21. Rajasthan - land of king - 3 in Marathi Travel stories by Anuja Kulkarni books and stories PDF | २१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३

Featured Books
  • વરદાન કે અભિશાપ - ભાગ 40

    વરદાન કે અભિશાપ (ભાગ-૪૦)                 (રાતના અઢી વાગ્યે પ...

  • ઈર્ષા

      ईर्ष्यी घृणी न संतुष्टः क्रोधनो त्याशङ्कितः।  परभाग्योपजीव...

  • ફરે તે ફરફરે - 61

    ફરે તે ફરફરે - ૬૧   જુના જમાનાના લેખકો સવારનુ વર્ણન કરત...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 10

    ૧૦ મહારાણીની પ્રેરણા   કાંધલે જે કહ્યું તે સાંભળીને કરણ...

  • ઇડરિયો ગઢ

    ઇડરિયો ગઢવર્ષોથી મનમાં તમન્ના હતી અને એક ગૂજરાતી ફિલ્મ પણ વા...

Categories
Share

२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३

२१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३

* राजस्थान प्रेक्षणीय स्थळे-

२. उदयपुर- द सिटी ऑफ लेक्स..

उदयपुर 'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखले जाते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटीश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. ह्या शहराच्या चहुबाजूने अरावली पर्वतरांग आहे. त्यामुळे हे शहर अधिकच देखणे झाले आहे. ह्या 'व्हेनिस ऑफ द इस्ट' मध्ये विपुल निसर्गसंपत्ती आहे. त्याचबरोबर इथली देवळे प्रसिद्ध आहेत. इथल आर्किटेक्चर अर्थात वास्तुकला अप्रतिम आहे जी एकदा तरी पहावी अशी आहेच. उदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिचोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादी पाहण्यासाठी येथे जगभरातून पर्यटक येतात. इथे आल्यावर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. उदयपुर ही राजस्थानची शान आहे आणि हे पिचोला तलावात बोट राईड घेतल्यावर जाणवेलच.

उदयपुरला ४ तलावांनी वेढले आहे. उदयपुर हे प्रमुख आकर्षक स्थळांपैकी एक आहे. हे खूप प्रचलित शहर आहे. इथे फिरल्यावर उदयपुर ला 'ज्वेल ऑफ मेवाड' आणि 'व्हेनिस ऑफ द इस्ट' ही नावे सार्थ आहेत ह्याची खात्री पटते. उदयपुर मध्ये पाहता येणाऱ्या जागा-

* पिचोला सरोवर- पिचोला हा तलाव कृत्रिम तलाव आहे. सरोवरात अनेक कृत्रीम बेटे आहेत. हा तलाव अतिशय सुंदर आहे. खूप जुना आणि मोठा असलेला हा सरोवर नेहमीच पर्यटकांनी गजबजलेला असतो. ह्या सरोवराची सुंदरता अनुभवण्यासाठी लाखोंच्या संखेने पर्यटक येथे येतात. महाराज उदय सिंग ह्यांनी ह्या तलावाच विस्तारीकरण केले आणि इथे एक धरण सुद्धा बांधले. अतिशय सुंदर अशी ही जागा पर्यटकांची आवडती आहे. पिचोला तलावात ४ बेटे आहेत जी पर्यटकांच्या आकर्षणांपैकी प्रमुख आहेत.

१. जग मंदिर - जग मंदिर हे उदयपूरमधील पिचोला लेकमधील एका छोट्या बेटावर स्थित आहे. या मंदिराला तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत भेट देऊ शकता. जग मंदिर हे पिचोला तलावाच्या मध्यभागी एक दुसरे बेट आहे आणि ते संगमरवरी आहे आणि ते फ्लोटिंग निवास सारखे दिसते. महाराणा जगत सिंह यांच्या सन्मानार्थ "जगत मंदिर" म्हणून त्याला "लेक गार्डन पॅलेस" म्हणून ओळखले जाते. 17 व्या शतकात हा सुंदर महाल बांधला गेला. बंसी घाट पासून बोटींच्या सहाय्याने पर्यटक या ठिकाणी पोहोचू शकतात. राजवाड्याच्या शिरल्या पासून, या महलमध्ये संगमरवराचा आश्चर्यकारकपणे केलेला वापर पाहून तोंडातून "वा" नक्कीच येईल.. येथे या महालमध्ये, आपण राजपूतांच्या वास्तु शैलींचा अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि पांढऱ्या संगमरवरी हत्ती जे पर्यटकांचे स्वागत करतात ते पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. जग मंदिर पॅलेसचे मुख्य आकर्षण गुल महाल आणि एक लहान संग्रहालय आहे. गुल महल मध्ये सुंदर पेंटिंग आणि म्युरल्स आहेत.

२. जग निवास- जग निवास, पिचोला तलावाच्या मध्यभागी स्थित आहे आणि उदयपूरच्या प्रसिद्ध पॅलेसमध्ये "लेक पॅलेस" किंवा "ताज पॅलेस" म्हणून ओळखले जाते. हा राजवाडा महाराजा जगत सिंह यांनी ग्रीष्मकाळात राहण्यासाठी बांधला होता आणि नंतर उदयपूरमधील ह्या वास्तुचं पाच-स्टार पॅलेस हॉटेलमध्ये रुपांतरित झाला. ताज समुहाद्वारे उदयपूर मधील सर्वात सुंदर आणि सुप्रसिद्ध पाच-स्टार लक्झरी हॉटेल म्हणून लेक पॅलेस ओळखले जाते. या महालाताली कलाकुसर आणि राजेशाही थाट पाहून पर्यटक आश्यर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. उदयपूरमध्ये राहण्यासाठी लेक पॅलेस हे सर्वोत्तम हॉटेल आहे आणि पिचोला तलावाच्या मध्यभागी राहून वेगळाच आनंद घेऊ शकतो. 24 तासांच्या व्यवसाय केंद्रासह आणि जलतरण तलाव, कॉन्फरन्स सेंटर, बार आणि रेस्टॉरंट इत्यादीसारख्या मनोरंजक व्यवस्था इथे उपलब्ध आहेत. इथे सर्व सेवा सुविधा मिळतात. अत्यंत सुंदर अस हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतांना दिसते.

३. मोहन मंदिर- मोहन मंदिर द्वीप 17 व्या शतकात जगत सिंह यांनी बांधलेले मंदिर आहे. हे स्मारक मंदिरसारखे दिसते पण त्यात कोणतीही देवता नाही. इतिहासानुसार, हे स्मारक महाराणा जगत सिंह यांच्या अनौपचारिक मुलाच्या स्मृतीमध्ये बांधले गेले होते. आणि गंगोर उत्सव साजरा करण्यासाठी राजा या साइटचा वापर करीत असे. सध्या हे स्थान राज्य सरकार ने घेतले आहे आणि आता गंगुरू उत्सवासाठी इथे गर्दी होते. गंगुराच्या उत्सवात आपणास या बेटावर प्रचंड आतिशबाजी पाहण्याची मजा अनुभवू शकता.

४. आरसी व्हिला- आरसी व्हिला हे जग निवासच्या मागे पिकोला तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले शेवटचे बेट आहे. इथे एक महाल आहे आणि आता तिथे पक्षी येतात. आरसी व्हिला महाराणा आरसी सिंह यांनी सूर्यास्ताच्या वेळी पिचोला तलावाच्या सुंदरतेचा आनंद घेण्यासाठी तयार केले होता. आणि जर तुम्ही आर्सी विलासकडे नीट पहिले तर तुमच्या लक्षात येईल के लो प्लॅट्फॉर्म मुळे ही जागा हेलीपॅड म्हणून देखील काम करते. सध्या, हा महाल पक्षी अभयारण्य म्हणून रुपांतरीत केला गेला आहे. येथे किंगफिशर, कुट्स, ट्युफ्टेड डक्स, टर्न्स, इग्रेट्स आणि कॉर्मोरंट्ससारखे अनेक स्थलांतरित पक्षी येतात. बरेच प्रवासी आणि दुर्मिळ पक्षी पाहण्याकरिता आरसी विलास ही एक पक्षी प्रेमीची आवडती जागा आहे.

* सज्जनगड महाल- सज्जनगढ महाल हा 'मान्सून पॅलेस' म्हणून ओळखले जातो. उदयपूरमध्ये एक महालासारखी दिसणारी वस्तू आहे. मेवाड घराण्यातील महाराणा सज्जन सिंह यांनी 1884 मध्ये पावसाचे ढग पाहण्यासाठी महल बांधली. हा सुंदर किल्ला पांढरा संगमरवरी बनलेला आहे. पर्यटक या ठिकाणा वरून पिचोला तलाव आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अद्भुत दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. किल्ल्याला आधार देणाऱ्या खांबांना फुलं आणि पानांनी डिझाइन केले आहे. या नऊ-मजल्याची इमारत खगोलीय केंद्र म्हणून वापरली जात होती, ज्यात राजा मानसूनच्या ढगांवर लक्ष ठेवत असे. तथापि, त्यांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे, महाल बांधकाम थांबविले गेले. पुढे, त्यांचे उत्तराधिकारी महाराणा फतेहसिंग यांनी महाल बांधण्याचे काम पूर्ण केले.

* सिटी पॅलेस- सिटी पॅलेस, उदयपुर हा राजस्थान राज्यातील सगळ्यात मोठा महाल आहे. जवळजवळ ४०० वर्षांपूर्वी हे बांधले गेले, ज्यामध्ये मेवाड साम्राज्याच्या अनेक शासकांनी त्यात योगदान दिले आहे. सिटी पॅलेस पिचोला सरोवरच्या काठी वसलेली आहे आणि पॅलेस कॉम्प्लेक्समध्ये अनेक लहान इमारती बांधण्यात आल्या आहेत. पॅलेसमध्ये महाल, अंगण, पॅव्हेलियन, गच्च्या, खोल्या आणि हँगिंग गार्डन्स असे विविध प्रकार पाहायला मिळतात. येथे एक संग्रहालय आहे जिथे राजपूत कला आणि संस्कृतीतील काही सर्वोत्कृष्ट गोष्टी पाहायला मिळतात. रंगीबेरंगी चित्रांपासून राजस्थानी राजवाड्यात आढळणाऱ्या विशिष्ट वास्तुकलापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. रिगल पॅलेसचे आर्किटेक्चर अतिशय उत्तम आहे. इथे वेगवेगळ्या प्रांतांच्या म्हणजेच युरोपियन तसेच चिनी प्रांताचे मिश्रण पाहायला मिळते. इथे खूप घुमट, टॉवर्स देखील पाहायला मिळतात. इथल्या हिरव्यागार बागा मन प्रसन्न करतात. ह्या जागेचे बरेचसे चाहते देखील आहेत. इथे 'गाईड' सारख्या अनेक चित्रपटांना येथे शूट केले गेले आहे. अतिशय सुंदर अशी ही जागा आहे आणि सिटी पॅलेस पासून फक्त काही किलोमीटर दूर असलेल्या विंटेज कार म्युझियम भेट देता येते.

* फतेह सागर लेक- उदयपूरच्या उत्तर-पश्चिम भागाकडे फतेह सागर तलावातील एक तलाव आहे. हा तलाव शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अरावली हिल्सच्या सभोवती असलेले हा शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे कृत्रिम तलाव आहे आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे वातावरण शांत आहे आणि पर्यटक शांततेच्या प्रेमात पडतात. इथे पर्यटकांना बोटिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्स ची मजा देखील अनुभवता येते. अतिशय सुंदर अश्या उदयपुर ह्या जागेला नक्की भेट दिली पाहिजे.