अगदी काल परवा मला गावी जाण्याचा योग जुळून आला होता
कारण निमित्त तसे फार चांगले होते वाशिम येथे एकदिवशीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे
म्हणूननच की काय
मी नेहमी पेक्षा यावेळेस गावी जातांना थोडा आनंदीच मूडमध्ये होतो कधीच कानात हेडफोन न वापरणारा आज मात्र कानात सुमधूर गीतांना एकुण प्रवासाचा आनंद द्विगुणित करत मी माझे जन्म गाव तांदळी (शेवई) जवळ करत होतो
गावी येतांना कासोळा फाटा लागताच मला माझ्या काँलेज जिवनातील आठवणी जाग्या झाल्या होत्या
सकाळी सकाळी पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी व उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा सहन करत सकाळी साडेसहाच्या सुमारास तांदळीवरुन अकरा किलोमीटरचा हा प्रवास आम्ही पाच सहा मित्र सायकलवर टांग टाकून शक्य होईल तेवढ्या लवकर कासोळा येथील जुनियर काँले जवळ करत होतो
वेळ झाला तर थंडीतही ठाकरे सर जाब विचारुन काँलेजमधल्या मुलीसमोर अपमान करत होते म्हणून
हे आता ता तरुण वयात मनाला पटत नव्हते
म्हणून कुठेही न थांबता जमेल तसे मागेपुढे का होईना पण सरळ काँलेज जवळ करत होतो
मात्र परत जाताना सर्व सोबत जात होतो
सर्व एकत्रित जमा होऊन सायकलवर टांग मारून
उलट्या वार्याच्या दिशेने घामाच्या धारा वाहेपर्यत आम्ही कुठेच थांबायचो नाही फक्त एक विसाव्यासाठी राखून ठेवलेले ईचोरी फाट्याच्या समोर व पार्डी फाट्याच्या अलीकडे असलेले हे विशाल वटवृक्ष आम्हाला कायमस्वरूपी आमचे नशीब बदलायला जणू एक सहारा द्यायला एकप्रकारे मदत करतो की काय असे वाटायला लागायचे आता आमचेही एक निख्खळ मैत्रीचे नाते निर्माण झाले की काय असे होउन गेले होते
या आठवणीत असलेल्या याच वटवृक्षावर आज माझी नजर गेली व तो मला जणू काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतो की काय असेच वाटले
त्यांना असे एकाही निराश पाहून माझ्या गाडीचा वेग नकळतपणे कमी झाला होता
कानात अडकून असलेले हेडफोन मी काढून बँगमध्ये
घातले डोळ्याला लावलेला काळा चश्मा हातात धरून या विशालकाय वटवृक्षावर मझी नजर फिरवली ओळखलेत का मला कदाचित हाच सवाल त्या निमागस वटवृक्षाचा मला असेल
आजवर मी अनेक वर्षे झाली तुमची प्राणीमात्रांची
वाटसरुची पशुपक्षाची किती निस्वार्थी सेवा केली पण मला आजवर कुणीही स्वतःच्या स्वार्थासाठी संपवले नाही पण मानुस स्वताच्या फायद्यासाठी कसा निष्पाप झाडांची कत्तल करतो आहे याचेच तर मला खूप वाईट वाटले आहे
अशा नानाप्रकारचे वास्तविक आरोप लाउन मला भावनिक करून सोडले होते हा रस्ता रुंदीकरण करून तुम्ही प्रवास कराल पण मला वाचवायला कंजूस झालात तर तुम्हाला कुणीही वाचवण्यासाठी येणार नाही
अशा त्यांच्या मुक्या भावनीक प्रश्नांची उत्तरे मनात वादळ उठवुन गेले होते. आता लौकरच त्यांच्यावर रुंदीकरणाच्या निमित्ताने या विशाल काय वटवृक्षावर मुळासकट उपटून इतिहासात जमा होण्याची वेळ आली होती.
माझ्या पेक्षा जास्त खरेतर पुर्वीच्या पायदळी वाटसरुचा अनुभव कितीतरी वेदनादायक असू शकेल आता अशा विविध प्रकारच्या नानाविध प्रश्नाने माझ्या मनाला संवेदनशील करून अनेक सोडले होते. त्या जमीनीवर येवून टेकलेल्या पारंब्या जणू काही त्यांच्या वयाचा दाखलाच देत आहे असेच वाटत होते आता मी थकलो आहे तरी तुमच्या विकासासाठी माझे बलिदान द्यायला मी तयार आहे पण माझ्या सारख्या असंख्य वृक्षतोडीत झालेली ही पर्यावरणाची हानी कधी भरून निघेल
याचा विचार नक्कीच व्हायला हवा या त्यांच्या मुक्या भावना मला त्यांच्या मोहात केव्हाच ढकलून गेला होता
म्हणून मी त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून त्या जाग्यावर पुन्हा रुंदीकरण झाल्यानंतर एक पुन्हा वटवृक्ष लाउन तुझ्या उपकारातुन उतरायी करेल असे वचन देउन मी वटवृक्षावरुन पुन्हा आरपार नजर फिरवली
व रोडवर उभे राहून माझ्या मोबाईलने सेल्फी घेऊन एक शेवटची आठवण म्हणून सुदंर कायम स्मरणात राहील अशी हिंदी कविता लिहून विशाल असलेल्या वटवृक्षावर शेवटची नजर फिरवुन मनोभावे नतमस्तक झालो..व पुढच्या प्रवासाला लागलो....
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
?©डॉ के घोडके वाशिमकर
हरसूल ता.दिग्रस जि.यवतमाळ
मो,९७६४४१६९३१