लग्नानंतर सुद्धा मुलींनी काम का कराव?
लग्न झाल असो वा नसो, प्रत्येक मुलीला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडून काम केल पाहिजे. हल्ली लग्न उशिराच होतांना दिसतात. मुलींना आपल्या स्वातंत्राची जाणीव व्हायला लागली आहे. कोणाच्या बंधनात न अडकता प्रत्येक मुलीला मनासारखं जीवन जगून स्वप्नपूर्ती करायची इच्छा असलेली दिसून येते! त्यामुळे मुली स्वतः च करियर सेट झाल्यावरच लग्नाचा विचार करता. त्याच मुख्य कारण म्हणजे फ्रीडम च महत्व वाढल आहे. पूर्वी सारख फक्त घरकामात रमायला मुलींना अजिबात रस नसतो. त्यांना सुद्धा आपले पंख विस्तारून आकाशात उंच भराऱ्या घ्यायच्या असतात. स्वतःच स्वातंत्र जपायचं असेल, स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर लग्नानंतरही मुलींनी कोणावर अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर उभ राहील पाहिजे. आजच्या काळात मुलींना फक्त ४ भितींमध्ये अडकून राहण्यात काहीही रस नसतो आणि प्रत्येकीला आपल आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा असतेच. त्या इच्छेला न दाबता प्रत्येक मुलीनी आपल्या पायावर उभ राहून स्वतःची खास ओळख निर्माण केलीच पाहिजे. त्याचबरोबर, घरातल्या लोकांनी सुद्धा मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
* लग्नानंतर सुद्धा मुलींनी घरा बाहेर पडून काम का केल पाहिजे-
१. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ राहून स्वतःची वेगळी आणि खास ओळख निर्माण करण्यासाठी-
घरातली काम तर स्त्रियांना सुटत नाहीत आणि त्याच कधी कोणाकडून कौतुक सुद्धा होत नाही. रोज तीच ठरलेली काम आणि त्या कामामुळे काही समाधान सुद्धा मिळेनास होत. अश्या वेळी स्वतःची अशी ओळख निर्माण करायची असेल तर लग्ना नंतर सुद्धा स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी काम करायला मुलींचा प्राधान्य असत. किती पैसे मिळतात या पेक्षा तुम्ही बाहेर जाऊन काम करता या गोष्टीमुळे तुम्हाला चांगला वाटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा बदलण्यास मदत होईल हे हि नक्की!
२. सतत नवीन शिकण्याची ओढ जिवंत ठेवण्यासाठी-
आयुष्य भर शिकत राहायचं असत. आणि सतत नवीन शिकण्याची ओढ जिवंत ठेवण्यासाठी घराबाहेर पडून काम करण्याची गरज तर असतेच. नवीन शिकण्यासाठी वय किवा लग्न झालाय हा अडथळा होऊच शकत नाही. जर लग्नंतर जॉब सोडून फक्त घरातच अडकलात तर नवीन गोष्टी करण्याची उर्मी कमी होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे तुमच आयुष्य बोअरिंग होऊ शकत. तुमच ज्ञान थंडावू शकत. हे टाळण्यासाठी आणि सतत नवीन शिकण्यची ओढ जिवंत ठेवण्यासाठी स्त्रियांनी लग्नानंतर सुद्धा घर बाहेर पडून काम करण गरजेच असत.
३. पैश्यासाठी दुसऱ्या वर अवलंबून न राहण्यासाठी-
लग्न झाल्यावर स्वातंत्र थोड्या फार प्रमाणात कमी होताच. अश्यावेळी पैश्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहायची वेळ आली तर अर्थातच त्या गोष्टीचा त्रास व्हायची शक्यता वाढते. तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा समाविष्ट केले जाण्याची शक्यता कमी होते. त्याबरोबर आपण घरखर्चा मध्ये हातभार लाऊ शकणार नाही याची टोचणी तुमच्या मनाला कायम लागून राहू शकते. त्या विरुद्ध, जर तुम्ही काम करून पैसे आणलेत आणि त्याचा वापर घरामध्ये केलात तर तुम्हाला चांगल तर वाटेलच पण त्याचबरोबर घरातल्यांकडून सुद्धा तुम्हाला मानाची जागा मिळेल.
४. तुमचा आत्मसम्मान वाढण्यासाठी-
प्रत्येकाचीच बरीच स्वप्ने असतात. आणि लग्नानंतर जर तुम्ही स्वप्न किंवा इच्छा पूर्ण करू शकला नाहीत तर तुम्हाला स्वतःबद्दल वाटणारा आदर कमी होऊ शकतो. जेव्हा तुमच्या कळत,नकळत स्वतःला ४ भिंती मध्ये बंद करून घेता तेव्हा तुम्हाला लो वाटू शकते. जगण्यातला आनंद आणि समाधान कुठेतरी हरवल्यासारखं वाटू शकेल. त्या विरुद्ध जर घराबाहेर पडून काम केलत तर बाहेर तुम्हाला सम्मान मिळेल आणि त्याबरोबर तुमच आत्मसम्मान सुद्धा वाढण्यास मदत होईल.
५. मानसिक आणि वैचारिक पातळी वाढण्यासाठी-
स्वतःला कोशात बंद करून घेण्याऐवजी जर लग्नानंतर सुद्धा तुम्ही स्वतःला नवीन अनुभव घेण्यासाठी सज्ज केलत तर तुम्ही नवीन उची गाठू शकाल. आणि साहजिकच तुमची मानसिक आणि वैचारिक पातळी वाढण्यास मदत होईल. तुम्ही बदल स्वीकारू शकता, तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारू शकाल. साहजिकच त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर झालेला दिसून येईल. त्याचबरोबर आयुष्यात कोणत्याही समस्येला खंबीर पणे सामोरे जाऊ शकाल.
६. घरातल्यांसाठी खंबीर आधार बनण्यासाठी-
जेव्हा तुम्ही स्वतः बाहेर पडून काम करता त्यावेळी तुम्ही घरासाठी जास्तीचे पैसे मिळवून आणू शकता. तुम्ही आणलेल्या पैश्याचा उपयोग घरात होतो आहे या गोष्टीच खूप समाधान तुम्हाला मिळेल. तसही, हल्ली खर्च इतके वाढले आहेत कि फक्त एकाच्या पगारात घर चालवण अवघड होऊन जात. अश्या वेळी तुमच्या पैश्यांमुळे घराला आधार मिळेल हे नक्की आणि तुमच्या जोडीदारावरचा भर सुद्धा हलका होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तुमच सेव्हिंग सुद्धा वाढेल.
७. आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी-
आता परिस्थिती सुद्धा बदलली आहे. फक्त घरकाम करून समाधान मिळेल याची काही खात्री नसते. बऱ्याच वेळा लग्न झाल कि मुली घरात राहायचा निर्णय घेतात. घर व्यवस्थित सांभाळतात सुद्धा. पण त्यांच्या मनात कोणत्यातरी कोपऱ्यात काहीतरी राहून गेल्याची जाणीव राहू शकते. तिच्या कुवतीच्या मनानी तिनी काहीच केल नाही अशी खंत मनात राहू शकते. पण जर स्त्री नी घराबरोबर बाहेर जाऊन काम केल तर टी घर सुद्धा चांगल सांभळू शकते आणि त्याचबरोबर बाहेर राहून तिथे सुद्धा प्रगती करू शकते आणि पूर्ण समाधान मिवू शकते.
८. शिक्षण वाया न घालण्यासाठी-
हल्ली मुली खूप शिकतात. समाजासाठी हि अत्यंत चांगली खुण आहे. पण जर भरपूर शिक्षण झालेलं असतांना सुद्धा जर लग्न झाल्यावर ती मुलगी तिच्या शिक्षणाचा उपयोग तिच्या प्रगतीसाठी नाही केला तर त्याचा दुःख त्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा होऊ शकत. स्त्री च कौशल्य फक्त घर कामात असल पाहिजे हि गोष्ट आता जुनी झाली आहे. आणि घर सांभाळून सुद्धा स्त्रिया यशस्वीपणे जॉब करू शकतात. याची असंख्य उदाहरण आपल्याला दिसून येतात. त्यामुळे जे शिकलोय ते वाया घालवायच नसेल तर स्वतःच्या मनाप्रमाणे बाहेर जाऊन काम केल पाहिजे.
९. यशस्वी होण्याकरता-
हल्ली सगळे स्वताची ओळख निर्माण करण्यासाठी झटत असतात. अश्यावेळी लग्न झाल म्हणून स्त्री ने काम कारण सोडून देण हे आजच्या परिस्थितीला साजेस नाही. प्रत्येक स्त्री मध्ये इतकी क्षमता असते कि ती तिला जे वाटेल ते करू शकते. स्त्रिया घर काम आणि त्याचबरोबर बाहेर जाऊन काम करण हे दोन्ही व्यवस्थितपणे सांभाळू शकतात. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मनातली स्वप्न न दाबता त्या स्वप्नांचा पाठपुरावा कारण अत्यंत गरजेच असत.
१०. आदर्श आई होण्याकरता-
आईपण हि स्त्री ला मिळालेली देणगीच आहे. जेव्हा स्त्री आई होते तेव्हा तिच्या मुलांची सगळ्यात पहिली शिक्षक तिच असते. जेव्हा मुल पाहतील कि आपली आई सगळ किती व्यवस्थितपणे सांभाळते आहे तेव्हा साहजिकच त्यांच्या विचारंना सुद्धा सकारात्मक दिशा मिळण्यास मदत होते. एक स्त्री सगळ घर पुढे नेण्यासाठी जबाबदार असते. त्याचमुळे प्रतेकीनी घर बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करण्याची गरज असते.
स्त्री नी बाहेर पडून काम करण्याची गरज काय हा विचार तसा जुना झाला आहे. प्रत्येक स्त्री ला तिची स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क आहेच. त्यामुळे स्वत:च्या वाढीसाठी, समाधानासाठी आणि घरासाठी लग्न झाल्यावर सुद्धा मुलीने बाहेर पडून काम कारण अत्यंत गरजेच आहे आणि स्वतःची ओळख बनवून ती जपणे सुद्धा महत्वाचे आहे.