without love is like begger in Marathi Love Stories by Adisha Verma books and stories PDF | प्रेमाविना भिखारी

Featured Books
Categories
Share

प्रेमाविना भिखारी

खुप वर्षा आधीची ही गोष्ट मी दहावी मध्ये होते. मला पुस्तके वाचण्याचा खूप  खूप छंद होता. मला दहावी बोर्डामध्ये टॉप करायचं होतं. एके दिवशी मी जेव्हा शाळेच्या ग्रंथालयांमध्ये गेले त्यावेळी वर्गातला एक मुलगा आला आणि मला विचारला ,  तुला कोणती पुस्तके जास्त वाचायला आवडतात. मी सहजपणे उत्तर दिले मला प्रेम कथा वाचायला जास्त आवडतात पण त्या उत्तराने तो मुलगा आश्चर्यचकित होऊन मला म्हणला तुला पाहून वाटत नाही ही ही तू प्रेम कथा वाचत असशील. मी विचारले, का ? तो म्हणाला तू सतत वाचनामध्ये  गुंग असते, मला वाटतं होतं कि बोर्डाचा अभ्यास करत असशील. शेवटी टॉपर तुम्ही. मी हसत हसत म्हणाली तुझा पण दुसरा दुसरा क्रमांक असतो क्लासमध्ये मग काय तू फक्त अभ्यास करत असतो का? तो म्हणाला नाही. काय माहिती पण त्यावेळेस त्याला बोलताना खूप छान वाटलं नंतर आम्ही अभ्यासाच्या गोष्टी करायला लागलो. कुठली पुस्तके वाचायची,बोर्डासाठी काय पाहिजे? अभ्यास  मिळून करायला लागलो .असेच काही आमची मैत्री घट्ट होत गेली. एके दिवशी आम्ही फिरायला गेलो, आमचा पूर्ण वर्ग, शेवटच्या वर्षी म्हणून सर्वजण सोबत गेलो. खूप मजा करत गेलो. एका गार्डनमध्ये बसल्या वेळेस अचानकच तो मला म्हणाला, तुला प्रेमावर किती विश्वास आहे.त्यावेळेस माझे उत्तर होतं, प्रेमामध्ये खुप शक्ती आहे. विचारला ,तू कोणावरती प्रेम केले का? मी म्हणले ,नाही तो परत विचारला, कधी प्रेम करावं वाटलं नाही का, मी म्हणली कोणाबद्दल कधी तसा विचारच केला नाही. मी परत विचारली तू कोणावरती प्रेम केले का? तो म्हणाला, हो .मी विचारले तुझ्या मनात कोणती मुलगी आहे का तो म्हणाला हो .मी परत विचारली, तुझ्या प्रेमावर किती विश्वास आहे? तो म्हणाला की  खूप जास्त. माणसाकडे तर प्रेम असेल तर त्याच्या एवढी संपत्ती कोणाकडे नाहीये. “प्रेमा विना भिकारी असतो माणूस” .माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे मला. ऐकून छान वाटलं, पण माहिती नाही का विचारावंसं वाटलं की, ती मुलगी कोण आहे? त्याला मी विचारले कोण आहे बरं ती मुलगी तुझ्या मनात .तो हसला आणि म्हणाला, वेळ आल्यानंतर सगळं काही सांगतो. माहिती नाही का पण मला खूप वाईट वाटू लागलं. त्याला परत, परत,परत ,परत तोच प्रश्न विचारू लागली, की सांग मला , ती मुलगी कोण आहे?. तो म्हणाला अगं मी सगळं काही सांगतो तुला पण वेळ होते. आम्ही घरी परतलो, घरी आल्यानंतर मला माहिती नाही का पण वाईट वाटू लागलं, मी तोच विचार करत होते की ती मुलगी कोण असेल, तिच्यावर तो इतका प्रेम करतो. नंतर दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये , त्याला तोच प्रश्न विचारला, की तू मला त्या मुलीचे नाव का नाही सांगतोस. तो मला म्हणाला,सगळ्यात आधी तर मी ‘तुलाच’ सांगेल. मी विचारले, त्या मुलीला माहितीए का की , तिच्यावर इतका प्रेम करतो. तो म्हणाला, नाही . मी परत विचारले, त्या मुलीला कधी सांगणार आहेस. तो हसला आणि म्हणाला वेळ आल्यावर .मी म्हणले, मी तुझी हेल्प करते पण तू आधी मला त्या मुली चे नाव सांग .तो परत हसला आणि म्हणाला वेळ आल्यानंतर आधी मी तुला सांगेल .मी खुश झाले ,पहिल्यांदा तो मला सांगणार आहे पण मनामध्ये थोडसं वाईट वाटत होतं, कि ती मुलगी कोण आहे .परत त्याच्या मागे गेले आणि त्याला विचारलं किती प्रेम करतो त्या मुलीला . तो म्हणाला, माझ्या जिवापेक्षा पण जास्त. मी म्हणलं पुढे, सांग तरी मला, ती मुलगी कशी आहे. तो म्हणाला ठीक आहे मी सांगतो ती मुलगी कशी आहे, जीने माझ्या मनामध्ये घर केले आहे आणि तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जेव्हा मी त्या मुली ,डोळ्यांमध्ये पाहतो त्या वेळेस मला एक वेगळाच अभिमान दिसतो. त्या मुलीचे जमात केस पाहतो यामध्ये गुंग होऊन जातो.तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आकर्षित पणा आहे .तिच्या चेहर्यावरती एक प्रकारचा तेज आहे. जेव्हा तिच्या चेहऱ्याकडे मी पाहतो, एक तेज मला दिसून येतं.तिच्या डोळ्यांमध्ये तो अभिमान पाहून कधीकधी विचारात पडतो की परमेश्वराने त्या मुलीला खूप विचार करून बनवला आहे .पहिल्यांदा जेव्हा तिला मी पाहिलं त्यावेळेस मला असं काही वाटलं नाही, कि ती  मुलगी माझ्या मनामध्ये घर करेल. माझ्या हृदयाचे ठोके तिच्यासाठी धकरतील, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझे डोळे फक्त तिचाच विचार करतील. कधी वाटलं नव्हतं मला, एक दिवस जर ती मला दिसली नाही तर दिवसभर मी चिंतेत असतो, की ती कुठे आहे ,कशी आहे. मी पहिल्यांदा तिला पाहिलं होतं तेव्हा मला असं काही जाणवलं नाही की ती माझ्यासाठी आहे .माफ कर, खरंतर ती माझ्यासाठी आहे का नाही मला हे नाही माहिती, पण मी तिच्यासाठी आयुष्यभर असेल. मी विचारले तू इतका प्रेम करतो, तर तिला का नाही सांगतोस. तो म्हणाला, तिला सांगण्याची ही वेळ नाही ,जेव्हा तिलाही माझ्यावरती प्रेम होईल, त्यावेळेस तिला आपोआप कळेल. मी म्हणाले, तिला तुझ्यावरती प्रेमच नाही झालं तर ; तो म्हणाला ,वेळ आल्यानंतर मी माझ्या मनातल्या गोष्टी तिला सगळ्या सांगेल .तिच्यापासून काही लपून नाही ठेवणार. तिचं हो असेल तर माझा आयुष्य मी तिच्यासाठी देईल, तिथं नाही जरी असेल तरी मी माझा आयुष्य तिच्यासाठी येईल. मी म्हणाले इतका तर तू प्रेम करत असशील आणि तिने जर तुला नाकारत , तू सहन करू शकशील का? तो म्हणाला ,मी तिच्यावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की तिनेही माझ्यावरती प्रेम करायलाच हवं. तो तिचा प्रश्न आहे तिला पूर्ण अधिकार आहे ,ती तिच्या आयुष्यात तिच्या मनाने निर्णय घेऊ शकते ती जोपर्यंत म्हणत तोपर्यंत मी तिच्यासाठी वाट पाहिल ,ज्या दिवशी तिने पूर्णपणे नकार  दिला तर एक मित्र म्हणून आयुष्यभर तिची साथ देईल आणि जर तिने माझी मैत्री ही स्वीकारली नाही, माझ्या मैत्रिला ही नकार दिला आणि इथून पुढे मला भेटू नको , या आयुष्यात मी तिच्यासमोर कधी येणार नाही तिच्या खुशीसाठी मी काहिही करेल .मी म्हणाले इतका तू, तिच्या खुशीचा विचार करतोयस, तुझ्या खुषीचा काय रे तो म्हणाला, मी तिच्यावर प्रेम केले आहे आणि आयुष्यभर करत राहील आणि तिच्या खुशीसाठी काही करायला तयार आहे. तिने जेव्हा मला पूर्णपणे नकार देईल आणि तिचं हे वाक्य असेल आयुष्यात माझ्या समोर येऊ नको त्या वेळेस तिची माझी ती शेवटची भेट असेल. आणि नंतर मी तिच्या आयुष्यात कधीच येणार नाही. पण प्रेम मात्र मी फक्त तिच्यावरच करेल .शाळेची घंटी वाजली आणि आम्ही वर्गामध्ये गेलो .माझ्या मनामध्ये तेच विचार चालू होते .इतकं प्रेम कोण कसं करू शकतो, खरंच प्रेमामध्ये एवढी शक्ती आहे का ,त्याचे बोलणे ऐकून मी थोड्या वेळासाठी विचारांमध्येच अडकून राहिली. नंतर वाटल, ती मुलगी किती नशिब्वान आहे कि तीला इतका प्रेम करणारा कोणीतरी आहे……To be continue..