ISHQ - 4 in Marathi Love Stories by Aniket Samudra books and stories PDF | इश्क – (भाग ४)

Featured Books
Categories
Share

इश्क – (भाग ४)

“एक्सक्युज मी..”, कबिर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली.

कबिरने जणू लक्षच नव्हते अश्या अविर्भावात वर पाहीलं..

“येस?”, कबिर
“अम्म.. इथे कोणी बसलेलं नसेल, तर मी इथं बसु का?”, तरुणी
“हो.. व्हाय नॉट.. प्लिज..”

ती तरुणी समोरची खुर्ची सरकवुन बसली. हातातल्या फाईल आणि कागदपत्र कडेला ठेवली आणि कबिरला म्हणाली.. “मी राधा…”
“आय नो..”, कबिर पट्कन म्हणुन गेला..

“अं..” आपले घारे डोळे मोठ्ठे करत ती म्हणाली..”हाऊ डू यु नो?”
कबिरला पट्कन आपली चुक लक्षात आली.. तो टॅटू आपण मगाशी पाहीला होता हे कबिर बोलु शकत नव्हता..

“आय मीन.. तुच म्हणालीस नं आत्ता,…”, कबिर आपली चुक सावरत म्हणाला..
“ओह हं… हिहिहिहिहि..”, विचीत्र हसत राधा म्हणाली..
“मी कबिर…”, कबिर म्हणाला..

ती सुध्दा आता आय नो म्हणेल.. मग मी तुमच्या लेखनाची फॅन आहे वगैरे म्हणले असं त्याला वाटत होतं…

“मला वाटतं, तु मला ओळखलेलं दिसत नाही”, राधा..
“नाही.. म्हणजे, आपण आधी कधी भेटलो आहे का? आय एम सॉरी, पण मी खरंच नाही ओळखलं..”, कबिर आपले नेहमी ई-मेल करणारे फॅन्स, पब्लिकेशनच्या वेळी भेटलेली लोकं ह्यांबद्दल विचार करत होता. पण त्यात राधा नावाचं असं कोणीच नव्हतं. शिवाय तिला आधी कधी पाहीलं असेल तर विसरणं अशक्यच होतं.

“ओके.. नेव्हर माईंड.. मला तुमची माफी मागायची होती…”, राधा
“माझी माफी? पण का?”, कबिर पुरता गोंधळुन गेला होता..
“काल रात्री.. ते मेडीकल स्टोअर.. तुमची रुम.. तुमच्या डोळ्यात तिखट.., ती.. ती तरुणी मीच होते..”

“काय?”, जवळ जवळ किंचाळत कबिर म्हणाला…
“कुल डाऊन.. कुल डाऊन.. आय सेड आय एम सॉरी..”, एम्बारस होत ती तरुणी म्हणाली..

“हाऊ डेअर यु..? एक तर तुला मी रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणुन रुमवर घेऊन आलो आणि तु.. तु…”, संतापाने कबिरच्या तोंडुन शब्द बाहेर पडत नव्हते..

“आय एम.. रिअली.. रिअली सॉरी कबिर.. खरंच गैरसमज झाला.. अ‍ॅक्च्युअली जेंव्हा तुम्ही मला तुमच्या रुमवर न्हेलेत तेंव्हा मी बेशुध्दावस्थेत होते, जेंव्हा जाग आली तेंव्हा तु असा.. अर्धा माझ्यावर झुकलेला… मला वाटलं.. की..”, राधा
“काय वाटलं.. मी काय तुझा रेप करणारे..?”, कबिर.

“हो.. म्ह्णजे..”, राधा
“हो?? गेट लॉस्ट.. गेट लॉस्ट फ़्रॉम हिअर..” कबिर खुर्चीतुन उठत म्हणाला..

“कबिर प्लिज.. मी खरंच मनापासुन सॉरी म्हणतेय..”, कबिरच्या हातावर हात ठेवत राधा म्हणाली

तिच्या एका स्पर्शाने कबिरचे सर्व सेन्सेस एकदम शांत झाले. जणु गार वार्‍याचा एक झोका कबिरच्या अंगावरुन वाहत गेला…

“..पण तु विचार कर ना.. अशी मी अर्धवट शुध्दीत होते.. त्यात ती अंधारी खोली, समोर अनोळखी असा अर्धवट माझ्यावर वाकलेला तरुण.., मी.. मी खरंच खुप गोंधळुन गेले….”, राधा

“हम्म.. इट्स ओके..”, कबिर शांतपणे खाली बसत म्हणाला

“पण तुला कळलं कसं हा सगळा प्रकार?”, कबिर..
“त्याच काय झालं..”, राधा अडखळत म्हणाली
“हा बोला.. अजुन काय घोळ घातला होतास?”, कबिर

“आज सकाळी मी पोलिसांना घेऊन लॉजवर आले होते.. कालची कंम्प्लेंट केली मी सकाळी पोलिस स्टेशन मध्ये…”, राधा
“हाईट्ट आहे ही.. सिरीयसली.. यु आर जस्ट हॉरीबल..”, कबिर कपाळावर हात मारुन घेत म्हणाला

“हो मग.. असंच मोकळं सोडायचं होतं का मी.. सो मी पोलिसांना घेऊन गेले तेथे.. तर तो खालचा मेडीकलवाला भेटला, त्याने झाला प्रकार सांगीतला आणि मग मी कंम्प्लेट लगेच मागे घेतली.. मग हॉटेलमध्ये कळलं की तु सकाळीच चेक-आऊट केलंस… मग विचार केला, कदाचीत तु सकाळचा ब्रेकफास्टसाठी असशील कुठेतरी. त्यातल्या त्यात हे हॉटेल ह्या एरीयामध्ये टॅक्सीवाले रेकमेंड करतात.. सो थॉट टू चेक हिअर..”, उसनं हासु आ्णत राधा म्हणाली

“आणि समजा तो मेडीकलवाला भेटलाच नसता तर..??”, आवंढा गिळत कबिर म्हणाला
“तर आत्ता पोलिस तुझ्या मागावर असते..”, राधा
“धन्य.. लक्ष लक्ष धन्यवाद त्या मेडीकलवाल्याचे.. पोलिसांनी मला पकडल्यावर माझ्यावर थोडं न विश्वास ठेवला असता त्यांनी.. आत्ता कदाचीत आपल्या कृपेने मी तुरुंगात असतो..”

“रिअली सॉरी वन्स अगेन.. काय आहे ना, जगातील चांगुलपणावरचा विश्वास उडाल्यासारखा झालाय माझा..”, राधा काहीश्या निराशेच्या स्वरात म्हणालि

“ए पण.. रिअली, मी ओळखलंच नाही तुला.. काल आय मीन.. शॉर्ट कलर हेअर, शॉर्ट्स.. तो अवतार ! आणि आज एकदम डिसेंट लुक..??”
“ओह.. अरे विग होता तो.. आणि कॉन्टॅक्ट्स घातल्या होत्या.. बाकीचं म्हणशील तर.. असंच..!!”

“पण का असं? उगाचं?”, कबिर
“कधी भेटलो सावकाशीत तर सांगीन निवांत.. बिट पर्सनल..”

पर्सनल वरुन कबिरला आठवण झाली तिच्या मंगळसुत्राची. कबिरने पट्कन तिच्या गळ्याकडे बघीतलं, पण कालचे ते मंगळसुत्र गळ्यात नव्हते..

“आय जस्ट होप, बाकीच्या त्या अवतारासारखंच तिचं ते मंगळसुत्र पण तेवढ्यापुरतंच असेल..”, कबिर मनातल्या मनात म्हणाला..

“एनिवेज.. गॉट टु गो…”, खुर्चीवरुन उठत राधा म्हणाली, ती माघारी वळणार इतक्यात तिचं लक्ष कबिरच्या सुटकेसकडे जाते.

“यु लिव्हींग गोवा?”, राधा
“नाह.. अ‍ॅक्च्युअली कालच तर मी गोव्याला आलो.. निदान ३ आठवडे तरी मी इथे असेन, सो सध्या जागा शोधतोय..”, कबिर
“ओह.. अ‍ॅक्च्युअली सगळं आत्ता अरे जॅम पॅक्ड असेल.. कशी आणि कुठे पाहीजे जागा..? म्हणजे एनी प्रेफ़रंन्सेस?”, राधा..

“नॉट अ‍ॅक्च्युअली, पण जनरली, मला थोडी शांत जागा पाहीजे.. आय एम हिअर टू राईट अ बुक…”, कबिर
“वॉव.. तु पण लिहीतोस…?”, राधा परत खुर्चीत बसत म्हणाली.
“तु पण म्हणजे..? अजुन कोण लिहीतं?”, कबिर

“मी..!!” आपले खांद्यावर आलेले केस, हाताने मागे ढकलत, डोळे मोठ्ठे करुन राधा म्हणाली.

“रिअल्ली.. काय लिहीतेस?”
“अं.. नाही म्हणजे.. लिहायचा प्रयत्न करतेय.. बरं झालं तु भेटलास.. ए मला सांग ना.. म्हणजे.. मला पण कादंबरी लिहायचीय.. तर कशी लिहु? म्हणजे सुरुवात कुठुन करायची? कादंबरी लिहायला काय काय लागतं??”

कबिर स्वतःशीच हसला..

“सांगेन तुला, सध्या तरी मला जागा शोधणं फार महत्वाचं आहे… मी आहे ३ आठवडे किमान गोव्यात, सो सावकाशीत भेटू आणि बोलु.. ओके?”

“चालेल.. वाय द वे, तुझा जागेचा प्रॉब्लेम मी सोडवु शकते..”, राधा..
“म्हणजे तुला चालणार असेल तर.. होम-स्टे आहे एक.. मी तिकडेच रहाते सध्या..”

“हो का? कुठेशी आहे..”, कबिर

“ओल्ड गोवा. तशी मी खुप सेल्फिश ए, सो कुणाला मी बोलले नव्हते.. बट इफ़ यु प्रिफ़र होम-स्टे.. सध्या फ़क्त मी आणि सोफी ऑन्टी.. ज्या ओनर आहेत.. दोघीच रहातो तिथे, पण खुप स्पेशीअस असं.. टीपकल फ्रेंच स्टाईलचं घरं आहे, शांतता आहे, मागे नदी, हिरवी गार झाडी.. मस्त आहे.. बघ एकदा.. आवडलं तर वेल एन गुड…”

“साऊंड्स टेम्प्टींग, बघायला काहीच हरकत नाही..आणि बेगर्स डोन्ट हॅव एनि चॉईस.. नाही का?”, वेटरला बिल आणण्याची खुण करत कबिर म्हणाला
“हे काय? बिल? एव्हढा मोठ्ठा तुझा प्रश्न सोडवते आहे मी! आणि एक साधी कॉफी पण नाही ऑफर करणार?”, आपले गाल फुगवत राधा म्हणाली..

“ओह सॉरी.. कर की ऑर्डर.. “, वेटरला थांबवत कबिर म्हणाला
“ईट्स ओके.. माझी कॉफी तुझ्यावर उधार ..”, वेटरला यायची खूण करत राधा म्हणाली.

“तसंही, सोफी ऑन्टी वाट बघत असेल, सकाळी इतक्या गडबडीत बाहेर पडले, त्यात ते पोलिस वगैरे. ती काळजी करत असेल.. चल तुला घर दाखवते…” बिलाच्या खालची गोड बडीशेप खात राधा म्हणाली

जागा मिळण्यापेक्षा कबिरला ती जागा आत्ता राधाच्या आजुबाजुला रहायला मिळण्याचा आनंद अधीक होता.

“एव्हढी सुंदर मुलगी आजुबाजुला रहात असेल तर कुणाला रोमॅन्टीक स्टोरी नाही सुचणार?”, कबिरच्या मनात एक विचार येऊन गेला

त्याने हॉटेलचे बिल भरले, खुशीत वेटरला टीप ठेवली आणि तो सामान उचलुन राधाबरोबर हॉटेलच्या बाहेर पडला.


“ओ अनुराग सर…अहो कुठं चाललात गडबडीत?, एक तरुण गाडीत बसणार्‍या दुसर्‍या एका तरुणाला हाक मारुन थांबवत होता.
त्याचा आवाज ऐकुन, अनुरागने मागे वळुन पाहीलं.

“अरे मनिष.. सॉरी लक्षच नव्हतं माझं..”, अनुराग
“चालायचंच, मोठी लोकं तुम्ही, करोडोंचे बिझीनेस सांभाळायचे म्हणजे…”, मनिष
“छे रे, म्हणुन मित्र मित्रच असतात ना, खरंच लक्ष नव्हतं. बोल काय म्हणतोस?”, अनुराग
“मी मस्त मज्जेत.. तु बोल.. आणि वहीनी कुठं दिसत नाहीत त्या? एक दोनदा मध्ये येऊन गेलो घरी, तर घराला कुलुप. माहेरी गेल्यात की काय?”, मनिष

अनुरागचा चेहरा काहीक्षण उतरला आणि मग चिडून म्ह्णाला, “तसं झालं असतं तर बरंच झालं असतं”
“म्हणजे?”, मनिष
“अनु घर सोडून गेलीय..”, अनुराग संतापुन म्हणाला…
“काय? कधी? कुठे?”, मनिष

“आता तुझ्यापासुन काय लपवायचं? झाले ३ आठवडे.. सगळ्या मैत्रीणींकडे, नातेवाईकांकडे शोधलं. तिच्या माहेरी पण काही पत्ता नाही अनु कुठे गेली आहे ते…”, अनुराग

“अरेच्चा.. अरे मग पोलिस कंम्प्लेंट वगैरे केलीस का? चुकुन माकुन काही बरं वाईट..”, मनिष
“बरं वाईट वगैरे काही नाही. धडधडीत चिठ्ठी लिहुन घर सोडून जाते आहे सांगुन गेली आहे..”, अनुराग
“पण का? काही भांडण वगैरे झाली का तुमची..”, मनिष

“आता तुच सांग मनिष, नवरा बायको मध्ये कधी भांडण होत नाहीत का? थोडे-फ़ार चालायचेच. पण निट बसुन बोललं की होतंय सगळं…”, अनुराग
“मग आता?”, मनिष

“आता काय? बघू वाट अजुन काय करणार !, फोन पण लागत नाहीए तिचा…”, अनुराग

“ओह्ह.. सॉरी टू हिअर यार..”, मनिष
“डोन्ट बी.. बिकॉज आय एम नॉट.. एनिवेज.. चल पळतो मी कंपनीत.. उशीर झालाय..”, घड्याळात बघत अनुराग म्हणाला..
“येस सर.. काही कळलं अनुचं तर नक्की सांग..”, मनिष

“बाय..”
“बाय”


अनुराग ज्या वेळी कारमध्ये बसत होता, त्यावेळी राधा आणि कबिर टॅक्सीमधुन खाली उतरत होते. कबिरने समोर बघीतले, साधारण १९१० वगैरे काळातले एक टुमदार बंगलावजा बसके घर समोर उभे होते.

“सी..ssss आय टोल्ड यु.. तुला बघताक्षणीच घर आवडेल म्हणुन..”, राधा म्हणाली.

कबिरने टॅक्सीच्या डीक्कीतुन आपली बॅग बाहेर काढली आणि बंगल्याचे गेट उघडुन तो राधाच्या मागोमाग आतमध्ये शिरला.

[क्रमशः]