Tya divashi in Marathi Horror Stories by Harshad Molishree books and stories PDF | त्या दिवशी...

Featured Books
  • अपराध ही अपराध - भाग 24

    अध्याय 24   धना के ‘अपार्टमेंट’ के अंदर ड्र...

  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

Categories
Share

त्या दिवशी...


रात्रीचे २:३० वाजले असतील, काळ्या रात्रीच्या अंधारात फक्त चंद्रचा उजेळ दिसत होता.... 
हरी त्याच्या दोनी मित्रांनसोबत गच्चीवर असलेल्या पाण्याच्या टाकी समोर बसलेला.... 
हरीश उर्फ हरी, प्रदीप आणि केतन तिघं अगदी लहानपणापासून चे मित्र, एकाच शाळा व त्यांनतर एकाच कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन तिघांनी वेगवेगळ्या कंपनी मध्ये काम सुरू केलं.... आज हे तिघं मित्र बसून एकत्र बोलत होते अगदी खास आणि जवळ च्या ह्या मित्रांना आज एक मेकावरच संशय येत होता.... खरं तर हा संशय.. संशय नसून एक भीती होती, मारण्याची....
प्रदीप ,केतन आणि हरी तिघं पण एक मेकां पासून लांब लांब बसलेले... तिघंही त्रिकोण आकारात बसले होते, तेच हरी त्यांच्या समोर बसून बोलत होता... प्रदीप आणि केतन अगदी शांत पणे ऐकत होते...
"भेंडी पयले चे दिवस पण काय दिवस होते ना भाई... बिलकुल पण टेन्शन नव्हतं च्या मायला आता नुसतं डोक्याची किर किर होत असते".... हरी
"अरे शांत का बसला आहेस बोलना... प्रदीप, चल केतन तू तरी बोल... अबे काय तुम्ही लोकं पण ना नुसतं येड्यावानी घाबरता, अरे काय भूत भीत नाहीये इथं, अबे कशाला घाबरताय... मी आहे ना"..... हरी
"च्या आईला केतन तुझी तर नुसतच फाटली आहे, भेंडी सोड.... अबे तो किस्सा आठवतो का एक वर्षा आधी... काय मज्जा केलती रे भाई आपण".... हरी
केतन आणि प्रदीप दोघही घाबरत होते, हरी बोलत होता पण त्याला ही आतून खूप भित्ती वाटत होती, कोणी पण एक मेका समोर बघत नव्हते...
                                                                                    ★
एक दिवसा पूर्वी....
"ऐ हरी, अरे भाई आहेस कुठे... फोन तरी उचल".... केतन
"अरे साल्या कामावर आहे मी, आता वेळ भेटला बोल काय झालं".... हरी
"अरे उद्या मला आणि प्रदीप ला सुट्टी आहे, तुझं काय आहे जोबाचं... हे बघ भाई आधीच सांगतो नखरे न करता सुट्टी घे उद्या, उद्या काय पण करून भेटायचं आहे"....  केतन
"अबे अस कसं सुट्टी घेऊ, भेंडी तुला तर माहीत आहे ना माझी सुट्टी शुक्रवार ची असते, रविवारी कसं सुट्टी घेऊ".... हरी
"अबे ऐ प्रदीप हा बघ काय बोलतोय तूच बोल बघ"... केतन (केतन ने फोन प्रदीप च्या हातात दिला)
"अरे भाई भेट ना, अबे कधी तरी प्लान होतंय त्यात पण तू बोट दाखवू नकोस हा"... प्रदीप
"अरे भिकार्या बघतो चल संध्याकाळी भेटून बोलूया, चल मला जरा काम आहे ठेवतो फोन".... हरी 
"काय झालं, काय बोलला हरी"... केतन
"काय नाही संध्याकाळी भेटल्यावर सांगतो बोलला"... प्रदीप
संध्याकाळी प्रदीप च्या घरासमोर प्रदीप आणि केतन हरी ची वाट बघत बसले होते, काही वेळ नन्तर हरीपन तिथं आला... 
"बोल शेट काय झालं"... हरी
"आम्ही काय बोलू, तू बोल भाई आम्ही रेडी आहोत, तुझा काय ते ठरव".... प्रदीप
"अरे हो रे भावा घेतली सुट्टी मी आता पुढे बोल काय प्लान आहे"... हरी
"अरे सही ना... हा बघ हा असतो खरा मित्र, भेंडी तू हड साला"... केतन प्रदीप ला चिडवत म्हणाला
"हांका साल्या हे बरोबर आहे आता लगेच तू पलटलाना, बघितलं रे तुला, आता पर्यंत मस्त बोलत होता माझा सोबत, आणि आता लगेच".... प्रदीप
"गप रे तू"... केतन
"अरे ऐ ते सगळं सोडा आधी मला सांगा प्लान काय आहे"... हरी
"Brother प्लान ना जागरण चा आहे, फुल night नुसतं मज्जा"... केतन
"जागरण कुठे करणार आणि ह्यो प्रदीप भेंडी याच्या घरचे आधीच याला मुली वानी ठेवतात, याला काय घंटा सोडतील night ला"... हरी
"अबे भाई ऐकून घे आधी माझ्याच घरी night चा प्लान आहे, समजलं का आला लगेच शाना".... प्रदिप
"अबे तुझ्या घरी, काय पकवतोय"... हरी
"हे बघ याला ना माझं काय खरच वाटतं नाही, सांग रे केतन तू".... प्रदीप
"अरे शेट याच्या घरचे सगळे गावाला चालले आहे, मग घरी कोण नाही हा एकटाच आहे... म्हणून तर night चा प्लान केलं आहे भाई"... केतन
"असं आहे का... मग तुझ्या आईला आधी सांग ना तसा, नुसतंच फालटूची भन भन करतोय".... हरी
"हा ना, सोड ना या प्रदीप ला डोकच नाहीये".... केतन
"हो का भेंडी लगेच, चल मग उद्या च्या ठरलं, भेंडी आणि जर आता जर कोणी cancel केला प्लान तर भाई... खरच मग पुढे कधी कुठला काय प्लान ठरला तर मला सोडून बनवायचा".... प्रदीप
"हो रे भिकारी गप आता"... केतन
"हो बे शहाण्या चल चल आता"... हरी
दुसऱ्या दिवशी... संध्याकाळी प्रदीप चे घरचे गावाला निघून गेले, केतन प्रदीप आणि हरी एकाच चाळीत रहायचे... प्रदीप ने केतन आणि हरी ला फोन केला आणि दोघांना घरी बोलावलं... थोड्याच वेळ्यात तिघंही ठरल्या प्रमाणे एकत्र जमले....
"भाई सगळी तयारी झाली ना"... प्रदीप
"हो रे शेट"... केतन
"भाई आणि तू सगळं आणलाय ना"... प्रदीप
'हो रे सगळं आणला आहे... चल आत"... हरी
तिघांची माजक मस्ती चालू झाली, गंमत करत रात्री चे १ वाजले आणि तिघंही थकून बसले ....
"भाई रास दमलो रे भेंडी"... हरी
"हो रे भाई, कंटाळा यायला लागला आता"... प्रदीप
"मग काय करायचं आता"... केतन
"काय नाय बस झाली मजा, आता ताणून झोपुया"... हरी
"काय बे हरी झोपुया... चला ना काय तरी अस खतरनाक करूया"... केतन
"अबे गप.. एवढ्या रात्री काय खतरनाक करायचं आहे आता"... प्रदीप
"अबे गप उशी घे आणि झोप"... हरी
"अरे हट काय झोप... भेंडी काय night मारायचं फायदा आहे का... काय तरी करूया ना बे".... केतन
"काय तरी म्हणजे काय ते तर सांग"... हरी
केतन ने थोडा विचार केला... आणि मग बोलला चला truth and dare खेळूया... 
"हा आला लायकी वर नुसतं भेंडी बच्चेचाली"... प्रदीप थोडं चिडून बोलला...
"ऐ तुझ्या आईला तुला नाही खेळायचं ना... मग गप झोप भिकार्या"... केतन
"अबे सोड ना रे काय truth n dare... आपल्या एकमेकां बद्दल सगळंच माहीत आहे.. म आता अजून काय खरं बोलायचं"... हरी
"हे ह्या वेळ्या ला समजवं".... प्रदीप
"हां मग truth सोडा फक्त dare खेळूया"... केतन
"बरं ठिके चालेल... चला खेळूया"... हरी
"तुला खेळायचं आहे की नाही, शेवटचा विचारतोय"... केतन प्रदीप ला विचारात म्हणाला
"हो चल आता काय, खेळूया"... प्रदीप
"बरं पाहिले कोण करणार".... केतन
"कोण करणार ते सोड काय करायचं ते ठरवं आधी.. एवढ्या रात्री करायचं तर करायचं काय".... हरी
"भाई आहे, एक करू शकतो"... केतन
"काय"... ??? प्रदीप आणि हरी दोघही प्रश्नार्थक भावाने केतन कडे पाहू लागले...
"भाई ती पाटची खाली बिल्डिंग आहे ना... त्या बिल्डिंग मध्ये, थेट गच्चीवर जाऊन वरतून हाथ दाखवायचा"... केतन
"अबे हड येडा झालाय का... ??? त्या भूतबंगल्यात, मी नाही हड अजिबात नाही"... प्रदीप
"का फाटली का तुझी'... केतन
"एवढं बोलतोय ना तर स्वतः जाऊन दाखव मग"... प्रदीप
"हो जा तू जाऊन दाखव"... हरी
"हां ठीक आहे, no problem.. मी जातो ना".... केतन
तिघंही घराला ताळा लावून पाटच्या त्या बिल्डिंग जवळ आले, आख्या एरियात या भुताळ बिल्डिंग चे चर्चे होते, लोक दिवसाला पण त्या बिल्डिंग च्या रस्त्याने जायला घाबरायचे... 
त्या बिल्डिंग च्या मागचा इतिहास असा होता की गेल्या २० वर्षा पासून ती बिल्डिंग रिकामी होती, तिथे कोणच रहात नव्हतं अस म्हणतात की २० वर्षा पूर्वी त्या बिल्डिंग च्या गच्चीवर एक लहान मुलाचं शव भेटलेलं, तो मुलगा कोण होता... त्याच्या शव त्या गच्चीवर कसं आलं ते आज पण लोकांसाठी मोठा प्रश्न होता, या घटने नन्तर तिथं रहाणाऱ्या लोकांना नेहमी भास व्हायचं की तो पोरगा गच्चीवर खेळतोय, कधी पायऱ्या चढताना लोकांना असं वाटायचं की कोण तरी त्यांचा पाटी आहे... ह्याच सगळ्या करणा मुळे एक दिवस तितले सगळे लोक घर सोडून निघून गेले आणि.. परत तिथं कोण रहायला आलं नाही....
केतन, प्रदीप आणि हरी ला ही हे माहीत होतं, हे सगळं ते ऐकून होते पण ही अफा आहे की खरं हे कोणाला ठाऊक...
ठरल्या प्रमाणे केतन बिल्डिंग च्या आत शिरत होता तेव्हाच हरी बोलला...
"केतन मला असं वाटतंय की राहूदे.. चल परत जाऊया"... हरी
'काय यार तू पण घाबरतो, घाबरू नको"... केतन
"याला ना हरी सोड जाऊदे याला, काय झालं तर कळेल याला"... प्रदीप
"तू गप रे"... केतन प्रदीप ला बोलला...  
"काय नाय होणार रे भावनो"... केतन
केतन निडर होऊन बिल्डिंग च्या आत मध्ये शिरला... १५ मिनटं झाले पण केतन चा काय पत्ता नव्हता, हरी आणि प्रदीप ला भित्ती वाटायला लागली, हरी सारखा प्रदीप ला फोन लावत होता, पण केतन चा फोन लागतच नव्हता
"भाई माझी जाम फातेय... seriously, मी आधीच याला बोललो होतो नको... पण ना"... प्रदीप घाबरत बोलत होता...
हरी चे तर हाथ पाय थंड झाले... पण तरी हरी हिम्मत करत बोलला... 
"भाई आपला मित्र आहे, आत नक्की काय झालं ते माहीत नाही, पण जवळ पास अरध्या तासच्या वर झालं... आपण आत जाऊन पाहूया'... हरी
"भाई पागल आहेस का... चार माळ्या ची बिल्डिंग आहे,  कुठे कुठे शोदशील"... प्रदीप
"ते काय पण असो आधी आत जाऊया मग ठरवूया काय ते"..... हरी
हरी आणि प्रदीप खूप घाबरलेले पण... आपल्या मित्रा साठी दोघही हिंमत करून बिल्डिंग च्या आत शिरले... बिल्डिंग च्या आत चा वातावरण खूपच थंड होता... इतका थंड की हरी आणि प्रदीप चे हाथ पाय गारठले... बिल्डिंग च्या आत मध्ये खूपच अंधार होता... प्रदीप आणि हरी दोघांनी आप आपल्या मोबाईल च्या torch चालू केल्या... आणि पायऱ्या चढाईला सुरवात केली... 
हरी पुढे चालत होता आणि प्रदीप त्याच्या मागे, दोघही जशे जशे वर जात होते तशी थंडी वाढत जात होती... हळू हळू केतन ला हाक मारत मारत दोघ पण दुसऱ्या मजल्यावर पोचले.. तेव्हाच अचानक प्रदीप च्या हातातून मोबाईल सटकून खाली पडला... प्रदीप दचकला आणि लगेच मोबाईल उचलायला खाली वाकला... पण जसाच प्रदीप उठला, समोर बघतोय तर कोण नव्हतं... हरी जणू त्याच्या नजरेच्या समोरून अदृश्य झाला, प्रदीप घाबरला.. तो मोबाईल चा उजेडात हरी ला शोधू लागला, प्रदीप खूप घाबरला होता आणि थंडी चा प्रमाण वाडत जात होता, प्रदीप जोर जोराने केतन आणि हरी ला हाक मारत होता, पण वाडत्या गारवा मुळे प्रदीप ला स्वाश घ्यायला जमत नव्हतं, त्याच्या आवाजही निघत नव्हता.... प्रदीप तरी हिम्मत करून पुढे चालायचा प्रयत्न करत होता.... तेव्हाच
प्रदीप ने बघितलं की समोरून एक चेंडू म्हणजेच लहान पोरांचा खेळण्याच्या बॉल... टप टप टप... असं आवाज करत प्रदीप च्या जवळ टप्पा खात येत होता, हे बघून प्रदीप घाबरला आणि जोरात ओरडला... प्रदीप पाटी पुढे काही न बघता... धावत धावत पायऱ्या चढत... गच्चीवर पोचला आणि जोरात गच्ची च्या दरवाजा वर आपटलागेला आणि तो तिथंच बेशुद्ध होऊन खाली पडला.....
प्रदीप बेशुद्ध होऊन खाली पडला, तेव्हाच बाजूने एक हाथ प्रदीप च्या जवळ आला... प्रदीप ला त्या हाताचा स्पर्श होताच तो दचकून उठला आणि जोरात ओरडला... तेव्हा हरी त्याला शांत करत म्हणाला...
'प्रदीप, प्रदीप मी आहे मी,हरी".... हरी
हरी ला समोर बघून प्रदीप शांत झाला... प्रदीप नि लगेच हरी ला मिठी मारली, पण तेव्हाच लगेच प्रदीप ची नजर केतन वर पडली... प्रदीप दचकून लांब गेला...
"तू खरच हरी आहेस ना"... प्रदीप
"अरे हो भेंडी मी हरी आहे काय झालं भाई"... हरी
मग साल्या हरामी, निर्लज... मधीच गायब होऊन तू इथे कसा पोचलास वरतून हा केतन इथं, भेंडी तुम्हाला माहित नाही माझी किती बेकार फाटली... प्रदीप नुसताच थरथरत बोलत होता...
"अबे तुझी सोड इथं माझीच बेकार फाटली आहे"... केतन
केतन चा आवाज ऐकून हरी ने लगेच मागे वळून पाहिलं... समोर बघतोय तर केतन उभा होता, केतन ला बघून हरी च्या मनात शंका जागृत झाली, तेच नव्हे पण त्याला खूप भीती वाटायला लागली....
हरी च्या मनात सारखे प्रश पडू लागले की केतन इथं कसा पोचला....
"तू तर भेंडी गप बस साल्या हे सगळं तुझ्या मुळे झालं आहे, चांगलं घरी झोपलो असतो आपण पण तुला ले खाज होती काय तरी खतरनाक करायची"... प्रदीप
"तू बरोबर बोलास प्रदीप आपण खरच चुकी केली इथं येऊन"... केतन
हरी अजून पण केतन समोर संशय ने बघत होता... पण तरी त्याने मनात काय तरी ठरवलं आणि केतन कडे दुर्लक्ष केलं...
"आधी शांत व्हा, आणि नीट ऐका आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाहीये, काहीही झालं तरी सकाळ परंत इथंच बसून रहाऊया, आता जे होईल ते सकाळी बघू"... हरी
"हो भाई तेच"... केतन
"मला आधी सांगा की तुम्ही दोघ इथं वरती कशे पोचले'... प्रदीप
"तू शांत हो रे प्रदीप, सगळं सांगतो तुला पाहिले शांत हो"... हरी
तिघंही पाण्याच्या टाकी जवळ येऊन बसले... रात्रीचे २:३० वाजले होते, तिघांच्या मोबाईल ला अजिबात network नव्हता, तिघंपण आपआपल्या मोबाईल च्या torch चालू करून बसले होते... 
                                                                                         ★
प्रदीप ,केतन आणि हरी तिघं पण एक मेकां पासून लांब लांब त्रिकोण आकारात बसले होते, तेच हरी त्यांच्या समोर बसून बोलत होता... प्रदीप आणि केतन अगदी शांत पणे ऐकत होते...
"भाई सांग आता तुम्ही दोघ वरती कशे पोचले"... प्रदीप अगदी घाबरत बोलत होता, त्याच्या आवाजातून भीती स्पष्ट कळून येत होती......
हरी ने बोलायलं सुरवात केली...
"भेंडी पयले चे दिवस पण काय दिवस होते ना भाई... बिलकुल पण टेन्शन नव्हतं च्या मायला आता नुसतं डोक्याची किर किर होत असते, हां ना रे.... काय झालं केतन बोल काय तरी".... हरी
केतन हरी कडे पाहू लागला... पण तो काहीच बोलला नाही
"अरे शांत का बसला आहेस बोलना... केतन, चल प्रदीप तू तरी बोल... अबे काय तुम्ही लोकं पण ना नुसतं येड्यावणी घाबरता, अरे काय भूत भीत नाहीये इथं, अबे कशाला घाबरताय... मी आहे ना"..... हरी
"च्या आईला केतन तुझी तर नुसतच फाटली आहे, भेंडी सोड अबे तो किस्सा आठवतो का एक वर्षा आधी... काय मज्जा केलती रे भाई आपण".... हरी
हरी मुद्दाम कायचं काय बोलत होता, हरी ला केतनला बघून शंका वाटत होती म्हणून तो सारखा केतन ला बोलण्यासाठी भाग पाडत होता.... 
"केतन बोलना रे भाई"..... हरी
हरीचं बोलणं... केतन आणि प्रदीप ला कळत नव्हतं, तो असा का बोलतोय त्यांना ह्याची अजिबात ठाऊक नव्हती....
"ए हरी तू ठीक आहेस ना भाई हे सगळं काय बोलतोय... नीट बोलना, तुझं असं बोलणं ऐकून माझी अजून फटायला लागलीय भाई"... प्रदीप
"भाई मी आहे ना तू घाबरू नको"..... हरी
केतन हरी वर संशय घेत बोलला "आधी तू सांग ना... की तू प्रदीप ला सोडून कुठे गायब झाला होता"..... केतन
केतन चे अशे शब्द ऐकून प्रदीप केतन पासून थोडा लांब झाला... हे बघून हरी बोलला...
"मी कुठे गायब नव्हतो झालो मी तितच होतो आधी तू सांग तू इथं कसा आलास".... हरी
यावर प्रदीप ने पण हरी चा साथ दिला आणि केतन वर बोलण्यासाठी जोर टाकला....
केतन ने घाबरत घाबरत हळूच बोलायला... सुरवात केली
"जसाच मी बिल्डिंग च्या आत शिरलो मी दुसऱ्या माळ्या परंत नीट पोचलो, आत मध्ये शिरताच मला खूप थंडी वाजत होती तरी, त्यावर दुर्लक्ष करून मनाला शांत ठेवण्यासाठी मी गाणे म्हणत पुढे चालत होतो... पण मी जसाच दुसऱ्या मजल्यावर पोचलो माझा मोबाईल आपोआप बंद पडला.... मी घाबरलो आणि फटाफट मोबाईल परत चालू केला आणि जसीच मी मोबाईल ची बॅटरी परत चालू केली... माझ्या जीवात जीव आला"... 
"त्यांनतर मी जसाच पुढे पाऊल टाकला... मला हळूच कानात आवाज आला"...... "uncle"
"आवाज ऐकताच मी घाबरलो, माझ्या कपाळाला घाम फुटला, घाम सरकून माझ्या डोळे परंत पोचताच जणू तितल्या तिथं घाम बर्फ़ा वाणी जमलं... आणि परत थंडी चा प्रमाण वाढायला लागला... मी आखा गारठलो... तेव्हाच समोरून एक बॉल माझ्या जवळ टप्पा खात येत होता... मला असं वाटत होतं जशे माझे पाय जाग्यावर चिपकले आहेत... मला पुढे पाऊल टाकताच येत नव्हतं"....
"तो बॉल पुढे पुढे येत थांबला... आणि एका क्षणा साठी सगळं शांत झालं... आणि मग अचानक जोरदार वेगाने... माझ्या नजरे समोरून एक लहान मुलगा पळत गेला... तो मुलगा ज्या गतीने माझ्या समोरून तो बॉल उचलून निघून गेला... की मला एका क्षणा साठी काहीच कळलच नाही.. मी तिथून हलायचा प्रयत्न करत होतो... पण माझे पाय पुढे पाऊल टाकायला उठतच नव्हते, तेव्हाच माझा मोबाईल वाजला... मी फोन मध्ये बघितलं तर unkown number असं दाखवत होतं"... 
"त्या क्षणाला मला तो call recieve करायला ही भीती वाटत होती.. पण मी जसा तसा देवाचा नाव घेत फोन उचलला... आणि घाबरतच हळूच बोलो"...
"Hello... hello कोण"....
समोरून एका लहान मुलांचा आवाज आला... "uncle माझ्यासोबत खेळणार का".....
"मी ते आवाज ऐकून दचकलो... तसाच मला पाटून कोणी तरी ढकल आणि मी खाली पडलो'....
केतन बोलता बोलता शांत झाला... आणि हरी कडे पाहू लागला...
"मग... भाई पुढे काय झालं"... प्रदीप भीती मुळे अगदी थरथरत म्हणाला
"पुढे काय झालं मला नाही माहीत जेव्हा माझे डोळे उघडले मी इथं गच्चीवर होतो... मी इथं कसं आलो मला काहीच माहीत नाही".... केतन
हरी केतन समोर अजूनही संशय ने बघत होता....
"भाई मी खरं बोलतोय... माझ्या वर विश्वास करा"... केतन
"मी कसा विश्वास करू तुझ्यावर"....????  हरी थोडं रागात बोलला
हरी चे अशे शब्द ऐकताच प्रदीप ची नजर वळून हरी वर थांबली... 
"भाई असं का बोलतोय"... ??? प्रदीप ने हरी ला विचारलं
हरी एकदम शांत नजरेने केतन च्या समोर बघत होता.... आणि मग बोलला....
कारण जेव्हा मी आणि प्रदीप तुला शोधण्यासाठी बिल्डिंग च्या आत आलो तेव्हा आम्ही दुसऱ्या मजल्यावर बरोबर पोचलो, पण जसाच आम्ही दुसऱ्या मजल्यावर पोचलो माझी नजर तुझ्यावर पडली केतन, तू दुसऱ्या मजल्यावर खाली बेशुद्ध होऊन पडला होता... मी लगेच तुझ्या जवळ आलो आणि तुला उठवायचा प्रयत्न कारालागलो... मी तेव्हाच प्रदीप ला हाक मारली पण प्रदीप ने काही उत्तर दिला नाही... मी प्रदीप ला बाघण्यासाठी मागे वळलो, पण जसच मी मागे वळून पाहिलं प्रदीप पण तिथं थांबून जोरजोरात माझ्या नावाने बोंबलत होता... 
मी प्रदीप ला हाक मारत होतो... हा प्रदीप मी आहे इथं घाबरू नको पण, भौतेक प्रदीपला मी दिसत नव्हतो, तेच नाही पण त्याला माझा आवाज ही ऐकू येत नव्हता... मी तिथून उठायचा प्रयत्न केला पण मला असं वाटत होतं की माझे पाय तिथंच स्तंब झाले आहेत, मला उठायलाच जमत नव्हतं... तितक्यात मी पाहिलं की प्रदीप माझ्यासमोरून धावत वरती निघून गेला... मला असं वाटलं की तो काय तरी बघून घाबरला... 
ते बघून मी अजून घाबरलो आणि केतन ला उठवायचा प्रयत्न करत होतो तेव्हाच समोर... मी काय वेगळाच दृश्य पाहिलं....
"काय पाहिलं"...  प्रदीप अगदी भीती भरलेल्या आवाजात बोलला.... 
हरीला प्रदीपच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती...  हरी ने परत बोलायला सुरवात केली...
मी  समोर पाहिलं की..... समोर पायऱ्या चळत एक बाई येत होती, तिच्या सोबत एक लहान मुलगा होता जवळ पास ५ ते ६ वर्षा चा असेल तो... त्या मुलाने त्या बाईचा हाथ धरला होता... दोघे पण खूप खुश वाटत होते... ते लोकं माझ्या समोरून दाव्याबाजूच्या घरात शिरले... 
मी जे पाहत होतो मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता... मी त्या घरा समोरच बघत होतो, एका क्षणा साठी सगळी कडे शांतता पसरली... आणि मग थोड्याच वेळे नन्तर तो छोटासा मुलगा धावत बाहेर आला, तो मुलगा माझ्याच जवळ पळत येत होता, जसाच तो माझ्या अगदी जवळ आला, मी त्याला घाबरून खाली वाकलो, पण तो जणू माझ्या आतून शिरून बाहेर पडला.... आणि धावत वरच्या मजल्यावर गेला...
असं वाटत होता की तो कोणाला तरी घाबरून पळत होता... मला काहीच समजत नव्हतं की काय चालय, पण अचानक मला माझे पाय मोकडे वाटायला लागले मी लगेच जग्यावरून उठलो आणि... केतन ला उठवायचा खूप प्रयत्न केला, पण तो शुद्धीत नव्हता, मग मी त्याला खेचून एका बाजूला आणलं आणि भिंती ला टेकून त्याला बसवलं... मग मी तुला बघण्यासाठी वरती आलो प्रदीप...
मी तूला हाक मारत मारत वरती गच्चीवर पोचलो... आणि तिथं येऊन बघतोय तर तू बेशुद्ध होऊन पडलेला....
आणि मग मी तुला उठवलं आणि तू मलाच बघून घाबरलास.... हरी प्रदीप कडे बघत बोलला....
हरीचं बोलणं संपल्यानंतर, प्रदीप केतन कडे शंके च्या नजरे ने पाहू लागला... तेच हरी ही केतन समोर संशयजनक नजरेने पाहत होता...
"ऐ तुम्हाला काय झालं यार तुम्ही दोघही अशे का बघताय माझ्यासमोर"... केतन
"मग सांग तू वरती कसा पोचलास, मी तर तुला तिथं बसवून आलतो, मी जेव्हा वरती आलो तेव्हा इथं फक्त प्रदीप होता मग तू अचानक कसा काय आलास"... हरी अगदी रागात... व चिडून बोलत होता
"हरी आणि प्रदीप पुढे पुढे चालत जात होते.. तेच केतन त्यांना पुढे येताना बघून मागे मागे सरकत होता... मागे मागे सरकताना केतन अचानक त्याच्या जागेवर खाली मान टाकून थांबला"... 
हे बघून हरी आणि प्रदीप पण तिथंच शांत थांबले.... 
केतन तोंडातच काहीतरी बोलत होता... प्रदीप आणि हरी ला खूप भीती वाटायला लागली वातावरणात एकदमच बद्दल आला, थंडी चा प्रमाण ही परत वाढला.... 
हरी ने तरी हिम्मत केली आणि हळूच केतन ला... आवाज दिला केतन.. केतन
तसाच पातून जोरात आवाज आला... "हरिरीरीरी".....
हरी आणि प्रदीप तसेच पाटी वळले... पाहताय तर काय केतन तिथं त्यांच्या समोर उभा होता... केतन ला अस समोर बघून प्रदीप आणि हरी विचारात पडले, हरी चा संशय खरं पडला, प्रदीप ला काहीच समजत नव्हतं
हरी आणि प्रदीप परत पाटी वळले... तर तिथं कोण नव्हतं
इथून केतन हरी आणि प्रदीप च्या जवळ आला... प्रदीपला केतन ला पाहून अजूनही भीती वाटत होती, केतन ने लगेच हरी ला मिती मारली आणि रडत म्हणाला...
"भाई हे सगळं माझ्यामुळे झालाय... खूप मोठी चूक झाली यार, खूप मोठी चूक झाली"... केतन
"मित्रा रडू नकोस जे हवायचं होतं ते झालं आता फक्तं एक विचार करा इथून बाहेर कसं पडायचं"... हरी
"हरी मला तर काहीच समजत नाहीये.... केतन हा आहे तर ती कोण होता जो आधी आपल्यासोबत होता"....??? प्रदीप
"हाच केतन आहे मला आधीच त्याला बघून वाटलंच होतं"... हरी
"पण भाई हे नक्की चालय काय, तो होता कोण मग"... प्रदीप
"भाई मला तर काहीच कळत नाहीये, मी तर इथं येऊन चूक केली आणि तुम्ही पण माझ्यामुळे फसले"... केतन
"भाई मला थोडं थोडं कळतंय... तो जो आपल्या समोर केतन बनून थांबला होता, तो... तो लहान मुलगा होता, तो खेळतोय आपल्यासोबत"... हरी
त्याच क्षणी गच्चीचा दरवाजा... जोरात वाजला आणि बंद झाला, आपोआप कुलूपही लागला बाहेरून, हे बघून तिगही पळून दार उघडण्याचा प्रयत्न करू लागले, पण काहीच फायदा नव्हता दार उघडत नव्हता...
"आपण मजबूत अडकलाय इथं... आता इथून बाहेर कसं पडायचं".... केतन
"इथं जे काय आहे ते आपल्याला असच बाहेर पडू देणार नाय, खेळतोय तो आपल्यासोबत".... हरी
"खेळतोय अबे मजाक आहे का... आपण काय खेळणं वाटलो त्याला"..... प्रदीप अगदी चिडून बोलला
"भौतेक हो, आपण खरं तर इथं येऊन त्याला जागृत केलय... मला जसं खाली दिसलं त्याच्या हिशोबाने तो आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो"... हरी
"पण काय"..... केतन
"हे आपल्याला शोधावं लागणार.... भौतेक तेव्हाच आपल्याला यातून बाहेर पडायचा काय मार्ग भेटेन"..... हरी
"पण आपल्याला कळणार कसं"... केतन 
केतन बोलत बोलत प्रदीप च्या जवळ गेला... तसाच प्रदीप केतन ला घाबरून लांब झाला आणि हरीच्या बाजूला येऊन थांबला...
"अरे तुला काय झालं... असं का नाचतोय".... केतन
"गप तू भेंडी आधीच मला कळत नाहीये की तू कोण आहेस... साला केतन समजून तुझा बाजूला उभा रऱ्हाईन मी आणि नंतर कळणार की तूच तो छोटा भूत आहे... आणि माझा खेळ करून टाकशील".... प्रदीप अगदी रागात बोलत होता....
"प्रदीप शांत हो"... हरी प्रदीपला समजून सांगायला लागला...
"भाई तू घाबरू नकोस".... केतन
"ऐ हरी भाई इथून आता बाहेर कसं निघायचं".... प्रदीप
हरी डोक्यावर हाथ ठेवून विचार करू लागला.... तेव्हाच त्याला काहीतरी आठवलं आणि तो बोलला... 
"प्रदीप मला सांग या बिल्डींग चा तो जो तू किस्सा ऐकलेला".... हरी ने प्रदीप ला विचारलं
ह्यावर केतन बोलला... "भाई किस्से तर मी पण खूप ऐकले आहे इथले".... 
"हो मग सांग मला काय आहे इथली मेन story".... हरी
"उमम्म्म... तेच की २० वर्षा पूर्वी इथं या गच्चीवर एका लाहान मुलाचा शव भेटला होता, आणि मग त्या नंतर लोकांना इथं त्याच्या असण्याच्या भास होऊ लागला... म्हणून मग लोकं इथून घर सोडून निघून गेले".... प्रदीप
"बरोबर.... हे तू बरोबर बोललास, पण काय तरी आहे जे लोकांना कधी कळलं नाही"..... हरी
"काय".... ???? केतन आणि प्रदीप एकदम प्रश्नारथक भावाने हरी समोर पाहत होते...
"बघ लोकांच्या हिशोबाने एक लहान मुलांचा मृत शरीर इथं सापडलं, बरोबर".... हरी
"हा बरोबर"... केतन आणि प्रदीप हरी च्या बोलण्यात सहमती देत बोलले
"आणि लोकं म्हणतात की त्या मुलाचा या बिल्डिंग सोबत काहीच वासता नव्हता... right, तेच नाही तो त्या मुलाचा मृत शरीर इथं कसं आलं तो कोण होता हे सगळं गुपित रहायलं"..... हरी
"हो बरोबर... पण हे तर आम्हाला पण माहीत आहे, यात नवीन काय... हे सगळं आम्ही पण लहानपणापासून ऐकतोय"... केतन
"हा तेच".... प्रदीप
"हो बरोबर... पण भाई मला वाटतं की त्या लहान मुलाचा या बिल्डिंग सोबत काय तरी संबंध आहे"... हरी
"म्हणजे तुझं म्हणं काय आहे"... प्रदीप
"मला असं म्हणायचं आहे की, तो मुलगा याच बिल्डिंग मध्ये रहात असेल... त्याच्या नक्कीच या बिल्डिंग सोबत किंवा इथं रहाणाऱ्यान सोबत काही तरी संबंध आहे"..... हरी
"हे तू कसं म्हणुशकतो"....??? केतन
"करण जेव्हा मी दुसऱ्या माळ्यावर फसलो होतो तेव्हा मी त्या लहानमुलासोबत एका बाईला पाहिलं, भौतेक ती त्याची आई असणार आणि तेच नाही मी त्यांना दाव्याबाजूच्या एका घरात शिरताना बघितलं.... म्हणजे नक्कीच त्या घरा सोबत त्या मुलाचा काय तरी संबंध आहे"..... हारी
"तू बरोबर बोलतोय"... प्रदीप
"तेव्हाच भेंडी, आधी ठीक होतं सगळं पण जेव्हा मी दुसऱ्या माळ्यावर पोचलो माझ्यासोबत ते सगळं घडलं आणि मी बेशुद्ध झालो"... केतन
"हा बरोबर हरी, आपल्यासोबत पण तसच झालं, आपण पण दुसऱ्या माळ्यावर आलो तेव्हाच ते सगळं झाला... तू अचानक माझ्या नजरे समोर असून मला दिसत नव्हतं आणि पण केतन तिथं बशुद्ध झाला, वरतून मला पण तितच तो बॉल दिसला आणि पहिल्यांदा भास झाला काही तरी असण्याचा"... प्रदीप
"तेच... त्या मुलाचा शव भले इथं भेटलं असेल पण तरी, त्या घरासोबत नक्कीच काय तरी त्याचा संबंध आहे"... हरी
"हो पण आता करायचं काय"... केतन
"हे तर आता त्या घरात गेल्यावरच कळणार".... हरी
"ऐ नाही बस भेंडी आधी या केतन ची सटकली, आता तुझी सटकली आहे हरी... भेंडी तुम्ही दोघ ना"... प्रदीप
"बघ आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाहीये"... हरी
"अरे तू येडा आहेस का.... खाली जाऊन जीवावर रिस्क घ्याचा म्हणतोय"... प्रदीप
"इथं येऊन आधीच आपण आपला जीव रिस्क मध्ये टाकलं आहे"... हरी
प्रदीप शांत झाला व हरीही शांत झाला... तिघं पण मानातल्यामनात काय करावे हे विचार करत होते, इथे येऊन त्यांची खूप मोठी चूक झालीय हे ते तिघांना आधीच चांगलं समजलं होतं....
केतन ने मोबाईल मध्ये time बघितला.... व बोलला...
"भावनो मी काय बोलतोय बघा ४:३० होऊन गेलेत, बस काही वेळेनंतर आता सकाळ होईल... मग कशाला काय करायचं एकदा सुर्या चा प्रकाश पडला की आपण शांत पणे निघून जाऊया इथून"... केतन
"हा हे बरोबर आहे हरी... इतच थांबुया, केतन बरोबर बोलतोय"... प्रदीप
हरी ने पण विचार केला की चल ठीक आहे... आणि तो ही शांत होऊन खाली बसला... 
आता तिघं पण सकाळ होण्याची वाट पाहत होते... प्रदीप सारखा मोबाईल मध्ये time बघत होता, वेळ जणू जागच्या जागी थांबून रहायला आहे... असं वाटत होतं की घड्याळाचे काटे पुढे जाताच नाहीये
जशे तशे ५:०० वाजले, वातावरण खूप शांत होता, गार असा थंड वारा चालू होता, वरती आकाशात पाहता पाहता, तिघांना कधी झोप लागली त्यांना काय कळलंच नाही... तिघं एका एका कोपऱ्यात शांत झोपून गेले...
तेव्हा हरी ला एक वेगळाच ड्रीश्या दिसला... हरी ने बघितलं की तो छोटा मुलगा त्याचा आई सोबत खेळतोय.... खूप जोराने हसतोय, त्याची आई पण खूप खुश होती तो तिच्या आईचा हाथ पकडून रस्त्यावर उड्या मारत मारत चालत होता.... अस करत करत तो आणि त्याची आई बिल्डिंग मध्ये शिरले, आत शिरतानांच त्याच्या आईने त्याला तोंडावर बोट ठेवून त्याला शांत रहाण्याचा इशारा केला... दोघे पण खूप खुश दिसत होते, हळू हळू दोघे पायऱ्या चडून वर दुसऱ्या माळ्यावर पोचले.. आणि त्याच दाव्याबाजूच्या घरात गेले.... काही क्षण नंतर तो मुलगा जोरात धावत धावत.... गच्चीवर आला, तो मुलगा रडत होता खूपच घाबरलेला तो.... तो मुलगा येऊन गच्चीवर एका कोपऱ्यात लपला...
हरी हे सगळं बघत होता... आणि तितक्यात त्याच मुलाने जोरात हरी ला हाक मारली.... "uncle"
आणि हरी घाबरून उठला.... हरी लांब स्वाश घेत बोलला.. "नशीब स्वप्न होता"
हरी ने नजर फिरवून सगळी कडे बघितलं... आकाशात चांदण्या चम चम करत होते, रात्री चा अंधार होता हरी ने झटकन त्याचा मोबाईल काडला... त्यात जेव्हा त्याने time बघितला तो थक्क झाला, तो मोबाइल मध्येच बघत रहायला, हरी विचारात पडला.... त्याला काय सूचत नव्हतं की काय करावं....
हरी ला सारखा त्या मुलाचा चेहरा दिसत होता, हरी च्या अंगाला काटे फुटले... त्याला खुप भीती वाटत होती त्याने त्याच्या आजूबाजूला बघितलं, केतन आणि प्रदीप गार झोपेत होते... हरी ने झटकन दोघांना उठवलं
"अरे काय सकाळ कुठे झाली आहे अजून"... केतन
"सकाळ नाही भेंडी उठ परत रात्र झाली"... हरी
हे ऐकून प्रदीप आणि केतन झटकन उठले...  हरी ने दोघांना सर्व प्रकरण समजवलं, प्रकरण ऐकून प्रदीप आणि केतन ची भीती ने अजून वाट लागली, दोघ पण घामाघूम झाले....
"ऐ हरी तू नीट बघ ना यार तुझा मोबाईल बिगडला असेल".... प्रदीप अगदीच कंटाळून बोलला
"ठीक आहे मग तुझ्या मोबाईल मध्ये बघ, अरे फक्त वेळ नाही तारिक पण बदली आहे, काल रात्री जेव्हा आपण आलो तेव्हा २६ तारिक होती आणि आता बघ २७ तारिक दाखवत आहे".... हरी
"हो हरी... माझ्या मोबाईल मध्ये पण तेच"... केतन
"ऐ मग आता काय करायचं"...??? प्रदीप
"नक्कीच इथं जे काही आहे त्याने अपल्याला अडकवून ठेवलं आहे, इथं नक्की काय तरी विचित्र घडलं आहे जे लोकांना माहीत नाही आणि त्याचाच आपल्याला आता शोध लावावं लागणार"...... हरी
"तुला येड लागला आहे का... परत तू आता म्हणशील खाली जाऊन बघूया"... प्रदीप
तेव्हाच अचानक थंडी चा प्रमाण परत वाढायला लागला, तिघं ही खूप घाबरले, तेच थंडी ने त्यांचे हाथ पाय सुन्न पडत होते, तिघांना ही स्वाश घ्याला जमत नव्हतं... तेव्हाच गच्ची च्या ऐका कोपऱ्यातून तोच बॉल जे प्रदीप ने दुसऱ्या मजल्यावर पाहिलं होतं ते.. तसच टप टप टप्पा खात पुढे येत होता...
तिघंपण आपल्या जागेवरून उठले आणि एकमेकांच्या बाजूला येऊन थांबले, तिघांनाचा लक्ष त्या बॉल वर होता, तिघं पण एकटक त्या बॉल ला बघत होते.... केतन ने अचानक त्याच्या दाव्याबाजूला पाहिलं आणि पाहताच तो जोरात ओरडला... 
प्रदीप... केतन ने प्रदीप ला जोरात पुढे ढकलला आणि स्वतः ही मागे झाला, आणि त्याच क्षणी वरतून बर्फाचा एक मोठा तुकडा बरोबर हरी च्या पाया जवळ येऊन पडला....
प्रदीप खूप घाबरला, तिघांची अगदी अवस्था झाली होती....
हरी पण खूप घाबरला तो बरवाफा चा तुकडा हरीच्या पायाजवलच पडला.... हरी भीती ने थरथरत बोलला
"मी बोलतोय तुम्हाला आपण खाली जाऊया, तिथूनच काय तरी कळेल आपल्याला"... हरी
"हरी हे तिथं जाण्यात खूप रिस्क आहे... जीव पण जाऊ शकतो"... केतन
"नाही... जीव नाही जाणार"... हरी
"तूला कसं माहीत, तुला काय त्या मुलाच्या आत्मने हे सगळं कानात येऊन सांगितलं आहे का"... प्रदीप
"अरे समझ ना यार, जर जीव घ्याचा असला असता तर तो आपल्याला इथं अडकवून का ठेवेन त्यांनी कधीच आपला जीव घेतला असता, आपण कालची रात्र इतच झोपून काढली पण आपल्याला काही झालं नाही, तो फ़क्त आपल्याला काही तर संकेत द्यायला इच्छितोय"... हरी
"जर असच आहे तर मग मी जातो हरी खाली आणि बघतो काय आहे... तसं पण हे सगळं माझ्यामुळे सुरू झालं आहे"... केतन
"गप रे तू, काय सारखा रडतोय माझ्यामुळे माझ्यामुळे, खेळ आपण एकत्र चालू केला ना चल मग आता त्याला एकत्र संपवूया".... हरी
"हो ते सगळं ठीक आहे भाईलोग... पण खाली जायचं कसं गच्चीचा दार तर बंद आहे".... प्रदीप
प्रदीपचं बोलणं जस संपलं तसच दार अपोआप उघडला गेला... हे बघून तिघं ही थक्क नजरेने एक मेकांसमोर पाहू लागले, प्रदीप आणि केतन ला पण आता खात्री झाली की हरीचं बोलणं बरोबर आहे... आणि मग तिघं ही हिम्मत करून देवाचा नाव घेऊन खाली उतरले....
तिघं पण खाली दुसऱ्या माळ्यावर पोचले, वातावरण मध्ये परत बदल झाला, थंडी चा प्रमाण परत वाढला, पण तरी ते लोक हिम्मत करत पुढे त्या घरा समोर येऊन थांबले, त्यांनी पाहिलं की त्या घराला टाळा लागलेला....
"हरी भेंडी आता".... ???? प्रदीप
"भाई आता काय टाळा तोडून टाकूया, चल काय तरी शोध, जेने करून टाळा तुटेल"... हरी
केतन इथं तिथं नजर फिरवत होता, तेव्हाच त्याला समोर एक लोखंडाचा रॉड दिसला, त्याने लगेच तो रॉड आणला... आणि टाळा तोडला...
टाळा तुटताच तिघं पण एक मेका समोर पाहू लागले, मग हरी ने देवाला हाथ जोडून नमस्कार केला आणि हळूच तो टाळा काडून बाजूला ठेवला आणि दाराचा कुलूप खोलला... बऱ्याच वर्षाने दार बंद होता म्हणून दार उघडत नव्हता... तेव्हा तिघांनी मिळून जोर लावला आणि दार उघडला... 
दार उघडताच आतून घान वास सुटला, नुसतं ते उंदीर मेल्यासारखा वास येत होता...
हरी ने हळूच आत पाऊल ठेवल... व तो आत आला, त्याच्या पाटी पाटी केतन आणि प्रदीप पण आत शिरले, घराच्या आत मध्ये खूप गारवा होता....
हरी ने मोबाईल काडला आणि torch चालू केली... समोरच्या भिंती वर एकमोठी फोटोफ्रेम होती, त्या चित्रा मध्ये एक बाई खुडचीवर बसलेली होती, आणि तिच्या पाटी एक माणूस थांबला होता.... तिघं पण त्या चित्रा कडे बघत होते
हरी ला तो चित्र बघून आठवलं आणि तो बोलला... "प्रदीप हीच ती बाई आहे जिला मी बघितलं होतं"
हे ऐकून प्रदीप काहीच बोलला नाही आणि भीती वाटत असल्यामुळे शांत रहायला.... 
केतन आणि हरी मोबाइल च्या उजेडात घरात इथं तिथं सगळीकडं बघत होते... पण त्यांना त्या रूम मध्ये काहीही भेटलं नाही, मग ते लोक हळूहळू आतल्या घरात गेले, तिथं आता मध्ये एक मोठा पलंग होता बाजूला एक लकड्याच्या कपाटं होता... 
"केतन इथं बघ काय तरी भेटेन"... हरी
केतन आणि हरी कपाटात शोधत होते तेव्हाच... प्रदीप ची नजर पलंगवर गेली, त्या पलंग वर एक डायरी होती... ते पाहून प्रदीप लगेच बोलला... 
"हरी हे बघ"... प्रदीप
ती डायरी बघून हरी खुश झाला, यात नक्की काय तरी लिहलेलं असणार, आणि ते उपयोगी पडणार अशी हरी ला खात्री झाली
प्रदीप ने ती डायरी उचलली आणि उगढून त्याच्या पहिला पान पलटला... दुसऱ्या पानावर एकदम शुंदर अक्षरात.... "सुरेखा लिहलेलं होता.... सुरेखा"
प्रदीप ने हरी कडे बघितलं... आणि मग वाचायला सुरवात केली....
"पल्लट्या पानांन सोबत आखं आयुष्य पलटून गेलं....
लिहताना मनाची आस, जीवनाचा स्वाश हरवून गेलं"...
स्वतः बदल लिहिणं माझी आवड होती, पण जीवनात बरंच काय असं घडलं की सगळी आवड मात्र आवड म्हणून रहायली, पण आज परत एकदा मला लिहावंसं वाटय... 
खूप खुश आहे मी, असं झालं होतं की जगायची मनात ईच्छाच उरली नव्हती पण आज मन भरून जगावं असं वाटाय... विजय... मी तुझ्या कडून खूप काय लपावलं, बरच काय गुपित ठेवलं... पण ते मात्र माझी मजबुरी होती, तू माझ्यासोबत भांडलास, चिडून निघून गेलास पण मला मनात त्याचा काहीच राग नाहीये, पण मला खात्री आहे की जेवहा तू घरी येशील यश ला बघितल्या नंतर तू तुझा राग विसरून त्याला तुझ्या मिठीत घेशील आणि मग सगळं ठीक होईल....
५ वर्षा पूर्वी माझे लग्न विजय सोबत झाले, विजय पोलीस ऑफिसर आहे... तेच दिसायलाही खूप चांगला आहे, पण त्या वेळी विजय सोबत लग्न करायची माझी बिलकुल पण इच्छा नव्हती, पण बाबांनी मला विजय सोबत लग्न करण्यासाठी खूप आग्रह केल्या नंतर मी फक्त बाबांच्या खुशी साठी लग्नाला हो म्हणलं....
लग्न झाल्यानंतर मी विजय सोबत खूप खुश होती, आणि त्याच्या प्रेमात मी माझ्या जीवनात आधी जे सगळं घडलेलं ते विसरून गेली, बऱ्याच वेळी मला असं मनात झालं की विजय ला सगळं सांगू पण नंतर भीती वाटायची की काय होईल आणि याच भीती मुळे मी विजय ला कधी काय सांगितलं नाही...
सगळं चांगलं चालू होतं, विजय आणि मी खुश होतो... पण मग आमच्यात झगडे हवायला लागले, विजयचं आता माझ्यासोबाय बिलकुल पटत नाही, कारण लग्न होऊन ५ वर्ष झाले पण आम्हाला मुलं नाहीये, आणि हे सगळं माझ्या मुळे...
या साठीच आम्ही भरपूर डॉक्टर कडे फिरलो... खूप टेस्ट केल्या, आणि आज याच टेस्ट मुळे माझं आयुष्य पलटलं, विजय आणि मी डॉक्टर कडे गेलो... डॉक्टर नि सांगितलं की...
"I am Sorry... तुम्हाला कधी मुलं होणार नाही".... 
हे ऐकून यश गडगडीत झाला, त्याच्या डोळ्यात मला दुःख स्पष्ट दिसत होतं... 
विजय या गोष्टीला घेऊन खूप निराश झाला, तेही नाही पण त्यानी माझ्यासोबत बोलणं पण बंद करून टाकलं.... मला विजय ला पाहून खूप दुःख व्हायचं पण काय करू... मला ही मनात खूप वाईट वाटायचं की मी कधी आई होण्याचं सुख नाही मिळवुशकात.... 
दुःखाच्या अश्या परिस्तित मी माझ्या बाबांच्या घरी गेली आणि मी हे सगळं प्रकरणं बाबांना सांगितलं.... माझे बाबा हे सगळं ऐकून खूप दुःखी झाले, त्यांचे डोळे दुःखाने भरून आले... आणि तेव्हा मला बाबांनी यश बद्दल सांगितलं....
विजय माझा दुसरा नवरा आहे, त्याच्या आधी माझे लग्न मकरंद सोबत झाले होते... मी मकरंद सोबत खूप खुश होती, पण नियती ला माझ्या जीवनात काय वेगच घडवायचं होतं, लग्नाच्या ६ महिन्या नंतर मकरंदचा एका कार अकॅसिडेंट मध्ये जीव गेला... यश तेव्हा माझ्या पोटात होता, मकरंद गेल्यानंतर मी मनात विचार केला होता की मी माझ्या बाळासाठी जगणार पण, जेव्हा यशचा जन्म झाला, बाबांनी मला सांगितलं की माझं बाळ मेलेलाच जन्माला आलता, हे ऐकून मी खूप रडली... मला जगायची ईच्छाच नव्हती... मी नेहमी एकटीच बसून रहायची, न कोणासोबत बोलणं न भेटणं... मी बाबांन सोबत पण बोलणं सोडून दिलं होतं... बाबाला माझी अशी अवस्थ बगवत नव्हती आणि त्यांनी माझं दुसरं लग्न करायचं ठरवलं, मी दुसरं लग्न करण्यासाठी तयार नव्हती, पण बाबांच्या खूप आग्रह केल्यावर मी शेवटी विजय सोबत लग्न केलं... 
मला मुलं नाही होउ शकत हे प्रकरण जेव्हा मी बाबांना सांगितलं तेव्हा, बाबांनी माझ्यासमोर एक मोठा खुलासा केला, इतके वर्ष मी ह्या विचारात जगली की माझं बाळ जन्मालाच मेलेलं आलं होतं, पण असं नव्हतं बाबांना माहीत होतं की मी दुसरं लग्न नाही करणार आणि माझं आखं आयुष्य माझ्या बाळा सोबत जगणार... आणि याच कारणामुळे बाबांनी मला सांगितलं की माझं बाळ मेलय... आणि बाबांनी त्याला अनाथ आश्रमात ठेवून दिलं....
हे सगळं कळल्यावर मला खूप राग आला पण या गोष्टीचा आनंद होता की माझं बाळ जिवंत आहे, मी घरी आली आणि इतके वर्ष जे मी विजय कडून सगळं लपवून ठेवलं होतं ते सगळं मी त्याला सांगून दिलं, तेही नाही मी त्याला यश बदल ही सगळं सांगितलं... मला माहित होतं की एकदमच हे सगळं कळल्यानंतर विजयला स्तिर होण्यासाठी वेळ लागेल... त्यादिवशी विजय ने माझ्यावर पहिल्यांदा हाथ उचलला... पण मी काहीच बोलली नाही
त्या दिवसापासून विजय ने माझ्यासमोर बघणं ही सोडून दिलं, विजय २ - २ दिवस घरी पण नाही यायचा, जेव्हा पण तो घरी यायचा नशेत असायचा, त्याला त्याची स्वतःची शुध नसायची... आणि हे सगळं माझ्यामुळे होतं, मला मनात खूप वाईट वाटायचं... मी नेहमी विजय सोबत बोलायचं प्रयत्न करायची पण ते मात्र प्रयत्न म्हणूनच रहायले...
तेव्हाच मग एक दिवस खबर आली की बाबपण मला सोडून गेले.... मी बाबासोबत बोलणं बंद केलं होतं म्हणून बाबांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी माझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं ज्यामध्ये यश बदल सगळी माहिती होती....
यश बदल माहिती मिळाल्यानंतर मी एक क्षण पण उशीर केलं नाही आणि आज मी यश ला घरी घेऊन आली, माझ्या बाळाला माझ्यामिठीत घेतल्यावर मला खूप आनंद झाला... मी खूप खुश आहे... आणि मी देवाला एकाच प्रार्थना करते की देवा असं काय तरी कर की विजय पण यश ला स्वीकार करून घेईल...
"हरी ह्याच्या पुढे पानं कोरे आहेत... पुढं काहीच लिहलं नाहीये".... प्रदीप
"माझा शक सही होता"... हरी
"हो हरी ते ठीक आहे पण आता पुढे काय आपण इथून बाहेर कसं पडायचं"... केतन
"इथं परंत आलोय तर पुढे पण काय तरी होईल"... हरी
तेव्हाच घराचा आखा वातावरणच बदलला, हे बघून प्रदीप, केतन आणि हरी तिघं ही एक कोपऱ्यात येऊन थांबले.... आणि मग त्याने बघितलं की सुरेखा यश सोबत घरात शिरली... सुरेखा खूप खुश होती तसाच यश पण खूप खुश होता सुरेखा यश सोबत खेळत होती...
प्रदीप केतन आणि हरी ला त्यांच्या नजरे समोर आखं दृश्य दिसत होतं, पण त्याचं बोलणं काहीच ऐकू येत नव्हतं....
तेव्हाच मग यश बाहेरच्या रूम मध्ये जाऊन लपला... आणि सुरेखा आतल्या घरात येऊन बेडवर बसली आणि मग तिने डायरी लिहायला शुरवात केली, सुरेख डायरी लिहतच होती की थोड्या वेळेत, दाराची घंटी वाजली आणि सुरेखा झटकन उठून दार उघडायला गेली.... थोड्याच वेळा नंतर सुरेखा विजय चा हाथ धरून परत आतल्या घरात आली.... आणि मग तिथं यश पण आला... 
सुरेखा विजय ला काय तरी सांगत होती.. पण ते सगळं प्रदीप केतन आणि हरी ला काहीच ऐकू येत नव्हतं, भौतेक सुरेखा विजय ला यश बदल सांगत होती... पण विजय खूप रागात होता तेच, तो खूप नशेत होता, विजय ने काहीही विचार न करता सुरेखा चा गळा दाबला... हे बघून यश खूप घाबरला... सुरेखा स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होती, पण ती स्वता ला वाचवू नाही शकली... आणि सुरेखाचा शरीर बेड वर पडला, विजय त्याच्या रागात भयसटला होता, तो अगदीच रागाच्या भरात येडा झाला होता, सुरेखा ला मारल्यानंतर त्याची नजर यश वर पडली, पण जसच विजय यश ला मारण्यासाठी पुढे आला यश विजय ला घाबरून जोरात पळाला... आणि विजय पण यश च्या पाटी पाटी बाहेर पळाला...
हे बघून प्रदीप केतन आणि हरी पण बाहेर पळून आले... हे तिघं पण विजय चा पाठलाग करत वरती गच्चीवर पोचले... तिथं यांनी बघितलं की विजय ने यशाचा पण गळा दाबून ठेवला आहे आणि मग काहीच क्षणात विजय ने यश ला पण मारून टाकलं आणि यश जमिनीवर पडला...
ह्याच्या सोबतच सगळी कड आधार पसरलं, आणि प्रदीप केतन आणि हरी ला समोर तो बॉल टॅप टॅप करत दिसला.... 
हरी ला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं, जे सगळं त्यांनी त्यांच्या डोळ्याने पाहिलं ते काय तरी विचित्रच होतं, तिघांना पण खूप राग येत होता, कोण माणूस एका लहान मुलाला... एका बाईचा जीव कसा घेऊ शकतो, प्रदीप ला तर त्याच्या डोळ्यांवर अजून पण विश्वास बसत नव्हता....
"हरी आता सगळं पाण्यासारखा स्पष्ट आहे आपल्यासमोर... पण आपण अजून इथे अडकून आहे, आपल्याला अजूनही इथून निघायचा मार्ग भेटला नाहीये"... केतन
"हो सगळं स्पष्ट आहे आता, विजय पोलिसवाला होता आणि विजय ला माहीत होतं की सुरेखाच्या पाटी बोलणारं कोण नाहीये, म्हणून त्यांनी काहीही विचार न करता सुरेखा आणि यश ला मारून टाकलं... तो स्वतः पोलीस ऑफिसर होता आणि म्हणूच त्याला कोण पकडू नाही शकलं".... हरी
"हो.... आणि मग त्या नंतर हिते लोकांना नेहमी, यश च्या असण्याचा भास होत असेल म्हणून सगळे इथून घरं सोडून निघून गेले"... प्रदीप
"हे सगळं तर ठीक आहे, पण आता आपण बाहेर कसं निघायचं इथून"... केतन
"त्याचं पण रस्ता आहे"... हरी
'काय आहे"......???  प्रदीप
"बघ लोकांच्या हिशोबाने या बिल्डिंग मध्ये इथं गच्चीवर फक्त यशचं मृत शरीर भेटलं होतं, पण आपण जे दृश्य बघितलं त्यात विजय ने सुरेखा आणि यश दोघांनाही मारलं आहे पण... इथून फक्त यशचं मृत शरीर सापडलं, म्हणजेच याचा अर्थ हे आहे की सुरेखाचा मृत शरीर अजून पण या बिल्डिंग मध्ये असणार... विजय ने नक्कीच ते कुठे तरी लपवलं असणार"... हरी
"पण कुठे... बिल्डिंग मध्ये तो कुठे लपवुशकतो"... प्रदीप
"त्याच्याच घरात"... हरी
"हे कसं शक्य आहे... आपण आताच तर त्या घरात जाऊन आलो, तिथं कुठे काय होतं".... केतन
"मला वाटतं आपण परत जाऊन नीट शोदुया".... हरी
प्रदीप केतन आणि हरी तिघं पण परत सुरेखाच मृत शरीर शोधण्यासाठी साठी त्या घरात गेले... घरात त्यांनी सगळी कडे बघितलं पण त्यांना कुठेच कायभेटलं नाही... तिघं पण शोधून शोधून दमले, तेव्हाच प्रदीप बोलला...
"हरी एक विचार कर आपण इथं आलोय तेव्हा पासून जेव्हा पण आपल्या सोबत काही घडतं तेव्हा थंडी चा प्रमाण आपोआप वाढून जातं"..... प्रदीप
"हां बरोबर"..... हरी
प्रदीपचं हे बोलणं ऐकून तिघं पण एक मेका समोर पाहू लागले आणि मग तिघे पण एकदमच बोलले.. 
"म्हणजे स्वयंपाक घरात"....
तिघं पण स्वयंपाक घरात आले, तिथं समोर एक फ्रिज होता.. त्या फ्रिज ला बघून हरी, प्रदीप आणि केतन समोर बघायला लागला, हरी ला खूप भीती वाटत होती... पण त्याने हिम्मत करून फ्रिज चा दार उघडला... 
हरी ने जसाच दार उघडला खूप घाण वास आख्या घरात पसरला... आणि त्यांनी पाहिलं की त्या फ्रिज मध्ये सुरेखाचा मृत शरीर होतं, सुरेखचा मृतदेह आखं सडलं होतं..... मृतदेह खूपच भयानक दिसत होतं टेच त्याच्या वास मुळे तिघंचा जीव जात होता...
"हरी आता काय करायचं"... प्रदीप तोंडावर हाथ ठेवत म्हणाला...
"मला वाटतं की सुरेखा च्या मृतदेह ला आपण जर अग्नीदिली तर तिला मोक्ष भेटेल, भौतेक याच कारणामुळे तिचा सुटका होत नसेल"... हरी
"मग चल तसं करूया"... केतन
"प्रदीप इथं स्वयंपाक घरात कुठे तरी माचीस असेल बघ आणि केरोसीन वगैरे असेल बघ शोध, आणि केतन तू जा आतल्या घरातून बेडवरची चद्दर घेऊन ये"... हरी
"ठीक आहे भाई"... केतन
"हरी माचीस भेटली आणि हे बघ केरोसीन पण आहे".... प्रदीप
"हरी हे घे चद्दर".... केतन
"चल केतन जरा हाथ लाव"... हरी
केतन आणि हरी ने मिळून सुरेखाचं मृतदेह त्या चद्दर मध्ये लपटून घेतलं आणि तिघं पण सुरेखाच्या मृतदेहला वरती गच्चीवर घेऊन आले....
वरती आणल्यानंतर हरी ने सुरेखाच्या मृतदेह वर केरोसीन टाकलं... आणि मग देवाचं नाव घेऊन तिच्या शरीराला आग लावून टाकली... 
प्रदीप, केतन आणि हरी तिघं पण सुरेखाच्या शरीराला जळताना बघत होते... तेव्हाच त्यांनी पाहिलं समोर सुरेखा उभी होती आणि त्यांच्या मागून यश धावत सुरेखा कडे आला आणि सुरेखा चा हाथ धरला...
सुरेखा ने हसत हसत तिघांच्या समोर बघितलं... यश पण हसून तिघांना बघत होता...
प्रदीप, केतन आणि हरी पण खुश होते.. ते तिघं पण सुरेखा आणि यश ला हसत हसत बघत होते.... 
मग सुरेखा यश ला घेऊन मागे वळली आणि थोडं पुढे चालताच अदृश्य झाली....
आणि मग सकाळ झाली.... अकाक्षात सोन्यासारखा सूर्य उगवला, आणि प्रदीप केतन आणि हरी तिघं पण सही सलामत बिल्डिंग च्या बाहेर आले.... 
तिघांच्या मनात हा किस्सा एक विचार म्हणून स्टिट झाला एक गोड, थोडी भयपट आठवण म्हणून मनातल्या मनात रहायली ह्या प्रकरण बदल त्यांनी कोणाला काहीच सांगितलं नाही, पण आज पण जेव्हा तिघं पण भेटतात तेव्हा आठवतात की त्यांनी त्या दिवशी जे काही केलं त्याच्यामुळे एक मुलगा आणि आई मेल्यानंतरही एक झाले.... 
                                                                        ★
आईचं प्रेम तिच्या बाळा साठी कधीच संपत नाही, जीवनात आई च्या प्रेमापेक्षा कुठलंच प्रेम नाही.....
खोटं बोलणं हे चुकीचं आहे, पण परिस्थिती अनुसार चालणं हे योग्य आहे....
कोणालाच कोणाचा जीव घायचा हक्क नाही, तेच कोणालाही कोणाच्या आयुष्य सोबत खेळण्याचा हक्क नाही...
भीती हे मनाचा भास आहे असं म्हणतात, पण जीवनात भीती असणं ही आवश्यक आहे....
आज जे आपण बोलू किंवा जे काही करू त्याचा परिणाम आपल्याला आज न उद्या फेडावच लागणार...
हर्षद मोळीश्री....

..........................................................................The End ...........................................................................