लग्न...ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट..
मुळात मला लग्न हे माझ्या आवडीच्या मुलासोबत करायचं होत पण आई बाबा !! ह्यांच पण ऐकायचं होत
एक दिवस बाबा संध्याकाळी लवकर घरी आले येताच मला बोलले स्मिता आई कुठे आहे??
"अहो बाबा ती शेजारच्या मालिनी काकू कडे गेलिये काय झालं मला सांगा एवढी घाई का??
बाबा बोलले माझं काम आहे महत्वाचं तिच्याकडे .
तेवढ्यात आई आली
"काय हो काय झालं आणि आज लवकर कसे आलात??बर नाही का काय झालं सांगा ना ??
"अग हो हो तू जरा शांत होतेस मला पण बोलू दे
"बोला काय झालं "बाबा आईला आतील खोलीत घेऊन गेले
"अग मी स्मिता साठी एक स्थळ पाहिलंय मुलगा चांगला आहे स्वतःचा बंगला आहे एका मोठ्या कंपनी मध्ये मोठ्या पोस्ट वर आहे पगार पण ७०,००० हजार आहे.. तर ते लोक उद्या येणार आहेत बघायला
"अहो पण इतकी घाई कशाला आधी स्मिताला विचारुया तरी तिला काय वाटते ते ??
" तिला काय विचाराचे ती काय कळत तिला जो मुलगा दाखवू त्या सोबत ती करेल की लग्न !!
"ठीक आहे पण मी तिला पूर्व कल्पना देऊन ठेवते उगाच गडबड नको..
आई आणि बाबा बाहेर आले
"अग स्मिता ऐकतेस का जरा स्वयंपाक घरात येऊन एवढी भाजी काप बर अस बोलून आईने मला स्वयंपाक घरात बोलवले
"स्मिता ऐक मी काय बोलते ते तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक स्थळ पाहिले आहे ते उद्या येणार आहे"
मी अचानक दचकले"आई उद्या??लगेच मला विचारायचं ना एकदा ??
"त्यात विचारायचं काय असं तुझे बाबा बोलले आणि ऐक उद्या कॉलेज नको जाऊस ते लोक केव्हाही येतील घरीच थांब" मला पण काही पर्याय नव्हता कारण बाबांपुढे बोलण्याची हिम्मत नव्हती
सकाळी १२ च्या सुमारास ते लोक आले सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला मी तसा चेहरा पाडलाच होता पण बाबांपुढे कोण बोलणार !!!
तसा मुलगा मला मुळीच आवडला नाही पण नाईलाज होता ना...
त्यांना मी पसंद पडले आणि मला मुलगा मुळीच नाही पण माझ्या पसंदीच कोणाला पडलंय इथे!
बाबांनी लवकर लग्नाची तारीख ठरवली मी ह्या सर्व प्रोसेस मध्ये फक्त एक बाहुली होते जे घडतंय ते बघायच असेल तस स्वीकारायचं बसस..
ह्या कालावधीत तो मुलगा म्हणजे सुधीर आमच्या घरी आला तस तो मी स्मिताला थोड बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो का असा प्रश्न बाबांना केला ??
" अहो पण अजून लग्न झालेले नाही आहे लोक काय बोलतील?
सुधीर बोलला "अहो बाबा आम्हाला लग्नाआधी थोड एकमेकांना जाणून घायला हवं असे काहीस बोलून बाबांना समजवले व परवानगी मिळवली...
मग आम्ही दोघे बाहेर पडलो
"सुधीर अग स्मिता तुला movie आवडते का ??
मी बोलले जास्त नाही बघत केव्हा तरी
"अग ऐक ना आपण जाऊया का movie ला ??
हे ऐकताच मी त्याच्याकडे एकटक बघत होते अचानक movie का बोलला का बाहेर बागेत ही जाऊ शकत होतो
असे प्रश्न मला आले पण मी पण ठीक आहे बोलून movie ला गेले
कदाचित आम्ही जर movie ला गेलो नसतो तर मला खरा सुधीर कधीच कळला नसता..
movie बघता असताना त्याने मला विचारलं
"स्मिता तुला मी आवडतो का ??
मी नाही बोलणार होते पण फायदा काहीच नव्हता तस ही मी त्याला accept केलं होत "
मी त्याला बोलली हो आवडता तुम्ही"
तो अलगद हसला..पुढे हळूच त्याने त्याचा हाथ माझ्या गळ्यात टाकला मी शांत पुढे बघत movie बघत होते काय करावं हे मला कळत नव्हत..
हळू हळू तो जवळ येऊ लागला आणि ही गोष्ट मला अजिबात आवडत नव्हती त्याने त्याच्या हाताने माझ्या चेहरा त्याच्याकडे फिरवला मी विचार केला हा असा काय वागतोय बघता बघता त्याने मला अचानक kiss केला माझी कोणतीही पर्व न करता मला काय वाटतं ह्याचा विचार न करता त्याने अस केलं हे होताच माझा पारा चढला आणि मी न विचार करता त्याच्या मुस्काटात मारली व रडत थिएटर च्या बाहेर येऊन थेट घर गाठले...
क्रमशः