Harvalya Premachya katha - 10 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -10)

Featured Books
Categories
Share

हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग -10)








रस्ता अरुंद होता ..... वाटेत त्याच्या आता रोझा आली होती .... उंचीच्या शिखरावर पोहचलेला फेनिक्स आता

डगमगणारं होता का ?

भूतकाळाच्या घटनांचा आढावा घेतं ... रोझाकडे पाठ फिरवणार होता !

तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता त्याचं रात्रीची ती घटना ....

त्या भयाण डोंगराच्या माथ्याशी फेनिक्स एकटाच वाईन च्या नशेत तल्लीन झाला होता ...

वयचं काय होतं त्याचं अवघ्या पंधरा वर्षयाचा .... तारुण्याच्या पहिल्या पाहिरीवर चरण पडतांच

त्याचे हार्मोन उसळू लागले .... भावना सुसाट झाल्या .... हा पंधरा वर्षयाचा फेनिक्स सेक्स बद्दल

काहीच जाणलेला नव्हता ... स्त्री पुरुष सम्बंध होतातही ह्याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती ....

आणि ते जाणून घेण्याची त्याला उत्सुकता ही नव्हती .... दारूची बाटली एवढ्या कमी वयात त्याच्या

हाती लागली ह्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या गर्भश्रीमंत फेनिक्सकडे सर्व काही असून तो त्याच्या

मॉमला गमावलेला होता .... स्त्री प्रेमाने व्याकुळ झालेला फेनिक्स दुःख विसरण्यासाठी त्या डोंगरावर

येऊन मद्य प्राशन करायचा ...

रोझा तेव्हा तेरा वर्षाची होती ... आपल्या घराचा रस्ता विसरून ती त्या रात्री एकटीच भटकत होती त्या

डोंगरावर काळोखात तिला काही उजेडाचा नजराना लोचनास भेदत होता ... कोणी आपली मदत करेल

ह्याचं खुळ्या आशेने तिची पाऊले त्या नागमोडी वळणावर स्थिरावली .... प्रत्यक्षात डोंगर चढून जातांना

तिला हुरूप लागली होती मागे वळून ती उंचवट्यावरून घराचा रस्ता कोणत्या दिशेला असेल म्हणून

बघायची आणि समोर चालायची ...

फेनिक्सला तिच्या पाऊलांवरून ती येतं असण्याची चाहूल झाली ... ती त्याच्या समोर येताच

त्याने मद्याची बाटली आपल्या मागे लपवली ...

" मी घराचा रस्ता विसरली आहे .... मला मदत हवी आहे . "

थरथरत्या रोझाच्या ओठातून शब्द बाहेर पडले ... पण , फेनिक्स तो मद्याच्या नशेत चूर झाला होता

त्या वेळेला तो भान हरपून रोझाच्या सौन्दर्याला न्याहाळत होता ... ती काय सांगती आहे ह्याकडे ही

त्याचे भान नव्हते .... मद्याच्या नशेत तिचे निळेशार डोळे त्याला गहन समुद्राच्या किनाऱ्या सारखे काठोकाठ

भरलेलं वाटतं होते ... तिचे ओठ जणू त्याला गुलाबाच्या पाकळ्या सारखे वगळता त्याला चुंबुन रसपान करून

तृप्त व्हावे वाटतं होते ... तिच्या नाजूक चेहऱ्यावर शृंगाराचा गाभारा ओसरत त्याला अलिप्त करू पाहत होता

तिच्या बाहू पाशात बंधिस्त व्हायला मद्याची बाटली डोंगरावरून फेकत तो समोर तिच्या दिशेने सरसावला ...

मानाने नाजूक स्त्री जातीचा सन्मान करणारा आताच फेनिक्स ... तेव्हाचा नरपशू होऊन तिच्यावर झडप घालता झाला ...

आपल्या दोन्ही हाताने तिला घट्ट पकडून घेतले होते ... त्याच्या बंधिवासातून रोझा निसटून जाऊ शकली नाही ...

काय होतं आहे आपल्या सोबत तिला कळू नाही लागलं पण त्याच्या तावडीतून ती सुटायला त्याला गयावया करतं होती ...

फेनिक्सने जबरदस्तीने तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले ... सलग अर्धातास तो तिच्या नाजूक ओठाचे लचके तोडत राहिला ...

त्याचा पुरुषी देह त्याला आता सुस्त बसू नव्हता देतं ... तो पुढचं पाऊल उचलतं तिला ओरबाडू लागला , त्याच्या हातून एक नाजूक

कळी कुचकरल्या जातं होती ... आपली मर्दानगी एकटवत तो जिंकला ... रोझा स्वतःला वाचवता वाचवता त्याच्या नजरेत घायाळ

पाखरू होऊन विव्हळत होती ...

तिला एकटीला टाकून फेनिक्स तिथून निघून गेला ... त्या रात्री जिवाच्या आकांताने रोझा वाचली खरी पण , जगण्यातून कायमची

वजा झाली ....



त्या रात्री नंतर फेनिक्स सतत आठ दिवस तिचा पाठलाग करत राहिला ....

शरीर उपभोगण्यासाठी ..... तो सुखावला होता तरस्त होता तिच्यासाठी ....

त्या मद्याच्या नशेत तल्लीन झालेला फेनिक्स ती रात्र आठवू पाहत होता ....

तो आपल्या मेंदूला त्या रात्रीच्या घटनेत गुंतवत होता ... तिचा आक्रोश

त्याच्या कर्णाला आरपार भेदत होता ... तिचं ओरडणं त्याला कळवळून घेतं होतं ...

त्या तिच्या घायाळ देहाला आठवून कोणी चाबकाचा मार आपल्याला मारत आहे

असं वाटतं होतं ...

काय केलं आपण हे ??

एका स्त्री देहाला उपभोगून तिचं सर्वस्व गमावून घेतलं ... त्याला वाटलं ती आपल्या हाताने

ठार झाली पण नाही ,

ती जीवित होती की ठार झाली ह्याच्याशी आता फेनिक्सचा काहीच सम्बंध नव्हता ...

त्या दिवशी दारावर थाप ऐकू येत होती .... फेनिक्स त्याने केलेलं कृत्य हातात

वर्तमानपत्र घेऊन वाचतच होता ... कोण असावं तो निडर होऊन दरवाजा उघडायला गेला

तर समोर पोलीस ... त्याला अटक करायला आले होते .

आपल्या एकुलत्या एक मुलाने असं कृत्य करावं एका वडिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारी किती लाजिरवाणी

बाब होती ती ... पण , फेनिक्स त्याने तर केलेल्या गुन्ह्याची कबुली करतं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले ...

पण गुन्हेगाराला त्याच्यातल्या नाबालिक वयाला ओळखत बंधिवासातून मुक्त केले ... 

फेनिक्स जैलातून बाहेर पडलाच तो एक

द मॅन

ऑफ डेस्टिनी म्हणून .... 

त्याची पाऊले सत्याची वाट धरत होती ... त्याच्यातला नरपशु एकाच रातोरात नष्ट होऊन ... तो मेहनतीला 

अंगीकारत दिवसरात्र एक करत कष्ट करू लागला .... कोण जाणे त्याच्यातल्या दुर्दम्यइच्छाशक्तीला ?? 

आपण केलेला गुन्हा नुसताच गुन्हा नसून त्या गुन्ह्याने आपण एका जीवाला ठेच पोहचवली नाही 

ठेचच पोहचवली नाही तर जगणं छिनून घेतलं तिचं .. 

कशी जगतं असेल ती ह्याच विचारात त्याला कितीतरी रात्रीने झोपू दिलं नाही ... 

त्याने तेव्हाच मनाशी खूणगाठ बांधली तिला मी दिलेल्या जखमा भरून तर नाही काढू शकत पण 

माझं उर्वरित आयुष्य सर्वसामान्याच्या सेवेसाठी व्हायचं ... 

आणि त्यानंतर त्याने जे मनाशी ठाणल तेच केलं ... त्यातून बाहेर पडायला फेनिक्सला कधी वेळ मिळालाच नाही ... 

त्या घटनेनंतर फेनिक्सने कोणत्या स्त्रीलाही स्पर्श्य केला नाही ... हा त्याच्यातला खरा खुरा नियतीने 

घडवलेला फेनिक्स होता ... ज्याला जग ओळखू लागलं त्याला दिशा देणाऱ्या बलात्कारी घटनेतून ..