Dimple Kapadiya- Bold and Beautiful in Marathi Biography by Anuja Kulkarni books and stories PDF | डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल..

Featured Books
Categories
Share

डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल..

डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल..

वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी " (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणारी केलेली एक गुणी अभिनेत्री- डिंपल कपाडिया! एक अत्यंत देखणी मुलगी म्हणून डिंपल कपाडिया यांची ओळख आहे. मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपल यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. त्या कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आल्या आणि समांतर सिनेमांकडे वळल्या आणि त्यामुळेच चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करत राहिल्य.. डिंपल कपाडिया यांनी नायिकेची छबी बदलण्याच महत्वपूर्ण काम केल. बोल्ड अभिनेत्री म्हणून डिंपल ह्यांची ओळख होती. डिंपल कपाडिया यांचे शिक्षण सेंट जोसेफ'स कॉन्वेंट हायस्कूल मध्ये झाले. वडिलांकडे असलेल्या संपत्तीमुळे त्यांचे पालनपोषण वेगळ्या पद्धतीने झाले असे म्हणले जाते. त्यांना ३ भावंडे होते..सिंपल कपाडिया, रीम कपाडिया आणि मुन्ना कपाडिया. ह्यात डिंपल सगळ्यात मोठ्या! सिंपल आणि रिम कपाडिया ह्या दोघी कॉश्चुम डिझायनर आणि नट्या होत्या. सिंपल कपाडिया यांचे २००९ मध्ये कर्करोगाने निधन झाले.

बालपण-

डिंपल ह्यांचा जन्म गुजराती बिझिनेसमन च्या घरात ८ जुन १९५७ ला झाला. चुन्निभाई आणि बेट्टी कपाडिया हे डिंपल ह्यांचे आई वडील. चुन्निभाई आणि बेट्टी ह्यांचा प्रेम विवाह होता अस स्वतः डिंपल एका मुलाखती दरम्यान बोलल्या होत्या. आई वडिलांच्या बद्दल बोलतांना त्या सांगतात, त्यांचे वडील त्यांच्या आईच्या बहिणीला बघायला गेले असतांना त्यांना माझी आई आवडली आणि माझ्या आईच्या प्रेमात पडले..तेव्हा डिंपल यांची आई फक्त १६ वर्षाची होती. दोघांच लग्न झाल्यावर एका वर्षात डिंपल यांचा जन्म झाला. त्याचबरोबर डिंपल हे सांगायला विसरत नाहीत की त्या आईच्या खूप जवळ होत्या पण वडिलांची मात्र त्यांना भीती वाटायची. त्यांचे वडिलोपार्जित घर सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या चोटीलामध्ये आहे. डिंपल यांचे बालपण चोटीलामध्ये स्थित याच घरात गेले. सध्या या घरात डिंपल यांचे काका राहतात. शालेय शिक्षण पूर्ण होताच डिंपल यांचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले.

डिंपल फक्त ५ वर्ष्यांच्या होत्या तेव्हाच त्यांना नटी व्हायचं होत आणि त्यांनी हे त्यांच्या वडिलांना सांगितलं. त्या वेळी त्यांचे वडील बाल्कनी मध्ये शेव्ह करत होते आणि तेव्हा त्यांनी त्यांचे मनसुबे वडिलांना बोलून दाखवले ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात बोल्ड गोष्ट होती हे त्या नमूद करतात. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्या हे देखील नमूद करतात की, बेट्टी ह्यांना चित्रपट पहायची प्रचंड आवड होती. त्या आणि त्यांच्या आई,बेट्टी रोज न चुकता एक चित्रपट पहायच्या. त्यांनी पाहिलेला पहिला चित्रपट होता आशा पारेख ह्यांचा 'झिद्दी' आणि त्या चित्रपटातली विद्रोही भूमिका इतकी आवडली की त्याक्षणी त्यांनी त्यांना काय करायचं आहे हे ठरवलं होत.

शालेय शिक्षण पूर्ण होताच डिंपल यांचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले. नंतर त्या जुहू मध्ये त्या राहायला लागल्या. जुहू मध्ये त्यांना फिल्मी शेजार लाभल होत. त्यांच्या वडिलांचे जॉय मुखर्जी, राजेंद्र कुमार इत्यादींशी चांगले संबंध होते. ह्या सगळ्यांना वाटल होत की डिंपल ह्या बालकलाकार होऊ शकतात आणि इथूनच त्यांचा चित्रपटांचा प्रवास सुरु झाला. बाकी डिंपल यांच्या बालपणाबद्दल फार माहिती उपलब्ध नाही.

१९७३ ला राज कपूर ह्यांनी हजारो मुलींमधून डिंपल यांची निवड बॉबी ह्या चित्रपटासाठी त्यांच्या मुलगा ऋषी कपूरची नटी म्हणून केली. डिंपलला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि ती स्वतःला "चित्रपट वेडी" समजत होती. राज कपूरने लहान वयातच तिच्या तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुलप्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता. म्हणजेच डिंपल आणि ऋषी यांचा हा पहिला चित्रपट होता. "बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. ह्या चित्रपटात डिंपल यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपल यांना जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. २००८ मध्ये, rediff.com ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात दमदार पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये डिंपल ह्या चौथ्या क्रमांकावर होत्या.

* लग्न आणि त्या नंतरच्या घडामोडी-

बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनल्या. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी त्या चित्रपटांपासून दूर गेल्या. यशाच्या शिखरावर असून असा निर्णय घेण नक्कीच वेगळ होत.

ह्याकाळात राजेश खन्ना यांच खाजगी आयुष्य चांगलच वादग्रस्त ठरलं. त्यांनी १९७३ मध्ये त्यांच्याहून १५ वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडियांसोबत लेग्न केलं. हा सर्वांसाठीच धक्का होता. कारण त्याआधी त्यांचं एका दुस-या अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू होतं. राजेश खन्ना आणि डिंपल यांच लग्न झालं तेव्हा डिंपल केवळ १६ वर्षांच्या होत्या. आणि राजेश खन्ना हे ३१ वर्षांचे होते. वयामधल्या अंतरामुळे या दोघांची लव्हस्टोरीही नेहमीच चर्चेत राहिली. हे दोघे पहिल्यांदा कुठे कसे भेटले हे तसे फारच कमी लोकांना माहिती आहे. राजेश खन्ना आणि डिंपल यांची पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. असे हिमांशुभाई व्यास यांनी सांगितले होते. हिमांशुभाई यांनी माहिती देताना सांगितले होते, की बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना ७० च्या दशकात नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. इथेच त्यांची भेट डिंपल यांच्याशी झाली. पहिल्याच नजरेत डिंपल त्यांना आवडल्या होत्या. इथूनच राजेश आणि डिंपल यांच्या लव्ह-स्टोरीला सुरूवात झाली. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे तीन वर्षे अफेअर होते. या काळात राजेश सतत गुजरातचा प्रवास करायचे. त्यांना गुजराती नाटके खूप आवडायची. ते गुजरातचे नाटकार आणि कलाकार प्रवीण जोशी यांच्या नाटकांचे चाहते होते. राजेश आणि डिंपल यांनी लग्न केले, मात्र त्यांचे वैवाहिक जीवन जास्त काळ टिकू शकले नाही. राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अंजू महेंद्रू होते. तसेच त्यांचे अनिता अडवाणी यांच्यासोबतही अफेअर होते. राजेश, अनितासोबत बरचे दिवस लिव्ह-इनमध्ये होते. राजेश आणि डिंपल यांचे १९७३ मध्ये लग्न झाले होते. १८ जुलै २०१२ रोजी राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतला. राजेश आणि डिंपल यांचे लग्न १९७३ मध्ये झाले होते. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यावेळी डिंपले फक्त १६ वर्षांच्या होत्या. राजेश खन्नांनी ज्यावेळी लग्नाचा प्रस्ताव डिंपलसमोर ठेवला त्यावेळी त्यांचे वय ३१ वर्षं होतं. डिंपलने ज्यावेळी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घरच्यांना सांगितला त्यावेळी तिची आई या लग्नासाठी तयार नव्हती. पण डिंपलच्या वडिलांची या लग्नाला परवानगी होती. कारण त्यांचा जावई राजेश खन्नांसारखा सुपस्टार बनणार होता. काही दिवसांनी डिंपल च्या आईने या लग्नाला परवानगी दिली. त्या राजेश खन्ना यांच्यापेक्षा वयाने खूप लहान होत्या. या दोघांना दोन मुली असून ट्विंकल आणि रिंकी ही त्यांची नावे आहेत. ‘बॉबी’ च्या यशानंतर डिंपल यांच्याकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी दिग्दर्शकांच्या रांगा लागल्या होत्या. पण, त्यांनी सर्व ऑफर्स नाकारत राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. डिंपल यांच्याशी लग्न करताना राजेश खन्नांचे वय त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यांच्या लग्नाचा एक छोटासा व्हिडिओ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी दाखविला जात होता. लग्नानंतर त्या जवळपास १० वर्षे रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्या. त्यादरम्यान, त्यांनी ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींना जन्म दिला. त्यावेळी राजेश खन्ना यशाच्या शिखरावर होते. राजेश खन्नांचा राग आणि चीडचीड वाढल्यामुळे त्यांचे लग्न तुटल्याचे म्हटले जाते. बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडी तेव्हा विभक्त झाली. पण त्यांनी कधीच घटस्फोट घेतला नाही, असेही म्हटले जाते. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये डिंपल बऱ्याचदा त्यांच्यासोबत दिसल्या. राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या पुन्हा रुपेरी पडद्याकडे वळल्या. १० वर्षे ब्रेक घेऊन आणि दोन मुलांची आई असूनही १९८५ साली त्यांनी ‘सागर’ चित्रपटातून केलेले पदार्पण अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. पण हा कम बॅक अतिशय योग्य ठरला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. रमेश सिप्पी दिग्दर्शित या चित्रपटातील त्यांच्या बोल्ड लूकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.


* डिंपल यांना मिळालेले सन्मान-

* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1993 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रुदाली

* फिल्मफेयर पुरस्कार

1973 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, बॉबी

1985 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सागर

1993 - क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रुदाली.

1994 - बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री, क्रांतिवीर

* नामांकन

1991 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, लेकिन ...

1993 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री रुदाली

१993 - बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, गर्दिश

2009 - बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री, लॅक बाय चान्स

2014 - बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस, फाइंडिंग फॅनी

* बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशन पुरस्कार

1991 - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (हिंदी), दृष्टी

* इतर पुरस्कार

1993 - आठवा दमास्कस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रूदाली

1993 - 38 वे एशिया पॅसिफिक फिल्म महोत्सव, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रूदाली

* डिंपल यांनी केलेल्या चित्रपटांची यादी-

Year- Film- Role Name- Notes

1973- Bobby Bobby J. Braganza- Filmfare Award for Best Actress

1984- Zakhmi Sher- Anu Gupta

1984- Manzil Manzil- Seema Malhotra

1985- Aitbaar- Neha Khanna

1985- Lavaa- Rinku Dayal

1985- Arjun- Geeta Sahani

1985- Pataal Bhairavi- Yaskankya

1985- Saagar- Mona D'Silva Filmfare Award for Best Actress

1986- Vikram- Princess Inimaasi- Tamil film

1986- Janbaaz- Reshma Rai

1986- Allah Rakha- Julie Khera

1987-Insaniyat Ke Dushman- Shilpa

1987- Insaaf- Sonia / Dr. Sarita

1987- Kaash- Pooja

1988- Saazish- Meena

1988- Mera Shikar -Bijli

1988- Gunahon Ka Faisla- Shanu / Durga

1988- Bees Saal Baad- Nisha

1988 -Aakhri Adaalat- Rima Kapoor

1988- Kabzaa- Dr. Smita

1988- Mahaveera- Dolly

1988- Zakhmi Aurat- Kiran Dutt

1988- Ganga Tere Desh Mein- Princess

1989- Ram Lakhan- Geeta Kashyap

1989 -Action

1989 -Touhean- Deepika Srivastava

1989- Batwara- Jinna

1989 -Shikha- Shikha

1989- Shehzaade- Aarti- Uncredited

1989- Ladaai- Billoo

1990- Pati Parmeshwar- Durga

1990- Kali Ganga

1990- Jai Shiv Shankar- Unreleased

1990 -Aag Ka Gola - Aarti

1990- Pyar Ke Naam Qurbaan- Rajkumari Devika Singh

1990- Drishti- Sandhya

1991- Lekin ...- Reva- Nominated-Filmfare Award for Best Actress

1991- Prahaar: The Final Attack- Kiran

1991- Naramsimha- Anita V. Rastogi

1991- Mast Kalandar- Prit Kaur

1991- Haque- Varsha B. Singh

1991- Khoon Ka Karz- Tara K. Lele

1991- Dushman Devta- Gauri

1991- Ajooba- Rukhsana Khan

1991- Ranbhoomi- Prostitute

1992 -Karm Yodha- Namita

1992- Angaar- Mili

1992- Dil Aashna Hai- Barha

1993- Rudaali- Shanichari- National Film Award for Best Actress, Filmfare Critics Award for Best Actress,Nominated-Filmfare Award for Best Actress

1993- Gunaah- Kavita Sharma

1993- Aaj Kie Aurat- Roshni Verma

1993- Gardish- Shanti- Nominated-Filmfare Award for Best Supporting Actress

1994- Pathreela- Gayatri Sanyal

1994- Krantiveer- Megha Dixit- Filmfare Award for Best Supporting Actress

1994- Antarean- The Woman- Bengali film

1997- Share Bazaar- Special appearance

1997 -Agnichakra- Rani

1997- Mrityudata- Mrs. Janki Ghayal

1998- 2001: Do Hazaar Ek Mrs.- Roshni Sharma

1999 -Laawaris- Mrs. Kavita Saxena

1999- Hum Tum Pe Marte Hain- Devyani

2001- Dil Chahta Hai- Tara Jaiswal

2002- Leela- Leela

2004- Hum Kaun Hai?- Sandra Williams

2005- Pyaar Mein Twist- Sheetal Arya

2006- Being Cyrus- Katy Sethna

2006- Banaras- Gayatri

2008- Phir Kabhi- Ganga

2008- Jumbo Devi- (Voice-over)

2009- Luck by Chance- Neena Walia- Nominated-Filmfare Award for Best Supporting Actress

2010- Tum Milo Toh Sahi- Delshad Nanji

2010- Dabangg- Naini P. Pandey

2011- Patiala House- Mrs. Kahlon

2012- Bombay Mittayi- Mrs. Mansoor Malayalam film

2012- Cocktail- Kavita Kapoor

2013- What the Fish- Sudha Mishra

2014 -Gollu Aur Pappu- Amma

2014- Finding Fanny - Rosalina "Rosie" Eucharistica- Nominated-Filmfare Award for Best Supporting Actress

2015- Welcome Back- Poonam / Maharani Padmavati

2019- Brahmastra- Film has yet to be released.

* डिंपल यांचे गाजलेले चित्रपट-

डिंपल यांचा अभिनय उत्तम आहे आणि प्रत्येक चित्रपटातून त्याच वेगळेपण अधोरेखित केल गेल. त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या आणि वेगवेगळ्या भूमिका उत्तर रित्या साकारल्या. त्यांनी बऱ्याच चित्रपटात काम केल. त्यांच्या काही निवडक आणि गाजलेल्या चित्रपटांची थोडक्यात माहिती-

१. बॉबी- १९७३ ला वयाच्या १६व्या वर्षी डिंपल यांनी केलेला बॉबी हा पहिला चित्रपट!! ह्या चित्रपटात डिंपल यांनी बॉबी ची भूमिका केली होती. हा चित्रपट ब्लॉक बस्टर ठरला. राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट खूप गाजला होता. हा चित्रपट ट्रेंड सेटर म्हणून ओळखला जातो. ह्या चित्रपटाची कथा बॉबी या गरीब कॅथोलिक मुलीची आहे. ऋषि कपूर ह्या चित्रपटात श्रीमंत व्यवसाईकाचा मुलगा आहे. ह्या चित्रपटात श्रीमंत-गरीब अशी प्रेमकथा दाखवली गेली आणि हे कथानक गाजल त्याचबरोबर ह्या कथानकाची बऱ्याच प्रमाणात कॉपी सुद्धा झाली. इंडिया टाईम्स मुवीजने बॉबी ह्या चित्रपटाला "टॉप २५ मस्ट सी" मध्ये रँक केल आहे. ह्या चित्रपटातली गाणी देखील गाजली आणि आजही सिनेरसिकांच्या तोंडात असतात. १९७३ मध्ये बॉबी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ह्या चित्रपटाची कमाई ११ कोटी इतकी झाली होती. ७०च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणारा शोले नंतर चा दुसरा चित्रपट ठरला.. भारता बाहेर सुद्धा हा चित्रपट बराच गाजला आणि ह्या चित्रपटाने बरीच कमाई केली. ह्या आपल्या चित्रपटात डिंपल यांना बेस्ट अॅक्ट्रेस चा किताब सुद्धा मिळाला होता.

२. रुदाली- १९९३ला प्रदर्शित झालेला रुदाली हा डिंपल याचा अतिशय गाजेलेला चित्रपट. ह्या चित्रपटातलं दिल हुं हुं करे हे गाण अतिशय गाजल होत. महाश्वेता देवी ह्या फेमस लेखिकेच्या लघुकथेवर हा चित्रपट आधारलेला आहे. कल्पना लाजमी ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ह्या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्ट्रेस चा किताब मिळाला होता. ह्या चित्रपटातल्या त्यांच्या अभिनयाची विशेष नोंद घेतली गेली. ह्या चित्रपटाची निवड बेस्ट फोरेन लॅन्ग्वेज फिल्म म्हणून ६६ अॅकेडेमिक अवार्ड्स मध्ये झाली होती पण नॉमिनी म्हणून मान्य केली गेली नाही. ह्या चित्रपटात डिंपल यांची छोटी बहिण, सिंपल यांची निवड बेस्ट कॉश्चुम डिझायनर म्हणून झाली आणि नॅशनल फिल्म अवार्ड त्यांना मिळाल होत. म्हणजेच रुदाली ह्या चित्रपटामध्ये डिंपल आणि सिंपल या दोघी बहिणींना पुरस्कार मिळाले होते. ह्या चित्रपटात राखी गुलझार, राज बब्बर आणि डिंपल यांनी काम केल होत.

३. सागर- हा डिंपल यांचा अजून एक गाजलेला चित्रपट. १९८५ साली प्रदर्शित झालेला सागर हा एक हिन्दी चित्रपट आहे. या चित्रपटात ऋषी कपूर, कमल हसन, डिंपल कापडिया व नादिरा यांनी काम केले आहे. या चित्रपटातली गाणी खूप गाजली आणि आजही ती गाणी लोकप्रिय आहेत. रमेश सिप्पी ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. डिंपल ह्यांना ह्या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस चा किताब मिळाला होता. ह्या चित्रपटात सुद्धा डिंपल यांची बोल्ड भूमिका गाजली होती. जाने दो ना, सागर किनारे, सागर जैसी आंखोवाली ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतात. सागर किनारे ह्या गाण्यासाठी किशोर कुमार ह्यांना ८वा फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. ह्या चित्रपटातली गाणी लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांनी गायली आहेत.

४. क्रांतिवीर- १९९४ साली डिंपल यांचा हा अॅक्शन चित्रपट आला होता. मेहुल कुमार ह्यांनी दिग्दर्शन केल होत. नाना पाटेकर, डिंपल कपाडिया, ममता कुलकर्णी, डॅनी डेन्जोंगपा, अतुल अग्निहोत्री, परेश रावल ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि १९९४ मधला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात ह्या चित्रपटाला तिसरे स्थान मिळाले होते. त्याचबरोबर ह्या चित्रपटाला तीन स्टार स्क्रीन पुरस्कार, चार फिल्मफेयर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला होता. 1995 साली फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्री हा पुरस्कार डिंपल कपाडियांन मिळाला होता. ह्या चित्रपटाच्या कथेला सुद्धा सर्वश्रेष्ठ कथेचा पुरस्कार मिळाला होता. आणि हा चित्रपट अत्यंत प्रभावी चित्रपट होता.

५. अर्जुन- राहुल रवैल ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९८५ साली प्रकाशित झाला होता. ह्या चित्रपटात सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर हिट ठरला होता. ह्या चित्रपटाचे मुझिक राहुल देव बर्मन यांचे आहे. ह्या चित्रपटाला बेस्ट फिल्म चा अवार्ड मिळाला होता त्याचबरोबर, फिल्मफेअर चा बेस्ट स्टोरी आणि बेस्ट डायरेक्टर चा देखील अवार्ड मिळाला होता.

६. लक बाय चान्स- झोया अख्तर ह्यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. ह्या चित्रपटात अख्तर परिवाराशी जोडला गेला आहे. ह्यात फराहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. जावेद अख्तर यांची गीते आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाची कथा हिंदी फिल्म इंडस्ट्रीवर आधारीत आहे. कलाकारांचा संघर्ष, त्यांना मिळणारे यश आणि येथील राजकारणावर चित्रपटातून भाष्य करण्यात आले. ह्यात मुख्य कलाकार ऋतीक रोशन, फरहान अख्तर, ऋषि कपूर, कोंकणा सेन शर्मा, ईशा श्रावणी, डिम्पल कापडि़या, जूही चावला, संजय कपूर आहेत.

७. राम लखन- राम लखन हा १९९१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. सुभाष घाई ह्यांनी दिग्दर्शन आणि प्रोडक्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित, राखी व अमरीश पुरी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. भव्य कथानक असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज अभिनेते होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. डिंपल ह्यांची भूमिका ह्या चित्रपटात गाजली होती.

८. दिल चाहता है- २००१ मध्ये फरहान अख्तर यांचा दिल चाहता ही हा चित्रपट आला. अमीर खान, प्रीती झिंटा, सैफ आली खान, अक्षय खन्ना, सोनाली कुलकर्णी आणि डिंपल कपाडिया ह्यांच्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या, ही फरहान अख्तर यांनी लिहिलेलेली आणि दिग्दर्शित केलेली पहिली मुव्ही होती. ह्या चित्रपटाला नॅशनल फिल्म अवार्ड ऑफ बेस्ट फिचर फिल्म इन हिंदी मिळाला होता. ह्या चित्रपटातली गाणी जावेद अख्तर ह्यांनी लिहिली आहेत आणि त्यांना संगीतबद्ध शंकर अहसान लॉय ह्यांनी केले आहे. ह्या चित्रपटाला बरेच अवार्ड्स मिळाले. डिंपल यांनी ह्या चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस चा किताब मिळाला होता. आणि हा चित्रपट तरुणांना प्रचंड आवडला होता.

९. फाइंडिंग नॅनी- हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला. डिंपल कपाडिया, नसरुद्दिन शाह, दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका ह्या चित्रपटात आहेत. हा चित्रपट रोड ट्रीप टू गोवा वर आधारलेला आहे. ह्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५१ मिलिअनची कमाई केली होती. ह्या चित्रपटासाठी डिंपल यांना बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेसच नॉमिनेशन मिळाल होत.

१०. वेलकम बॅक- २०१५ साली ही अॅक्शन कॉमेडी फिल्म आली होती. ह्या चित्रपटात जॉन अब्राहम, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल, श्रुती हसण, नसरुद्दिन शाह डिंपल कपाडिया ह्यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ह्या चित्रपटात डिंपल यांची विनोदी भूमिका आहे. ह्या चित्रपटाला फुल पैसा वसूल अस म्हणले गेले होते. ह्या चित्रपटाचे १७ दिवसातले कलेक्शन १३३ करोड इतक झाल होत.

* बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री डिंपल कपाडियांच्या खास गोष्टी थोडक्यात-
डिंपल कपाडिया ही बॉलिवूडची अशी एकुलती एक अभिनेत्री असेल जिने पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर अनेक वर्ष सिनेमांपासून दूर राहिली. हे त्यांनी केल कारण त्यांना त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवायचा होता. तेव्हाच ट्विंकल आणि रिंकी खन्ना ह्या दोन मुलींचा जन्म झाला. ट्विंकल चा जन्म १९७३ साली झाला. आणि १९७७ साली रिकी चा जन्म झाला. डिंपलचा दुसरा सिनेमा बऱ्याच वर्षांनी आला होता.

* डिंपल यांच्या आयुष्याबद्दलची थोडक्यात माहिती-

१. डिंपल यांचा जन्म 8 जून 1957 मध्ये एका गुजराती परिवारात झाला होता. बाकी त्यांच्या परिवाराविषयी फार माहिती कुठेच उपलब्ध नाही.

२. डिंपल ही बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठीच ओळखली जात होती. 'बॉबी' या पहिल्याच सिनेमातच तिने अनेक बोल्ड सीन देऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली आणि सर्वांना धक्का दिला होता. ह्या चित्रपटासाठी डिंपल यांना बेस्ट नटी चा किताब मिळाला होता.

३. डिंपलला अभिनेते राज कपूर यांनी सिनेमात पहिला ब्रेक दिला होता. 1973 मध्ये आलेल्या बॉबी या सिनेमात डिंपल पहिल्यांदा दिसली होती. या सिनेमात डिंपल यांच्याबरोबर ऋषी कपूर मुख्य भूमिकेत होते.

४. बॉबी सिनेमावेळी डिंपल केवळ 16 वर्षांची होती. त्यांना लहानपणींच नटी व्हायचं ठरवल होत. असेही म्हटले जाते की, या सिनेमापासून ऋषी कपूर आणि डिंपल एकमेकांना डेट करत होते. अशा अफवा सगळीकडे प्रसिद्ध होत होत्या.

५. डिंपलने केवळ 16 वर्षांची असताना अभिनेते राजेश खन्ना यांच्याची लग्न केले होते. त्या आधी दोघे एकमेकांना डेट करत होते असाही म्हणाल जात. लग्नानंतर डिंपल अनेक वर्ष सिनेमापासून दूर होती. त्याच काळात, ट्विंकल आणि रिंकी खन्ना यांचा जन्म झाला.

६. डिंपल आणि राजेश खन्ना यांनी लग्न केल पण त्यांच लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 9 वर्षांनंतर दोघे घटस्फोट न घेता वेगळे राहत होते.

७. राजेश खन्नापासून दूर झाल्यानंतर डिंपल यांनी 'सागर' या सिनेमातून कमबॅक केले. तिच्या याही सिनेमाचा हिरो ऋषी कपूर होता. हा चित्रपट चांगलाच गाजला.. या सिनेमात डिंपलने टॉपलेस सीन दिला होता. आणि डिंपल ह्यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळला होता.

८. डिंपल ह्या बोल्ड रोल्स साठी प्रसिद्ध होत्या. डिंपल कपाडिया यांनी अभिनेता अनिल कपूर यांच्या सोबतही एक इंटीमेट सीन दिला होता. हा सीन बॉलिवूडच्या सर्वात इंटीमेट सीनपैकी एक मानला जातो. हा सीन त्यांनी 'जाबांज' सिनेमात दिला होता.

९. 1993 मध्ये डिंपल कपाडिया यांनी अभिनय केलेल्या 'रुदाली' या सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

१०. डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांच्यातील अफेअरच्या चर्चाही फार रंगल्या होत्या. असे सांगितले जाते की, दोघांचं अफेअर ११ वर्ष सुरु होतं. दोघे बऱ्याच वेळा एकमेकांसोबत दिसायचे.

डिंपल ह्यांच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. पण त्यांची लोकप्रियता टिकून राहिली. आज वयाची ६० वर्षे पूर्ण होऊनही अजून आपल्या रूपाने आणि अभिनयाने डिंपल ह्या प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडायला लावतात. आज इतकी वर्ष उलटूनही त्यांच चाहते यांच्या अभिनयाच्या प्रेमात आहेत. अशी ही बोल्ड आणि सुंदर अभिनेत्री मोठ्या पडद्यावर अजून अनेक वर्षे काम करत राहो आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत राहो हीच प्रार्थना..

References-

१. https://www.imdb.com/name/nm0438092/bio

२. https://en.wikipedia.org/wiki/Dimple_Kapadia

३. https://www.dnaindia.com/entertainment/report-once-upon-a-time-1048705