Naa Kavle kadhi - 1 - 5 in Marathi Fiction Stories by Neha Dhole books and stories PDF | ना कळले कधी - Season 1 - Part 5

Featured Books
  • నిరుపమ - 7

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 20

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 6

                         మనసిచ్చి చూడు -06అప్పుడే సడన్గా కరెంట్...

  • నిరుపమ - 6

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 19

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

Categories
Share

ना कळले कधी - Season 1 - Part 5

आर्याला ला कळलेच नाही काय झालं तिला वाटलं हा देतो आता आपल्याला उतरवून तिने आजूबाजूला पाहिले रस्ता तसा सामसूम च होता तिला थोडी भीतीच वाटली. काय झालं सर is everyting ok??? घाबरू नको आर्या तू विचार करतेस तस काहीही नाही आहे . मी तुला इथे काही उतरून वगरे देणार नाही just relax. ह्याला  कस कळलं मी काय विचार करतीये.???बापरे, 'नाही सर मला मी घाबरत नाही आहे'. आर्या एकदा चेहरा बघ स्वतःचा किती घाबरलीये. पण मी पुढे जाऊ शकणार नाही कारण मला कुठे जायचे हेच माहिती नाही. तुझा address सांगतेस का??? ohhh extremely sorry sir आणि तिने पुढे address सांगितला. अरे काय बावळट आहे मी काय विचार करत असेल हा.
          बाहेर चांगलाच गारठा होता आणि त्यात सिद्धांत ने ac full केलेला .आर्या तर बिचारी गारठून गेली पण त्याला कोण बोलणार सिद्धांतने सहजच बाजुला पहिला आणि त्याला आर्या कडे बघून जाणवल की हिला थंडी वाजत आहे. त्याने हळूच ac कमी केला. आर्याला आता बर वाटलं . आपण समजतो तितका वाईट नाही आहे हा. त्याने हॉर्न वाजवला आणि आर्या भानावर आली. तिने पाहिलं अरे आपलं घर आलं. 'ohh sorry माझं लक्षच नव्हतं' आर्या म्हणाली. thank you so much सर, सिद्धांताला तीच thank you वगरे ऐकण्यात काहीच रस नव्हता. त्याने ती उतरल्यावर पाहिलं सुध्दा नाही. आणि वेगाने तिथून निघून गेला. काय विक्षिप्त आहे हा! 

          काय रे सिद्धांत किती हा उशीर! किती वाट पाहायला लावतो तू, आई सॉरी ना अग झाला आज उशीर. बर तू आता बोलतच बसणार आहे की वाढणार आहे मला ? मला जाम भूक लागलीये. मी आलोच फ्रेश होऊन तू वाढ तो पर्यंत. सिद्धांत चा मूड थोडा बरा पाहून त्याच्या आईला बरं वाटलं बर झालं हा नॉर्मल झाला नाहीतर सकाळी त्या फोन मुळे चिडूनच गेला होता. इतक्यात सिद्धांत तिथे आला, काय रे आज इतका काय काम होत किती वेळ केला. अग आई मी वेळेतच निघालो पण ऑफिस मधल्या एक मुलीची गाडी  बंद पडली तर तिला घरी सोडून आलो so late ग.अच्छा ठीक आहे जेवून घे. 

          आर्याने घरी येऊन जेवण केले आणि ती झोपायला गेली .पण आज काहीही केल्या झोप काही येतच नव्हती.सतत तिच्या डोक्यात सिद्धांत चे च विचार येत होते.किती carieng आहे सिद्धांत. मी नाही म्हणूनही तो सोडायला आलाच, मी उगाचच rude वागले.पण सकाळी कसा वागला तो माझी काहीही चुकी नसतांना मला ओरडला .जाऊ दे जे झालं ते झालं असं म्हणून तिने मस्त बुक घेतलं वाचायला.  सिद्धांत च जेवण झालं त्याने आई सोबत गप्पा मारल्या आणि त्याची आई झोपायला गेली. सिद्धांत आपल्या रूम मध्ये आला पण नकळत त्याच्या मनात आर्यचेच विचार येत होते. त्याला सकाळपासून घडलेले प्रसंग आठवू लागले . आपण सकाळी उगाचच बोललो तिला तिच्या गाडीचा खरंच प्रोब्लेम होता. पण तिला कुठे काही फरक पडला. ती तर मस्त सगळ्यांसोबत हसत खेळत होती.आणि इतक होऊनही लिफ्ट ऑफर केली तर किती attitude, जाऊ दे पण मी का इतका विचार करतोय तिचा,का मी तिच्यासाठी परत मागे गेलो? का मला तिला एकटीला सोडावं वाटलं नाही? पण तिच्या ऐवजी कोणतीही मुलगी असती तरीही मी तिला एकटीला सोडलं नसतं. पण सकाळी तिच्या डोळ्यातील पाणी ते का मला इतक त्रास देतंय? या पूर्वीही मी कित्येक जणांना ओरडलो पण आजच इतका त्रास का? अशे अनंत प्रश्न सिद्धांत ला पडले परंतु त्याचे उत्तरे काही त्याला मिळत नव्हते. दिवसभराच्या थकव्याने  त्याला झोप कधी लागली हे त्यालाही कळले नाही.