भांडण खूप जणांना आवडत नाही. तरीही प्रत्येक घरात भांडण होतंच असतात , पण आपल्याला दिसत नाही. आज आपण या विषया बद्दल थोड विचार करूया .
भांडणाचा मूळ कारण माझे मते ,
१.अहंपणा
२.अज्ञान
३.राजस आणि तामस वृत्ति अर्थात राग
४. राग आवरण्याची शक्तीची कमतरता
५.स्वभावात मोठेपणाचा अभाव
६. अधिकार किंव्हा सत्तेचा दुरुपयोग
१.अहंपणा
अहं म्हणजे मी . मी जे सांगतो तेच बरॊबर आहे .तुम्ही जे सांगता ते चुकीचा आहे . असे म्हंटले तर वाद सुरु होतो. वाद लवकर मिटलं नाही तर भांडण सुरु झाला असे समजा . तोंडाचा भांडण शारीरिक भांडणात कधी बदललं कळतच नाही . म्हणून शहाण्यांनी वाद करू नयेत .
बरोबर आणि चूक यांचा विश्लेषण करण्यात डोकं वापरायला पाहिजे.मी पणा बाजूला ठेवून आपण बरोबरआहोत असे , पटवून द्यायला हवी .म्हणजे भांडण होणार नाही .
२.अज्ञान
आपण चर्चा करत असलेले विषया बद्दल ज्ञान असायला पाहिजे , तरच चर्चेत भाग घ्यायला हवी . नाहीतर वाद सुरु होऊन भांडणात रूपांतर होईल.
म्हणून जास्तात जास्त ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. काही बायकांना नवऱ्यानी कंप्युटर वर जास्त वेळ घातलेले आवडत नाही . कंप्युटर चा ज्ञान नसल्या मुले तो काय करतो हे समजून येत नाही. या मुळे घरात भांडण , अशांती नांदू लागतात.
३. राजस आणि तामस वृत्ती अर्थात राग
राग म्हणजे क्रोध षड्रिपु मधे एक आहे. काम ,क्रोध ,लोभ ,मोह ,मद ,मत्सर हे माणसाचे ६ शत्रू आहेत. हे आपण जिंकायला प्रयत्न करावे. मनुष्य सहसा तीन प्रकारचे असतात .
१. सात्विक - देवगुण
२. राजस - देवगुण आणि राक्षस गुणांचे मिश्रण ---- जास्त प्रमाणात असतात
३. तामस - राक्षस गुण
राग कमी कमी करत गेला तर सात्विकता वाढेल आणि भांडण होणार नाही.
४. राग आवरण्याची शक्तीची कमतरता
ही शक्ती दैवी देणगी असते , तरीही आपण प्रयत्न करून वाढवू शकतो . ह्या साठी ध्यान करणे , नाम घेणे वापरू शकतो . चिडचिड करणे ,रागावणे , ओरडणे , भांडण करून मारामारी करणे . हे सगळ्यांची त्याग करावे .
५.स्वभावात मोठेपणाचा अभाव
स्वभाव चांगलं असायला पाहिजे . मोठेपणा घेवून लोकांना माफ करावी . म्हणजे भांडण होणार नाही .
श्री शंकराचार्या ना , स्नान करून येताना एका माणसांनी १०० वेळा थुंकला . तरीही एका शब्दांनी न बोलता जात होते. तो माणूसच कंटाळून त्यांचा पाया पडून माफी मागितला.
६. अधिकार किंव्हा सत्तेचा दुरुपयोग
अधिकार किंव्हा सत्ता आली कि माणसाला मद म्हणजे गर्व येतो , तो वाटेल तसा वागायला सुरु करतो. अशा वागणुकी मुळे भांडण सुरु होतात . हे त्याज्य करावे. प्रत्येक माणसाला त्याचा स्वाभिमान असतो. ते न दुखवता अधिकार वापरावे.म्हणजे भांडण होणार नाही .
भांडण का टाळावे ?
भांडण सुरु झालकी जो ओरडत असतो त्याचा ब्लूडप्रेशर वाढतो , हे चांगल नवे. हार्ट अटॅक होऊ शकतो आणि माणूस मारू शकतो.
पॅरालीसीस होऊन आयुष्य भर रडत बसावे लागतो. राज्या साठी कौरव युद्ध करून मेले.
आजकालचे युगात सासू-सून यांचा भांडणात घर २ होतात. नवरा बायकोचा भांडणात डिव्होर्स होतात किंव्हा मुलांना त्रास होतो. भावन्डात वितुष्ट निर्माण होतो.
देश देशात भांडण झाले तर युद्ध होऊन खूप जनहानी,धनहानी आपण पाहिलेले आहे.
भांडणामुळे प्रेमाचा अंत होतो,शांती भंग पावते. माणसाचे जन्म भांडणासाठी झाले नसून देव समजणासाठी झाला आहे, हे समजून प्रत्येक माणसांनी जगले तर रामराज्य निर्माण होईल.
म्हणून आपल्याला सत्संग,सद्विचार ,सत्यबोलणे,सात्विक स्वभावांची फार फार गरज आहे. हे सगळे सद्गुरू कडूनच मिळेल.