दारा वर अजून एकदा थाप पडली....प्रतापराव नोकरकडे पाहत बोलले.......तो आला असेल....जा दार उघड....
नोकराने दरवाजा उघडला....समोर एक रेनकोट घातलेला व्यक्ति होता....त्याने त्याची छत्री बंद केली....आणि आत आला....त्याला पाहून सर्व गावकरी पुन्हा हात जोडून उठून उभे राहिले......
प्रतापराव बोलले....’’या या मंगेश राव या.....’’
मंगेश.....त्या साइटचा चीफ इंजींनियर होता......
त्याने एक कटाक्ष त्या गावकर्यां वर टाकला.......त्याचा नजरेत राग होता....त्याला न सांगता गावकरी सरल प्रतापरावांना भेटायला आले......ते त्याला आवडलं नव्हतं......
‘’अहो काही तक्रारी आहेत....तुमचा माणसांची.....’’ प्रतापराव हसत हसत मंगेशला बोलले.....
‘’क...कसल्या तक्रारी...??? मंगेश अडखळत बोलला....
‘’बोला आता.....पहिल्या पासून सांगा काय झाल ते...” प्रतापराव गावकर्यांंकडे पाहत बोलले....
क्षणभर सर्वत्र शांतता पसरली......तेवढ्यात खाड......असा आवाज आला....सर्वजण दचकले....वार्यााने खिडकी उघडली गेली होती.....नोकराने लगेच उठून ती बंद केली...
लाइट नसल्याने कंदील लावला होता....आणि त्या कंदिलचा प्रकाशात प्रतापराव सर्वांकडे पाहत होते.....
तेवढ्यात कोपर्यादत बसलेला एक मजूर उठला......धोतर आणि सदरा घातला होता त्याने....निम्मा चेहरा पटक्याने झाकला होता....हात जोडून उभा राहिला आणि बोलू लागला......
‘’काल सकाळी आम्ही सर्वजण कामाला लागलो….पाया खोदणीच काम चालू होत....काहीजण मोठ मोठे झाड कुर्हामडीने तोडून काढत होती तर काहीजण खोदकाम करत होती.....नार्याच माझा पासून काही अंतरावर काम करत होता.....तो खोर्याकने खड्ड्यात साचलेली माती काढत होता.......जवळ जवळ ५ फुटचा खड्डा झाला होता.....दिवस आता मावळत चालला होता....सर्वजण घरी निघून गेले होते.....मी पण माझ काम आवरलं आणि नार्यााला आवाज दिला.......’’ए नार्याह घरी यायचं नाही का…?? का मुक्काम करणार आहेस...???
तो तसाच काम चालू ठेवत बोलला...”अरे धूला....झालच समज ..फक्त एवढी माती काढून घेऊ दे.....”
मग मी पण तिथेच त्याचा जवळ जाऊन बसलो आणि तंबाखू काढून मळू लागलो.....
नार्याप खोर्या ने जमिनीवर वार करत होता......सूर्य मावळत चालला होता.....तेवढ्यात अचानक आवाज आला.....
टन......
मी दचकून खडयात पहिलं....नार्यावने माझाकडे पहिलं......त्याने पुन्हा वार केला.......पुन्हा तसाच आवाज आला......जणूकाही एखाद्या धातुवर मार बसावं......मग मी पण खडयात उतरलो.....आणि दोघांनी मिळून सर्व माती बाजूला केली......तर आम्ही पहिलं की तिथे एक चमकणारी वस्तु होती......हंडा......सोन्याचा हंडा.......
धुलाच बोलणं सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते.......
धूला पुढे सांगू लागला.....
मग आमचा चेहर्या वर आनंद पसरला....म्हटलं आता खजिना सापडलाय तर आमची गरीबी दूर होणार.....मग आम्ही तो हंडा बाजूला घेतला.....त्या पूर्ण हंड्यावर ओम ही अक्षर कोरली होती.....
हे ऐकताच प्रतापराव जागेवर उभे राहिले....त्यांचे डोळे विस्फारले गेले....चेहर्याोवर भलतीच चिंता पसरली गेली.....आणि बोलले.....”मग.....मग काय झाल...???
धूला सांगू लागला........
मग आम्ही त्या हंड्याच झाकण काढलं......मग अचानक त्यातून एक भयंकर जीव...चीत्कार करत बाहेर पडला.....सगळीकडे विजा कडाडू लागल्या.......त्याचा चीत्कार इतका भयानक होता की क्षणभर वाटलं कानाचे पडदे फाटतील......हंड्यातून बाहेर पडताना त्याचा पंखाचा वार माझा चेहर्यानवर झाला.....आणि हे बघा माझा चेहर्या ची अवस्था......
अस बोलत त्याने त्याचा अर्धवट झाकलेला चेहरा दाखवला......त्याचा चेहरा पाहून मंगेश आणि प्रतापरावांनी गच्च डोळे मिटून घेतले.......खूप भयानक घाव झाला होता त्याचा चेहर्यायवर.....जणूकाही चेहर्या वर उकळत तेल ओतल होत.....
धूला पुढे बोलला........नंतर बेशुद्ध पडलो.....शुद्धीवर आलो तेंव्हा सकाळ झाली होती...आणि आजूबाजूला हे सर्वजण होते......नार्या. कुठे गायब झाला...??? कोणालाच कल्पना नाही......मला तर वाटतय त्या हंड्यातून ती दुष्ट आत्मा मुक्त झालीय......आणि कदाचित तिने.......कदाचित तिने नार्या्चा बळी घेतलाय......
हे सांगताना त्याचा अंगाचा थरकाप उडत होता.......
मंगेश उठला आणि बोलला...”अरे मूर्खा.....सोन्याचा हंडा घेऊन पळून गेला असेल तो.......उगीच काहीपन बडबड करू नकोस.....”
धूला बोलला...”साहेब विश्वास ठेवा माझावर....मी पाहिलय ते जनावर....जे हंड्यातून बाहेर पडलं होत....आता जर का तिथे काम केल तर आमच मरण निश्चित आहे...”
प्रतापराव उठले.....धुलाचा नजरेला नजर भिडवून बोलले.....”आणि जर तू काम नाही केल तरी सुद्धा तुझ मरण निश्चित आहे....आणि तुझा सोबत तुझा परिवाराचा पण.... सर्वाकडे पाहत ते बोलले...”.काय होईल तुमचा बायका पोरांच.....उपाशी मरून जातील जर तुम्ही लोकांनी काम नाही केल तर.....मी दिलेल्या पैशावर तुमची चूल पेटते...आणि आज तुम्ही मला वर तोंड करून काम करणार नाही म्हणून सांगताय....???
सर्वांनी खाली माना घातल्या.....हातावरच पोट होत सर्वांच.....काम केल्या शिवाय पर्याय नव्हता.....
‘’तुम्हाला एवढीच भीती वाटत असेल तर मी आता साइट वर जाऊन दाखवतो....तिथे विशेष अस काहीच नाही....फक्त जंगल आहे एवढच...” दिलासा देत मंगेश बोलला.....
त्याच हे बोलन ऐकून धूला घाबरला आणि विनवणी करू लागला.....”साहेब अस करू नका....ती आत्मा तुम्हाला नाही जीवंत परत येऊ देणार....”
मंगेश हसत हसत बोलला....”मग तर मी नक्कीच जाणार....निघा तुम्ही सगळे....सकाळी भेटू साइट वर....तिथेच असेन मी...”
सर्व मजूर निघून गेले.......
मंगेश तिथेच खुर्चीवर बसून होता......आणि समोर प्रतापराव.....दोघेही विचारात गढून गेले होते......
जीव घेणी शांतता पसरली.....मग ती शांतता मोडत प्रतापराव बोलले....
‘’नार्याा अस पळून जाईल वाटलं नव्हतं....” आणि त्यांनी हुक्क्यातून धूर सोडला......
मंगेश ने त्यांचाकडे पहिलं आणि बोलला....”पळून नाही गेला तो......सापडला...”
हे ऐकून ठसका लागला त्यांना आणि खोकत खोकत बोलले....”सापडला...?? आता तूच तर बोलला पळून गेला असेल म्हणून...”
मंगेश गंभीर नजरेने पाहत बोलला..”मजूर होते समोर....खर सांगितलं असत तर काम बंद पडलं असत...”
प्रतापराव बोलले...”कसलं खर,कुठे सापडला तो...??
मंगेश सांगू लागला.....
आज सकाळी मी साइट वर उभा राहून पाहणी करत होता....इतक्यात मन्या जो माझा असिस्टंट आहे.....तो पळत आला....आणि मला सांगितलं.....नार्या. सापडला म्हणून.....पण तो जीवंत नाही.......मेलाय.....खूप भयानक मरण आलय त्याला.......
मंगेश बोलला...,”चल मला आत्ताचा आत्ता दाखव त्याच प्रेत....”
मण्या बोलला.....”साहेब तुम्ही नाही पाहू शकणार त्याला.....”
मंगेश बोलला...”मला पाहायचं आहे चल दाखव....”
दोघे त्या जंगलातून वाट काढत चालू लागले.....सकाळची वेळ असल्याने सगळीकडे धुके जमा झाले होते....वातावरण एकदम थंड होत.....
चालता चालता मण्या एका जागी थांबला.....
आणि त्याने समोर बोट दाखवलं......
मंगेशला आधी तर धुक्यामुले काहीच दिसलं नाही......नंतर मात्र धुक्यातून त्याला काही दिसू लागलं....
समोर च दृश्य अतिशय भयंकर होत.....जे सामान्य माणसासाठी खूप भयंकर होत.....समोरचा झाडावर लटकत असलेल नार्या च प्रेत......आणि त्याचा शरीरातून खाली पडणार थेंब थेंब रक्त......पण याचा पेक्षा वाईट होती ती त्या प्रेताची अवस्था...
डोळे नव्हतेच.....फक्त होल दिसत होते....आणि त्यातून निघलेल रक्त गालावरून शरीरावर पाजरत होत....त्याच पोट पूर्ण फाडल होत......पण पोटातील आतडया तिथे नव्हत्या...जणूकाही कोणीतरी अगदी अलगदपणे काढून टाकलय....झाडाचा टोकदार फांदीवर ते प्रेत अडकवून टाकलं होत.......
मंगेश हे सर्व पाहून हादरलाच होता......”हे सर्व क...कस काय...एखाद्या जंगली जनावराने हल्ला केलाय त्याचावर कदाचित......”
मण्या गंभीर आवाजात बोलला....”जनावर हल्ला करेल....पण अस फांदीवर लटकून नाही ठेवणार...”
डोक्याला दोन्ही हात लावून मंगेश खाली बसला.....
त्याचा खांद्यावर पडलेल्या हातमुळे तो भानावर आला....मागे प्रतापराव उभे होते.....”काय केल त्या प्रेताच...??
“मी आणि मण्याने मिळून पुरून टाकलं ते तिथेच......”मंगेश एक मोठा श्वास घेत बोलला.....
“बर केलास...” प्रतापराव काहीसं खुश होवून बोलले.....आणि पुन्हा चिंतित स्वरात बोलले....”तो हंडा सापडला का...??
मंगेश तर हंड्याबद्दल विसरलाच होता.....तो बोलला...”नाही....म्हणजे मी शोधलाच नाही.....नार्यापच प्रेत पाहून दुसर काही सुचलच नाही....”
प्रतापराव उठले....आणि बोलले....”हंडा शोधा...मंगेश राव.....नाहीतर......
बोलता बोलता त्यांचा आवाज जास्तच चिंताग्रस्त झाला.......
“मी आज जातोय तिथे.....त्या साईट वर....आता.......” मंगेश कसल्या तरी निर्धाराने बोलला.....
प्रतापराव बोलले.....”अरे पण काय गरज आहे...??
“गरज आहे साहेब...मला पण पाहायचं आहे कोणती आत्मा आहे तिथे...” मंगेश ने जाण पक्क केल होत....
प्रतापरावांनी पण त्याला अडवण्याचा प्रयत्न नाही केला....”काही गरज लागली तर फोन कर...”
एवढं बोलून ते जिना चढून निघून गेले.....
मग मंगेश निघाला.....त्या जंगलाकडे.......कदाचित मृत्युकडे..........
क्रमश: