लिव इन चा फंडा
जसं वय वाढत जातं बालपणाला दुर सारत तारूण्याच्या उबंरठ्यावर पाऊले पडू लागतात ..
मनाची घालमेल होते .... हार्मोन्स उसळू लागतात ... चुक की बरोबर काहीच कळत नाही
अल्लड वय असतं ना ते !
प्रेम वैगरे फार कमी जपतात हो अधिकतर आकर्षणालाच बळी पडतात ...
न समजलेल्या प्रेमाच्या काहाण्या पण फार करूण आहेत ... त्यात ही दोघे ह्यांना हेच समजून
घ्यायला तयार नाही तर आपण काय समजून घेऊ ??
" निमिशा अगं ये ऐक ना माझं , का असा अट्टाहास करते नको जाऊ ना मला सोडून
दुर ..... तुझ्याविणा इकडे मला सारं काही भकास वाटेल गं ..."
विनयचा आपला लागलीच सुर निमिशाला जाण्यापासून थांबवत होता ...
तळ्यात मळ्यात अशी परिस्थिति होती त्या बिचारीची ... काय करू आणि काय नको !
विनयला ती बोलली ...
" अरे , गेली तीन वर्ष झाले आपण रिलेशनशिप मध्ये आहोत .... लग्न नको का करायला संसार असाच
रेटत जायचा का ? आणि ह्या सरकारी नोकरीसाठी तुला माहिती आहे ना मी किती कष्ट घेतले आता
हातचा जॉब सोडून दे म्हणतो ... "
निमिशाने लग्नाच नाव काढताच विनयचा कपाळावर मात्र शंभर आठ्या यायच्या .... तो तिला
म्हणाला ,
" आपण कमी पैशातही इथे सोबत राहून सुखाने जगू शकतो ना ! तुला माझं बोलणं कळत कसं नाही .."
विनय आणि निमिशा दोघही एकाच अॉफीस मध्ये चार वर्षांपासून काम करायचे ... दोघात आधी
चांगली फ्रेन्डशिप झाली ... आणि फ्रेंन्डशिपच रूपातर प्रेमात कसं झालं दोघानाही कळलचं नाही
आधी आधीचे दिवस जणू दोघासाठीही स्वर्गाची सैर केल्यासारखे भासत होते नंतर नंतर आपण
जमीनवर उभं
आहोत की पाताळात म्हणून चक्रवायला व्हायचं दोघानाही ..... दोघांमधला वादच असा टोकाला जायचा .
आताही वादानेच घेरलं होतं त्याचा प्रेमाला ....
" विनय जगण्यासाठी पैसा म्हत्त्वाचा असतो , आणि काय रे तू पण चल ना तिकडे माझ्या सोबत .... हे
बघ आपण आंतरजातिय विवाह करणार आहोत तुझ्या घरचे मान्य होणार नाहीत रहावं आपल्याला घर
सोडूनच लागणारं आहे ..."
निमिशाही एका अर्थाने खरं तेच बोलत होती ....
" अगं माझे आईबाबा मला बाहेर नाही पाठवू शकतं आणि तू लग्नाचं काय घेऊन बसलीस ...
लग्न म्हणजे एक सामाजमान्य संकल्पना आहे ज्यावर माझा विश्वास नाही ....."
विनय असं का बोलतो ....
" अरे म्हणजे तुला लग्न करायचंच नाही का ? "
विनय जरा रागाच्या स्वरातच म्हणाला , " असं मी बोललो का ? निमिशा तू पण ना ! "
" नाही बोलला तू पण लग्न ही संकल्पना जरी तुला मान्य नसली तरी मला आहे ना ... लग्न झाल्यावर
एका गाडीची दोन चाक होऊन आयुष्य जगावं लागतं तेव्हा ते सुकर होतं .... "
निमिशा त्याला समाजावून सांगत होती पण तिचं बोलणं म्हणजे त्याला लग्नाबद्दलच पोथी पुराण
ऐकायला सारखं वाटायचं ....
" हे बघ निमिशा , मॉम डँड दुसर्याजातीची मुलगी म्हणून तुला घरात प्रवेश देणार नाहीतच अगं खुप
जुण्या विचाराचे आहेत ते समाज काय म्हणेल लोक काय म्हणतील शिवाय त्यांची सर्व इज्जत मातीत
मिसळेल ....आपण लिव इन रिलेशनशिप मध्ये राहूयात ना विचार कर जरा शांत डोक्याने माझ्यासाठी ! "
आता तर लिव इनच नाव ऐकताच निमिशाच डोकं गरगरायला झालं ... तिला वाटू लागलं
आपण चुकीच्या व्यक्तिच्या प्रेमात पडून आपलं सर्वस्व गमावून बसलं ....
" विनय तू लग्न करण्याच्या आधीच म्हणतो , तुझ्या आई बाबाची इज्जत मातीत मिसळेल ... आणि माझं
लग्न होण्याआधीच मी आपलं शरीर तुला बहाल केलं ..... शरीरसंबंध ठेवण्याआधी तू मला वचन दिलं
होतं की आपण तुला किंवा मला सरकारी नोकरी लागल्यावर लग्न करून घेऊ ! आणि आता लिव इन
सांगतो .... माझ्या इज्जतीच काय ?? "
निमिशा रडायला लागली .... ती पश्चाताप करतं होती पहिल्यादाच आपण चुकीच्या व्यक्तिवर प्रेम
केल्याचा ....
" निमिशा , शरीरसंबंधाला का मधात आणते ते दोघाच्या सहमतीनेही घडून यायचे .... तू तर माझ्यासोबत
अशी भांडते आहे जसं काही मी तुझ्या मर्जीच्या पलीकडे जाऊन तुझ्यावर जबरदस्ती केली ...."
..... आता तर अश्रू डोळ्यात दाटले तिच्या कापरे ओठ बोलू लागले .
" व्वा विनय वा ! मानलं पाहिजे यार तुला ... ते सर्व कारायला तू मला भाग पाडत होता तुझ्या खुशी खातर
मी तयार व्हायची आणि आता तुझं असं बोलणं अरे प्रेम केलं होत ना मी तुझ्यावर वाटायचं आजपर्यत
मी तुझी आहे पण आज वाटतय तू माझा नाही रहाला ... तू होताच कधी रे माझा ??
माणुस शरीराने नाहीतर मनाने पवित्र असतो विनय तुला तर ते मनही नसावं माझं प्रेम आंधळ होतं
समजून जगणार मी एकटी .... नकोय मला तुझ्या लिव इन ची गरज ."
दोघाच्या वादाने एवढं रौद्र रूप धारण केलं की कोणीच कुणाला समजून घ्यायला तयार नव्हतं
नात्याला असाचं तडा जातो ...
विनयने तिला थांबवण्याचा खुप प्रयत्न केला .... पण व्यर्थ ती आता मागे वळून
बघायलाच तयार नव्हती विनय वरून तिचा विश्वास उडाला होता ....
☀☀☀