प्रेम हि एक निर्मळ भावना आहे. जसं प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तशाच त्या प्रेमालाही आहेत. हि काळीबाजू अनेकांच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून जाते. आणि एकदा का आपण तिचे नखरे सहन केले, तर अक्षरशः थैमान घालते. प्रसंगी आयुष्य उधवस्त होते. आपण कसे धीराने तोंड देतो, यावर उभे आयुष्य अवलंबून असते. ज्यावेळी असे क्षण आयुष्यात येतात, तेव्हा डोकं शांत ठेऊनच वागावं लागत, अन्यथा नुकसानच अधिक संभवत.
रवीच आयुष्य अनेक चित्रविचित्र प्रसंगी , घटनांनी, भरून गेलेलं आहे. वयवर्षे ३० झालं आणि सगळ्यांनी रवीची वधुशोध मोहीम सुरु केली. बहिणींची लग्न झाल्यानंतर त्याच लग्न करावं, असं ठरलं होत, पण सोनंच (शेंडेफळ) लग्न होईपर्यत वय उलटून गेले असत. मग संसार, मुलबाळ, त्यांचं शिक्षण या सर्वांचं गणित बिघडलं असत, असं 'सो कॉल्ड' अनुभवी नातेवाईकांचं मत पडलं.
जेव्हा मुलाचं लग्न ठरत तेव्हा त्याच घर आणि परिवार पहिला जातो. कारण आपली मुलगी दुसऱ्याची घरी कशी राहील. तिला सासुरवास तर होणार नाहीना याची काळजी घेतली जाते. याच कारणाने पाहिलं वधूपरीक्षण पहिल्या फेरीतच फेल झालं. रवीच्या मातोश्री थोड्या कडक स्वभावाच्या असल्याचे चौकशीअंती कळले. त्यामुळे वधुवर परस्पर पसंती असून देखील 'बात आगे बाधी नाही'.
दुसरी मुलगी त्याच्या मामाच्या सासुरवाडीकडून सांगून आली. परंतु ती कमी शिकलेली असल्याने रवीने नापसंत केली. जे देवाजिच्यामना तिथे कोणाचे चालेना. रवीच्यापण बाबतीत हा नियम लागू पडत होता.
आपल्या लहान मावसबहिणीच्या लग्नात रवीने पूजाला पहिले. आणि त्याने मामाला सांगितले. आणि काही आश्वासनांची लग्न ठरलं. आपण नापसंत केलेली मुलगी हीच होती, हे रवीला मागावून कळलं. लग्न सर्वसाधारण मध्यमवर्गीय ताम्झ्याममध्ये झालं.
पूजाला लग्न कारण पसंत नव्हतं. नवरा नावाचा प्राणी किती विचित्र असतो हे तिच्या मैत्रिणीने चांगलच डोक्यात भरवलं होत. सुरवातीला काही महिने समजण्या-उमजण्यात जातात.नंतर संसार सुरळीत होतो असं म्हणतात. नंतर सर्व व्यवस्थित होते, असं म्हणतात. परंतु रवीच्या काही विपरीत घडणार होत.
रवीच पूजावर प्रेम होत, पूजाच नव्हतं. सुरवातीच्या काही महिनांमध्येच छोटेमोठे झगडे होऊ लागले.
त्याच पर्यावसन घर सोडण्यामध्ये झालं.
तो शनिवार होता. आपल्या काही कपड्यानिशी रवी पूजासह घराबाहेर पडला. पूजाच्या प्रेमासाठी, तिचा वेगळं राहण्याचा पुरवावा लागणार होता. हाच हट्ट त्याच्या आयुष्याची विल्लेवाट लावायला पुरेसा होता. डोकं गुढग्यात घालून बसण्यापेक्षा, रोज रोजच्या भांडण्यापेक्ष्या घर सोडलेलं बरं. आजारी वडिलांना कणखर आणि खंबीर आईच्या भरवाशी ठेऊन त्यानं हा निर्णय घेतला. त्यांच्या आजारपणात रवीची जास्त गरज होती. हि गोष्ट ईश्वरालाही पटली नसणार.
दोन मुलांच्या संसारात आणि असंतुष्ट बायकोच्या प्रेमात रवीच चाललं होत. संसार बहरला, असं म्हणणं रवीच्या बाबतीत गैरलागू होत. भाडोत्री खोलीत संसार चालला. ७-८ वर्ष अशीच निघून गेली.
मी तर म्हणेन रवीच प्रेम आंधळं होत. एकतर्फी होत. त्याने आपल्यापरीने खूप सांभाळून घेतलं. पूजाच्या अपेक्षा मात्र अधिक होत्या. संसाराची दोन्ही चाक 'एक साथ' चालली तरच संसार सुरळीत चालतो. कोणीच परिपूर्ण नसतो. संसार करताना बऱ्याच गोष्टींची तडजोड करावी लागते.घर सांभाळताना पूजाची साथ पूर्णपणे मिळाली नाही. रवीच मानसिक संतुलन बिघडू लागलं. अशावेळी मनुष्य व्यसनाधीन होतो. रवी नाही झाला व्यसनाधीन. त्याच्या संस्कारानी त्याला धैर्यवान बनवलं होत. त्याचा या वागण्याला लोक भोळसट आणि साधं समजत होत. रवी खरंच साधा नव्हता आणि नाही.
रवीने पसंतीने लग्न केलं होत. पत्रिका बघितली नव्हती.पण खरंच त्याच्या (किंवा कोणाचाही) संसारात लग्न-पत्रिका जुळवणं एवढं महत्वाचं असत ? आज जेव्हा कोणतेही प्रसंग उभे राहतात, तेव्हा खोचकपणे या गोष्टीवर बोट ठेवलं जात. वेळीच पुजाने नकार द्यायला नको होता का ? आज मात्र रवीवर सगळ्या बाबतीत बोट ठेवल जात. हे कितपत योग्य आहे का ? तुम्हीच ठरवा.