metoo - 10 in Marathi Fiction Stories by Komal Mankar books and stories PDF | #मिटू ( भाग -10)

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

#मिटू ( भाग -10)


डोंगरदऱ्यांच्या शेजारी वसलेलं शेदोनशे लोकांचं ते गाव . पडीक जमीन कोरड्या विहिरी ओलिताला पाणी भेटतं नाही म्हणून लोक गाव सोडून शहराचा रस्ता धरू लागले . विनायकराव त्या गावातले लोकप्रिय इमाने इतबारे व्यवहार करणारे इसम होते . त्यांचा जीव अडकला होता आपल्या शेती वाडीत रुखमाबाई (त्यांची दुसरी बायको) त्यांना कितीतरी वेळा सांगून चुकली हे गाव सोडून दुसरीकडे चला म्हणून . तिला सारखं वाटायचं आपणही हे खेडे सोडून शहरात जावं चार लेकरांना शिकवून काहीतरी मोठं ऑफिसर बनवावं . तीच ऑफिसर बण्याचं स्वप्न तिची धाकटी मुलगी दीपमाला पूर्ण करतच होती . रुखमाबाईचे पोटचे दोन लेकरं नाना आणि दीपमाला दोघे वयाने लहान सवंतीचे दोन्ही मुलं रुखमाबाईच्या मुलांपेक्षा मोठी तरी रुखमाबाईने त्यांच्यात आणि आपल्या धाकट्या लेकरात कधीच दुजाभाव केला नाही . दीपमालाही त्या दोघांना आपल्या सख्य्या मोठ्याभाव प्रमाणेच मनात होती . पांढुरंग आणि अजित सावत्र आईचे मोठे मुलं ते ही तिच्यावर बहिणीसारखं प्रेम करतं होते . विनायकरावांकडे तीस एकर जमीन होती त्या जमिनीची देखभाल त्यांना पांढुरंग त्यांचा मोठा मुलगा करू लागायचा . अजित आणि दीपमाला महाविद्यालयीन शिक्षण घेतं होते नानाने मात्र नवीतच शाळा सोडली . 

उन्हाळ्याचे दिवस होते दीपमालाच पदवीच शिक्षण पूर्ण झालं म्हणून ती अजितला गावाला सोडून मागतं होती . अजितच शिक्षण पूर्ण होऊन तो तिथे नोकरीच्या शोधात होता . त्याने दीपमालाला घरी सोडून दिले आणि परत शहरात रवाना झाला . दीपमाला गावाला येताच तिच्या काकूने तिच्यासाठी स्थळ आणले . दीपमालाने घरी भावांना आणि वडिलांना सांगून ठेवले मी कॉलेक्टर झाल्याशिवाय लग्न करणार नाही . आधी शिकून मला मोठं अधिकारी होऊ द्या . पण तिचे बाबा तिला म्हणाले ," पोरी मुलगा लैय बेस हाये , शिवाय बाबू हाय महाविदद्यालयात एकदा पाह्यले का हरकत हाय ."

" ह्ह्हह्ह ...." त्यांच्या समोर नाईलाजाने तिने मान हलवली ..

दोन दिवसातच मुलगा बघायला आला . त्याला मुलगी खूप आवडली . दीपमाला म्हणजे साक्षात सौन्दर्य देवताच जणू अवकाशातून धर्तीवर उतरलेली . उंच देखणी गोरीपान लांब सडक पाठीवर केसाची वेणी . चेहऱ्यावर नेहमीच स्मित हास्य उमटलेले ..तिचे ओठ बघणाऱ्याला कमळाच्या पाकळ्या प्रमाणे भासतं होते . तिची ती तीक्ष्ण नजर कित्येकाला घायाळ करत होती . दीपमाला हातात चहाच पानदान घेऊन आली तेव्हा मुलाकडले तिच्याकडे बघतंच राहिले . मुलाने तर कसलाही विलंब न करता होकार दिला . परंतु दीपमाला तिला आताच लग्न करायचं नव्हतं .. दीपमालाची आई रुखमाबाई तिला म्हणाली ," दीपा अगं पोरी दारांत आलेल्या पाहुण्याला असं माघारी हाकलून का भेटणं ? "

" आई नाही करायचं म्हटलनं लग्न आताच माझं शिक्षण तर होऊ दे मला कलेक्टर बनू दे तू म्हणशील त्या पोरा सोबत लग्न करीन मी शब्द देते ." शेतातून आलेला नाना दोघीच्या संभाषणात सहभाग घेतं म्हणू लागला ," आई ती नाही म्हणतेंत राहूदे की पाहिलंच पाहूनं होतंते ." 

तिच्या नकाराने वडील मात्र नाखूश होते . दोन दिवस पोरी सोबत ते बोलेच नाही . विनायकरावांच्या घरीच एक कुटुंब किरायाने राहत होते . विनायकरावांसोबत त्यांचं चांगलं पटायचं . त्यांच किरायेंदराचा मुलगा गावातल्या पाटलाकडे त्यांच्या वाड्यावर जाऊन बसायचा . पाटील बाभळीच्या झाडाखाली आला म्हणजे त्यांची मैफल भरायची . पाटलाचे तीन भाऊ गाव सोडून शहरात गेले . पाटील मोठा होता म्हणून शेतीचा भार त्याच्या एकट्यावर पडला . शंभर एकर शेती तो एकटाच सांभाळत होता . पाटलाची शेती तीस एकर ही विनयकरावच्या शेताला लागूनच होती . पाटलाचा संपूर्ण गावावर दरारा होता एवढंच काय तर गावात कोणीच त्याच्या विरोधात जातं नव्हते . त्यादिवशी किसना ( विनायकरावचा भाडेकरीं ) पाटलाच्या वाड्यात जाऊन बसला होता . पाटील बाहेर येताच तो मोठ्या उत्साहाने म्हणाला , " याहो पाटील साहेब , तुमचं पाखरू उडून चाललं . "

" आमचं पाखरू कोण बुवा ? "

" आवं असं काय करता , दीपा नाही का हो ."

" दीपा , ते पाखरू पाटलाच्या पिंजऱ्यातून सुटून जाईल तेव्हाना .."

" म्हंजी पाटील जी मह्या नाही समजलो राव ?"

" पाखराला पिंजऱ्यात कैद करा .."

" पाखरू असं कैद नाही व्हायचं पाटीलजी .."

'' आरे दहा माणसं लाव ......."

'' व्हयं व्हयं साहेब तुम्ही काहीबी काळजी नका करू , तिले कसं अन कुठं गाठायचं ते माह्या वर सोडून द्या .."

पाटील आणि विनयकरावाचा भाडेकरी तिच्यावर पाळत ठेऊनच होते एकदोनदा दीपमाला त्यांच्या तावडीतून सुटलीही . आज मात्र ते दीपमालावर झडप घालून तिला आयुष्यातूनच उध्वस्त करणार होते . नाही तिचं जगणंच कायमचं हिरावून घेत होते ..तिच्या जीवावर पेटून उठलेला एकटा पाटीलच नव्हता तर त्याला ह्या कामात आधीपासून साथ देत होता तो विनायकरावांचा भाडेकरी . त्याला सोबती गावातली चारपाच मंडळी . एवढंच नाही तर किसनाची आईही . मांजर जशी उंदरावर टपून असते तशीच ही वासनेने भुकेली जनावर . 

त्या दिवशी नेहमी प्रमाणे दीपमाला लवकर उठली अंगणात शेणाचा सडा टाकला अंघोळ करून तुळशीवृंदावनाला पाणी घातले . नऊ वाजले होते . रुखमाबाई स्वयंपाक करतं होत्या . दीपमालाला वाटले शेतात जाऊन तुरीच्या शेंगा घेऊन यावं . म्हणून ती स्वयंपाक घरात जाऊन रुखमाबाईला म्हणाली ," आई , मी शेतातून तुरीच्या शेंगा घेऊन येते .."

" अगं पोरी दुपारनं जाऊ की वावरात .."

" विसरली का तू आज मामी मामा येणार आहेंन दुपारला .."

" व्हयं म्यां भुलून गेलती जा घेऊन ये मामासनं न्यासाठीबी जास्तवास्तच घेऊन येजो ."

" हो आई ...येते मी ." दीपमाला निघतंच शेतात जायला एवढ्यात आजितचा फोन आला . 

" हॅलो दादा ...." 

" हे दिपू कशी आहेस ?" .

" मी ठीकच आहे दादा तू कसा आहेस रे आणि येणं आज गावाला , आईने सकाळीच तुझी आठवण केली आज मामी मामा पण येत आहे ." एका दमात ती बोलून गेली 

" अगं हो , जरा मला बोलू देशील का ? " 

" हं .." 

" दिपू मला सरकारी शाळेवर इथे नोकरी मिळाली कालचं रुजू झालो .."

" काय सांगतो दादा , आणि मला तू आज कळवलं .."

" हो ग पाचवा आणि सातवा वर्ग आहे माझ्याकडे .."
" छान ..तू तर आता येणार नाही म्हणजे महिनाभर तरी .."

" यायला जमणार नाही ग मला , तुला घ्यायला येईल गावाला आणि तू आता इथे येऊन स्पर्धा परीक्षेचे क्लास करू शकते ."

" हो दादा , आता आपल्याला पैशाची अडचण ही जाणार नाही ."

" हो आईकडे फोन देना !"

" हो ...हो ."

" आई ..हे घे अजित दादाचा फोन आहे तो नोकरीवर लागला म्हणतो ." मोठ्या आनंदाने फोन देत तिने आईला आधीच सांगितले . आणि शेताकडे जायला ती निघाली . अजित सोबत तिचं हे शेवटचं बोलणं . रस्त्याच्या पायवाटेने जाताना नवीन स्वप्न उरात घेऊन ती चालतं होती स्वतःशीच एकांतात बोलतं होती . " छान झालं माझ्या भावाला जॉब लागला सरकारी ते आता कलेक्टर व्हायला मला कोणीच रोखू शकत नाही ."

तिला शेतांत जातानाच शहरात जाऊन कधी कधी क्लास लावतो . आणि मोठं अधिकारी बनतो असं झालं ..तुरीच्या पातेने जायच्या आधी दीपमाला . बोराच्या झाडाखाली जाऊन खोडाच्या आडोश्याला टेकून बसली . बसल्या बसल्या ती वेगळ्याच दुनियेत हरवून गेली . त्या दुनियेत ती एक अधिकारी म्हणून कार्यरत होती . चकाचक ऑफिस दीपमालाला भेटण्यासाठी दुरदुरून लोक येत होते . तिच्या शेजारीच तिला ऑफिस च्या कामात मदत करायला नोकर होते ती त्यांना फक्त ऑर्डर देत होती . दीपमाला आपला संपूर्ण पैसा अनाथाश्रमाच्या सेवेसाठी खर्च करत होती . तिने स्वतःच्या बळावर अंधांसाठी एक इन्स्टिटयूट उघडले होते . एवढंच नाही तर स्वतः महिलांना एकत्र करून स्त्री शक्तीकरण म्हणून संघटना उभारली होती . तिथे ती महिलांना भाषण देत होती . आणि एवढ्यातच कोणीतरी तिच्या खांद्यावर हाथ ठेवला . दीपमाला झोपेतून जागी व्हावी तशीच त्या स्वप्नातून खडबडून उठली . उठली काय किंचाळलीच पाटलाला समोर बघून . घामागून गेलेली दीपमाला ओढणीला घट्ट पकडून उभी होती . पाटलाचा चेहऱ्यावर मात्र हास्याची लहर उमटली होती . तो मोठ्याने हसू लागला ..त्याने दीपमालाच्या दोन्ही दंडाला पकडून ठेवले . जीव कासावीस करत दीपमाला पाटलाला म्हणाली .

" पाटील सोडा मला जाऊद्या ...सोडा सोडा ." वासनेच्या नशेत चूर झालेला पाटील 

" आता कुठे पाखरू हातात आलं ...यारे गड्यानो जुडपाच्या मागे घ्या हिला .."

त्याने सोबत आलेल्या सहा लोकांना आदेश दिला . पाटलाचा आदेश ऐकून ते सहाही लोकं दीपमालाला तिच्या शेतातून उचलून पाटलाच्या शेतात पडीक असलेल्या झुडुपात घेऊन गेले . 

दीपमाला त्यांच्यासमोर रडतं होती . पाटलाला सोडण्याची विनंती करत होती . " पाटील अहो मी काय बिघडवलं तुमचं मला जाऊद्या घरी ."

पाटील तिची ही विनंती ऐकून मोठ्याने हसतं होता . दीपमाला विलाप करत होती . ती तिच्या भाडेकरू किसनाला म्हणाली ." अरे किसाना तू पण ह्या पाटलाच्या कटात सामील होता सहा वर्ष झाले तुझे मायबाप माझ्या घरी राहत आहे , तू असा निर्लज माणूस माझ्या भावला समजलं तर जिवंत सोडणार नाही तो तुम्हाला . " दीपमालाचे हे शब्द ऐकून पाटलाची तळ पायातली आग मस्तकात गेली . समोर येऊन त्याने दीपमालाच्या अंगावर हात घातला . तिच्या अंगावरची ओढणी बाजूला फेकत पाटील म्हणाला ," तुया भावालेबी सुगावा लागणार नाही तुह्या , त्याच्या पण डोळ्यात बहिणीची जवानी खुपत असणं ." भावाबद्दल असे शब्द ऐकून दीपमालाने पाटलाच्या थोबाडीत एक भीडकावलीच .

" खबरदार पाटील माझ्या भावा बद्दल असं बोलतंन माझ्यासारखी वाईट तुमच्यासाठी कोणीच स्त्री नसेल ." पाटीलने आता काहीही न बोलता तिच्यावर भुकेल्या जनावरासारखी झडप घातली . दीपाली वाचवा वाचवा म्हणून ओरडतच राहिली पण तिचा आवाज आज कुणालाच ऐकू जाणार नव्हता . सकाळी दहाच्या सुमारास गावातून लग्नाची वरात वाजत गाजत जात होती . त्या आवाजातच दीपमालाचा आवाज विरला होता . शेत अगदी रस्त्याच्याकडेने होते बाजूच्या खेडगावतले दोनचार लोक त्या रस्त्याने गेले त्यांना हा सारा पाटलाचा डाव समजला होता . पण ते मुकाट्याने डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेऊन तिथून निघून गेले . दीपमाला विव्हळत होती पाटील तिच्यावर जबरदस्ती करतंच होता . ती रडत होती ओरडत होती . तिच्या ओरडण्याने पाटलाने तिच्या तोंडात माती कोंबली दगडं कोंबले . तिला निर्वस्त्र करून टाकले . सोबतच्या सहाही माणसाने त्यात किसना तिच्या घरी राहणारा भाडेकरू ही होताच एवढ्याने मिळून आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला . गुप्तांगात दगडं खडे टाकले . नाकातून तिच्या रक्ताची धार वहात होती . पण ते हिंस्त्र पशुपेक्षाही जालीम होते . तिचा देह शिणला होता ती जगेल एवढा जराही त्राण तिच्यात उरला नव्हता . जीव तिचा पाणी पाणी करत होता . आणि ह्या नरभक्षकाने तिच्या पोटात चाकू खुपसला शरीरावरचे कपडे गाठोड बनवून जमिनीत गाडले . चाकू पोटातून काढून वहात्या नाल्यात फेकून दिला . दीपमालाचा जीव कसा आणि कधी शांत होईल ती तर जीवनतपणी नरकयातना त्या ही पेक्ष्या ज्या कृत्याला हिंसेत बलात्कार म्हणतात त्याची बळी पडली होती . दीपमालाची प्राणज्योत तेव्हाच विझली . नराधम तिला झाडाला मागे हात करून बांधून निघून गेले . 

दोन तास झाले मुलगी अजून आली नाही म्हणून रुखमाबाई मुलीला शोधत शेतात गेली . दीपमाला तिच्या शेतात नव्हतीच . आई घरी जाऊन नानाला सांगू लागली . 

" नाना अरे ये नाना आपली दीपमाला वावरात पण नाही रं ..."

" का वं माय , ती वावरात काहिले गेलती अन असणच की कुठं बोलतं .."

" नाहीरे पोरा ती मले सांगून वावरात गेलती तुरीच्या शेंगा आणाले अजून नाही आली वावरातबी जाऊन पाहिलं मी तिचा कुठंबी आगास नाही लागला. "

" गेली कुठं मग ?"

" कोणास ठाऊक बापा .."

" बरं माय मी जाऊन पायतो वावरात , तू गावात कुणाच्या घरी गेली का तै पाह्य .."

" व्हयं व्हय जीवात जीव नाही माह्यावाला अशी कुठं जातं नाही पोरं सांगल्याबगर ."

" माय मी पायतो कुठं गेलीत मी ."

ती त्या दिवशी कुठेच सापडली नाही . अजितला ही गावाला फोन करून बोलवण्यात आले पोलीस कॉम्पलेन्ट केली पण दिपमालाचा कुणालाच शोध लागला नाही . आठ दिवस उलटून गेल्यावर . वावरातल्या मंजूरस्त्रियाना झाडाजवळ खूप खराब वास येत होता पराटी सवंगताना त्या एक दुसरीला म्हणतं होत्या इथे झाडाजवळ खूप बेकार वास चालतं आहे . त्या स्त्रियांनी जडजवळ जाऊन बघितलं . आणि त्यांना दीपमाला निर्वस्त्र अवस्थेत दोन्ही हात मागे बांधलेली तोंडातून नाकातून रक्त. संपूर्ण शरीर रक्तानी माखलेले केस सताड मोकळे होते केसाला ही माती रक्त लागलेले ती दिसून आली . स्त्रियांनी एकच टाहो फोडला आणि तिला अश्या अवस्थेत बघून रडू लागल्या . त्यातल्या एकीने तिच्या घरी जाऊन घरच्याना सांगितले . सर्व कुटुंबियांच्या नजरेसमोर सत्यघटना काय आहे ते समजले . तिचा देह पाटलाच्या शेतात होता म्हणून दीपमालाच्या भावाने पाटलालाच दोषी ठरवले . पण सो कॉल आपला कायदा त्याला सबूत पाहिजे असते न्याय द्याला . कोणताच पाटलांविरुद्ध पुरावा नव्हता . ज्यांनी त्या रस्त्याने जाताना पाटलाने तिच्यावर अत्याचार करताना पहिले ते कोर्टात येऊन पाटलांविरुद्ध बोलायला तयार नव्हते . किसना आणि त्याच्या परिवाराला तेव्हाच घरातून काढून टाकण्यात आले . पाटील आणि दोषी असेच मोकाट सुटले ते आजही चैनीने जगतात आणि ती ...... ती मात्र त्यांच्या वासनेची शिकार झाली .