सोशल मीडियाचा अतिरेकी वापर
आजकाल लग्नाच्या पत्रिकाही व्हाट्सअप्पच्या माध्यमाने पोहचू लागल्या
जग दूरच एवढं जवळ आलं की फेसबुकच्या माध्यमाने अनोळखी व्यक्ती
सोबत मैत्री करून आपण त्यांच्या भुलथापाचा बळीचा बकरा झालो .
आज दहावीत शिकणारा मुलांपासून ते गृहिणी पर्यत आपला जास्तीत जास्त
वेळ मोबाईल मध्ये घालवतात .
सकाळी उठल्या उठल्या आपण ब्रश हातात न घेता मोबाइल हातात घेतो
कुणाचे किती msg आलेत . कोणी काय पाठवलं . इतरांचे स्टेटस बघण्यापर्यंत आपला पूर्ण अर्धा तास आपण व्यर्थ घालवतो .
आपल्याला ह्या वर्तुअल जगाने घेरलेले असते .
महत्वाचं काहीच नसते आपण समजतो कॉलेजचे ग्रुप आहेत पण
तिथे स्टडी वर कमी चर्चा आणि इतर विषयावर गप्पा करण्यात आपण
तुमचं हे जग कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड ह्यावरच चालतं नवीन काही नाही त्यात तेच ते .
काय शिकता ह्यातून तुम्ही ? काहीच नाही . नेलपॅक असे पर्यंत तुमचं हे नातं असतं नेटपॅक संपला की तुमच्या नात्याची वॅलीडिटी ही संपली .
मग एकटेपणा खायला लागतो तुम्हाला तुम्ही ह्या जगाच्या दूर जाऊ शकत नाही . चॅटिंग करणं msg फॉरवर्ड करणं . कोणी स्टेटस वर काय टाकलं कोणी कोणती पोस्ट टाकली कोणाच्या आपल्या पोस्टवर किती
कॉमेंट्स आल्या बस्स पुरेपूरे ...... वैताग नाही का येत कधी ह्याचा
असा प्रश उपस्थित होतो .
घरी असतांनाही आपण आपल्या कुटूंबाला वेळ देऊ शकत नाही .
पोरग कॉलेज ला गेलं आता एवढीच आईबाबांना समज घालून गप्प
कोंडमारा होतो इथे एका क्लिक बटनेवर जीवनाची सारी ससेहोलपट होते .
आपण आपली लाईफ सोशल मीडियाविना नाही का चांगली जगू शकतं ?
आपल्या जगण्याला हेच एक माध्यम आहे का ?
असे प्रश विचारले कधी स्वतःला ? नाही ...
ह्यातून बाहेर पडायला वेळ मिळेल तेव्हा जाऊन विचारू ना !
सर्वात आधी तुमच्या मोबाईल मधून व्हाट्सएप आणि फेसबुक सारखे एप डिलीट करा .
नंतरचा काही ट्रिकस तुम्ही अंमलात आणा .
हे नियम 21 दिवस करा आणि तुम्हीच तुमच्या आयुष्यात काय बद्दल घडतो ते बघा .
1) शक्य तो सकाळी 5ला उठण्याचा प्रयत्न करा .
2) बाहेर पडून खुल्या आकाशात थोड्या अंधारलेल्या आसमंतात चमकणाऱ्या चांदण्याना बघा . गारव्याला डोळे बंद करून अनुभवा .
तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे काय हवं आहे ते मागा . ते मिळालं आहे ते तुमच्या पुढ्यात आहे असं स्वतः ला वाटू द्या ! हे जोपर्यत मिळतं
नाही तोपर्यंत रोज करा . पण एका अटीवर तुम्हाला त्यातून आनंद प्राप्त झाला पाहिजे . ( Visualisation process )
3) फ्रेश व्हा सकाळच्या विधी आटोपा .
4) तुम्ही विद्यार्थी असल्यास अभ्यासाला बसा . अभ्यास नसल्यास
फिरून या !
5) रोज तुमचा सातत्याने 8 ,10 तास अभ्यास नसेल होत तर
21 दिवस टाइम टेबल करून 4ला अभ्यासाला बसा आणि बघा
तुम्हाला रोज त्या वेळे वर without alarm जाग येईल . आणि अभ्यासाचा कंटाळा येणार नाही .
6 ) रोज काही न काही नवीन ज्ञान संग्रहित करण्याचा प्रयत्न करा . रोज
वर्तमानपत्र वाचा . शिकण्यासारखं काहीच नसेल तर इंग्लिश बोलायचं शिका . इंग्लिश ट्रान्सलेशन शिका . आयुष्यात तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल . ते ही कंटाळवने वाटत असेल तर gk वाचा .
7) शक्य तो मोबाइल चा डाटा ऑफ ठेवा . सतत मोबाइलकडे लक्ष घालू नका . व्हाट्सएप , फेसबुक हे अप डिलीट केल्यावर तुमचं मोबाईलकडे आधी सारख लक्ष ही जाणारं नाही .
8) रोज डायरी लिहा . आज काय केलं , काय झालं हे तारखे निषद डायरीत लिहून ठेवा .
9) दिवसभर घरी असलं काही काम नसलं तरी दुपारी झोपायचं टाळा .
स्वतःला कशात ना कशात गुंतवून ठेवा . तुम्हाला जगणं सोपं वाटायला लागेल . उदास वाटल्यास आपला बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवा
नवीन संकल्पनाचा विचार करा . निसर्गाच्या सानिध्यात रहा .
10 ) रात्री 10 पर्यत झोपायचं ठरवा .
आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं असेल . व्हाट्सएप शिवाय होऊ शकतं नाही . महत्वाचे ऑफिशिअल ग्रुप असतात . फाईल सेंड करायचा असतात .
स्टुडंट म्हणतील आम्हाला कॉलेजचे नोट्स शेअर करायचे असतात .
व्हाट्सएप कसं डिलीट करून चालेल ??
त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या फोन मध्ये ई-मेल ac असते .
इथून तुम्हाला प्रत्येक documents शेअर करता येतात .
सोशल मीडियामुळे होणारे दुष्परिणाम
1) सर्वात घातक जास्तवेळ स्मार्टफोनचा वापर केल्याने
तुमची समरणशक्ती आठवण्याची क्षमता कमी होते .
2) चिडचिडेपणाची वृत्ती निर्माण होते . व्हाट्सएप फेसबूक इतर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणे आणि रात्री उशिरापर्यंत जागे असणे सकाळी झोपून उशिरा उठणे . ह्यामुळे तुमच्या जगणे विचलित झालेलं असते .
3 ) योगा , पुस्तक वाचणे ह्याचे प्रमाण नाहीसे होते .
4) कुटुंबातील सदस्यांकडे दुर्लक्ष .
5) आयुष्यात जे साध्य करण्यासाठी आपण धडपडतो त्यांच्या पर्यत पोहचू शकतं नाही .
6) डोळ्यांवर मोबाईल स्क्रीनचा दुष्परिणाम होतो .
7 ) मेंदूची ग्रहणशक्ती कमी होऊन होऊन विसराळू वृत्ती उत्तेजित होते .
तुम्हाला काय वाटतं . वरील बाबीचा विचार करा . आयुष्य खूप
सुंदर आहे . सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तुम्हालाच घातक