ऋणानुबंध म्हणजे ऋण अधिक अनुबंध. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे देणे. अनुबंध म्हणजे संबंध. कर्जाचा संबंध म्हणजे ऋणानुबंध.
मी लहान असताना एक गोष्ट ऐकली होती. ती अशी आहे.एक माणूस त्याच्या मित्राच्या घरी आला होता.मित्राकडे एक बैल त्याच्या तेलाचा घाणात खूप वर्षांपासून काम करत होता. आलेल्या माणसाने असे म्हणाला की हा तुझा बैल खूप वर्षांपासून काम करतोना? तेंंव्हा बैलाचा मालक म्हणाला, हो रे , हा बैल खूप वर्षांपासून काम करतो. एवढे बोलण संपली कि एका क्षणात बैल मरून पडला. ह्याचा कारण, मालकाने त्या बैलाचा ऋण फिटल्याची कबुली केली आणि त्यामुळे बैल आणि मालकाच कर्जाची परतफेड झाली. बैल ऋणानुबंधातून मुक्त झाला.
असे आपण आपल्या जीवनात खूप उदाहरण बघतो. पण जास्त विचार करत नाही.
आपण थोडा खोलात जावू.एक बाळ जन्माला येतो. त्या बाळाला आई, वडील खूप प्रेमाने वाढवतात. खूप पैसा खर्च करून त्या बाळाला मोठा तरुण किंवा तरुणी बनवतात, निरपेक्ष बुद्धीने. चांगले शिक्षण द्यायला प्रयत्न करतात. नोकरी मिळवून त्या मुलगा किंवा मुलीला स्वावलंबी बनवतात. मुलगा किंवा मुलीच लग्न केल्या नंतरच आपली जिम्मेदारी संपली असे आपले आई, वडील म्हणतात , हो की नाही?
ह्या प्रोसेस मधे आई, वडीलांच्या मुलांना मागच्या जन्माची देणे असतो.म्हणून त्यांना मुलासाठी खर्च करावा लागतो. मुले मोठे होवुन नौकरीला लागले की त्यांच्या वर होणार खर्च कमी होतो. पण आई, वडिलांच्या ऋण कधीही फिटणार नाही, हे लक्षात ठेवा.
असेच प्रत्येक माणूस, नाते, स्थान, नोकरी, गाव इत्यादी गोष्टींचा ऋणानुबंध असते. हे लक्षात ठेवावे.
असे नौकरी आणि कंपनी या संदर्भातील ऋणानुबंध बद्दल बघूया. माझे B.E. चा शिक्षण पूर्ण झाला. नौकरी शोधायला सुरू केली.६ महीने पर्यंत नौकरी मिळाली नाही. डिसेंबर मधे नौकरी मिळाली, ते मिळाली नाशिक ला.माझे गाव कलबुर्गी सोडून लांब नाशिकला जाव लागले. कलबुर्गी चा ऋण संपली असेल. नाशिक मधे रेग्युलर जॉब मिळाली, सर्विस कायम झाली.२ वर्षात बढती मिळाली. आँफीसर झालो.क्वार्टर मिळाली, डिफेन्स कोट्यातून स्कूटर मिळाली. लग्न झाला. अजून काय पाहिजे? आनंदाने राहयला पाहिजे ना? नाही, H.A.L. नाशिकच्या ऋण संपत आला. कारण काय , जॉब सटिस्फ्याक्शन नव्हता.. दूसरी नौकरीचा प्रयत्न २/३ वर्षापासून चालू होता, पण त्या जागेचा ऋण संपेपर्यंत नौकरी मिळाली नाही. मी एका बाँँक्स नं.ला अर्ज पाठविलो होतो, ती कंपनी निघाली कूपर इंजिनिअरिंग प्राइवेट लिमिटेड, पुणे आणि देवाच्या इच्छेने डिझाईन डिपार्टमेंट मधे नौकरी मिळाली. 3 BHK असलेल्या क्वार्टर सोडून मी, पुणे त आलो.असे जागेची ऋणानुबंध संपला की माणूस ते जागा सोडून दूसरी कडे जावच लागते.
मला पुणेत कायम राहायचं होता पण देवाची इच्छा नव्हती. मला पुणे २ वर्षात च सोडाव लागली. पुणे च ऋण तेवढेच होता.
हे झाले जागेचे ऋणानुबंध.
आत्ता पाहू या कंपन्यांच्या ऋणानुबंध.
HAL मधे माझा मित्र माझ्याशि शर्यत लावली होती की माझ्या नौकरीत बदल होणार नाही कारण मला अनुभव मिळत होत मटेरीयल टेस्टिंग मधे. ह्या अनुभवाला स्कोप नव्हती. पण वेळ आली आणि मला जे पाहिजे ते कामाची नौकरी मिळाली.
असे पुणे त कायम राहायचं विचाराने आलो, सौभाग्यवती समेत.पण पुणेचे देणे म्हणजे ऋण कमी होता असे वाटते.दोन वर्षात च नौकरी सोडावे लागले आणि परत नौकरीचा शोधात राहिलो. तब्बल साडेचार महीन्यानी डोंबिवलीत एका कंपनीत डिझाईन इंजिनिअर म्हणून जॉब मिळाली. डोंबिवली च नाव माहित नव्हता, तरीही जाँब मिळाली. 1977 ला मी आणि सौभाग्यवती 2 मुलासहित डोंबिवलीत राहतो. मुलगा आणि मुलगी दोघेही कँप्यूटर इंजिनिअर झाले. नौकरीला लागले. लग्न झाले. त्यांना मुल आहेत. मी निव्रत्त झालो. नंतर सुध्दा 3 नौकरी केली. ज्या ज्या कंपनीचे ऋण म्हणजे देणे होते तिकडे नौकरी ,६५ वर्षापर्यंत केलो. आत्ता रिटायर्ड जीवन आनंदाने जगत आहे.
सौभाग्यवती ची किंवा माझ्या ऋण परस्पर फिटले की कोणालातरी देवाकडे ,आज ना उद्या जावच लागणार आहे.
अशी आहे माझ्या ऋणानुबंधांंच्या गोष्टी.