Pathlag - 25 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग (भाग-२५)

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

पाठलाग (भाग-२५)

“राणा एक काम करा, आपल्या कंप्युटर ग्राफिक्स डिझायनरला दीपकचा फोटो स्कॅन करून पाठवा. त्याला म्हणाव ह्याचा सर्व तऱ्हेने बदलाव करून त्याचे फोटो करून पाठवा. म्हणजे खूप दाढी वाढवलेला, खूप केस वाढवलेला, पूर्ण टक्कल केलेला, मिश्या आणि लांब केस असलेला…

दीपकने नक्कीच आपल्या चेहऱ्यात दिसण्यात बदल केले असतील त्यामुळे त्याला लगेच ओळखण कठीण जाईल. म्हणून शक्य तितके वेगळे लुक्सचे फोटो करून पाठवायला सांग. दीपक कुमार नक्कीच दमण मध्येच आहे आणि त्याने शेखावतला कट करून बोलावून घेतले ह्यामागे त्याची नक्कीच काहीतरी योजना असणार, नाहीतर तोच मुंबईला नसता का गेला. “, डिसुझा बोलत होता.

राणाने मान डोलावून सहमती दर्शवली
“येस सर, लगेच कामाला लागतो”, राणा

“मला काय वाटत्ते माहिते का? समहाऊ अस वाटते आहे कि दमण दीपकचा कम्फर्ट झोन आहे. तो इथे सुरक्षित आहे म्हनुनच इथून कुठ न जाता त्याने शेखावतला इकडे बोलावून घेतले. ”

“पण का? इथे त्याला कुणाचा सपोर्ट आहे म्हणून त्याला इथे सेफ वाटतेय. मी दीपकची फाईल वाचलीय. माझ्या वाचण्यात तरी त्याचा आणि दमणचा आधी कधी संबंध आला नव्हता. त्याचा कोणी नातेवाईकही इथे असण्याचे कारण नाही. मग दमण का?”

दोघही काही वेळ विचारात गढून गेले

“मला वाटते राणा आपण त्याचा शोध लावला, तर कदाचित दीपक आपोआप आपल्या ताब्यात येईल”
“येस , आय ऐग्री”, राणा

“तुम्ही शेखावतच सामान तपासले होते? काही आढळले त्याच्या सामानात?”, डिसुझा
“नो सर, तसं विशेष काही नाही आढळले”, राणा

“त्याचं बुकिंग कस झाल होत?, चेक, क्रेडीट कार्ड, कॅश?”
“कॅश सर”
“म्हणजे, कुणी तरी लॉज मध्ये येउन पैसे देऊन बुकिंग केले असणार. चला लॉजच्या मैनेजर ला भेटू”

दोघही लगबगीने शेखावत उतरला होता त्या लॉजकडे निघाले.

“डी.सी.पी. शेखावतच्या बुकिंगची चौकशी करायची आहे”, राणा लॉजच्या मालकाला म्हणाला
“सर, कश्याला पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारताय? एकदा सांगितले ना, बुकिंग कॅश ने झाल होते. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा लॉजवर येऊ नका, पोलिसांना इथे बघून कस्टमर येत नाही सर”, राणाला पुन्हा लॉजवर बघून मालक वैतागला होता

“बुकिंग करायला कोण आल होत? काही आठवते आहे का?”, राणाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत विचारले
“नाही आठवत सर. शेकडो लोक जा ये करतात. प्रत्येकाची ओळख पटवायची म्हणल तर होईल सर?”, मालक

डीसुझाची नजर इतरत्र भिरभिरत होती. लॉजमधल्या एका गोष्टीने त्याचे लक्ष वेधून घेतले.

“ते चालू असते का?”, कोपऱ्यात लावलेल्या एका सी.सी.टीव्ही कॅमेराकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला
“हा सर, चालू आहे ते”, मालक
“चला, मला ज्या दिवशी बुकिंग झालं त्या दिवशीचे व्हीडीओ दाखवा”, मालकाच्या हो नाही ची वाट न बघता डिसुझा त्याला घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेला.

काहीश्या नाराजीनेच मालकाने आपला कॅम्प्यूटर चालू केला.

रजिस्टर मध्ये शेखावतच्या बुकिंगची तारीख बघितली आणि त्या तारखेचा फोल्डर कम्प्युटरवर ओपन केला.

डिसुझाने दोघांना बाजूला केले आणि तो स्वतः व्हिडीओ चालू करून बसला.

मध्येच तो मालकाला विचारायचा, “निट बघा, ह्यापैकी कोणी होतं का?” आणि मालक नकारार्थी मान हलवायचा.

अख्खा दिवस संपत आला, साधारण संध्याकाळच्या ८.३०च वगैरे रेकोर्डिंग चालू होते तेंव्हा अचानक तो मालक म्हणाला, “एक मिनिट, एक मिनिट बहुतेक ह्या बाई आल्या होत्या बुकिंगसाठी”

डिसुझाने लगेच रेकोर्डिंग थांबवले.

“कोण? ह्या?”, संगणकाच्या पडद्याकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला
“हो, नक्कीच, ह्याच होत्या”, मालक
“कश्यावरून”, राणा

“अहो बघा न रेकोर्डिंग बघा, मला नक्की आठवतंय, त्यांनी सवयीप्रमाणे बुकिंगसाठी आधी क्रेडीट कार्ड पुढे केले होते. आणि मग एकदम त्यांना काय आठवल माहित नाही, त्यांनी कार्ड काढून कॅश दिली. ”

डिसुझाने रेकोर्डिंग थोडे मागे घेतले आणि पुन्हा चालू केले. काळ्या बुरख्यामध्ये आलेल्या एका स्त्रीने जसं त्या मालकाने सांगितले होते तसेच आधी दिलेले क्रेडीट कार्ड काढून कॅश दिली होती.

“तुम्ही त्या कार्ड वरच नाव, नंबर काही पहिले”, डिसुझा
“नो सर. मी काही करायच्या आधीच त्यांनी लगेच कार्ड घेतले न”, मालक

“तुम्हाला नक्की खात्री आहे, हीच ती बाई होती?”, डिसुझा
“एक दम सौ टक्का”, मालक खात्रीने छातीवर हात आपटत म्हणाला
“ठीक आहे, जा तुम्ही. आम्ही थोड्यावेळ थांबतो इथेच”, डिसुझा

मालक निघून गेल्यावर डिसुझा आणि राणा दोघही जण ते रेकोर्डिंग काळजीपूर्वक बघत होते. त्या स्त्रीने क्रेडीट कार्ड बाहेर काढल्यावर डिसुझाने रेकोर्डिंग थांबवले आणि अधिक झूम करून तो कार्ड वरील काही डीटेल्स दिसतात का ते पाहू लागला. परंतु स्पष्ट अस काहीच दिसत नव्हते.

शेवटी डिसुझा तो नाद सोडून दिला आणि तो त्या स्त्रीकडे निट पाहू लागला.

ज्या वेळी ती स्त्री पर्स मधून पैसे काढत होती, त्या क्षणी त्याने अचानक रेकोर्डिंग पॉज केले.

“हे बघा राणा…”, डिसुझा
“काय बघू सर? ती स्त्री तर पूर्ण बुरख्यात आहे. काहीच तर दिसत नाहीये”, राणा चक्रावुन म्हणाला
“अहो, स्त्री नाही, हि पर्स बघा. लेपर्ड स्किनची पर्स आहे राणा. फार महाग असतात अश्या पर्स. सर्व सामान्य माणसांना नाही परवडू शकत”, डिसुझा
“हम्म. पण सर डुप्लीकेट असेल तर?”, राणाने शंका उपस्थीत केली
“असू शकते. पण एक नक्की ह्या स्त्रीचा आणि दीपकचा नक्की काहीतरी संबंध आहे. कदाचित शेखावतवर गोळी चालवणारी स्त्री पण हीच असावी”, डिसुझा

“मग आता आपण काय करायचं सर?”, राणा
“सगळ्यात आधी तो दीपकचा फोटो आपल्या ग्राफिक्स डिझायनरकडे पाठवून द्या. आणि हे रेकोर्डिंगपण लॅब ला पाठवून द्या. बघा तो क्रेडीट कार्ड नंबर मिळतोय का. आणि …. “, डिसुझा

“आणि काय सर?”, राणा
“सापाला बिळातून बाहेर काढायचे असेल तर त्याला हुसकाउनच काढावे लागते.”,डिसुझा

“पण म्हणजे नक्की काय करायचं सर?”, राणा
“पाण्यात खडा टाकायचा. माश्याला तो लागेल कि नाही.. माहित नाही? पण पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग मात्र नक्की निर्माण होतील. मी सांगतो ती बातमी आज लगेच टीव्ही वर द्या, चला” अस म्हणून डिसुझा आणि राणा बाहेर पडले.

“डी. सी. पी. शेखावत ह्यांच्या खुनासबंधी आज अजून एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. ज्या बारच्या पार्किंग मध्ये खून झाला होता, त्या पार्किंगमध्ये लावलेल्या सी.सी.टीव्ही कॅमेरामध्ये खुनाचे पूर्ण फुटेज मिळाले आहे. ह्या खुनामध्ये एक नाही तर दोन व्यक्तींचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांच्या हाती अधिक काही पक्के पुरावे मिळाले आहेत आणि लवकरच शेखवतचा खुनी गजाआड होईल असा दावा सी.आय.डी इन्स्पेक्टर डिसुझा ह्यांनी केला आहे ”

संध्याकाळच्या न्यूज फ़्लैश मध्ये हि बातमी वारंवार दाखवली जात होती.

“हा काय प्रकार आहे? तिथे कुठे सि.सि.टीव्ही होता?”, माया दिपकला म्हणत होती
“हो.. माझ्या माहितीमध्ये तरी नव्हता. एक तर पार्किंग ओपनच होते आणि आजुबाजुला तरी मला कुठेही कॅमेरा दिसला नव्हता.”, दिपक
“पण मग ही बातमी? आणि इतक्या खात्रीने दोन लोकं होती सांगत आहेत ह्याचा अर्थ नक्कीच त्यांच्याकडे हा पुरावा असणार”, माया

“डोन्ट बी पॅरॅनॉईड माया, मे बी त्यांनी अंधारात बाण मारला असेल. बघु अजुन दोन दिवस काय होतं ते.”, दिपक
“नो दिपक.. हे बघ, सि.आय.डी. पण केस मध्ये इन्व्हॉल्ड आहे. अश्या बेजबाबदार, बिनबुडाच्या बातम्या ते लोकं नाही देणार. वुई मस्ट अ‍ॅक्ट. आय कान्ट रिस्क इट”, माया
“मग आपण काय करावं असं तुला वाटतं आहे?”, दिपक
“आपण तो पुरावा नष्ट करायचा.”, माया
“पण कसा?”, दिपक

“हे बघ, मला माहीती आहे. हे असे गोळा केलेले पुरावे वगैरे कुठे ठेवतात ते. एम.जी.रोड वर पोलिसांचे हेड-क्वार्टर्स आहे. तिसर्‍या मजल्यावर एक रुम आहे जिथे ह्या असल्या गोष्टी ठेवल्या जातात.”, माया
“ओह.. आणि तुला वाटतं आपण तेथे जाऊन आपला पुरावा शोधायचा हजारो गोष्टींमधुन आणि तो नष्ट करायचा.. बरोबर?”, दिपक
“हो”, माया

“आणि तुला वाटतं पोलिस आपल्याला सन्मानाने आपल्याला आत जाऊ देतील, आपल्याला पुरावा शोधायला मदत करतील आणि जमलच तर नष्ट ही करु देतील.. असंच ना?”, दिपक कुचेष्टेने म्हणाला
“हे बघ, रिस्क आहे, पण आपल्याला करायलाच हवं. नाहीतर नाहक आपण त्यात अडकु”, माया

“अरे?? पण तुला काय खायची गोष्ट वाटली का? इट्स पोलिस हेडक्वॉर्टर्स बेबी..”, दिपक
“तिथल्या सेक्युरीटी एजन्सीचे हेड माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. १०-१५ मिनीटांसाठी तिथले सेक्युरीटी एजन्ट्स इकडे तिकडे होऊ शकतात ना? हे बघ दिपक, पैश्याने सगळ्या गोष्टी साध्य होतात. एकदा का ती टेप फॉरेन्सीक लॅबला गेली आणि त्यातील फोटो प्रिंन्ट्स करुन जागो जागी लागले की मग आपण काही करु शकणार नाही..”, माया

“मुर्खपणा आहे हा माया. एक तर मला वाटतं की त्या टेप मधुन काही साध्य होणार नाही. पोलिसांचा हा नक्कीच काहीतरी डाव आहे.. किंवा अगदीच टेप असली तरी ते आपल्या पर्यंत लगेच दोन दिवसांत पोहोचु शकणार नाहीत. मला वाटतं आपण घाई नको करायला. दोन दिवस वाट बघु काय होतं आहे आणि त्याप्रमाणे ठरवु..”, दिपक

“तुला जमणार नसेल तर तसं सांग, मी जाते.. मला माझ्या कॉन्टॅक्ट्सवर पुर्ण विश्वास आहे. आतमध्ये जायला आपल्याला कुठलीही अडचण होणार नाही…”, माया

माया वैतागुन आपल्या मोबाईलमध्ये नंबर डायल करायला लागते…

“ऑलराईट.. इफ़ यु से सो.. पण लक्षात ठेव धिस इज द लास्ट टाईम. पुढच्या वेळेपासुन सगळं प्लॅनींग माझ्या म्हणण्यानुसार होईल. तु ऑलरेडी खुप मेस करुन ठेवली आहेस..”, दिपक

माया धावत येऊन दिपकला बिलगली आणि तिने त्याचे एक दीर्घ चुंबन घेतले.

“आय नो यु विल डु ईट. डोन्ट वरी..”, असं म्हणुन तिने सेक्युरीटी एजन्सीच्या हेडला फोन लावला

अर्ध्या तासानंतर दिपक रेडी होऊन आला.

“माझं बोलणं झालं आहे दिपक.. खुप पैसे द्यावे लागले, बट अ‍ॅज आय सेड, पैश्याने काहीही विकत घेता येतं. ११.३०-११.३५ ह्या वेळात मेन गेट वर कोणी नसेल. तुला तिसर्‍या मजल्यावर जायला दहा मिनीटं आहेत. ११.५० – ११.५५, वरचा मजला रिकामा असेल. तु आत घुसुन ती खोली शोध. तेथे काय सेक्युरीटी आहे.. आय हॅव नो आयडीया. पण पोलिस नक्कीच कोणी नसतील. कुलुप कसं आहे, काय आहे ते बघुन तु डिसिजन घे आणि काम तमाम करं. बाहेर येताना बॅटरीचा एक झोत व्हरांड्यात टाक. त्यानंतर पुढची पाच मिनीटं आणि १५ मिनीटांनंतर मुख्य गेट रिकामं असेल.”

“आय एम नॉट हॅप्पी अबाऊट धिस माया. हा सगळा तुझा मुर्खपणा आहे. त्या दिवशी तु तेथे आली नसतीस तर…”, दिपक

“दिपक, वेळ कमी आहे.. तें तेच बोलुन काही फ़ायदा नाही.. जा पट्कन…”, माया

दिपकने एक दीर्घ कटाक्ष मायाकडे टाकला आणि तेथुन तो बाहेर पडला.

११.१५ ला दिपक पोलिस हेडक्वार्टसपाशी पोहोचला. आजुबाजुला बर्‍यापैकी सामसुम होती. इमारत बर्‍यापैकी अंधारातच होती. कुठल्या मजल्यावरही फ़ारसे दिवे चालु नव्हते. मुख्य गेटपाशी दोन रायफल घेतलेले सेक्युरीटी गार्डस फेर्‍या मारत होते.

दिपक तेथेच अंधारात दबा धरुन बसला.

बरोब्बर ११.३०ला दोन मिनीटं कमी असताना ते दोन गार्ड्स एकमेकांशी काहीतरी बोलले आणि गप्पा मारत कुठेतरी निघुन गेले.

दिपकने एक मिनीटं तेथेच थांबुन अंदाज घेतला. वेळ कमी होता. ठरल्याप्रमाणे बरोब्बर ११.३० ला ते दोन गार्ड्स तेथुन निघुन गेले होते.. आणि पाचच मिनीटांमध्ये ते परतण्याची शक्यता होती.

दिपक अंधारातुन भिंतीला चिकटत चिकटत मुख्य गेटमधुन आत शिरला.

पहीला अडथळा तरी अगदी सहजच पार पडला होता…

दिपकची छाती धडधडत होती. त्याच्या सिक्स्थ सेन्स, पुढे धोका आहे.. असं सतत बजावत होता. परंतु मायाने सांगीतल्याप्रमाणे खरोखरचं ११.३० ला मुख्य गेट रिकामे होते. आणि तिच्या सांगण्याप्रमाणेच पुढेही काही अडथळा न येण्याची खात्री बाळगण्यातही काही गैर नव्हते.

शिवाय खरंच तसा काही पुरावा असेलच तर तो नष्ट करणं गरजेचे होते. नाही तर, इतक्या दिवस लपुन राहील्याचे कष्ट वाया गेले असते.

दिपक दबक्या पावलांनी इमारतीमध्ये शिरला. वरच्या मजल्यांवरुन काही गार्डसचा फिरण्याचा आवाज येत होता. दिपक कसलाही आवाज न करता दुसर्‍या मजल्यावर जाऊन थांबला.

त्याने घड्याळात नजर टाकली. ११.५० झाले आणि वरची गार्डसची हालचाल पण शांत झाली. दिपक हळु हळु पायर्‍या चढत तिसर्‍या मजल्यावर आला. त्याने अंधारलेल्या व्हरांड्यात चाहुल घ्यायचा प्रयत्न केला. परंतु सर्वत्र शांतताच होती.

घड्याळाचे काटे वेगाने फिरत होते. दिपक झपझप पावलं टाकत रेकॉर्ड्सरुमपाशी आला. हीच ती खोली होती ज्यामध्ये गोळा केलेले पुरावे ठेवले जात होते. आणि आश्चर्य म्हणजे खोलीला कोणतेही कुलुप नव्हते.

दिपकला हे अनपेक्षीत होते. परंतु कदाचीत सेक्युरीटी गार्ड्सचा पहारा असताना, तसंही कड्या कुलुपं लावायची गरज नसावी असाही एक विचार त्याच्या डोक्यात येऊन गेला.

खोलीचं दार उघडुन तो आत आला. सर्वत्र विचीत्र शांतता होती.

दिपकने खोलीचं दार लोटुन घेतले आणि तो अंधारात चाचपडत पुढे सरकु लागला.

इतक्यात खोलीतले सगळे दिवे चालु झाले. दिव्याच्या प्रखंर प्रकाश्याने अंधारातुन आलेल्या दिपकचे डोळे दिपले गेले. क्षणभर त्याला काही होतं आहे ते कळेना.

मग त्याने सावकाश डोळे उघडले…..

खोलीमध्ये सर्वत्र हातामध्ये रिव्हॉल्व्हर्स धरुन पोलिस उभे होते आणि समोरच्या टेबलावर पाय टाकुन दिपककडे हसत हसत बघत एक चेहर्‍यावर खवले खवले असलेला इसम बसला होता.

[क्रमशः]