वातावरणात संचारलेला गारवाच एवढा तीव्र होता की तिला आज अंथरुणाच्या
बाहेर पडावं वाटतं नव्हतं ...
दिनू ला कॉल करू का ? नाही नको शाळा सुटायची असेल त्याची . वर्गावर असणार तो तर
उगाच खोळंबा होईल त्याला आपल्यामुळे म्हणून ती डायरी आणि पेन घेऊन काहीतरी मनातला
साचलेला गाळ कोऱ्या पानावर उतरवत होती .....
दिनू हा काव्याचा खूप जवळचा मित्र जवळचा म्हणण्यापेक्षा अगदी हृदयालगतचा
तिच्या जीवनात काहीही बरं वाईट घडलं तर त्याची पहिली न चुकता खबर जायची दिनूला .
काव्याची आणि दिनूची मैत्री म्हणजे अल्लड अवघड आणि खट्याळ बॉंडिंग .....
कवितेत प्रथम क्रमांक आलेल्या लिस्ट मध्ये सर्वात उंचावर त्याचंच नाव होतं . सर्टिफिकेटला
फोटो पाहिजे आहे तुमचा म्हणहून हिने त्याला इंफॉर्म केलं आणि बस्स त्याच दिवसापासून
दोघात मैत्री झाली .... उन्हाळ्याचे दिवस होते ते . दिनू काव्याला खूप स्ट्रेस मध्ये असल्याचं
जाणवलं आणि तिने त्याला विचारणा केली ....
" दिनू अरे तुला झालं तरी काय ? "
दिनू तिला आधी नाही नाही म्हणतच सर्व सांगायचं टाळत होता .... पण तिला वाटायचं हा खूप
मोठ्या संकटात आहे किंवा माझ्यापासून काहीतरी लपवतो आहे .
तिने त्याला गळ घातली काय झालं तुला सांगावच लागेल म्हणून .....
तेव्हा दिनूने तिला सांगितले , " माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे ग ती पण माझ्यावर खूप
प्रेम करते पण आमच्या प्रेमाला तिच्या घरून विरोध आहे कारण जीविका माझ्या मामाची मुलगी
आहे . तिला न भेटून चार महिने झाले तिच्या मैत्रिणीकडून समजलं की ती एका शॉप मध्ये
काम करते आहे मी आज तिथे गेलो ही वणवण रस्ते भटकलो खूप वेळ तिची
वाट बघितली पण ती दिसलीच नाही ...."
काव्या त्याला समजवत होती ते तुझे मामाचं आहेत न तर मामाला समजव तू
पण तो म्हणायचा मामा काही एक ऐकून घ्यायला तयार नाहीये ..... जीविका जवळ फोन असूनही
ती दिनूला कॉल करत नव्हती . आणि दिनू तिला सतत् कॉल वर कॉल करून ती रिस्पॉन्स देईल
म्हणून वाट बघत राहायचा . दिनू चा वाढदिवस येऊन गेला तरी साधं त्याला शुभेच्छा द्यायलाही
तिने त्याला कॉल केला नव्हता ....
दिनू आठ आठ दिवस उपाशी राहायला लागला होता आपलं दुःख कुणाला न सांगता
तो काव्या जवळ मन मोकळं करायचा आणि काव्यालाही वाटायचं की असा काहीतरी
चमत्कार होवो आणि माझ्या मित्राला त्याच प्रेम मिळो .... अस खरचं होणार होत का ??
की काव्या उगाच त्याच्यासाठी साकडे घालत होती ... जीविका आताही दीनुवरच प्रेम
करायची ना ! दीनुवर ती प्रेम करायची तर मग तिच्या जवळ फोन असून ती दिनूचा कॉल तरी
रिसिव्ह का करायची नाही ?? खूप गुंतागुंतीच हॊत हे सर्व ......
काव्या जवळ व्यक्त होऊन दिनू आपलं दुःख तर मोकळं करायचा ... सहा महिने झालेत जीविका चा
कॉल त्याला आला नाही ... रात्री अपरात्री दिनू वेड्या सारखा जीविकाच्या आठवणीत
रस्त्याने पावसात फिरायचा स्वतःला पावसात चिंब भिजवायचा पण हा त्रास किती दिवस
करून घेणार होता तो .... मुंबईला एका शाळे मध्ये तो जॉईन झाला . पण तिथेही रूमवर
तो तिच्याच आठवणीत जगायचा शाळेत मुलासोबत शिकवण्यात जेवढा वेळ जायचा तेवढाच तो
तिच्या आठवणीपासून दूर राहायचा ..
ह्या काळात एक जिवलग मैत्रीण म्हणून त्याला काव्या सोबत होती .... पण हळूहळू दिनूच
मन काव्यात रमायला लागलं ..... आणि काव्या तिच्या मनात मैत्रिपलीकडे दिनू बद्दल
कधीच काही नव्हते ..... पण दिनू तिला म्हणायचा आपली मैत्री म्हणजे प्रेमाच्या अलीकडे आणि
मैत्रीच्या पलीकडे आहे .....
.........