Shikshan - 2 in Marathi Human Science by Harshad Molishree books and stories PDF | शिक्षण... भाग २

Featured Books
Categories
Share

शिक्षण... भाग २

आता पर्यंत... 
आता पर्यंत या कथे च्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कसं कुणाल १० वीच्या परीक्षा नंतर कमला लागतो, कुणाल ला शिकण्या ची आवड असूनही फक्त पैसे नसल्या मुले त्याला शिकायला मिळत नाही तेच त्याचा घरची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही, पण कुणाल कामावर लागून स्वतः कमवून शिक्षणा साठी एक पाऊल पुढे घेतो....
आता पुढे...
कुणाल दिलेल्या वेळेवर बरोबर कामावर पोचला, आज त्याच्या पहिला दिवस होता... कुणाल ला काहीच काम माहीत नव्हतं, त्याला तिथलं काहीच समजत नव्हतं.... कुणाल बस एका कोपऱ्यात बसून होता, लोक येतात काही लोक enquiry करतात, काही लोक बस टिकत घेऊन जात आहेत, पण कुणाल ला यातलं काहीच कळत नव्हतं... तो शांत पणे बस एका जागेवर बसून होता...
असं करत दिवस निघून गेला... आणि संध्याकाळी ऑफिस च्या मालकाने कुणाल ला हाक मारली... 
"कुणाल आत ये जरा"...
कुणाल ला भीती वाटायला लागली, आता काय करू, मानातल्यामनात तो विचार करत होता....
"हां सर"...
"काय करतोय"....
"काय नाही सर बसलोय"...
"एक काम कर पुढच्या क्रॉससिंगच्या समोर एक पानवाला आहे तिथून एक पान घेऊन ये, पान म्हणजे काय माहीत आहे ना, ते घेऊन ये"...
"हो सर माहीत आहे"...
"कुठला पान आणशील"....
"कुठला आणू सर"...
"कलकत्ता मीनाक्षी सादा.... पान बोलायचं, समजलं'
"हो सर समजलं आणतो"...
"जा बाहेरून काउंटर वरून पैसे घे आणि पान घेऊन ये"....
कुणाल बाहेर आला आणि बाहेर काउंटर वर एक मॅडम बसले होते.... त्यांच्या कडून कुणाल ने पैसे घेतले आणि पान आणायला गेला...
कुणाल मनातल्या मनात बोलत होता....
"भेंडी मला काय इथं पान आण्यासाठी ठेवलं आहे... कुणाल ला राग येत होतं, पण त्यांनी स्वतः ला समजवलं.... कुणाल गप यार कुठलंच काम छोटं नसतं शांत हो, कुणाल स्वतःला शांत करत बोलला"...
थोड्या वेळ नंतर कुणाल पान घेऊन ऑफिस मध्ये परत आला... आणि आत जाऊन त्यांनी सरांना पान दिलं, आणि मग परत बाहेर त्याच्या जागेवर येऊन बसला....
दिवस असाच निघून गेला.... कुणाल ने दिवसभरात काहीच काम केलं नाही, आणि बघता बघता ९ वाजले कुणाल ला घरी जायचं होतं वेळ पण झाला होता सुटायचा, कुणाल ने आत जाऊन सरांना विचारलं आणि मग तो ऑफिस वरून घरी जाण्यासाठी निघाला....
कुणाल च्या मनात बस एक विचार होता की कधी एक महिना संपणार आणि त्याला पगार मिळणार असं विचार करत करत तो घरी पोचला.... 
घरी आई आणि बाबा त्याची वाट पाहूनच बसले होते जेवण्यासाठी... कुणाल लगेच हाथ पाय धुवून जेवायला बसला आणि जेवून आरामात झोपला....
कुणाल सकाळी उशिरा उठला, पण वेळेवर कामावर पोचला, नेमकं आज त्याला काल सारखं दिवसभर बसायला नाही मिळालं, कामावरची एक मॅडम नाव त्यांचं "हेतल"... कुणाल ला सगळं काम शिकवत होते, कुणाल त्याना ताई म्हणून हाक मारायचा...
हेतल मॅडम ने कुणाल ला कामाबद्दल सगळं काही समजावलं... तशीच संध्याकाळ झाली, कुणाल ला काल सारखंच सर ने पान आणायला पाठवलं, व जसाच कुणाल परत आला, त्याला अंकल सोबत पाठवलं.... 
अंकल उर्फ सिंधी काका, नाव त्यांचं तसं प्रकाश, ऑफिस मध्ये सगळे त्यानां अंकल म्हणूनच ओळखायचे...
कुणाल अंकल सोबत बसनाक्यावर पोचला जिथून सगळ्या खाजगी बस सुटायच्या, अंकल ने कुणाल ला सगळं काम समजवल...
बघ ही बस आपली आहे कोल्हापूर ला जाणारी, या बस मध्ये बुकिंग प्रमाणे प्रवासींना पिक अप पॉईंट वरून तिकीट नीट बघून त्यांच्या जागेवर बसवायचं आणि तसं करत बस आपल्या ऑफिस परंत आणायची, मग किती प्रवासी आहे सगळे बस मध्ये बसले की नाही, त्यांच्या सामान वगैरे सगळं नीट बघून मग ऑफिस मधून त्याना बस ड्राइवर ला पास देऊन बस पुढे सोडायची....
कुणाल ने सगळं नीट ऐकून घेतलं, मनात तशी त्याला भीती वाटत होती, पण तरी मनाला खंबीर करून तो बस मध्ये शिरला आणि त्यांनी कामाला शुरवात केली...
कुणाल अगदी कमी दिवसात सगळं काम शिकला, व त्याच्या प्रेमळ स्वभावा मुळे त्याचं सगळ्यांसोबत पटायचं, कुणाल चे दिवस चांगले जात होते...
दिवस असेच जाताना कुणालचं काम बघून सरांने कोल्हापूरच्या बस चं सगळं लेन देन त्याच्या हातात सोपलं, कुणाल रोज आता संध्याकाळी ७ वाजले की बस नाक्यावर जाऊन.... बस च्या दरवाजा वर थांबून जोरात हाक मारायचा....
"चला कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर "..... 
                                                                        ★

आज १ तारिक, म्हणजेच पगाराचा दिवस कुणाल खूप खुश होता, की महिना भर जी महिनात आपण केली शेवटी त्याच्या फळ आज आपल्याला मिळणार....
कुणाल रोज च्या प्रमाणे कोल्हापूर च्या त्याच्या बसला सोडून, व त्याच्या आखा हिशोब करून ऑफिस मध्ये आला, अगदी त्याच्या घरी जायच्या वेळेवर सरांनी त्याला आत मध्ये बोलवलं...
कुणाल ला पटकन समजलं की सरांनी त्याला पगार देण्यासाठी बोलवलं आहे... पैसे हातात येताच कुणाल खूप खुश झाला, स्वतःच्या महिनतीचे पैसे... कुणाल सारखा पैसे मोजत होता, कुणाल ने ठरवलं की आई आणि बाबांन साठी काय तरी घ्यावं.... 
कुणाल ने त्याच्या आई बाबा साठी कपडे घेतले आणि अगदी हसरा चेहरा घेऊन तो घरी पोचला...
घरी पोचताच सगळ्यात आधी त्याने आई बाबा ला बसवलं... आणि त्यांच्या साठी आणलेले कपडे त्यांना दिले, कुणाल चे आई बाबा खूप खुश झाले पण... तेव्हाच बाबा म्हणाले
"हे काय कशाला हे सगळं फालटूचा खरचं, आधी स्वतः साठी आणायचे ना कपडे"....
"बाबा आयुष्यभर तुम्ही स्वतः चं विचार न करता माझा विचार केला... आणि त्याच्या समोर हे काहीच नाहीये, तुमच्या मुलाकडून ही फक्त छोटीसी भेट आहे"...
"गप बसा ओ तुम्ही माझ्या बाळा ने एव्हड्या प्रेमाने आणलंय आणि तुम्ही ना.... राहुद्या तुम्ही शांत बसा"...
कुणाल ची आई खूप खुश होती इतकी की त्यांचा आनंद अगदी गगनात मावे ना....

                                                                                                    ★

आज निकाल चा दिवस होता, कुणाल जस तस सायबर मध्ये ऑनलाइन results बघण्या साठी आला, कुणाल चे हाथ पाय थंड पडले होते...
"सीट नंबर सांग तुझा".... सायबर वाला
"हो सांगतो"... कुणाल ने त्याचा सीट नो सांगितलं आणि मग थोड्याच वेळात त्या सायबर वाल्याने कुणाल च्या हातात result ची print दिली...
कुणाल काहीच बोलला नाही, आणि पैसे देऊन बाहेर निघून आला, थोडं पुढे चालत आल्यानंतर कुणाल ने हळूच result बघितलं....
"पास"..... कुणाल जोरात ओरडला 
कुणाल खुशी ने उद्या मारत घरी पोचला, आणि त्याला आनंदात बघून आई त्याहून जास्त खुश झाली...
सगळे कुणाल चा कौतुक करत होते...
दुसऱ्या दिवशी कुणाल पेढ्याचा डब्बा घेऊन कामावर पोचला आणि सगळ्यांना पेढे वाटले व सगळ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या...
कुणाल दुसऱ्या दिवसापासून कॉलेज ऍडमिशन च्या मागे लागला... एक कॉलेज मध्ये जाऊन admmission फॉर्म पण घेऊन आला, पण तोच दिवस त्याच्या जीवनाचा व्हाइट दिवस ठरला...
कुणाल संध्याकाळ च्या  वेळी ऑफिस च्या बाहेर थांबला होता, तितक्यात त्याचे सर आले, सरांना पाहून कुणाल खुश झाला पण मनातल्या मनात त्याला भीती ही वाटत होती...
सर जशेच केबिन मध्ये जाऊन बसले.. कुणाल आत त्यांच्या पाटी पाटी देवा ला हाथ जोडत गेला
"सर येऊ का मी"...
"हा ये ना"...
"सर थोडं बोलायचं होतं"...
"हां बोलना, काय बोलायचं आहे"...
"सर मी १० उत्तीर्ण झालोय आणि आता कॉलेज मध्ये मला admission घ्याचा आहे"...
"अरे वाह चांगला आहे, तुला पुढे शिकायचं आहे तर... very good"
"हो सर पण सर मला थोडी मदत हवी होती, ऍडमिशन साठी थोडी पैशाची मदत कराल का सर"...
"पैसे... किती पाहिजेत तुला पैसे"
"सर एक १०,०००"....
"बरं देतो मी पण तू मला फेडशील कसं"...
"सर थोडे थोडे करून देईन मी"...
"थोडे म्हणजे किती थोडे थोडे, बरं मला सांग आता तू admission घेशील मग तुझा कॉलेज चालू होईल, मग तू कामावर कसा येशील आणि जर तू कामावर नाही आलास तर तू पैसे कशे परत करशील मला"...
"सर मी देईन थोडे थोडे करून"...
"हो रे बाबा ते कळलं मला पण, किती थोडे आणि कसं... मला ते सांग आधी आणि मग पैसे घेऊन जा"...
कुणाल एक क्षणा साठी शांत झाला, काहीच बोलला नाही, विचार करून मग हळूच बोलला...
"ठीक आहे सर"...
कुणाल त्या नंतर नुसतं विचारात होता, त्याचं लक्ष कुठेच लागत नव्हतं... काम संपलं कुणाल घरी जाण्यासाठी निघाला.. कुणाल हळू हळू चालत घरी पोचला आणि कोणासोबत न बोलता तसच जाऊन झोपला...
सकाळी कुणाल लवकर उठला आणि त्यानी बाबांना सगळं सांगितलं... 
"बाळा काळजी करू नको बघतो मी काही तरी"...
"बाबा मला कॉलेज ला जायचं आहे, शिकायचं आहे... बघा काय तरी
हो बाळा"...
कुणाल चे बाबा कामावर निघून गेले... कुणाल ही कामावर निघून गेला
महिन्याभर ची धावपड नंतर शेवटी काहीच हाती लागलं नाही पैस्यांच झालं नाही...
त्या दिवशी कुणाल कॉलेज च्या बाहेर हातात त्याच्या फॉर्म घेऊन थांबला होता, अचानक पाऊस पडायला लागला आणि पावसाच्या पाण्याने हातातला फॉर्म भिजला आणि कुणाल ने तो फॉर्म तितच टाकून दिलं आणि रडत रडत तिथून निघाला....
"पावसात भिजताना हातातून शिक्षण सुटला...
तर भिजलेला डोळ्यातून शिकण्याची आस"...
.................................................. To Be Continued .................................................................