Pathlag - 15 in Marathi Fiction Stories by Aniket Samudra books and stories PDF | पाठलाग – (भाग-१५)

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

पाठलाग – (भाग-१५)

दोन महीन्यांनंतर –

दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि तिला एकदम मिठी मारली.

“स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला.

व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती.

“काय करते आहेस..?”, दिपकने विचारले..
“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले..

“अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायला ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने जवळच्या भांड्यातील पाणी दिपकवर फेकले आणि ती किचन मधुन हसत-हसत बाहेर पळाली. दिपकनेही मुठभर पिठ उचलले आणि तो तिच्या मागोमाग धावला.

दिपकला येताना बघुन स्टेफनी बाहेरच्या बागेत जाण्यासाठी रिसेप्शनकडे धावली आणि तिच्या मागोमाग दिपक. परंतु दोघांची मस्ती अचानक रिसेप्शनमध्ये उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला बघुन थांबली.

जुन्या काळच्या सफारी प्रकारातील बदामी रंगाचा सफारी घालुन ती व्यक्ती स्टेफनी आणि दिपककडे आळीपाळीने पहात उभी होती. हडकुळी शरीरयष्टी, डोळ्यावर अतीशय जाड भिंगाचा चष्मा होता त्यामुळे त्या व्यक्तीचे पिचपीचे डोळे सुध्दा टपोरे भासत होते. हातामध्ये एक कळकट चॉकलेटी रंगाची ब्रिफकेस होती. खिश्याला निळ्या टोपणाचे रेनॉल्ड्सचे पेन लावलेले होते.

दिपक त्या व्यक्तीच्या जवळ गेला तसा सिगारेटचा एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला.

“नमस्कार…”, खोल गेलेल्या आवाजात ती व्यक्ती म्हणाली.. “मी मोहीते.. केशव मोहीते…” असं म्हणुन त्या व्यक्तीने आपला हात पुढे केला.

दिपकने सुध्दा आपला हात पुढे केला तेंव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या हातामध्ये पिठ आहे.. तसं काहीसं ओशाळुन त्याने हाताच्या मुठी जोडुन नमस्कार केला.

“मी मिसेस स्टेफनींना भेटायला आलो आहे..”, मोहीते म्हणाले…

“ह्या मिसेस स्टेफनी..”, शेजारी उभ्या असलेल्या स्टेफनीकडे हात दाखवत दिपक म्हणाला.. “काय काम होते आपले?”

त्या व्यक्तीने खिश्यातुन व्हिजीटींग कार्ड काढुन दिपककडे दिले आणि म्हणाले, “मी लाईफ़-लाईन इंन्शोरंन्स कंपनीकडुन आलोय. स्टेफनी ह्यांचे दिवंगत पती थॉमस ह्यांच्या इंन्शोरंन्स क्लेम बद्दल काही चौकशी करण्यासाठी मी इथे आलो आहे…”

दिपकने डोळे विस्फारुन स्टेफनीकडे पाहीले आणि तो मोहीत्यांना म्हणाला, “थॉमस ह्यांची इंन्शोरंन्स पॉलीसी होती? कोणी क्लेम केला त्याचा?”

“अर्थात त्यांच्या पत्नी स्टेफनी ह्यांनी..”, चेहर्‍यावरचे भाव किंचीतही न बदलता मोहीते म्हणाले…
“पण मला तर ती तसं काहीच म्हणाली नाही..”, दिपक
“आपण?”, मोहीते
“मी दिपक…इथे मॅनेजर आहे…”, दिपक..

“नवर्‍याच्या इंन्शोरंन्सबद्दल स्टेफनीने हॉटेलच्या नोकरांशी चर्चा करावी अशी तुमची अपेक्षा आहे का?”, मोहीते

दिपकला आपली चुक लक्षात आली तसा तो चपापला.

“तर मिसेस स्टेफनी.. मला काही प्रश्न विचारायचे होते…”, मोहीते
“हो जरुर.. विचारा नं..”, स्टेफनी

मोहीत्यांनी एकवार दिपक आणि मग स्टेफनीकडे पाहीले आणि मग काहीश्या कुत्सीत स्वरात ते म्हणाले, “मला वाटतं मी थोडं थांबतो इथे.. तुम्ही कामात दिसताय.. तुम्ही तुमची कामं उरकुन या तो पर्यंत मी चहा ब्रेकफास्ट घेतो..” असं म्हणुन मोहीते तेथीलच एका सोफ्यावर बसले.

त्यांच्या लेखी जणु दिपक आणि स्टेफनी आता तेथे नव्हतेच. त्यांनी आपली ब्रिफकेस उघडली आणि जणु काही ही आपली ब्रिफकेस नसुन दुसर्‍याच कुणाचीतरी आहे अश्या आश्चर्याने ते ब्रिफकेसमधील गोष्टींमध्ये बुडुन गेले.

दिपक एकवार स्टेफनीकडे पाहीले आणि त्याने डोळ्यानेच आतमध्ये चलण्याची खुण केली.

दोघेही आतमध्ये निघुन गेले तसे मोहीत्यांनी एकवार ज्या दिशेने ते गेले त्यांच्याकडे पाहीले. त्यांच्या चेहर्‍यावर एक गुढ हास्य पसरले आणि मग ते परत आपल्या बॅगेतील कागदपत्रात बुडुन गेले.


“स्टेफनी हा काय प्रकार आहे..?”, स्टेफनीच्या दंडाला जोरात धरत दिपक शक्य तितक्या दबक्या आवाजात म्हणाला

“दिपक… दुखतंय मला..”, दिपकच्या हातातुन हात सोडावुन घेत स्टेफनी म्हणाली..
“हा काय इंन्शोरंन्स क्लेमचा प्रकार आहे? आणि तु मला ह्याबद्दल काहीच कसं बोलली नाहीस?”, दिपक
“तुला सांगण्यासारखं काय होतं त्यात? थॉमसची पॉलीसी होती, त्याच्या मृत्युनंतर क्लेम करणं स्वाभाविकच आहे. एवढं चिडतोस कश्यासाठी?”, स्टेफनी..
“कितीची आहे पॉलीसी?”, दिपक..

स्टेफनी काहीच बोलली नाही..

“स्टेफनी, पॉलीसी कितीची आहे?”, दिपक..
“सहा करोड…”, स्टेफनी…
“व्हॉट??? सिक्स करोड????”, दिपक

“ऑफ-कोर्स.. थॉमस एक बिझीनेसमन होता.. मोठी पॉलिसी घेणं कधीही फायद्याचंच होतं.. विशेषतः बॅंकांकडुन लोन घेताना…”, स्टेफनी..
“अगं पण मुर्ख आहेस का तु? निदान मला सांगायचस तरी क्लेम करताना..”, दिपक
“पण का? प्रॉब्लेम काय आहे?”, स्टेफनी..

“प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम बाहेर बसला आहे.. एन्क्वायरी आलीय.. नाहक तो खोलात शिरला तर आपलं पितळ उघडं पडेल…”, दिपक..
“डोन्ट वरी.. मला नाही वाटत तो फार खोलात शिरेल.. चेहर्‍यावरुन तरी बावळट वाटतोय.. फॉर्मालिटी म्हणुन काही प्रश्न विचारेल आणि जाईल तो… चल बाहेर जाऊ..”, स्टेफनी..

“हो येतोच मी कपडे बदलुन.. पण मी येईपर्यंत फारसं काही बोलु नकोस.. येतोच मी लगेच..” असं म्हणुन दिपक त्याच्या खोलीकडे गेला.
स्टेफनीने आपली शॉर्ट बदलुन काळ्या रंगाची स्लॅक घातली आणि केस एकसारखे करुन ती मोहीत्यांच्या इथे गेली.

मोहीते चहा, ब्रेकफास्ट करुन पुन्हा आपली बॅग उघडुन बसले होते. स्टेफनी त्यांच्या समोर जाऊन बसली. मोहीतेने बॅगेतुन कागदांचा एक गठ्ठा काढुन टेबलावर ठेवला, नंतर एक पिवळट रंगाचा कागद घेऊन त्यांनी आपली बॅग बंद केली आणि त्याच्यावर कागद ठेवुन त्याच्यावर तारीख वेळ लिहिली व मग ते स्टेफनीला म्हणाले..

“मला थॉमससर दिल्लीला गेले इथपासुन पुन्हा एकवार सगळं तपशीलवार सांगाल का? म्हणजे ते केंव्हा, कसे गेले? दिल्लीला कधी पोहोचले. तेथुन त्यांनी तुम्हाला केंव्हा केंव्हा फोन केला? तुमचा आणि त्यांचा संपर्क कधी तुटला? सरांच्या मृत्युची बातमी तुम्हाला कशी समजली वगैरे वगैरे.. जितके जास्त सांगाल तितके मला चांगले…”

स्टेफनी अस्वस्थपणे दिपकच्या येण्याची वाट पहात होती..

“अजुन कोणी येणार आहे का??”, मोहीते म्हणाले..

तेवढ्यात दिपक तेथे आला.. दिपकला पाहुन मोहीते प्रश्नर्थक स्वरात म्हणाले.. “येस्स??”
“तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते ना क्लेम बद्दल.. म्हणुन..”, दिपक
“हो.. पण ते तुम्हाला नाही.. मिसेस स्टेफनी ह्यांना.. तुमची तशी काही इथे आवश्यकता नाही..”, मोहीते
“अं.. मोहीते.. असु देत त्यांना इथे.. दिपक थॉमसच्या मर्जीतले होते. ते इथले एम्प्लॉई असले तरी सरांनी त्यांना नेहमी एक घरातील असल्यासारखीच वागणुक दिली होती..”, स्टेफनी..

मोहीत्यांनी खांदे उडवले आणि मग उत्तराच्या प्रतिक्षेत ते स्टेफनीकडे पाहु लागले.

स्टेफनीने काही वेळ विचार केला आणि मग ती म्हणाली, “अ‍ॅक्च्युअली, मला माहीत नाही..”
स्टेफनीच्या त्या उत्तराने मोहीत्यांनी चमकुन स्टेफनीकडे पाहीले

“..म्हणजे.. खरं तर इतक्या दुर हॉटेल घ्यायच्या मी विरोधात होते. इन्व्हेस्टच करायचे तर जवळपासच कुठे तरी करावं असं माझं मत होतं. त्यावरुन थॉमस आणि माझे थोडे वाद सुध्दा झाले होते.. म्हणुनच ‘जाताना फक्त सौदा करायला चाललो आहे’ एव्हढंच थॉमस सांगुन गेले.. आणि मी सुध्दा त्यांना काही विचारलं नाही..”, स्टेफनीने सांगीतले..

स्टेफनीच्या त्या अनपेक्षीत पण अगदी योग्य उत्तराने दिपक खुश झाला. त्याला चिंता होती की स्टेफनी काहीतरी सांगेल आणि त्यामुळे कुठे तरी आपण अडकु. पण ह्या उत्तराने पुढचे अनेक प्रश्न खुंटले होते..

“ओह.. पण म्हणजे थॉमससरांनी दिल्लीला पोहोचल्यावर फोन सुध्दा नाही केला तुम्हाला?”, मोहीते

स्टेफनीने आपला खालचा ओठ वाकडा करुन नकारार्थी मान हलवली.

“बरं, निदान कोणती प्रॉपर्टी खरेदी करणार होते? कुठल्या भागात? एनी आयडीया? म्हणजे निदान तुम्ही विरोध करण्याआधी त्यांनी काही तरी सांगीतले असेलच ना?”, मोहीते

“नाही.. ती वेळच आली नाही.. दिल्ली म्हणल्यावरच मी विरोध केला असता.. थॉमसने माझं ऐकले असते तर कदाचीत ते आज आमच्यात असते..”, असं म्हणुन स्टेफनीने तळहातांनी आपला चेहरा झाकुन घेतला.

“बरं.. मिस्टर दिपक…”, दिपककडे बघत मोहीते म्हणाले.. “.. थॉमससरांच्या मृत्युची बातमी तुम्हाला कशी कळाली?”

“इंटरनेटवर..”, दिपक
“इंटरनेटवर?? पण बातमी फक्त दिल्लीच्या पेपरमध्ये होती.. बाकीच्या पेपर्समध्ये नव्हती. तुम्ही दिल्लीचे पेपर उघडुन काय बघत होतात?”

“थॉमससर कोणतेतरी मोठ्ठे हॉटेल घेणार होते.. साधारण अश्या व्यवहाराच्या बातम्या पेपर्समध्ये येत असतात म्हणुन उत्सुकतेपोटी मी काही दिवस पेपर्स चाळत होतो तेंव्हा मला ‘ती’ बातमी सापडली..”, दिपकने एव्हाना आपली उत्तरं तयार करुन ठेवली होती.

“मोठ्ठे हॉटेल?? आर यु शुअर?”, मोहीते..
“येस्स व्हेरी मच…”, दिपक

“मी थॉमससरांचे बॅंक अकाऊंट चेक केले आहे.. ज्या वेळी ते दिल्लीला गेले तेंव्हा त्यांचे सेव्हींग्स आणि करंट अकाऊंट मिळुन सुध्दा फार तर फार ८-१० लाख बॅलंन्स होता.. मोठ्ठे डिल करणार असते तर निदान टोकन अमाऊंट मनी तरी नक्कीच काही करोड असणार नाही का? मग ते पैसे कुठुन देणार होते?”
“आय हॅव नो आयडीया.. थॉमससर त्यांचे पैश्याचे व्यवहार आमच्या कुणाशीच डिस्कस करत नसत.. पाहीजे तर तुम्ही हॉटेलच्या इतर स्टाफशी बोलु शकता…”, दिपक

“स्ट्रेंज..मला तर हा सगळा प्रकार बनावटीचा वाटतो..”, मोहीते पुटपुटले..
“व्हॉट डु यु मिन मोहीते.??”, स्टेफनी चिडुन म्हणाली…”आम्ही काय फ्रॉड वाटतो? थॉमससर जेंव्हा मरण पावले तेंव्हा आम्ही इथेच होतो.. तुम्ही कुठेही चौकशी करु शकता.. ती एक अ‍ॅक्सीडेंटची केस होती.. बसचा ड्रायव्हर सध्या दिल्लीच्या तुरुंगात आहे.. पाहीजे तर तुम्ही तिकडे जाऊन चौकशी करु शकता..”

“सॉरी मिसेस स्टेफनी तुम्ही चिडु नका.. अहो आम्ही इंन्शोरंन्स एजंट असतोच असे किचकट.. प्रत्येक क्लेममध्ये आम्हाला फ्रॉडच दिसतो.. अ‍ॅन्ड व्हेन द क्लेम अमाऊंट इज ह्युज.. आम्हाला थोडं सावध रहावंच लागतं ना…”, सारवासारव करत मोहीते म्हणाले.. पण त्याच वेळी त्यांची गिधाडासारखी नजर आळीपाळीने स्टेफनी आणि दिपकच्या चेहर्‍यावरुन फिरत होती.

मोहीत्यांच्या त्या नजरेने दोघांनाही अस्वस्थ होत होतं..

“ऑल राईट मिस्टर केशव मोहीते, इफ़ नथींग एल्स इज रिक्वायर्ड.. आय हॅव टु गो.. मला कामं आहेत..”, स्टेफनी

“शुअर मिसेस स्टेफनी.. सध्या तरी काही नाही… पण मला प्रश्न कधीही आणि केंव्हाही पडतात.. सो आय विल रिक्वेस्ट की मी दोन-चार दिवस इथेच रहातो.. काय आहे मी हेड ऑफीसवरुन आलोय.. सो सारंख सारंख ये-जा करणं.. फार त्रासाचं आहे..”, मोहीते..

“काय?.. इथे???”, स्टेफनी माघारी वळली..
“डोन्ट वरी मिसेस स्टेफनी.. आवर कंपनी विल पे ऑल दी एक्स्पेंन्सेस..”, मोहीते

स्टेफनीने एकवार दिपककडे पाहीले आणि मग ती म्हणाली.. “ऑलराईट.. दिपक तुम्हाला तुमची खोली दाखवेल…” असं म्हणुन स्टेफनी निघुन गेली..

“थॅंक्यु.. बरं मिस्टर दिपक.. मला थॉमससरांचा मोबाईल नंबर, त्यांचे इमेल अकाऊंट आणि हॉटेलचा पत्रव्यवहारांची नोंद ठेवणारे तुमचे इनवर्ड-आऊटवर्ड रजिस्टर हवे आहे.. तेवढं माझ्या रुममध्ये पाठवुन द्या..”, मोहीते
“शुअर.. मी व्यवस्था करतो.. पण हे सगळं कश्यासाठी विचारु शकतो का?”, दिपक
“मला ते हॉटेल ज्याचा व्यवहार करण्यासाठी थॉमस दिल्लीला गेले होते, ते ट्रेस करायचे आहे.. व्यवहार ठरवण्याआधी थॉमससरांचे तेथील व्यवस्थापनाशी नक्कीच कम्युनिकेशन झाले असेल ना.. फोन वरुन म्हणा किंवा इमेल-द्वारे किंवा टपालाने कश्यानेतरी नक्कीच बोलणे झाले असणार.. अचानक असं थोडं ना कोणी व्यवहार करायला जातं.. नाही का?”, चेहर्‍यावर कुत्सीत हास्य आणत मोहीते म्हणाले..

दिपकने मोहीत्यांना रुम दाखवली आणि तो लाऊंजमध्ये येऊन बसला. जितका मुर्ख हा मोहीते दिसतो तितका तो नक्कीच नव्हता. हेड ऑफीसने खास चौकशीसाठी त्याला इकडे पाठवले होते म्हणजे नक्कीच तो हुशार असणार. त्याची ती नजर.. त्याचे ते हास्य जणु सुचवत असते की..‘फक्त काही दिवस.. आणि तुम्हाला तुमच्याच जाळ्यात गुंडाळतो….”

नकळत दिपकच्या मानेवरुन घामाचा एक ओघळ उतरला. सर्वकाही सुरळीत सुरु होत होते.. हा मोहीते कितवर खोलात शिरेल सांगत येत नव्हते.. त्याच्या ह्या तपासात दिपकचे पुर्वायुष्य तर ओढले जाणार नव्हते? दिपक तुरुंगातुन पळालेला एक कैदी आहे हे तर त्या तपासात पुढे येणार नव्हते? दिल्लीला जो मेला तो थॉमस नव्हता हे तर उकरुन येणार नाही ना?.. आणि थॉमसचा खुन इथेच झाला आणि दिपक-स्टेफनीने त्याच्या बॉडीची विल्हेवाट लावली.. वरती इन्शोरंन्स क्लेम केला कळाले तर त्याच्या खुन ह्या दोघांनी मिळुनच केला असाही एक तर्क लावला जाण्याची शक्यताही होती..

कित्तेक सारे प्रश्न.. कित्तेक सार्‍या चिंता.. हा हडकुळ्या केशव मोहीते किती ‘गडे हुए मुडदे’ उकरणार हे येणारा काळच ठरवणार होता.. किंवा कथेचा पुढचा भाग…

वाचत रहा.. पाठलाग…

[क्रमशः]