आर्या अग उठ लवकर, आज ऑफिस चा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशीर नको उठ बघु आईच्या सकाळच्या ह्या आवाजनेच आर्या ला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची ईच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नाईलाजनेच उठली आणि आपलं आवरायला सुरवात केली. खर तर तिला पण उशीर करायचा नव्हता. आर्या म्हणजे एक हुशार बुद्धीमान मुलगी नुकतच MBA complete केलं आणि लगेचच एक MNC मध्ये जॉबही लागला. पण तिला मात्र ह्या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छदी जगणारी मुलगी .निसर्गाच्या सानिध्यात रहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि ह्या निसर्गाचे सुंदर रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपायाचे हेच तिचे छंद . आज ऑफिसच्या पहिल्या दिवशी ती वेळेतच ऑफिस ला पोहचली तिला मात्र मनातून फार दडपण आले होते एकतर पहिलाच जॉब परत कोणी ओळखीचेही नाही . जॉयनिंग ची सगळी प्रोसिजर करून ती इतर एम्प्लॉईस मध्ये येऊन बसली तशी सकाळची सगळ्यांची वेळ कामाचीच असल्यामुळे तिला फारस कुणी काही बोललं नाही .तिनेही कोणाला काही डिस्टर्ब केले नाही. थोड्या वेळाने तिच्या बॉस ने तिला बोलावून सांगितले की लवकरच तिचे काम सुरू होईल तिलाही एका टीम मध्ये टाकतील तोपर्यंत बाकीच्यांकडून शिकून घे . ती हो म्हनाली व परत आपल्या जागेवर आली. खर तर तिला कंटाळा आला होता असे नुसतेच बसायचा मग तिने थोड्या वेळ बघितलं आपले सिनियर कस काम करत आहेत वगेरे . त्यांच्याशी ही ओळख करून घेतली आणि परत सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले . आता मात्र आर्याला जाम बोअर झाले . शेवटी तीने आपला फोन घेतला आणि timepass चालू केला . इतक्यात कुणीतरी सिद्धांत सिध्दांत असा आवाज देत होत त्यामुळे तिची तंद्री भंगली तिने एकदा आवाज देणाऱ्या कडे बघितले तर कंपनीची HR मॅनेजर होती. त्या HR चा मात्र सिद्धांत चा जप चालूच होता. आर्या ला मात्र कळतच नव्हते की हा सिद्धांत आहे कोण तिने इकडे तिकडे बघितले तेव्हा तिला लक्षात आले आहे की आपल्या मागे बसलेला एक टीम लिडर आहे. पण त्याच काही अजूनही लक्षच नव्हतं.आर्या ला मात्र आश्चर्य वाटलं की एवढ्या कुठल्या कामात व्यस्त आहे हा की ह्याला कशाचेही भान नाही. workholoic कुठला, एकदाचा सिद्धांतला आवाज पोहचला आणि त्या HR चा आवाज बंद झाला. आर्या ला माञ छान वाटले की बर झालं बाबा एकदाचं ह्याने पाहिलं नाहीतर ह्या बाईचा जप चालूच असता. आणि आता ती सिद्धान्त आणि HR बोलत होते तिला सिद्धांत ला पाहून थोडं कुतुहुलच वाटलं किती गंभीर आहे हा. वयापेक्षा जास्तच गंभिर वाटतो,असा विचार करून आर्या ने परत आपल्या फोन वर लक्ष केंद्रित केलं.
एकदाचा लंच ब्रेक झाला तशे सगळेच कॅन्टीनमध्ये आले .आर्या पण आली लंच मध्ये तिच्या बऱ्याच जणांनसोबत ओळखी झाल्या आणि तिला थोडं बार वाटलं कारण ती फारच बोअर झाली होती.आणि त्यांच्यापैकीच एक जण रेवा ती थोडी उशिरा आली. सगळे जण तिच्याच साठी थांबले होते . आशिष तर जवळ जवळ चिडलाच तिच्यावर काय ग रेवा तुझं रोजचंच झालं किती उशीर सगळे थांबले तुझ्यासाठी, तुझ्या बॉस ला म्हणावं तुला भूक नसेल लागत तरी आम्हाला लागते . सॉरी यार माझ्यामुळे late झाला पण काय करणार तो सिद्धांत किती काम देतो यार . अरे यार तुम्ही आता भांडण थांबवा आणि please आता जेवणार concentrate करूया ना मला फार भूक लागलीये , इति आर्या. आता मात्र सगळ्यांची दंगा मस्ती करत जेवणावर ताव मारला इतक्यात तिथे त्यांच्याच टेबल वर सिद्धान्त आला त्याचा टिफिन घेऊन आता मात्र सगळेच शांत झाले. क्रमशः