“ऑर्डर ऑर्डर…!!”
न्यायमुर्तींनी टेबलावर आपला लाकडी हाथोडा आपटला आणि पुन्हा एकवार न्यायालयात शांतता पसरली.
न्यायालयात केस उभी राहिल्यापासून असलेल्या गर्दीने आज उच्चांक गाठला होता. खर तर निकाल काय लागणार आहे हे स्पष्टच होते, पण तरीही निकाल ऐकायला लोकांनी गर्दी केली होती.
“पब्लीक प्रॉस्येक्युटर.. यु मे कंन्टीन्यु…”… आणि केसच्या शेवटच्या दिवसाचे न्यायालयीन कामकाज सुरु झाले.
आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या दिपकचे मन मात्र अजुनही भूतकाळातच घुटमळत होते.
————————————————————————————————
“जेनी.. वेक अप जेनी… कमऑन जेनी..डोन्ट गिव्ह अप ऑन मी..”, निस्तेज पडलेल्या जेनीला हलवत दिपक जिवाच्या आकांताने ओरडत होता.
पोलिसांच्या दोन जिप सायरन वाजवत घटनास्थळी येऊन थबकल्या. मुंग्याच्या वारुळातुन जश्या मुंग्या बाहेर पडतात तसे पटापट पोलिस इन्स्पेक्टर आणि हवालदार उतरले. दोघं जण धावत जाऊन त्या तरुणापाशी गेले. तो तरुण अगदी मंदपणे हालचाल करत होता. पैकी एका हवालदाराने एक मोठ्ठे कापड काढले आणि त्या तरुणाच्या जखमेला बांधले जेणेकरुन रक्तप्रवाह थांबेल. इन्स्पेक्टर तार स्वरात वॉकी-टॉ्कीवर कुणाशीतरी बोलत होते. काही वेळातच वेगाने एक अॅम्ब्युलन्स आली. त्यातुन दोन वॉर्डबॉय धावतच त्या तरुणापाश आले. त्याला स्ट्रेचरवर घालुन त्याला अॅम्ब्युलन्समध्ये न्हेले. आतमधील डॉक्टर तयारच होते. लगेच त्यांनी त्या तरुणाला ऑक्सीजन मास्क लावला आणि प्रथमोपचार चालु केले.
बाकीचे पोलिस दिपकभोवती जमले. एकाने जेनीचा हात हातात घेउन तिची नाडी तपासली, मग नाकपुड्यांखाली हात धरला आणि मग सावकाशपणे तो उठुन उभा राहीला.
पोलिस इन्स्पेक्टरने भुवया उंचावुन “काय?” अशी खुण केली, तेंव्हा त्याने माने नकारार्थी हलवली.
इन्स्पेक्टरने अॅम्ब्युलन्सकडे पाहुन हातानेच जाण्याची खुण केली. क्षणार्धात अॅम्ब्युलन्स ज्या वेगाने आली होती त्याच्या दुप्पट वेगाने घोंगावत तेथुन निघुन गेली.
पोलिसांनी दिपकला धरुन जिपमध्ये बसवले आणि दुसर्याला अॅम्ब्युलन्स बोलावुन जेनीची ‘बॉडी’ घेउन जायला सांगीतले.. हो बॉडीच.. कारण जेनी जागेवरच गतप्राण झाली होती…
———————————————————————————————————
दिपक हताशपणे पोलिसांसमोर बसला होता.
इस्न्पेक्टर हवालदाराला म्हणाला..”३०२ लागतो साल्याला.. गेलं ते पोरगं हॉस्पीटलमध्ये पोहोचायच्या आधीच..”
“इन्स्पेक्टर.. प्लिज ट्राय टु अन्डरस्टॅन्ड.. माझ्या हातुन प्रतिकार करताना खुन झालेला आहे… माझ्या बचावासाठी प्रयत्न करताना त्याचा मृत्यु झालाय.. आय एम नॉट अ मर्डरर.. आय एम अ लेफ्ट्नन.. तुमच्यासारखाच एक देशाचा सेवक आहे मी…”, दिपक बोलत होता..
“हे बघा मि.दिपक.. आम्ही घटनास्थळी असलेल्या लोकांचे जवाब नोंदवले आहेत.. त्यांच्या म्हणण्यानुसार.. तुम्ही सर्वप्रथम त्यांच्या अंगावर धावुन गेलात.. हल्ला प्रथम तुम्ही केलात…”, इन्स्पेक्टर…
“अहो पण.. ते माझ्याबद्दल.. जेनीबद्दल.. आमच्या… …. आमच्या बाळाबद्दल नको नको ते बोलत होते….”, दिपक
“म्हणुन काय खुन करायचा??”, इन्स्पेक्टर…”इथे जो तो पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलत असतो. म्हणून काय आम्ही प्रत्येकाला मारत सुटतो का काय?”
“मी तो खुन जाणुन बुजुन केलेला नाहीये इन्स्पेक्टर.. तो केवळ एक अपघात होता.. मान्य आहे मी त्यांच्या अंगावर धावुन गेलो होतो.. पण सुरा त्याने काढला होता..”, दिपक..
“अपघात? अपघातात एखादा वार समजू शकतो. पाच-सहा नाही.. मयताच्या शरीरावर भोसकल्याच्या ५-६ खुणा आहेत.”
“………”
“तुम्ही तुमचे म्हणणे न्यायालयात सांगा दिपक..आमचे हात बांधलेले आ्हेत..”, इन्स्पेक्टर
“………………………..”
जेनीच्या आठवणीने, बाळाच्या आठवणीने दिपकचा कंठ दाटुन आला होता. काही क्षण तो कोठडीच्या त्या दमट कोपर्यात पडुन राहीला. आठवणींच्या सरींवर सरी कोसळुन जात होत्या. दिपक कोमेजुन एका कोपर्यात बसुन राहीला.. आज पहील्यांदा तो स्वतःला इतका एकटा समजत होता. त्याची बाजु ऐकुन घेणारे.. त्याला समवुन घेणारे.. त्याला धिर देणारे.. कोणी कोणी सुध्दा नव्हते त्याच्याबरोबर.. अगदी सिंग सर…
“येस्स.. सिंग सर.. हाऊ कॅन आय फरगेट हिम..”, दिपकला स्वतःच्याच मुर्खपणाची लाज वाटली. तो ताडकुन उठुन उभा राहीला.
“इन्स्पेक्टर.. कॅन आय मेक अ कॉल..”, दिपकने विचारले..
इन्स्पेक्टरने एकवार दिपककडे पाहीले आणि मग हवालदारला दरवाजा उघडण्याची खुण केली…
दिपकने भराभर नंबर फिरवला…
“हॅलो.. हॅलो.. सिंग साब… मै दिपक.. दिपक कुमार…”
“बोलो दिपक..”
“सर.. मुझे मदत चाहीये.. मै….”
“हा.. मै जानता हु..”
“आप.. आप जानते है?”
“…”
“फिर..आपने कुछ किया क्यु नही..? सर मै बेकसुर हु..”
“देखो दिपक..बात हदसे आगे बढ गयी है.. फौज को इस हादसे से दुर रखा गया है..”
“क्यु सर..??”
“क्यु?? जानते हो तुम्हारे हाथ से जिसकी मौत हुई है वोह कौन था? गृहसचिवजी का बेटा था वो…”
“……”
“देखो दिपक चाहते तो हम भी है की हम कुछ करे.. लेकीन तुम तो जानते हो.. उपरसे ऑर्डर आये तो हम कुछ नही कर सकते…”
“पर सर…”
फोन केंव्हाच बंद झाला होता..
दिपकने हताशपणे रिसीव्हर खाली ठेवला.
काही क्षण शांततेत गेल्यावर..”इन्स्पेक्टर साहेब.. जेनी…”
“सरकारी इस्पीतळाच्या मॉर्ग्यु मध्ये ठेवले आहे…”
“मला दफनविधी करावा लागेल इन्स्पेक्टर साहेब…”
“हे बघा मि.दिपक.. त्यासाठी तुम्हाला आधी जामीन मिळवावा लागेल, त्याकरता तुमच्या विरोधात न्यायालयात केस उभी रहावी लागेल आणि त्याकरता ढिगभर कागदं आम्हाला जमा करावी लागतील. पंचनामा, साक्षीदारांचे जवाब, डॉक्टरांचे रिपोर्ट्स एक ना दोन. अर्थात साहेबांचे पोर असल्याने ही काम पटापट होतीलच.. पण नाही म्हणलं तरी दोन दिवस तरी तुम्हाला थांबावं लागेल…”
“दोन दिवस??? इन्स्पेक्टर साहेब.. दोन दिवस माझी जेनी त्या बर्फाच्या लादीत पडुन रहाणार.. त्या.. त्या बेवारस…..” दिपकला पुढे बोलायला शब्दच सुचेनात…..
———————————————————————————————————
दिपकने कोर्टात जमलेल्या लोकांवरून एक नजर फिरवली. सर्वच चेहरे अनोळखी, परके होते. ज्यांना आपल म्हणावं ते त्याला केंव्हाच सोडून गेले होते.
“सबुतोंको मद्दे नजर रखते हुए………”
न्यायमुर्तींनी आपला निकालनामा फिल्मी स्टाईलमध्ये वाचायला सुरुवात केली होती..
“दिपक कुमार को दोषी पाया जाता है.. दिपक कुमार जो की अपने दिमाख को गुस्से मै संभाल नही पाते है, ऐसी हालत मै, आर्मी ट्रेन्ड अफसर दिपक कुमार, सिव्हीलीयन्स को एक खतरा बन चुके है. इसीलिये ये अदालत दिपक कुमार को दोषी करार देते हुए उमरकैद की सजा सुनाती है…
बिफोर द स्टेट पोलीस टेक कस्टडी ऑफ मि. दिपक कुमार, आर्मी विल डु द प्रोसिडीन्ग्स ऑफ कोर्ट मार्शल..
द कोर्ट इज अड्जर्न्ड..”
निकाल ऐकल्यानंतर कोर्टात एकच कुजबुज पसरली..प्रत्येकजण आपापसात बोलू लागला..
“मला वाटते बायस्ड निकाल आहे हा…दिपकची बाजू ऐकून घायला हवी होती.”
“बायस्ड पेक्षा, दबावाखाली येऊन दिलेला निकाल आहे.. मंत्र्यांचा मुलगा मेलाय न.. ह्याला असा सहज थोडे न सोडणार..”
“नाहीतर काय.. कसली लोकशाही हि.. त्यापेक्षा कम्युनिस्टांची सत्ता परवडली…”
बहुतेक लोकांची दिपकला सहानभूती होती. पण त्याने फरक काय पडणार होता? निकाल झाला होता.. दिपक कुमार.. आपले उर्वरित आयुष्य तुरुंगात खितपत घालवणार होता…
———————————————————————————————————
कोर्ट-मार्शलचा अनुभव दिपकच्या दृष्टीने अत्यंत वेदानाद्यी होता. लेफ्टनन पदाची शपथ घेताना त्याला कधीही वाटले नव्हते कि अश्याप्रकारे कोर्ट-मार्शलला सामोरे जावे लागेल. अभिमानाने खांद्यावर बाळगलेले वर्दिवरील स्टार गळून पडताना पाहून त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले होते.
ले.दिपक कपूर आता फक्त दिपक कपूर राहिला होता… किंबहुना फक्त कैदी नं. ७२८……………………
पोलीस कोठडीतून दीपकची कारागृहात रवानगी करण्यात आली. कारागृहाच्या त्या कातळ भिंतींमध्ये जायच्या आधी दीपक लहान मुलासारखा पोलीस व्हैनच्या जाळी लावलेल्या खिडकीतून वाकून वाकून बाहेर बघत होता. न जाणो हे बाहेरचे जग परत केंव्हा पहायला मिळेल???
अनपेक्षितपणे दीपकला ज्या लॉक-अप मध्ये ठेवले होते ते इतरांच्या तुलनेत बरेच बरे होते. झोपायला छोटासा का होईना बेड होता, कोपर्यात पिण्याच्या पाण्याचा माठ होता, पांघरून होती. पण त्याचे उत्तर दीपकला दोन दिवसातच मिळाले. कारण कारागृहात आल्यावर त्याची मुलाखत घ्यायला मिडिया प्रतिनिधींची झुंबड उडाली होती. अनेक जण दिपकची बाजू पुन्हा ऐकून घ्यायला जमले होते.
“हमे बताईये दिपक, उस रात क्या हुआ था…”
“……………”
“मि.दिपक, क्या आप बता सकते है की जिस बंदे का आपने कत्ल किया उसने ऐसी कोन्सी बात कही थी…”
“मैने उस्का कत्ल जान बुझके नही किया…वो .. वोह एक हादसा था…”
“दिपक, क्या ये बात सच है की आप आपके गुस्से को कंन्ट्रोल नही कर सकते..क्या येह सच है की इसी बझसे आपके और आपके बिवी के बिचमै कुछ अनबन चल रही थी…”
“……………”
“दिपक, आपको लगता है की आपपे जाय्ती हुई है? आपकी बात सुनी नही गई है??”
“……………”
एक ना दोन.. असंख्य प्रश्न…..
जाताना प्रत्येक जण ह्याविरुद्ध आवाज उठवू, तुला न्याय मिळवून देऊ वगैरे वल्गना करत गेला परंतु सर्व काही आठवड्याभरात शांत झाले. पुन्हा काही दीपकला भेटायला कोणी फिरकले नाही आणि दिपक काय समजायचे ते समजून गेला.
अपेक्षेपेक्षा दिपक लवकर तुरुंगातील वातावरणात रुळला. शेवटी काही झालं तरी तो हाडाचा सैनिक होता. तुरुंगातील वातावरणापेक्षा कितीतरी खडतर वातावरणात रहायचे ट्रेनिंग त्याला मिळाले होते. जेनीच्या आठवणी त्याने मनाच्या कोपर्यात दडपुन टाकल्या होत्या. जेनी आता परत कधीच आपल्याला भेटनार नाहीये हे कटु सत्य त्याने स्विकारले होते.
दिपकच्या बाजुला विवीध प्रकारचे कैदी होते. कोणी खिसेकापु, कोणी जबरी दरोड्यात अडकलेला.. कोण दुचाकी/साखळी चोर, कोण बलात्कारी, कोण हिंसाचारी तर कोणी खुनी…
दिपक कोण होता? ह्यापैकी कोणीच नाही. त्याने पैश्यासाठी, स्वार्थासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी खुन केला नव्हता. जे काही घडलं तो केवळ एक अपघात होता आणि तो इतर कुणाच्याही बाबतीत घडु शकला असता. दिपकच्या हातुन घडला तो गुन्हा.. नक्कीच होता, पण त्यासाठी देण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा मात्र नक्कीच जाचक होती.
तुरुंगातील दिवसाची सुरुवात सकाळी ५.३०लाच होई. सर्व कैद्यांना आंघोळी करुन ७ वाजेपर्यंत मुख्य पटांगणात असणार्या छोट्या देवळासमोर जमणे बंधनकारक असे. ७.३० वाजेपर्यंत प्रार्थना चाले. त्यानंतर व्यायामासाठी वेळ दिला जाई. ९ वाजता नाश्ता असे. तो उरकला की १० वाजता खर्या अर्थाने दिवसाला सुरुवात होई. प्रत्येक कैद्याला त्याच्या अंगी अवगत असलेल्या गुणांनुसार काम देण्यात आले होते. अगदी क्षुल्लक वस्तु बनवण्यापासुन ते सुतारकाम, लोहकाम, किरकोळ इमारतीची डागडुजी वगैरे शारीरीक कष्टाची काम असत.
दुपारी १-२ जेवणाची वेळ उरकली की ४ वाजेपर्यंतचा वेळ हा झोप, अवांतर वाचन, गप्पा वगैरेंसाठी राखुन ठेवलेला असे. ४-६ पुन्हा एकवार नेमुन दिलेली काम. ६.३० ते ७.३० भेटायला आलेल्या व्यक्तींसाठी वेळ, ७.३० वाजता प्रा्र्थना, ९ वाजता जेवण आणि १० वाजता सर्व सामसुम असा ठरलेला कार्यक्रम असायचा.
दिपक फारसा कुणाशी बोलत नसे. ‘आपण बरे आपले काम बरे’ हे एक सुत्र मनाशी पक्क करुनच तो वागत होता.. एक महीना असाच पार पडला.
‘तो’ दिवसही इतर दिवसांसारखाच होता. संध्याकाळी मात्र अचानकपणे दिपकच्या बराकीतील बाकीच्या दोन कैद्यांना दुसर्या बराकीत स्थलांतरीत करण्यात आले. दिपक त्या लॉक-अप मध्ये एकटाच होता. असं नाही की त्याच्या बरोबरच्या इतरांशी त्याची मैत्री जडली होती. पण निदान त्याला कुणाची तरी सोबत होती. आज मात्र तो एकटा होता… दहा वाजुन गेले तसे सर्वत्र सामसुम पसरली. बहुतांश दिवे नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते.
दिपकला आज काही केल्या झोप येत नव्हती. एकटेपणा त्याला खायला उठला होता. जेलच्या त्या काळ्याकुट्ट भिंती भकासपणात अधीकच भर घालत होत्या. दिपक कुस बदलुन बदलुन झोपण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी कशी-बशी १.३० च्या सुमारास त्याचा डोळा लागला.
सर्व काही सुरळीत चालु आहे असे वाटत असतानाच त्या रात्री…………………….
[क्रमशः]