Pathlag - 21 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग (भाग – २१)

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

पाठलाग (भाग – २१)

“माझा प्लॅन रेडी आहे..”, दोन दिवसांनी सकाळी ऑफीसला जाताना माया दिपकला म्हणाली.

“दुपारची कॉन्फरंन्स मी गार्डन-कोर्ट ला हलवली आहे, ऑफीसपासुन दुर आहे, जायला निदान तासभरतरी लागेल, तेंव्हा डिटेल मध्ये बोलु. बाहेर कुठे भेटुन बोलण्यापेक्षा गाडीतच बोललेले बरं..”

दिपकने मान डोलावुन संमती दर्शवली.

ठरल्यावेळी माया ऑफीसमधुन निघाली. बरोबर ऑफीसमधील दोन-तिन डायरेक्टर्स होते, पण ते नशीबाने दुसर्‍या गाडीत बसले.
दिपकने गाडी सुरु केली. सुरुवातीचे काही फोन कॉल्स झाल्यावर माया म्हणाली, “आपल्या मित्राचं नाव इन्स्पेक्टर शेखावत आहे. तुम्ही लोकं जेल मधुन पळुन गेल्यानंतर, त्या जेल मधुन त्याची आता बदली झाली आहे. परंतु त्याचा राग अजुनही धुमसतो आहे. तुम्हाला पकडुन त्याला त्याची गेलेली इज्जत परत मिळवायची आहे.

मी त्याला टीप द्यायची व्यवस्था करणार की तु जिवंत आहेस आणि इकडेच कुठेतरी दमण मध्ये लपुन बसला आहेस. तुला शोधत तो इथे येईल. शक्यता आहे की कदाचीत तो कुणालातरी तो कुठे चालला आहे हे सांगुन येईल. त्यामुळे सरळ-सरळ आपण त्याचा खुन करु शकणार नाही. तसं झालं तर तु नक्कीच जिवंत आहेस, आणि हा खुन तुच केला आहेस हे समजायला पोलिसांना वेळ लागणार नाही. सो त्याचा मृत्यु हा प्लॅन्ड मर्डर वाटता कामा नये.. ओके?”

दिपकने आरशात पाहीले. मायाची आणि त्याची नजरानजर झाली. दिपकने एकवार मान हलवली तसं माया पुढे सांगु लागली.

“एखाद्या संध्याकाळी त्याला आपण पुन्हा टीप द्यायची की त सी-मरीना बार मध्ये येणार आहेस. हा बार बर्‍यापैकी गावाबाहेर आहे. आणि बहुतेक वेळेस तेथे जुगारी, दारुडे लोकंच जास्त असतात. तु सुध्दा तेथे जायचंस, पण वेश बदलुन. शेखावत ने तुला अज्जीब्बात ओळखता कामा नये.
इतरांच्या लेखी तु सुध्दा एक दारुडाच वाटला पाहीजेस. तुझी शेखावतशी तेथे भेट घडेल. काही तरी किरकोळ कारणावरुन तुमच्यात बाचाबाची होयला हवी. साध्या वर्दीत असला तरी शेवटी तो दुसर्‍या स्टेटचा पोलिस आहे, तो तुझ्यावर चार-चौघात हात नाही उचलु शकणार. पण तु त्याला इतकं चिडवं की तो अगदी हमरातुमरीवर यायच्या तयारीत आला पाहीजे. दोघांमध्ये ढकलाढकली, शिवीगाळ व्हायला हवी.

दारुच्या नशेतच त्याला जिवे मारण्याची धमकी देऊन तु बाहेर पड. तुझी बर्‍याचवेळ वाट बघुन शेवटी शेखावत पण तेथुन बाहेर पडेल.
पार्कींगमध्ये तु त्याची वाट पहात बसशील आणि संधी मिळताच डोक्यात एखादी सळई किंवा तशीच एखादी वजनदार वस्तु घालुन तु त्याचा खुन करशील. ओके?”

“ओके.. आलं लक्षात..”, दिपक म्हणाला

“काम सफाईदारपणे व्हायला हवं. दुसर्‍या स्टेटच्या पोलिसाचा मृत्यु झालाय म्हणल्यावर.. आणि ते सुध्दा एका फडतुस दारुड्याकडुन म्ह्णल्यावर इथली पोलिस खवळुन उठेल. त्याचा शोध जोरदार सुरु होईल. सो आपल्याकडुन कुठलाही, कसलाही पुरावा मागे रहाता कामा नये.
तो दारुडा जसा अचानक उगवला तसाच तो गायब व्हायला हवा…”

“प्लॅन ओके आहे, पण एक शंका आहे.” काही क्षणांनी दिपक म्हणाला..”म्हणजे, कितीही कसाही मेक-अप केला तरी चेहरा बदलु शकतो, शरीराची ठेवण, उंची बदलणं अवघड आहे. समजा, चुकुन माकुन पोलिस माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेच, तर माझ्यासाठी काहीतरी सेफ अ‍ॅलबाय असणं गरजेचं आहे. आय मीन, खुन झाला त्यावेळी मी तेथे नव्हतो, तर दुसरीकडे कुठेतरी होतो हे सांगायला साक्षीदार हवा..”, दिपक

“गुड पॉईंट. शक्यतो पोलिस आपल्यापर्यंत नाहीच पोहोचणार.. पण ऑन-अ-सेफर साईड आपल्याला ती काळजी सुध्दा घ्यायला हरकत नाही. एक काम करु. तो दमणला आला की, जो दिवस आपण प्लॅन करु त्या दिवशी मी एखाद्या हॉटेलमध्ये किटी पार्टी ठेवेन. तु मला सोडायला बरोबर येशील. तुला बंगल्यातुन माझ्याबरोबर बाहेर पडताना वॉचमन पाहील. तु मला हॉटेलला सोडशील. हॉटेलचा पार्कींग स्टाफ तुला माझ्याबरोबर पाहील. तु गाडी पार्क करशील आणि तुझं काम करायला गुपचुप निघुन जाशील.

मायाचा ड्रायव्हर गाडी सोडुन कधीच कुठे जात नाही.. अख्या गावाला माहीती आहे. तु त्याला कसा अपवाद असशील? त्यामुळे तु माझ्या पार्टीच्या ठिकाणीच होतास हा पुरावा राहील.

अर्थात सी-मरीना हॉटेल थोडं दुर आहे. रिक्षा, टॅक्सी, बस करुन जाणं परवडणारं नाही. त्यापेक्षा आपण एक काम करु, बंगल्याच्या मागे गॅरेजमध्ये एक जुनी स्विफ्ट पडुन आहे. थोडी रिपेअर करुन ती चालु करुन ठेव. आपण ती किटी-पार्टीच्या हॉटेलपासुन जवळच कुठेतरी लावुन ठेवु. मला सोडल्यावर तु ती कार घेउन जा आणि काम झाल्यावर परत तिकडे लावुन ठेव…ओके?

“डन.. “, दिपक म्हणाला.. “मी प्लॅनवर अजुन थोडा विचार करतो आणि काही राहीलं आहे असं वाटलं तर सांगतो…”
थोड्या वेळातच मायाचं कॉन्फरंन्सचं ठिकाण आलं तसं माया गाडीतुन उतरुन निघुन गेली.
दिपक मायाने सांगीतलेल्या प्लॅनवर पुन्हा पुन्हा विचार करण्यात गढुन गेला.



टेबलावरची फोनची रिंग वाजली तेंव्हा इन्स्पेक्टर शेखावत एका नामी गुंडाचे जमानत पेपर्स सह्या करण्यात मग्न होता. त्याच्या अंगाची आग-आग झाली होती.

“कश्याला ह्या लोकांना पकडुन तुरुंगात टाकायचं, आणि मग जमानत देऊन सोडायचं? आधीच गोळ्या घालुन उडवला पाहीजे साल्यांना.. ना रहेगा बास.. ना बजेगी बासुरी”, तो स्वतःशीच विचार करण्यात गुंगुन गेला होता.
फोनची रिंग वाजली तसा तो भानावर आला.

“हॅलो? इन्स्पेक्टर शेखावत हीअर…”

“तुझ्या तुरुंगातुन, तुझ्या नाकावर पाय देऊन पळालेला कैदी दिपक कुमार, जिवंत आहे आणि दमण मध्ये लपुन बसला आहे..”
“कोण बोलतंय?”

“ते महत्वाचं नाही. दिपक अजुन किती दिवस इथे असेल माहीत नाही. वेळ घालवु नकोस. दमणच्या हॉटेल पर्लमध्ये उतर.. दमणला पोहोचलास की त्याला कुठं पकडायचं ते सांगायला मी तिथे परत फोन करेन..”

शेखावत पुढे काही बोलायच्या आतच फोन बंद झाला होता.

दिपकचं नाव ऐकल्यावर शेखावतंचं मन पुन्हा त्या कटु भुतकाळात गेलं. आधी तुरुंगातुन पळाला आणि नंतर गोकर्णातुन हाता-तोंडाशी आलेला पुन्हा निसटला होता.

“ह्यावेळेस जिवंत सोडनार नाही…”, टेबलावर हाताची मुठ आपटत शेखावत ओरडला.


शेखावत दमणच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेंव्हा तो घामाने ओलाचिंब झाला होता. आधीच शरीराचे मोठ्ठ धुड आणि त्यात समुद्रामुळे हवेत आलेला दमटपणा त्यामुळे तो पुर्ण घामेजुन् गेला होता.

बरोबर आणलेली एक छोटीशी बॅग घेउन तो स्टेशनवर उतरला. खिश्याला हात लावुन आपली सर्व्हीस रिव्हॉल्व्हर व्यवस्थीत असल्याची त्याने खात्री करुन घेतली आणि मग तो हॉटेल पर्लच्या दिशेने चालु लागला.


“बर्ड इज इन केज”, ऑफीसवरुन परतताना गाडीत माया दिपकला म्हणाली

“यु मिन शेखावत आला दमण मध्ये??”, आश्चर्यचकीत होत दिपक म्हणाला

“येस्स, आपल्याला आपलं काम आजचं संध्याकाळी उरकायला हवं, उद्या मला ४ दिवसांसाठी मुंबईला जायचं आहे, उशीर करुन चालणार नाही.”, माया

“पण माया.. अजुन आपला प्लॅन फुल्ल प्रुफ झालेला नाही. निटसा त्याच्यावर विचार करुन झाला नाहीये. काही गडबड झाली तर?”, दिपक

“डोन्ट वरी. मी केलाय विचार निट. एव्हरीथींग इज ऑल-राईट. ४ दिवसांनी खुप लेट होईल. तो पर्यंत तो निघुन गेला तर आपल्याला नविन प्लॅन आखावा लागेल. बिसाईड्स… मी ऑलरेडी त्याला सी-मरीनाची टीप दिली आहे. ८.३० ला तो तेथे पोहोचेल.. सो बेटर हरी अप.. तु पटकन तुझं मेक-अपचं सामान घेउन तयार रहा, मी फ्रेश होऊन येते….”

दिपक खरं तर पुर्णपणे कन्व्हींन्स नव्हता. पण त्याच्या हातात दुसरा कुठला ऑप्शन पण नव्हता. माया म्हणते त्यात तथ्य होते. चार दिवसांनी कदाचीत खुप उशीर झाला असता. शेखावत दिपकला शोधत चार दिवस नक्कीच थांबला नसता. त्यामुळे जे होईल ते होईल, बघु असं म्हणुन दिपकसुध्दा तयार झाला. शिवाय जेलमध्ये त्याच्यावर झालेले अत्याचार आणि स्टेफनीचा खुनाचा बदला घ्यायला त्याचे हात शिवशिवत होते.

गाडी बंगल्याच्या पोर्चमध्ये लावुन तो जवळ जवळ धावतच खोलीत शिरला. कपाटातुन गेल्या दोन दिवसांत जमा केलेले सामान त्याने बाहेर काढले. एक कुरळ्या, मानेपर्यंतच्या केसांचा विग, अर्धा कापुन दोन तुकडे केलेला टेबल-टेनिसचा चेंडु. एक मळकट ओव्हरकोट, लो-क्वॉलीटीचा एक काळा गॉगल वगैरे.

टेनिसचे अर्धा कापलेल्या बॉलचे तुकडे त्याने तोंडात दोन्ही बाजुला गालाला चिकटउन लावले. त्यामुळे त्याचं तोंड थोंड गोलाकार आणि फुगलेलं वाटु लागलं. केसांचा विग, दाढी, ओव्हरकोट आणि आतमध्ये एकावर एक घातलेले ५-६ जाड शर्ट ह्यामुळे तो पहील्यापेक्षा कित्तेक पटीने जाड दिसु लागला. त्याने आपलं बदलेलं रुप आरश्यात एकवार न्याहाळलं. आणि मग केलेला बदल योग्य आहे ह्याची जाणिव झाल्यावर पुन्हा सर्व सामान उतरवुन त्याने एका बॅगेत भरलं आणि मायाची वाट बघत खाली जाऊन थांबला.

माया येईपर्यंत दिपकने उगाचच वॉचमनशी गप्पा मारल्या. मॅडमनी कशी ऐन वेळी किटी-पार्टी ठरवली, आणि आपली आराम करायची इच्छा असुन सुध्दा कसं तिच्यासाठी पुन्हा जाव्ं लागणार आहे त्याची दर्दभरी हकीकत त्याने वॉचमनला ऐकवली आणि शेवटी ‘मॅडम पार्टीको गया तो फिर मै मस्त गाडी मै दो-तिन घंटा सोनेवाला हु’ वगैरे ऐकवुन त्याचा निरोप घेतला.

माया गाडीत बसल्यावर बाहेर पडताना एकवार पुन्हा एकदा गाडीची काच खाली करुन त्याने वॉचमनकडे बघुन हात हलवला आणि मग त्याने गाडी हॉटेलच्या दिशेने वळवली.

“ऑल सेट?”, मायाने विचारले
“हम्म..”, दिपक

“प्लॅन सगळा लक्षात आहे ना? कोणतीही चुक होता कामा नये…”, माया
“हम्म.. आणि स्विफ्ट मी आज सकाळीच एम.जी.रोडला न्हेऊन ठेवली आहे.. सो नो प्रॉब्लेम..”, दिपक म्हणाला

“आपल्याकडे तिन तास आहेत, त्या वेळेत तु काम पुर्ण करुन परत गाडीत येऊन बसं. सगळं काही फ्ल्युएंटली व्हायला हवं. तरच आपला प्लॅन व्यवस्थीत पार पडेल.. ऑल द बेस्ट….”,माया


दिपकने गाडी हॉटेलच्या पोर्चमध्ये थांबवली. काही न बोलता माया उतरुन निघुन गेली. दिपकने गाडी वळवुन हॉटेल पार्कींगच्या गेटमधुन आत आणली.

“व्हॅले पार्कींग?”, दारात उभ्या असणार्‍या कर्मचार्‍याने दिपकला विचारले

“नो.. थॅंक्यु.. माया मॅडमना त्यांच्या गाडीला दुसर्‍या कुणी हात लावलेला आवडणार नाही. डोन्ट वरी, आय विल फाईंड माय प्लेस टु पार्क. बिसाईड्स मी कारमध्येच आहे..”

माया मॅडमची गाडी आहे म्हणल्यावर त्या कर्मचार्‍याने नकळत ड्रायव्हर असलेल्या दिपकलाच सलाम ठोकला.

दिपक त्याच्याकडे बघुन हसला आणि त्याने गाडी पार्कींगच्या एका कोपर्‍यात न्हेऊन उभी केली. साधारणपणे पाच-एक मिनीटं आजुबाजुचा अंदाज घेत त्याने थोडा वेळ जाऊ दिला आणि नंतर गाडीच्या काळ्या काचा वर करुन खिडक्या बंद करुन टाकल्या. मग त्याने आपली बॅग सिटवर रिकामी केली आणि बॅगेतुन आणलेले सामान अंगावर चढवायला सुरुवात केली.

पार्कींगमध्ये बर्‍यापैकी वर्दळ होती. अनेक अलिशान गाड्या जा-ये करत होत्या. त्यामुळे दिपकला बाहेर पडता येत नव्हते. घड्याळाचे काटे जणु वेगाने पुढे पुढे धावत होते. वेळ फार कमी होता. मायाची पार्टी संपायच्या आत दिपकला परतायचे होते.

थोडीशी संधी मिळताच दिपक पट्कन गाडीतुन बाहेर पडला. जाताना त्याने गाडीतील म्युझीक सिस्टीम ऑन केली आणि व्हॉल्युम मोठ्ठा केला जेणेकरुन गाणी बाहेर ऐकु येतील आणि गाडीत कोणीतरी बसलेलं आहे ह्याची खात्री पटेल.

गाडी लॉक करुन पार्कींगच्या मागच्या बाजुच्या भिंतीवरुन उडी टाकुन तो बाहेर पडला एम.जी.रोडच्या दिशेने जेथे त्याने सी.मरीना बारमध्ये जाण्यासाठी स्विफ्ट पार्क केली होती.

दिपक गाडीपाशी पोहोचला तेंव्हा तो घामाने पुर्णपणे निथळत होता. आधीच अंगावर चढवलेले ५-६ शर्ट, त्याच्यावर तो जाड मोठ्ठा ओव्हरकोट आणि त्यात झपझप चालल्याने तो पुर्णपणे घामाघुम झाला होता. त्याने पार्कींगमधुन गाडी बाहेर काढली आणि सी.मरीनाकडे वळवली त्याच वेळी संतापाने बेभान झालेला शेखावत सी.मरीनाचे दार उघडुन बारमध्ये प्रवेश करत होता.


[क्रमशः]