ISHQ - 15 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | इश्क – (भाग १५)

Featured Books
Categories
Share

इश्क – (भाग १५)

“गुड मॉर्निंग रोहन..”, ऑफीस मध्ये आल्यावर कबिर म्हणाला..

रोहनने मात्र काही उत्तरच दिले नाही, संगणकावर तो काम करण्यात मग्न होता.

“रोहनss… गुड मॉर्नींग…”, कबिर पुन्हा एकदा म्हणाला..
“गुड मॉर्निंग…”, रोहन

“का रे? असा उदास का? काय झालं?”, कबिर
“काही नाही असंच..”
“तब्येत बरी आहे ना?”
“हम्म…”
“बरं.. आपल्या पुस्तकाच्या सेल्सचा रिजनल रिपोर्ट घेउन जरा केबिनमध्ये येतोस का?.. बघु अजुन कुठे कमी सेल्स असेल तर तेथे प्रमोट कसं करता येईल…”, कबिर
“मी मेल करतो फाईल..”, रोहन

कबिरने जरावेळ रोहनकडे रोखुन कडे बघीतले आणि मग तो ठिक आहे म्हणुन केबिन मध्ये निघुन गेला.

रोहनचे काय बिनसले होते कुणास ठाऊक, पण त्याला मुळपदावर यायला दोन दिवस लागले. काहीतरी फॅमीली प्रॉब्लेम असेल म्हणुन कबिरनेही त्याला नंतर फारसे छेडले नाही.

एके दिवशी कबिर नुकताच ऑफीसमध्ये आला होता तोच त्याचा फोन वाजला. राधाचा फोन बघताच त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला.

“हायsss.. प्लिजंट सप्राईज..”, कबिर
“हाय..! काय करतोएस?”, राधा
“नथिंग, अ‍ॅज युजवल.. जस्ट आलोय ऑफिसला.. तु बोल..”

“अम्म.. दोन दिवस फ्रि आहेस का?”
“दोन दिवस???”
“हम्म.. म्हणजे काही महत्वाचं काम असेल तर राहु देत.. पण जनरल.. आज आणि उद्या?”
“तसं महत्वाचं काही नाहीए, बोल काय काम आहे?”
“मला गोकर्णला जायचंय.. ऑफीशीअल आयडेंटीफिकेशनसाठी.. म्हणजे ज्यांनी त्या दिवशी मला…अं…. त्यांची ओळख पटवायची आहे.. तस्ं तेथे तासाभराचच काम आहे.. पण इट्स लॉंग जर्नी.. ड्रायव्हर आहे.. पण एकट्याने जायचा कंटाळा आलाय.. तु फ्रि असशील आणि बरोबर यायची इच्छा असेल तर…”
“व्हाय नॉट.. तेवढाच बदल होईल मला पण.. आणि तुझी कंपनी असेल तर…”
“प्लिज.. उगाच फ्लर्ट करु नकोस..”
“नाही खरंच.. मी येतो बरोबर.. कधी जायचं आहे?”
“तासाभरात? तु सांग कुठे पिक-अप करु.. आत्ता निघालो तर संध्याकाळी ४ पर्यंत पोहोचु तेथे. मग तेथलं काम संपलं की लेट्स हेड टु गोवा.. सोफी ऑन्टीकडे आजची रात्र राहु.. तेव्हढीच भेट पण होईल त्यांची.. उद्या दुपारी जेवणं करुन निघु.. संध्याकाळ पर्यंत परत…”
“फॅंन्टास्टीक.. येतो मी, एक काम कर, घरापाशीच ये.. मी पट्कन हॅन्डबॅंग भरुन ठेवतो…”
“ओके देन, सी-यु अ‍ॅट १०?”
“१० इज फ़ाईन..”
“बाय..”
“बाय..”

फोन ठेवल्यावर कबिरला काय करु आणि काय नको असं झालं होतं. अख्खे दोन दिवस त्याला राधाची सोबत मिळणार होती. त्याने पट्कन लॅपटॉप बंद केला, रोहनला दोन दिवसाचा प्लॅन सांगीतला आणि बॅग भरायला तो घरी पळाला..


साधारणपणे १०.२०ला राधाचा कबिरला फोन आला की ती खाली गाडीमध्ये त्याची वाट बघतेय.
कबिरने त्याची हॅन्डबॅग उचलली आणि तो खाली उतरला. दारासमोरच एक काळ्या रंगाची ‘सी-क्लास मर्सिडीज’ उभी होती. काचा काळ्या रंगाच्या फिल्मने झाकलेल्या असल्याने आतमधले काही दिसत नव्हते. कबिरने मागची डिक्की उघडली, आपली बॅग आतमध्ये टाकली आणि मागचे दार उघडुन तो आतमध्ये शिरला.

मागच्या सिटवर राधा बसली होती. काळ्या रंगाचा सॅटिनचा लो-नेक शर्ट, काळ्या रंगाची फॉर्मल पॅंन्ट, वर क्रिम-कलरचा ओव्हरकोट, हाय-हिल शुज, डोळ्यावर मोठ्या काचांचा गॉगल आणि शेजारी लेपर्ड-स्किनची महागडी पर्स. तिच्या प्रत्येक गोष्टींतुन श्रीमंती ओसंडुन वाहात होती.

कबिर तिच्या शेजारी बसताच एक मंद पर्फ्युमचा सुगंध त्याच्या नाकात शिरला.

“तु पोलिस-स्टेशनला चालली आहेस का सेलेब-पार्टीला?”, कबिरने न राहवुन विचारले
“ऑफकोर्स पोलिस-स्टेशनला.. पण तेथे इंप्रेशन नको का पडायला? दे शुड नो हु आय एम! मी कोणी चिप रस्त्यावरची स्लट नाहीए हे कळालं पाहीजे त्यांना. ही राधा आणि ती राधा वेगळी आहे…”
“ओके ओके.. पण निदान तो गॉगल तरी काढ.. मला फार ऑकवर्ड होतेय…”

हसत राधाने गॉगल काढुन ठेवला..

“आय मीन.. अजुन तरी मी अनुरागचीच बायको आहे ना बाहेरच्यांसाठी…”, ड्रायव्हरला ऐकु जाणार नाही अश्या हळु आवाजात ती म्हणाली..

“राधा.. आपण माझ्या गाडीतुन जाऊयात का? मला चालवायला काही प्रॉब्लेम नाही.. फोर्ड-इको-स्पोर्ट आहे माझी..”, कबिर
“का? काय झालं? मर्सिडीज आवडत नाही का?”
“नाही, तसं नाही.. पण आपल्याला असं सारखंच हळु आवाजात बोलावं लागणार असेल तर अवघड आहे..” हळु आवाजात ड्रायव्हरकडे बोट दाखवत कबिर म्हणाला…
“हम्म खरं आहे.. पण मग तु मर्सच चालव ना, येईल नं चालवता.. फोर्डमध्ये माझे हे कपडे जरा….”
“ठिके ठिके.. लै कौतुक तुझ.. चालवीन मी मर्सिडीज…”

ड्रायव्हरला तसंही राधाबरोबर येण्यात काहीच उत्साह नव्हताच. पडत्या फळाची आज्ञा मानुन तो लगेच गाडीची किल्ली तिच्या हाती सोपवुन निघुन गेला.

राधा आणि कबिर पुढच्या सिटवर येऊन बसले.

“शुड वुई?”, कबिरने गाडी सुरु करत विचारलं.
“येस प्लिज…”, राधाने ए/सी चालु केला आणि सिट मागे सरकवुन रिलॅक्स होत म्हणाली..

कबिरने गाडीचा एस्कीलेटर दोन-तिनदा दाबुन फायरिंगचा आनंद घेतला आणि मग गाडी गेअरमध्ये टाकुन गोकर्णकडे प्रस्थान केले…


शहर मागे टाकुन गाडी एक्स्प्रेस-वे वरुन वार्‍याच्या वेगाने पळत होती.
१००-१२०-१४०-१६०

“सुप्पर ए यार, म्हणजे आधी बसलो होतो मर्सीडीजमध्ये पण चालवण्याचा अनुभव काही वेगळाच.. १६० आणि कसली स्टेबल आहे अजुनही…”
“क्रुज-कंट्रोल चालु कर, सगळे कंट्रोल ऑटो सेट होतात..”, डॅशबोर्डवरच्या एका बटनाकडे बोट दाखवत राधा म्हणाली… “.. पैसा सर्वकाही नसतो मान्य.. पण काही गोष्टींचा आनंद पैसा असल्याशिवाय घेता येत नाही हे ही खरं.. नाही का?”
“अगदी.. थॅंक्यु अनुराग फॉर धिस…” हाताची दोन बोट आधी ओठांना आणि मग आकाशाकडे बोट दाखवत कबिर म्हणाला.

“ए .. त्या दिवशी काय झालं मग? तु भेटलास मोनिकाला?”, अचानक काहीतरी आठवल्यावर राधा म्हणाली
“नाही..”
“का??? मी सांगीतलं होतं ना तुला?”, डोळे मोठ्ठे करत राधा कबिरवर ओरडली
“आणि मी पण तुला सांगीतलं.. आमच्यात काही नाहीए..”
“पण मग डेट कश्याला कबुल केलीस तिच्याशी.. हाऊ मीन ऑफ़ यु कबिर…”, राधा अजुनही चिडली होती.

तिच्या त्या रागाच कबिरला खुप कौतुक वाटत होतं. राधा त्याची असती तर तिला जवळ, मिठीत घेऊन तिला मनवायचा त्याने प्रयत्न केला असता पण…पण राधा त्याची नव्हती.. निदान सध्या तरी..

“ती ऐकतच नव्हती.. मी दहा वेळा नाही म्हणालो तिला..”
“मग अकराव्यांदा पण म्हणायचंस..”
“जाऊ देत ना सोड.. जे झालं ते बरंच झालं…”

“गोव्यात, तु बोलला नाहीस मला तुला गर्लफ्रेंड आहे ते..”
“कधी बोलणार? आपण दोन दिवसांतच गायब झालात.. आणि तेंव्हा ती माझी गर्लफ्रेंड नव्हती.. आमचा ब्रेक-अप आधीच झाला होता..”
“ओके ओके.. टॉन्टींग ची एक संधी सोडू नकोस.. बर सांग ना.. कधीपासुन एकत्र होतात तुम्ही? का ब्रेक-अप झालं? तुच काही तरी केलं असशील…..”

पुढचा अर्धा-पाऊण तास कबिर तिला मोनिका आणि त्यांच्याबद्दल सांगत होता.

“आमच्या रिलेशनशीपमध्ये सुरुवातीचा काही काळ सोडला तर ती आणि मी नव्हतोच.. फक्त मी आणि मीच होतो..”
“तु असे साधे कपडे का घालतोस?”
“पार्टीमध्ये कुणाशी जास्त मिक्स का नाही होत?”
“माझ्या सगळ्या फ्रेंड्सना तु बोअरींग वाटतोस.. तु असा कुल आणि ट्रेंडी का नाही राहात?”

“मी कित्तीदा तिला सांगुन बघीतलं. अनेकदा तिला माझ्या फॅन-मेल्स दाखवल्या. जितक्या तुझ्या मैत्रीणी नसतील त्याच्या दहापट अधीक मुलींनी मला ई-मेल / फोन करुन मी त्यांना आवडतो, माझं लिखाण त्यांना आवडतो सांगीतलं होतं हे दाखवुन दिलं..”
“मग?”
“मग काय? तिला तात्पुर्त पटायचं.. परत ये रे माझ्या मागल्या. तिला मी तिला आवडण्यापेक्षा इतरांना आवडणं जास्त महत्वाच वाटायचं..”
“जस्ट द सेम विथ मी.. अनुरागही काही वेगळा नव्हता…”
“तु बदललंस का स्वतःला अनुरागसाठी? मी तरी थोडाफार प्रयत्न केला…”

“अरे, पण ते एकच कारण नव्हतं अनुरागबद्दल.. मला हवं असलेलं स्वातंत्र्य तो मला कधीच देऊ शकला नसता. तु जे काही सांगीतलंस मला, निदान त्यावरुन मोनिका, ती एक गोष्ट सोडली तर.. सिम्स टु बी नाईस गर्ल… दिसायला पण चिकनी आहे रे…”

“ह्म्म.. मोना तशी आहे चांगली. आमच्या ब्रेक-अप नंतर मी खरंच डिप्रेस होतो.. त्यातच मला ते लव्ह-स्टोरी लिहायची ऑफर आली. मी तयारच नव्हतो, पण एक तर माझं तिसरं पुस्तक इतक हिट नाही झालं.. वुई अ‍ॅज अ युनिट आम्हाला सक्सेसची गरज होती, रोहनने खुपच पर्स्यु केलं आणि मी गोव्याला पोहोचलो…”

“उउउउह्ह्ह.. ‘मोनिका’वरुन एकदम ‘मोना’… समवन सिम्स टु बी स्टिल इन लव्ह…”
“प्लिज……”, काहीसा लाजत कबिर म्हणाला..
“लेट मी सी.. लेट मी सी.. आर यु ब्लशींग?”, कबिरच्या दंडाला धरुन त्याला मागे सरकवत राधा म्हणाली…
“धिस कॉल्स फॉर अ चिअर्स..”, असं म्हणुन तिने थंड ग्लोव्ह-कंपार्टमेंटमधुन बडवायजर बिअरचे दोन कॅन काढले आणि एक कबिरला दिला..
“नो थॅंक्स.. आय़ डोंन्ट ड्रिंक व्हाईल ड्राईव्ह…”
“ए काय नाटकं रे तुझी? बिअर काय ड्रिंक आहे का? स्पार्कल्ड वॉटर आहे ते…”
“थॅंक्स पण नको…”
“थांब..मोनालाच फोन करते.. सांगते कसा बोअरींग आहेस तु…”, कबिरच्या खिश्यातुन मोबाईल ओढुन घेत राधा म्हणाली…

“ओके.. ओके… दे इकडे”, असं म्हणुन राधाने फोडलेला बिअरचा कॅन घेउन कबिरने तो तोंडाला लावला…

“तु तिला लव्ह-लेटर्स वगैरे सॉल्लीड लिहीली असशील ना? लेखकच तु.. हो ना?”
“हो म्हणजे.. लिहीली होती थोडीफार….”
“वॉव्व.. ए.. सांग ना.. काय काय लिहीलं होतंस…”
“प्लिज…”
“प्लिज काय.. सांग.. जे आठवतेय ते सांग.. म्हणजे असं कविता वगैरे करायचास का?”
“मला नाही आठवत ए.. सोड ना राधा.. मोनिका तुझ्यासाठी विनोदाचा विषय असेल.. माझ्यासाठी नाही..”, गंभीर होत कबिर म्हणाला..
“ओके.. सॉरी.. हर्ट केलं असेल मी तर.. रिअली सॉरी…”

गाडी मुंबई-गोवा हायवेला लागली. राधा आणि कबिर गप्पांमध्ये बुडुन गेले होते जणु एकमेकांना गेली कित्तेक वर्षांपासुन ओळखतात. गप्पांचा विषय अक्षरशः काहीही असत. एखाद्या गाण्यावरुन.. एखाद्या सिनेमावरुन सुरु झालेली चर्चा अगदी जागतिक राजकीय विषयांपर्यंत पोहोचायची.

“तुला गुलजारची शायरी आवडते?”, राधा
“म्हणजे काय?”
“थांब, पेन-ड्राईव्ह मध्ये आहे एक फोल्डर…”, राधाने एंटरटेंमेंट-सिस्टीममधील गाण्याचा फोल्डर बदलला..

गुलजारच्या धिर-गंभीर आवाजातली शायरी सुरु झाली..

बेबस निगाहों में है तबाही का मंज़र,
और टपकते अश्क की हर बूंद
वफ़ा का इज़हार करती है……..
डूबा है दिल में बेवफाई का खंजर,
लम्हा-ए-बेकसी में तसावुर की दुनिया
मौत का दीदार करती है……….
ऐ हवा उनको कर दे खबर मेरी मौत की… और कहेना,
के कफ़न की ख्वाहिश में मेरी लाश
उनके आँचल का इंतज़ार करती है……….

दोघांनीही ती शायरी एकत्रच म्हणली.. जणु वर्षांनुवर्ष ऐकत आले होते..

“उफ़्फ़.. काय आवाज आहे यार.. यु नो व्हॉट.. माझा टर्न-ऑन पॉईंट काय आहे?”, राधाने विचारलं
“काय?”
“आवाज.. समोरच्या व्यक्तीचा आवाज चांगला असेल ना.. बस्स.. मला पटवण्याची आधी लढाई तो उसने तभी जित ली..”
“सो यु टर्न ऑन बाय गुलजार?”, हसत कबिरने विचारलं
“व्हाय नॉट? गुलजार.. जगजीत सिंग.. अमीताभ बच्चन.. इव्हन नसरुद्दीन शहा.. एज हार्डली मॅटर्स…”
“हम्म ट्रु..”
“व्हॉट अबाऊट यु.. मुलींमध्ये तुला काय आवडतं सर्वात? आय मीन.. ‘बट-ऑब्व्हीयस’ गोष्टी सोडुन सांग..”, डोळे मिचकावत राधा म्हणाली
“डोळे.. डोळे जर चांगले असतील ना..”, कबिर राधाच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि पुढचं वाक्य अर्धवटच राहीलं..

कबिरच पुढंच वाक्य अर्धवट का राहीलं हे लक्षात येताच.. “उप्प्स.. सॉरी..” असं म्हणुन राधाने डोळ्यावर तो मोठ्ठा गॉगल चढवला आणि खिडकीकडे तोंड करुन येणारं हासु दाबण्याचा प्रयत्न करु लागली…

“हम्म.. दॅट्स बेटर..”, असं म्हणुन कबिरने गाडीचा वेग वाढवला…


जेवणासाठीचा अर्धा-पाऊण तासाचा छोटासा ब्रेक घेऊन ते लगेच पुढे निघाले…
“तु सोफी ऑन्टींना फोन करुन सांगीतलंस आपण येतोय ते?”
“हम्म.. कालच रात्री केला होता फोन.. खुप खुश झाल्या..”

गोकर्ण ४० कि.मी. वर आलं तसं राधा थोडी टेन्स असल्याचं कबिरला जाणवलं.
“राधा.. डोन्ट वरी.. सगळं ठिक होईल..”
“हम्म.. होप सो.. मागच्या वेळी मी तेथे होते.. दॅट वॉज टेरीबल.. आय जस्ट होप.. की ही फक्त फॉर्मॅलीटीच असेल आणि तासाभरात आपण बाहेर पडु..”
“नक्कीच.. मी आहे तुझ्याबरोबर.. रिलॅक्स…”, कबिरने राधाला धीर देण्याचा प्रयत्न केला

गाडी पोलिस-स्टेशनच्या आवारात आली तसं राधाने एकदा आरश्यात बघुन चेहरा ठिक केला आणि कपडे निट करुन ती पोलिस-स्टेशनमध्ये शिरली. कबिरही गाडी लॉक करुन तिच्या मागोमाग शिरला.

चिफ़-इन्स्पेक्टरच्या जागेवर दुसराच कोण तरी थोडासा वयस्कर पोलिस इन्स्पेक्टर बसला होता.

राधाला पहाताच तो उठुन उभा राहीला.

“अं.. मी राधा.. ते इन्स्पेक्टर…”
“ते आता नाहित इथे.. त्यांची ट्रांन्स्फर झालीय.. त्यांच्या जागी आता मी आहे.. तुमची केस माझ्याकडेच आहे…” तो वयस्कर इन्स्पेक्टर म्हणाला..
“ओह..”
“त्यांचा शहाणपणा नडला त्यांना.. तुमची फ.आय.आर नाही, चार्जशीट नाही, कसली फारशी चौकशी नाही आणि त्यांनी सरळ बातमी मिडीयाला लिक केली.. वरच्यांना ते आवडलं नाही… त्यात तुमचे मिस्टर…”
“एनिवेज.. मी थोडी गडबडीत आहे.. आपण फॉर्मैलीटी उरकुयात का?”, राधाने विषय मध्येच तोडत विचारलं.

चेहर्‍यावरुन ती बराच कठोरपणाचा आव आणत होती.. पण मनातुन प्रचंड घाबरली होती..
“हो हो नक्कीच.. आणा रे त्यांना..”, असं म्हणुन इन्स्पेक्टरने एका हवालदाराला आत पिटाळलं..

राधा खुर्चीत सरळ होऊन बसली. तिच्या मानेच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. हाताच्या मुठी घट्ट आवळुन ती वाट बघत बसली.

थोड्याच वेळात चार्ली, रॉकी आणि इतर गुन्ह्यांत पकडलेले ४-५ कैदी तिच्यासमोर येऊन ठाकले.
चार्ली आणि रॉकी मान खाली घालुन उभे होते. राधाला वाटले होते, दोघं जण प्रचंड चिडलेले असतील, तिला बघताच तिच्या अंगावर धावुन येतील वगैरे. पण तसं काहीच नव्हतं हे पाहुन राधाच्या जिवात जीव आला.

“ह्यांच्यापैकी कोण होते?”, तो वयस्कर इन्स्पेक्टर म्हणाला
राधा काही बोलणार एव्हढ्यात कबिरने तिला थांबवले आणि तो त्या इन्स्पेक्टरला म्हणाला, “इन्स्पेक्टर साहेब, ह्या केसमधुन बाहेर पडण्याचा काही मार्ग..”

कबिरचे बोलणे ऐकुन सगळ्यांनी वळुन त्याच्याकडे बघीतले.. जणु काही सगळ्यांना तेच हवे होते.

“म्हणजे??”, इन्स्पेक्टर म्हणाला
“म्हणजे… त्या दिवशी जे काही झाले.. अर्थात दुर्दैवीच होते.. पण ती एक घडलेली चुक होती. कुणाकडुनच जाणुन-बुजुन घडलेला गंभीर गुन्हा नव्हता…”, कबिर म्हणाला
“असं कसं.. दोघांनीही एकमेकांविरुध्द गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.. नाही कसं म्हणता..”
“हो.. मान्य आहे.. पण कदाचीत त्यावेळेस तेथे पोलिस पोहोचले आणि…”
“मग तेच तर.. त्यावेळेस तेथे पोलिस पोहोचले नसते, तर अ‍ॅटेंप्टेड मर्डर किंवा रेप पैकी एक काहीतरी नक्कीच झाले असते.. नाही का..”
“अगदी खरं आहे.. पण समजा.. समजा आज ह्या ओळख परेड मध्ये राधा-मॅडमनी दोघांनाही ओळखलेच नाही तर???”
“कबिर अरे पण त्या दिवशी तेथे पोलिस नसते आले तर खरंच…”, राधा खुर्चीतुन उठत म्हणाली..
“एक मिनीट राधा.. हे बघ त्या दिवशी जे काय झालं ते झालं.. पण त्याच्यामुळे पुढे अनेक महीने.. किंवा वर्ष तुम्हाला कोर्टाच्या.. पोलिस-स्टेशनच्या फेर्‍या माराव्या लागणार आहेत.. मान्य आहे का तुला??”

राधा काहीच बोलली नाही..

“जर राधा मॅडमने ओळखलेच नाही.. किंवा हे ते दोघं नव्हेतच असं स्टेटमेंट दिलं तर मग प्रश्नच मिटला.. पण त्यांच्या केसंच काय.. जी राधावर त्यांनी फाईल केली आहे.. त्यांच्या केसनुसार तर राधा तेथेच होती ना!. कॉन्ट्रडीक्ट होतात स्टेटमेंट. राधा म्हणते, हे दोघं ते नव्हेत.. ते म्हणतात राधाच होती ती.. शिवाय आमच्या पोलिसांनी दोन्ही पार्टीजना एकत्र पकडलं आहे.. त्याचं काय? तिघांच्याही ब्लड-सॅंपलमध्ये ड्रग्ज सापडले.. त्याचं काय?”

“मला बोलु तर द्या.. सांगतो.. कदाचीत त्या दिवशी असं झालेलं असु शकतं. राधा तिकडे फिरायला गेली होती.. एकटीच.. हे लोकं तिकडेच होते.. ड्रग्जच्या नशेत.. त्यांनी राधाला बघीतलं.. तिला जबरदस्ती ड्रग्जचं इंजेक्शन दिलं.. पण राधा तेथुन निसटली.. ह्यांनी तिचा पाठलाग केला.. पुढे पोलिसांनी त्यांना पकडलं…”

“म्हणजे सगळी चुक आम्ही कबुल करायची आणि ही फुकटची सुटणार.. ते शक्य नाही.. आम्ही अडकलो तर ही पण अडकणार..”, रॉकी चवताळुन म्हणाला..

“अरे राजा.. जरा बोलु देशील मला?”, कबिर त्याला थांबवत म्हणाला…
“तु काही बोल.. आम्ही अडकलो तर ही पण अडकणार हे नक्की..”, रॉकी..

“हं.. तर त्यावेळेला राधाला जे ‘जबरदस्तीने’ ड्रग्ज दिले होते.. त्यावेळी ती नशेतच होती.. त्यामुळे आता तिला काही केल्या आठवतच नाहीये तेंव्हा नक्की काय घडलं, कुणी केलं वगैरे.. सो.. ती ओळखु शकत नाहीये ह्यापैकी कोणी होतं किंवा नव्हतं. आणि ह्या दोघांच म्हणाल.. तर त्यांची चुक ते मान्य करतील.. त्यांचा गुन्हा इतकाच ठरतो की त्यांनी ड्रग्जचं सेवन केल, राधाला दिलं आणि काही कारणामुळे ते तिला पकडायला धावले. अर्थात कुठल्या कारणामुळे ते त्यांनाही आठवत नाहीए आता. पळता पळता हा.. रॉकी.. पडला.. दगडावर तोंड आपटलं.. त्याला लागलं..” जसं काही अगदी साधंच काहीतरी घडलं असावं अश्या आवेशात कबिर डोळे बारीक करुन हातवारे करत बोलत होता..

“पोलिसांना बघीतल्यावर दोघं जण घाबरले.. आणि आपली चुक त्यांनी राधावर ढकलायचा प्रयत्न म्हणुन तिच्यावर काहीतरी केस फाईल केली..”

“अरे पण….”, रॉकी पुढे काही बोलणार एव्हढ्यात चार्लीने त्याला थांबवले आणि तो म्हणाला.. “ह्याबदल्यात आम्हाला काय मिळणार?”

“आत्ता कसं.. मुद्याचं बोललास…” हळुवार, एखाद्या वकिलाप्रमाणे टाळ्या वाजवत कबिर म्हणाला… “आता ड्रग्ज तर रक्तात सापडले तुमच्या.. सो तोच एक गुन्हा नक्की आहे.. त्याबदल्यात तुम्हाला तुरुंगात तर जावं लागेलच.. पण ह्याबाजुला हिप्पी लोकं आणि ड्रग्ज काही नविन नाही.. कित्ती तरी लोकं अशी येतात आणि जातात.. तुम्ही राधावरची केस मागे घ्या आणि किती पैसे घेणार ते बोला…”

चार्ली, रॉकी… इन्स्पेक्टर कबिर.. कबिर राधा.. सगळे एकमेकांकडे आळीपाळीने बघत होते.

कबिरने सांगीतलेला प्लॅन तसा बरा होता..

“पण मिडीया? त्यांना काय सांगायचं?”, इन्स्पेक्टर ने विचारलं..
“हेच.. जे आपण आत्ता बोललो ते…”, कबिर
“पण त्यांना ते पटायचं का? उगाच गोंधळ व्हायचा…”
“अहो आहे कुणाला वेळ ह्या केसकडे बघायला. तेथे दिल्ली युनिव्हर्सीटीत गोंधल चालु आहे..त्यात बजेट.. मग क्रिकेटसच्या टुर्नामेंट्स.. आय.पी.एल.. मिडीआ फुल्ल बिझी आहे सगळ्यात.. असे कित्तेक मोठ्ठाले घोटाळे आले आणि गेले.. हे तर किरकोळ आहे.. आणि समजा कुणी विचारलंच तर आपण जे बोललो तेच सत्य आहे.. आणि पटण्यासारखे नसले तरी.. कुणाकडे काही पुरावासुध्दा नाहीए…”

“दहा लाख..”, बराच विचार करुन चार्ली म्हणाला..
“ए.. चड्डीत राहुन बोल..”, कबिर म्हणाला… “एक विसरु नको.. आत्ता राधा बाहेर आहे आणि तु अजुनही तुरुंगात.. असा तुरुंगात खितपत पडुन रहायला हिप्पी झालायेस का? जा ना बाहेर.. खा.. पि.. गाणी म्हण.. पोरी फिरव.. ऐश कर..”

चार्ली आणि रॉकीने एकमेकांकडे पाहीले

“पाच लाख…”
“एनिवेज इन्स्पेक्टर, आपण ओळख परेड चालु करुयात.. जर राधाने दोघांना ओळखलं तर मग मात्र तुम्हाला काही करता येणार नाही.. नाही का?”

इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर ने खिश्यातुन रुमाल काढुन आपल्या कपाळावरचा घाम टिपला. त्याला आपली जवळ येत चाललेली निवृत्तीची तारीख दिसत होती. कसंही करुन त्याला ह्या केसमधुन बाहेर पडायचं होतं.

“हो अगदी बरोबर.. मग मात्र मी काहीच करु शकणार नाही…”, चेहरा गंभीर करुन इन्स्पेक्टर म्हणाला..
“दोन लाख.. फायनल..”, चार्ली म्हणाला..
“एक लाख.. फायनल.. टेक इट ऑर लिव्ह इट…”, कबिर निग्रहाने म्हणाला

रॉकी आणि चार्लीने एकमेकांत बरीच कुजबुज केली. एक लाख सुध्दा त्यांना काही कमी नव्हते. शंभर रुपायांसाठी सुध्दा तरसणारे ते.. लाख-रुपये खुप जास्ती होते..

“ड्न..”, दोघंही एकदम म्हणाले..
“इन्स्पेक्टर साहेब.. तुमंच काही??”, कबिर
“छे छे.. मला त्यातला एक रुपायाही नको.. दोन महीन्यांत मी रिटायर होतोय.. उगाच मी पैसे घेऊन हे केलं कुठं निघालं तर…”
“ओके ओके..” कबिर हसत म्हणाला..

पण मला माझ्या सिनीयर्सशी आधी बोलायला हवं.. त्यांना योग्य वाटलं तर…

“शुअर…”, कबिर म्हणाला
इन्स्पेक्टर दार उघडुन आपल्या केबिनमध्ये फोन करायला निघुन गेले..

राधा दोन्ही हातांची बोट क्रॉस करुन मनातल्या मनात प्रार्थना करत होती. अगदी अनपेक्षीतपणे कबिरने तिचं आयुष्य वेगळ्याच वळणावर येऊन थांबवले होते. ती जरका ह्या केसमधुन बाहेर पडु शकली असती तर.. एक नविन.. स्वच्छंद आयुष्य तिची वाट पहाणार होते.

ती खुर्चीतुन उठुन चार्लीपाशी गेली.

“शिना कशी आहे? इथेच आहे अजुन”, राधाने विचारले.
“नाही.. इथे नाहीएत.. पोलिसांनी सगळ्यांना पळवुन लावले. कोस्टल-कर्नाटका साईडला गेलेत सगळे..”, चार्ली म्हणाला..
“हम्म.. इथुन सुटलात तर तुम्ही तिकडेच जाणार?”
“हम्म..”, चार्ली म्हणाला.

राधाने रॉकीकडे पाहीलं, पण तो चेहरा दुसरीकडे करुन उभा होता.

जवळ जवळ १५-२० मिनीटांनंतर इन्स्पेक्टर बाहेर आले.
“कमीशनर साहेब तयार आहेत.. पण तुम्हाला दोघांनाही स्टेटमेंट्स लिहुन द्यावी लागतील. राधा मॅडम.. इथुन बाहेर पडल्यावर प्लिज बाहेर कुठे ह्याची वाच्यता करु नका.. विशेषतः मिडीयाशी काही कम्युनिकेशन नकोय याबद्दल.. ओके?”

राधाने बोटांची चिमटी करुन ओठांवरुन फिरवत तोंडाला कुलुप लावल्याची खुण केली.

“चार्ली-रॉकी… एक महीना.. इथे तुरुंगात रहावं लागेल.. हवालदार घेऊन जा ह्यांना…”, इन्स्पेक्टर
“तुमचे पैसे.. कुठे पाठवायचे?”, कबिर
“इथेच.. हातात पैसे पडल्याशिवाय कुठल्याही स्टेटमेंटवर आम्ही सह्या करणार नाही”, रॉकी म्हणाला..
“अरे.. आम्ही काही लाखरुपये बरोबर घेउन फिरतो का?”, कबिर वैतागुन म्हणाला..
“कबिर.. आय गॉट धिस.. आहेत माझ्याकडे..”, असं म्हणुन राधा कारमधुन तिची पर्स घेऊन आली.

कबिर तिचे पैसे देऊन होईपर्यंत डोळे फाडुन तिच्याकडे बघत होता.

इन्स्पेक्टरने दोन चार फॉर्म्स त्यांच्याकडुन भरुन घेतले.. हवालदारने दोघांचे स्टेटमेंट्स लिहून घेतले. आणि मग जशी कबिरने सांगीतली तशी ‘क्लिन-चीट’ सही शिक्यासहीत इन्स्पेक्टरने राधाच्या हातात ठेवली.

“सो.. ऑल डन?”, हातातल्या कागदाकडे बघत राधा म्हणाली…
“ऑल डन.., आपण सगळेच सुटलो नाही का?”, कसनुस हसत इन्स्पेक्टर म्हणाला.


कबिर आणि राधा बाहेर निघाले तसं राधा म्हणाली, “कबिर, दोन मिनीटं थांबतोस.. मी पट्कन गाडीत चेंज करते.. खुप हेवी झालंय हे.. आणि गरम पण खुप होतंय..”

“शुअर..” कबिर म्हणाला..

राधा गाडीच्या मागचं दार उघडुन आत गेली आणि दहा मिनीटांनी कपडे बदलुन बाहेर आली..
“लेट्स गो..कबिर…”,असं म्हणुन ती पुढच्या सिटवर जाउन बसली..

कबिरही ड्रायव्हिंगसीटवर बसला आणि गाडी सुरु करुन ते पोलिस-स्टेशनच्या बाहेर पडले.

पुढची दहा मिनीटं कुणीच कुणाशी बोलत नव्हते.
“राधा? इतकी छान गोष्ट घडली.. काहीच बोलत नाहीएस…”, कबिर शेवटी न रहावुन म्हणाला..
“बोलते.. पण त्याआधी.. इथुन पुढे कुठेतरी बीच-साठी एक्झीट आहे का बघ.. मला समुद्र किनार्‍यावर जायचं आहे..”, राधा म्हणाली..
“ओके..”, असं म्हणुन रस्त्यावरचे बोर्ड बघत कबिरने गाडी वळवली.

दहा-पंधरा मिनीटांनंतर एक छोट्याश्या वाटेवर त्याने गाडी वळवली आणि ते समुद्रकिनारी येऊन पोहोचले.

गाडी थांबताच राधाने दार उघडले आणि कबिरची वाट न बघता ती धावत धावत समुद्रापाशी गेली. कबिरही तिच्या मागोमाग गेला.

राधा समुद्राच्या लाटांपाशी पोहोचली. लाटांचा घनगंभीर आवाज आसमंतात भरुन राहीला होता. राधाने डोळे बंद केले.. दोन्ही हात आडवे पसरले आणि अनपेक्षीतपणे ती टाहो फोडुन जोरात किंकाळी मारली.. आणि परत एक.. परत एक.. आणि परत एक..
इतके दिवस मनात साठुन राहीलेला राग, चिंता, दुःख, भिती तिच्या ओरडण्यातुन बाहेर पडत होतं.

समुद्राच्या लाटांच्या आवाजात तिचा आवाज लगेचच विरुन जात होता.

राधाच्या डोळ्यांतुन अश्रु वाहात होते, पण ती अजुनही जोरजोरात ओरडत होती.

घसा सोलवटुन निघाला तसं ती थांबली. कबिर तिच्या शेजारीच उभा होता.
तिने कबिरकडे बघीतलं आणि म्हणाली.. “थॅंक्स म्हणायला हवंय.. खरं तर मला नाही म्हणायचंय.. आय ऑलवेज वॉन्ट टु बी इन डेब्ट ऑफ़ धिस…”

कबिर हसला आणि मानेनेच त्याने नाही म्हणलं..

“बट नो.. आय हॅव टु गिव्ह समथींग बॅंक…सो रेडी?”
“ओके..”

“मागे आकाशात बघ कबिर.. आत्ता कसली वेळ आहे?”,
“अं.. सुर्यास्त..” मावळतीकडे झुकलेल्या सुर्याकडे बघत कबिर म्हणाला..
“ओके.. गुड..”, राधाच्या चेहर्‍यावर एक मिस्टीरियस हास्य होते… “नाऊ लुक अ‍ॅट मी…. लुक अ‍ॅट माय ड्रेस…”

कबिरने राधाकडे बघीतले.. तिने गुलाबी रंगाच्या टी-शर्टवर पांढर्‍या रंगाचा सी-थ्रु शर्ट आणि खाली आकाशी रंगाची स्लॅक्स घातली होती.

“हम्म मग?”
“उफ़्फ़.. काय तु…”, गाल फुगवुन राधा म्हणाली..
“हे कसलं गिफ़्ट..”, कबिर न कळुन म्हणाला…
“अं.. बरं हे बघ..”, दुसरं काहीतरी आठवल्यावर तिने वाळुमध्ये शोधुन एक दगड उचलला आणि समुद्रात भिरकावला…..आणि म्हणाली “ते बघं.. ते काय होतं..?”

“भाकर्‍या…”, कबिर म्हणाला…
“एक्झॅक्टली.. भाकर्‍या.. भा.क.र्‍या…” असं म्हणुन राधा खळखळुन हासु लागली.. आणि अचानक कबिरला साक्षात्कार झाला.. हे सर्व त्याने कुठे तरी पाहीलं होतं.. राधाचा तो ड्रेस.. सुर्यास्त.. पाण्यावर टप्पे पडत जाणारा दगड.. त्याच्या पडणार्‍या भाकर्‍या, राधाचं निरागस हास्य आणि…आणि राधाचा आणि कबिरचा इमॅजनेटीव्ह किस…

येस्स.. त्याच्याच पुस्तकातला तो एक प्रसंग होता.. जो आज राधाने प्रत्यक्षात आणला होता…

स्तंभीत झाल्यासारखा तो राधाकडे बघत होता…
“इज धीस फॉर रिअल?”, कबिर म्हणाला..

“क्लोज युअर आईज मिस्टर…”, कबिरच्या अगदी जवळ जात राधा म्हणाली
“आर यु गोईंग टु..”,कबिर
“आय सेड.. क्लोज युअर आईज कबिर..”

कबिरने डोळे बंद केले…

अतिव-सुखाच्या कोमात जाण्यापुर्वी कबिरला एकच गोष्ट जाणवली.. जास्मीनचा जवळ जवळ.. अगदी जवळ येत जाणारा.. बेधूंद करणारा सुगंध आणि राधाचे त्याच्या ओठांवर टेकलेले ओठ……………

[क्रमशः]