्माण केला होता.. कदाचीत त्याचाच बदला म्हणुन..”, राणा

“हो.. मला ही तसंच वाटतं आहे”, डिसुझा

“पण मग सर.. दिपक?? त्याचा आणि शेखावतचा संबंध लक्षात आला.. पण त्याचा आणि दमणचा? काही तरी मिसींग लिंक आहे सर.. कोणीतरी ज्याने दिपक..दमण.. आणि शेखावत तिघांशी कनेक्शन आहे..”, राणा

“करेक्ट.. पण ती मिसींग लिंक..कोण लक्षात येत नाही”, डिसुझा आपल्या डोक्याला चालना द्यायचा प्रयत्न करत होता.

थोडा वेळ शांततेत गेल्यावर डिसुझा म्हणाला, “राणा, जेंव्हा शेखावत इथे पोस्टींगला होता.. दहा वर्षापुर्वी.. तेंव्हा इथे स्टेशन इन्चार्ज कोणं होतं बघा.. कदाचीत तेथुन आपल्याला काही माहीती मिळु शकेल..”

“ओके सर.. स्टेशन-डायरीमध्ये नक्की नोंद असेल त्याची.. मी लगेच चेक करुन सांगतो..”, राणा म्हणाला

डिसुझा टेबलावर पाय टाकुन डोळे मिटुन शांत बसला होता…

“सर!!”,राणा

“बोला राणा..”, डिसुझा

“सर.. सकाळ होत आली आहे… चहा सांगु?”, राणा

“हम्म सांगा.. परत कधी वेळ मिळेल सांगता येत नाही”, डिसुझा हसत हसत म्हणाला

राणा रेकॉर्ड्स तपासायला लगबगीने निघुन गेला


“युसुफ???”, युसुफला मायाच्या घरात बघताच दिपक स्तंभीत झाला होता. त्याचं इथे असणं दिपकच्या दृष्टीने अगदीच अनपेक्षीत होते.

“हॅल्लो फ़्रेंड”, युसुफ छमी हसत म्हणाला
“तु?? तु इथे कसा?”, दिपक अजुनही आश्चर्याच्या धक्यातुन सावरला नव्हता.

दिपकच्या ह्या प्रश्नाने माया आणि युसुफ दोघंही हसायला लागले.

“मित्रा, मी इथेच आहे.. पहील्यापासुनच.. तुला भेटायच्याही आधीपासुन…”, युसुफ
“म्हणजे? मी समजलो नाही”, दिपक
“बसं बसं.. फार मोठ्ठी कहाणी आहे ती”, माया त्याला सोफ्याकडे बोट दाखवत म्हणाली.

“युसुफ.. त्याचा तो बुटांमध्ये लपवलेला सुरा आधी काढुन घे बरं..”, माया

दिपकवर रोखलेली बंदुक तशीच धरुन ठेवत युसुफ पुढे आला आणि त्याने दिपकच्या सॉक्समधला तो सुरा काढुन घेतला. लगोलग त्याचा शर्ट आणि पॅन्ट एकदा अजुन काही हत्यार लपवलेलं नाही ना पहाण्यासाठी तपासुन घेतली. आणि मग त्याने ’ऑल ओके’ असल्याची मायाला खुण केली.

“युसुफ माफीयाचा माणुस आहे”, माया म्हणाली

“व्हॉट??”, दिपक

“हम्म.. माफीयाचाच एक सदस्य.. पण माझ्यासाठी काम करणारा”, माया सांगु लागली.. “तुला काय वाटतं तुझी आणि युसुफची भेट.. त्या जेलमध्ये.. योगायोगाने झाली?.

नाही दिपक.. मला त्यावेळी एका मोहर्‍याची गरज होती.. जो माझं काम करु शकेल असा. युसुफ नेमका त्यावेळी तुरुंगात होता. आणि तसही युसुफला मला ह्या कामात अडकवायचे नव्हते. मला कोणीतरी नवीन माणूस हवा होता. युसुफ त्याच तुरुंगात जेथे तु होतास. तुझी दर्दभरी कहाणी मी टि.व्ही.वर ऐकली होती. शेखावतकडुन तुझा होणारा छळ मला ठाऊक होता. मला असं वाटलं.. कदाचीत मला हवा असलेला मोहरा तु बनु शकशील. मी त्या दृष्टीने युसुफला तुझ्याशी संपर्क वाढवायला सांगीतले. आणि मग तुझी आणि युसुफची भेट झाली.

मग आम्ही तुला घेऊन तुरुंगातुन पळुन जायचा प्लॅन करायचं ठरवलं. माफीया भाईचा छोटा भाऊ, इस्माईलसुध्दा त्याच तुरुंगात होता. मग त्याला सुध्दा प्लॅनमध्ये सामील करुन घेतलं..

परंतु त्या जेलमधुन सुटणं शक्य नव्हतं. तु ते शक्य करुन दाखवलंस.. दॅट वॉज अ गुड प्लॅन, एक्झीक्युटेड सस्केसफुली…”, माया टाळ्या वाजवत म्हणाली.

“तुरुंगातुन पळतानाच इस्माईलला टपकवायचं आम्ही ठरवलं..”, माया पुढे म्हणाली..

“पण का? तो तर माफीयाचाच माणुस होता ना? भाईचा छोटा भाई. मान्य तुझी आणि त्याची दुष्मनी आहे.. तुझ्या मुलीच्या जिवाला धोका…”

दिपकच वाक्य पुर्ण व्हायच्या आधीच माया आणि युसुफ खदाखदा हसायला लागले…

“मुलगी?? माझी???”, माया हसत हसत म्हणाली आणि मग एकदम गंभीर झाली.. “मला मुलगी कशी असु शकते दिपक.. त्या शेखावतने माझ्या नवर्‍याला अपंग करुन टाकलं होतं. त्याच्या एका फडतुस गोळीने माझ्या नवर्‍याच्या मणक्याची वाट लावुन टाकली.. कमरेपासुन खालपर्यंत तो पुर्ण क्रिपल्ड होऊन गेला दिपक…” माया

“म्हणजे.. तु मला जे तुझ्या मुलीबद्दल सांगीतलेस ते..”, दिपक

“साफ खोटं होतं.. साफ खोटं…”, मायाने हातातली व्हिस्की बॉटम्स अप केली. तो जळजळीत घोट घश्याखाली उतरताना तिचा चेहरा वाकडा तिकडा झाला

जी आपल्या मनात भरु लागली होती.. जिच्याशी आपण शरीरसंबंध ठेवले.. हीच का ती माया? असा काहीसा प्रश्न दिपकच्या मनात येऊन गेला.

दमणच्या पोर्टवर आमचं पुर्ण राज्य होतं. माफीयाने आम्हाला दडपायचा अनेकदा प्रयत्न केला. इथुन बिनबोभाट होणारं स्मगलिंग आणि त्याद्वारे मिळणारा नफा त्यांना आकर्षीत करत होता. परंतु आम्ही त्यांना दाद देत नव्हतो.

एके दिवशी त्यांनी स्मगलिंगद्वारे होणार्‍या एका शिपमेंटची पोलिसांना टिप दिली. आणि पोलिसांने ऐनवेळी धाड टाकली.

माझ्या नवर्‍याने लाच देण्याचे. सरेंडर होणाचे सगळे प्रयत्न करुन पाहीले. परंतु माफियाकडुन मिळालेल्या ‘टिप’ नुसार सर्व मामु लोकं मारायलाच.. एन्काऊंटर करायलाच आले होते.

माझा नवरा तेथुन पळुन जात असताना शेखावतने गोळी झाडली ती त्याच्या पाठीत घुसली आणि आमचे वर्चस्व संपल्यातच जमा झाले. गेली कित्तेक वर्ष माझा नवरा बेडवरच खिळुन आहे…आजही तो वरच्या खोलीत निपचीत पडला असेल…”, माया

“यु मीन.. तुझा नवरा.. इथे.. ह्या बंगल्यातच आहे?”, दिपक

“हम्म..”, व्हिस्कीचा दुसरा पेग भरत माया म्हणाली

“आणि तरीही.. इथे.. तु माझ्याशी…..”, दिपक…

“काय फरक पडतो दिपक.. इट वॉज ऑल पार्ट ऑफ़ द गेम..”, माया पुढे बोलत होती.

“सो.. इट वॉज नॉट लव्ह???”, दिपक.
“लव्ह… ओह माय गॉड.. कमॉन दिपक.. ग्रो अप..”, हसत हसत माया म्हणाली… “एनीवेज.. तर मला त्या शेखावतचा बदला घ्यायचा होताच आणि माफियाचा सुध्दा. मला वाटलं, ती वेळ योग्य होती. तु सुध्दा तुरुंगातुन पळुन जायला, सिस्टीम विरुध्द बंड करायला उत्सुक होतास. आमच्या दृष्टीने तु योग्य होताच. तुझ्यात ते पोटॅंन्शिअल होते जे आम्हाला हवं होतं…. त्यानुसार आम्ही प्लॅन तयार केला.

तेथुन बाहेर पडताना झालेल्या गडबडीचा फ़ायदा घेऊन युसुफने इस्माईलचा काटा काढला. आणि ते योग्यही होतं. त्या गडबडीत इस्माईल नक्की कसा मेला, त्याला कोणी मारला कुणालाच कळले नसते. अर्थात त्याचा आळ तु्झ्यावर यावा असं आम्हाला वाटतं नव्हतं.. पण जे झालं ते अधीक चांगलं झालं..”, माया

“इस्माईलला युसुफने मारलं? शक्यच नाही. मी बघीतलं, एका पोलिसाच्या गोळीने त्याचा वेध घेतलेला.”, दिपक
“असं तुला वाटलं दिपक.. पोलिसांनाही तेच वाटलं.. पण इस्माईलला संपवलं युसुफने. तुम्ही तुरुंगातुन पळायच्या एक दिवस आधीच एक रिव्हॉल्व्हर युसुफला पोहोचवण्यात आली होती..”, माया

दिपक संतापुन युसुफकडे बघत होता.

“आमच्या प्लॅननुसार, इस्माइलला मारुन तुला माझ्याकडे घेउन यायचं असं ठरलं होतं. पण ऐनवेळेस गडबड झाली, तुझी आणि युसुफची चुकामुक झाली.

पोळ फुटलेल्या मधमाश्यांसारखे पोलिस सर्वत्र पसरले होते. त्यामुळे युसुफ ने तुला शोधण्यात जास्त वेळ नाही घालवला आणि तो तडक तेथुन पळुन गेल्यावर माझ्याकडे आला. त्याच दिवशी इस्माईलला तु मारल्याची बातमी न्युज मध्ये आली आणि त्यामुळे आम्हाला आमचा प्लॅन थोडा चेंज करावा लागला. जे झालं ते आमच्या पथ्यावरच पडलं. माफीया हात धुऊन तुझ्या मागे लागली. युसुफही माफीयाला जाऊन मिळाला.

पोलिसांच्या बरोबरीने माफियाची लोक सुध्दा तुला शोधत होती. तुझ्याबद्दल माफियाला मिळणारी प्रत्येक माहीती युसुफला, आणि पर्यायाने मला मिळत होती.

तुझं नशीब बलवत्तर आणि तुला थौमस भेटला. वाटल होत तू काही दिवसांनी तेथून बाहेर पडशील. पण झाल उलटंच, तु तेथे स्टेफनीच्या घरट्यात जाऊन लपलास आणि तेथे चांगलाच रमलास.

युसुफ तुझ्यावर नजर ठेवुन होता. परंतु तुझी तेथुन बाहेर पडायची काहीच चिन्ह दिसेनात. तुला तेथुन हुसकाऊन बाहेर काढणं आवश्यक होतं. आणि त्यामुळेच नाईलाजाने युसुफला तुझा ठावठिकाणा माफियाला कळवावा लागला.

जॉनी चिकनाने तुला तडफडुन मारायचा प्लॅन केला. तुला तर माहितीच आहे माफिया तरसासारखे असतात. आपली शिकार ते कध्धीच मारुन खात नाहीत. तडपवुन तडपवुन मारतात. त्यांचे अणकुचीदार जबडे तुमच्या शरीरात घुसलेले तुम्हाला जाणवतात.. तुमच्या शरीरातील हाडं मोडल्याचा आवाज तुम्ही ऐकता आणि अतीव वेदनेत आपला मृत्यु जवळ येताना पहात रहाता.


दुसरीकडे पोलिस स्टेशन मध्ये….

“सर.. इन्स्पेक्टर पटेल म्हणुन इथे इन्चार्ज होते त्यांच्या हाताखाली शेखावत कामाला होता..”, राणाने डिसुझाला माहीती दिली
“हम्म.. काही कॉन्टॅक्ट डिटेल्स?’, डिसुझा
“हो सर.. इथेच असतात ते.. आता ते रिटायर्ड झालेत, पण त्यांचा फोन नंबर आहे.. लावु फोन..”, राणा
“लग्गेच..”, असं म्हणुन डिसुझा खुर्चीतुन उठला आणि तो आणि राणा दोघंही इन्स्पेक्टर पटेलांना फोन लावायला गेले.

पुढचा अर्धा तास डिसुझा फोनवर विवीध प्रश्न विचारुन इन्स्पेक्टर पटेलांकडुन माहीती गोळा करत होता. मध्येच काही गोष्टी तो लिहून घेत होता.

सर्व प्रश्न विचारुन झाल्यावर त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरले. त्याने फोन ठेऊन दिला आणि बर्याच वेळ तो हातातील कागदावर पहात बसला. त्यावरील माहितीची जुळवाजुळव झाल्यावर तो म्हणाला,

“राणा, मला बहुतेक लक्षात आलं आहे, दिपक कुठे आहे.. पुर्ण फोर्स बरोबर घ्या.. चला”.

राणाला प्रश्न विचारायची संधी न देता डिसुझा लगबगीने खोलीच्या बाहेर पडला.


[क्रमशः]

पुढे काय होईल? दिपकला न्याय मिळेल का? का त्याचा दुर्दैवी शेवट होईल? मायाच्या कृत्याची शिक्षा तिला मिळणार का? डिसुझाच्या हाती कोण लागणार? सगळ जाण्यासाठी पाठलाग ह्या कथेचा शेवटचा भाग लवकरच …….