मुंबई जाने वाली गाड़ी दो घंटे देरी से चल रही हैं .....
प्लॅटफॉर्मवर मी पाय ठेवताच अनाउसमेंट ध्वनी माझ्या कानावर आदळत होता . केवढ्या घाईत निघाली मी घरून . झालं आता दोन तास जप करत बसा इथे !
ह्या मुंबई लोकल ट्रेनचा हाच तगादा असतो .
लोकल कधी वेळेत आली तर सूर्याने दिशा बदलवल्याचे डोहाळे लागतात .
खाली बर्थचा मी शोध घेत निघाली . पण कुठेच खाली बर्थ नजरेस पडत नव्हता . मी समोर चालू लागली शेवटी एक खाली बर्थ दृष्टीस
पडला तिथे जाऊन बसली .
नजरेसमोरून धाडधाड करत जाणाऱ्या गाड्या ह्यात माझी गाडी कधी येणार आणि इंटरव्ह्यू कसा जाणार ह्याच विचारात मी गढून गेली होती .
एवढ्यात माझ्या बाजूला ती येऊन बसली . समोरून जाणाऱ्या वडे वाल्याला ती आवाज देऊ लागली . तेव्हा माझ्या बाजूला येऊन बसलेल्या तिच्यावर माझी नजर पडली . विशीतली तरुणी वाटतं होती ती मला .
ओठाला लावलेली लाल भडक लिपीस्टिक तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर शोभून दिसत होती . काजळी डोळ्यात तेवढीच चमक होती . पाठीवर मोकळे सोडलेले तिचे काळेभोर केस काहीसे कपाळावर येत होते . त्या समोर येणाऱ्या लटांना मागे करत ती एका हाताने वडे खात होती .
खूप दिवसाचं तिने काही खाल्लं नसावं अशी ती वड्यावर ताव मारत होती .
दूरवर फिरणारी माझी नजर नराहून तिच्यावर खिळत होती . एकदम तिने माझ्याकडे बघितलं आणि आमची नजरेवर नजर पडली .
तोंडासमोर खायला घेतलेला वडा हातातल्या कागदी प्लेटवर ठेवत . प्लेट माझ्याकडे सरकवत ती म्हणाली ,
त्यावर ती म्हणाली , " मग अशी का बघत आहेस ? "
मी काही नाही म्हणत समोर बघायला लागली .
परत तिच्याकडे वळून बघण्याची हिंमत मला झाली नाही .
अर्धा तास असाच शांततेत निघून गेला .
कुठे जायचं आहे तुला ? तिने माझ्या सोबत संवाद साधण्याचा प्रयत्न
मी म्हटलं मुंबईला ... आणि तुला कुठे जायचं ?
मला विचार आला कुठे जायचं नाही तर बॅग वैगरे घेऊन इथे का बसलीे असावी ?
माझ्या प्रश्न चिन्ह चेहऱ्याकडे बघत ती उद्गारली
" मावशी येणार आहे मुंबईला जाणाऱ्या गाडीन . गाडी दोन तास उशिरा आहे म्हणून मी तिची वाट बघत बसली इथं . "
मला पुढे काही बोलायच्या आतच ती ,
" तुझ्याकडे फोन आहे का ? मला एक फोन करायचा होता .
कुठ जवळपास STD बूथ पण नाही ... "
मी हो म्हणत तिच्या हातात फोन दिला . तिने कॉल लावताच शिव्या द्यायला सुरुवात केली .
आजूबाजूला जाणारे येणारे प्रवासी तिच्या बोलण्याकडे एकटक बघत जात
होते . त्या दोन मिनिटांत तिच्या शिव्यांचा अंदाज बांधता नाही यायचा . ती कुण्यातरी माणसाला शिव्या देत असावी असं तिच्या बोलण्यावरून वाटतं होतं .
एवढं भडकायला काय झालं ? तिच्या हातून फोन घेत मी विचारलं .
त्यावर ती म्हणाली , ' साले ने पैसे नही दिए , दस दिन से बोल रहा आज देता कल देता ... रोजचा गिराइक आहे म्हणून थांबले होते . '
मी तिला विचारलं , काय करते तू ? माझ्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली ,
माझ्या प्रश्नावर ती लगेच उत्तरली .
( मी तिच्याकडे बघून काही क्षणासाठी निःशब्द झाली . काय बोलावं
काय झालं माझ्या सारख्या धंदेवाली सोबत एका बेंचवर बसल्याच तुला ....
तिला मध्येच बोलत असताना थांबवत
मी म्हटलं , ' असं काही नाही ... तू ही माणूसच आहे ना ?'
ह्यावर ती म्हणाली , ' सर्व मला माणूस म्हणून नाही तर एक वेश्या म्हणून बघतात .
घरणदाज बाया मी त्यांना कोण आहे हे कळताच माझ्या जवळून उठून
माझ्या अचानक विचारलेला प्रश्नाने ती भांबावून जात म्हणाली ,
' 25 लागेल आता ह्या महिन्यात '
माझा अंदाज खोटा ठरला होता तर .
मी म्हटलं तिला कशाला आली ह्या धंद्यात .
ती जरा मिश्किल हसत म्हणाली ,
' कोण्या स्वतःला ह्या धंद्यात झोकून घ्यायची हौस नसते तै .'
तिच्या डोळ्यातुन तिचा भूतकाळ अधोरेखित होत होता .
मी विषय बदलवत तिला म्हटलं
ती म्हणली बारवी पर्यंत ... मला आश्चर्य वाटलं ऐकून
मग समोर शिकायचं नव्हतं का ?
परिस्थिती न्हवती तशी , बाप कर्ज बाजरी बुडाला होता . माय लहानपाणीच देवाघरी गेली . कसा बसा भावाच्या भरवश्यावर संसाराचा गाडा रेटत होता . पण परमेश्वराने त्यालाही गिळला अपघातात तो ही जागीच गेला . बापावर कर्जाचा बोजा होता . काय करणार तो बी ? मला इथे सोडून गेला .
तिचं बोलणं ऐकून वाटलं सख्खा बाप मुलीला ह्या धंद्यात ढकलून देतो .
तुझ्या बाबाला माहिती आहे तू हे काम करते म्हणून ? तो तुला काहीच म्हणत नाही ??
ती पुढे सांगायला लागली , ' पहिल्या पाच महिन्यातच पन्नास हजार कमवून सर्व त्याच्या कर्जाचा बोज हलका केला तो काय म्हणेल नको करू हा धंदा म्हणून . लहान दोन बहिणी बी आहे हे काम नाही केलं तर
उपासमारीची वेळ येईल माझ्या सारखं त्यांचं शिक्षण नाही बुडवायचं .'
तिच हे बोलणं ऐकून तर थक्क झाली होती मी . वेळ आणि परिस्थिती माणसाला कोणत्या वळणावर घेऊन जाईल ह्याचा काही नेम नसतो .
मग परत तुझी गावाकडं जायची इच्छा नाही का ? इथे तुला पोटभर खायला मिळतं ? तिला ज्या पद्धतीने मी वडे खाताना बघितलं होतं त्यावरून जाणवलं की तिला पोटभर अन्नही नसेल मिळत .
' नाही , पोट भरायला तिथं काही बी साधन नाही एवढी मिळकत पण होत नाही . माझ्या आयुष्याचा गुजराना ह्याचं भरवश्यावर चालतो .
सरत्या शहराच्या मध्यवर्ती , डामरी रस्त्याभोवती वटवाघळासारखं घिरट्या घालत ऐ चालतो का अड्यावर म्हणत आपल्या कलेन त्यासनी
हिसडून घ्यायचं , तो म्हणणं त्या हॉटेल मध्ये रात्र काढायची आणि दिवस होताच आपल्या वस्तीला निघायचं .असे कैक येतात न जातात त्यातून
निघणाऱ्या एखाद्याकडे मी आस्थेने बघू लागते .
एखाद्याचं काळीज समजे पर्यंत कुतूहलाने मी त्याच्यात दुमडून रहाते . चालत्या हलत्या वस्तीतून येरझाऱ्या घालणारा मग तो नेहमीचा गिराईक होऊन जातो .
नेहमीचे होऊन जाणारेही फार फार काळ टिकत नाही . लुबाडायला
त्यांना शरीर पाहिजे असतं . घरात बायको असून रखेल बनवायला तयार असतात पण खिशातून पैसे काढायला हात मागे सरतो . '
हे सारं काही ती एका दमात बोलून गेली . एखाद्या स्त्री जीवनाची अशी
कैफियत तिच्या तोंडून मी पहिल्यांदाच ऐकत होती .
बोलताना ती म्हणूनही गेली ...
' तै , तुमच्या सारखं माझ्या आईवडिलांनी मला शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभं नाही केलं . '
दोष कुणाला द्यायचा तिने ,
परिस्थितीला की खुद्द पोटच्या पोरीला ह्या व्यवसायात ढकलून जाणाऱ्या बापाला जो कर्जाच्या बाजारात पोरीच्या देहाची किंमत लावून त्यावर
घराचा गाढा ओढत होता .
उन्हात वाऱ्याची हिरवी झुळूक अंगाला स्पर्श करून जावी तसं ती म्हणाली ,
' आज एवढ्या दिवसाने कोणी तरी आपलं भेटल्यासारखं वाटलं , ह्या जन्मात मनासारखं जगायचं राहून गेलं बघ . आईच्या गेल्यानंतर मायने जवळ बसून बोलणारही कोणी अजून पर्यंत भेटल नाही . '
तिचेही काही स्वप्न असतील प्रत्येकाला मनासारखं जगता आलं तर त्याचं आयुष्य त्याला सार्थकी लागल्यासारखं वाटतं .
' मी तुला काही मदत करू शकते का ? तू हवी ती मदत माग तुला इथून बाहेर पडायलाही साह्य करेल . तुझं बारावी पर्यंत शिक्षणही झालं आहे म्हणते ना ! मग समोर शिक्षण घे ... '
माझ्या बोलण्यावर ती म्हणाली ,
' मदत नको मला माझं आयुष्य खूप पुढे निघून गेल आता कात्रीत सापडल्या गत झालं , जगाच्या कोपऱ्यात मी कुठेही पळून गेली तरी मावशी माझ्या मागावर येऊन मला धंद्यावर लावेलच .
पळून जाण्याचा पर्यंत केला पण कैकदा मावशीने मला गाठलं .
शरीरावर ओरफडे फुटे पर्यंत मारलं . पायाला विस्तवाचे चटके दिले . '
हे सांगताना तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि नकळत
' हे बघ इथून पुढे माझा विचारही ध्यानात आणू नको . मला धड जगता ही येत नाही आणि मरताही येत नाही . शिकायची खुप इच्छा होती पण आता तेही शक्य नाही'
शिक्षणाबद्दल असलेली तळमळ मला तिच्यात दिसून येत होती .
तिलाही माझ्या सारखं शिकता आलं असतं तर आज समाजात ताट
एवढ्यात मुंबईला जाणारी गाडी अनाउन्स झाली . एवढा वेळ आम्ही
बोलतं होतो पण शेवटी मी तीच नाव विचारायचं राहून गेली .
मावशी ह्याच गाडीत आली आहे अस म्हणत ती जागेवरून उठताच .
मी तिला थांबवत विचारलं तुझं नाव विचारायचं राहून गेलं .
माझी रोज नाव बदलतात कधी शबनम , कधी राधा , चमेली कोणी त्याच्या मनात येईल ते म्हणतो ....
मुंबईला जाणारी गाडी धाडधाड करत माझ्या डोळ्यासमोर येऊन उभी
ती चालत जात मला म्हणाली तुला कोणतं नाव द्यावं वाटतं मला ते दे !
माझ्या समोर उभी असलेली मुंबईला जाणारी गाडी आणि तिची पाठमोरी
आकृती ह्याच्यात मी स्तब्ध उभी होते माझ्या जागेवर .
लोकांचा जमाव उतरत होता चढत होता .
मानो , जिंदगी तेज रफ्तार से आगे बढ़ रही हो और कोई पीछे छूट गया है ....
सांभाळत चढायला गेली . तेव्हापर्यत त्या लोकल ट्रेनच्या गर्दीत तिही दिसेनाशी झाली .