Sandhi hawi hoti pan... in Marathi Love Stories by Kajol Shiralkar books and stories PDF | संधी हवी होती पण ...

Featured Books
Categories
Share

संधी हवी होती पण ...

संधी हवी होती पण ....

मला नेहमी काहीतरी नवीन करण्याची संधी हवी असते .आणि मला नेहमी काही न काही नवीन करायला आवडते .मग तो कोणताही विषय असो.पण माझे काय होते की मी प्रयत्न खूप करते पण माझे प्रयत्न व्यर्थ जातात आणि त्याचा पुढे काही उपयोग होत नाही .म्हणे फ़क़्त गधामाजदुरीची कामं होतात आणि मग हवी ती संधी मिळत नाही .

असेच मी शाळेत असताना कराटे वर्गाला जायचे पण शाळा जशी पूर्ण झाली तशी माझी प्रॅक्टिस पण बंद झाली .मला सुचेना काय करावे आणि काय नको. कॉलेज मध्ये आल्यावर माझा पूर्ण वेळ अभ्यासातंच गेला आणि इतर वेळ बाकीची सर्व काम करण्यात .त्यामुळे परत मला या विषयाकडे वळणे काही जमलेच नाही .मग मी पदव्युत्तर शिक्षणाकडे वळले आणि मला माझा मोकळा वेळ खायला लागला.मग विचार केला की या वेळेचा कसा न कसा सदुपयोग केला पाहिजे म्हणून मी मग इंटरनेट वर कराटे क्लास शोधण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आणि कोणता जवळचा क्लास मिळतोय का ते पाहण्यास सुरुवात केली तेव्हा मला असे कळले की माझ्या जवळच वाशी ला (मी विरार ला राहत असल्याने )एक क्लास सापडला आणि मला अत्युच्च आनंद झाला.त्या क्लास ची इत्यंभूत माहिती काढली आणि मला हवा असलेला आणि माझ्या खिश्याला परवडेल असा क्लास शेवटी मला सापडला .मग मी ठरवले की आत्ता मोकळा वेळ वाया न घालवता या क्लास चे अॅडमिशन करायचे आणि लगेचं आपल्या शरीरावर मेहनत घ्यायची .एक छानसा दिवस ठरवला नि त्या सरांना भेटायचे ठरवले.त्या सरांची भेट झाली आणि खूप छान वाटले कारण त्या सरांच्या चेहऱ्यावर इतके कमालीचे तेज होते की त्यांचा चेहरा समोरून हलतच नव्हता.त्यांचे बोलणेही खूप सहज होते.

म्हणजे कराटे चे बाकीचे सर असतात तसे ते एकदम राकट आणि कडक शिस्तीचे असे न वाटता खूप शांत स्वभावाचे दिसत होते .मला त्यांचे हे व्यक्तिमत्व खूप आवडले .इथे येण्याचा माझा पक्का विचार झाला होता .

पदव्युत्तर शिक्षण घेता घेता मला यामध्येही पुढे कामगिरी करायाची होती .तर झाले असे की दोन दिवसांनी ठरवलेल्या दिवशी मी वाशीला पोहोचले .तो क्लास तसा जवळचं होता .पण मला शोधायसाठी जरा वेळ लागला .कारण स्टेशन जवळ जरी असला तरीही तो कोणत्यातरी गल्लीत लपलेला होता .म्हणजे खरंतर तो एक लग्नाचा हॉल होतो पण सापडण्यासाठी थोडा अवघड जात होता.तेथील माणसांना विचारंत विचारंत शेवटी मी माझ्या मुक्कामी पोहोचले आणि माझी आणि त्या सरांची भेट झाली.

क्लास च्या वेळा आणि दिवस यांबद्दल पूर्ण माहिती घेऊन मी दुसऱ्या दिवशी त्या क्लास ला जाण्यासाठी तयार झाले .दुपारी घरी आल्यावर तसं मला मोकळा वेळ मिळायचा तर त्यावेळेत मी थोडा आळशीपणा करून झोप काढायचे आणि मग नंतर क्लासची तयारी करून क्लासला जायचे .पहिल्या दिवशी मात्र उत्साही वातावरणामुळे मला झोपच लागली नाही .कॉलेजवरून आल्यावर मी विचार करत बसले की आज काय काय आणि कसे कसे सुरु राहिल आणि माझी सुरुवात कशी होईल वगैरे वागिरे .

मी क्लासमध्ये पोहोचले तर अजून कोणीही आले नव्हते .खरतर पहिला दिवस असल्याने मी थोडं लवकरच्ं गेले होते .मग सरांनी मला युनिफोर्म आणि क्लासच्या शिस्तीबद्दल सांगितले आणि मग मला चेंजिंग रूम दाखवून सर आपली प्रक्टिस करू लागले.

तेवढ्यात एक मुलगी तेथे आली .मग मीच पुढाकार घेऊन तिला युनिफोर्म कसा परिधान करावा याबद्दल विचारले .मग तिने मला व्यवस्थित सांगितले की युनिफॉर्म घालण्याची एक विशिष्ट पद्धत आहे ,कारण युनिफोर्म बांधायला दोन्ही बाज्जूंनी नाड्या आहेत तर त्यांचे योग्य प्रकारे बंधन बांधून पोशाखाची शिस्त तयार होते आणि मगच खरा तो रुबाब दिसतो .सर्व आवरून झाल्यावर मी खाली प्रक्टिस च्या जागी गेले तेव्हा सर्व मुलं एव्हाना जमली होती .

मला जिने मदत केली होती तिच्या बाजूला जाऊन उभे राहिले आणि तेवढ्यात सरांनी वॉर्म अप ची प्रक्टिस सुरु केली .पहिल्या दिवशी उत्साहात असल्याने प्रॅक्टिस कितीही वेळ चालली असती तरीही चालले असते मला .पण जसा ८.३० चा टोला पडला तसे सरांनी नमस्कार घेतला आणि क्लास सोडला.(क्लास ची सुरुवातही नमस्काराने झाली .)

आज खूप भारी काम झालं या अविर्भावात मी खूप खुश होते .घरी गेल्या गेल्या मी ताटावर बसले इतक्या जोरात भूक लागलेली.वाटले अंगात काहीतरी नवीन आणि सकारात्मक उर्जा संचारली जातेय आणि मी तिच्या स्वाधीन होत चाललीय ,कारण मनावरची सर्व मरगळ दूर चाललेली आणि मला मनातून खूप आनंद होत होता की मी आज माझ्या मानासारखे खूप आवडीचे काम केले .रात्रीची झोप सुद्धा खूप चांगली लागली असावी कारण सकाळी मी उशिरा आणि आळसावलेली मुलगी रोजचा वेळेच्या आधीच उठून बसते आणि काय आश्चर्य हवंय .अजून घड्याळात ५ वाजले होते आणि मी उठायचे १० किंवा ११ वाजता .मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता की माझ्यात इतका बदल होऊ शकतो .कॉलेज तर होते दुपारचे मग आत्ता लवकर उठून करायचं काय हा प्रश्न सतावणारी मी चक्क उद्यानात धावण्यासाठी गेले आणि मस्त घाम गाळून घरी आले .थोडासा आराम करून पुस्तक वाचनासाठी बसले .थोडा नाष्टा केला आणि मग गेले कॉलेजला .

घरी आल्यावर पुन्हा तिथे जाण्याची तयारी केली आणि तयार होऊन सायकलने गेले .म्हंटलं कालाचंच वॉर्म अप असल्याने तसा विचार करू लागले .पण आज बघितले तर काही नवीन चेहरे दिसले .आणि त्यातला एक चेहरा इतका निरागस वाटला की त्याच्यावरून मन हालतच नव्हते .आजचा वॉर्म अप थोडा नवीन होता आणि आज आम्हाला किक वरती कसे मारायचे हे शिकवले जाणार होते .त्यासाठी आमचे पार्टनर उभे केले गेले आणि माझ्या समोर नेमका ‘तो’ च येऊन उभा राहिला .मला थोडे अवघडल्यासारखे झाले होते पण जेव्हा किक मारायची वेळ आली तेव्हा मला कुठे धीर आला . मी किक मारायला सुरुवात केली आणि धड्दिशी खाली आपटले .सर्वांच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता .मला संकोचल्यासारखे झाले .मी जेव्हा त्याच्याकडे बघितले तर त्याची मुद्रा एकदम शांत होती .आणि तो जणू मला सांगत होता की नाही तुला हरायचे नाही तुला पुढे जायचे आहे .त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास मला खूप काही शिकवून आणि सांगून गेला की तू अजून खूप काही करू शकतेस .स्वतःशी खंबीरपणे लढ.दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष दे आणि पुढे जा .मागे वळून पाहू नकोस अन स्वतःवर इतका आत्मविश्वास ठेव की कोणीही तुला हरवू शकणार नाही .त्यानंतर मी काय केले असेन माहिती नाही पण (त्यादिवसानंतर मी ठरवूनच टाकले की काही झाले तरीही परिस्थितीशी सामना करायचा ; कोणाचेही लक्ष वेधून न घेता , फ़क़्त आपल्या मार्गावर चालत राहायचे ).

मी आत्तापर्यंत ज्या संधीची वाट बघत होते ती अखेर मला सापडली होती .मला मझ्या आयुष्याचं सर्वस्व मिळालं होता .आणि मी त्याच धुंदीत क्लास ला प्रॅक्टिस करत होते आणि माझा विश्वास आणखी दृढ होत होता .

२ महिन्यांनी मी त्याला विचारले की मला तुझी जीवनसंगिनी व्हायला आवडेल तर तुंला आवडेल का मला साथ द्य्याला .त्याने काहीच उत्तर दिलं नव्हतं .शेवटी मी त्याच्या डोळ्यात बघून निघून जाणार होते तेवढ्यात त्याने माझा हात पकडला नि म्हणाला की हात सोडवून तर दाखव ....बस अजून काय हवे होते ...मला संधी हवी होती पण मला माझ्या जीवनाचे गमक सापडले होते ...

©काजोल मधुकर नम्रता शिराळकर