खूप दिवसांनी तिचा आज msg आला .... मी म्हटलं बरी आठवण केली
आज आमची ... तर ती म्हणाली ,
" तुम्ही ते कोई मिल गया मधले एलिअन्स नाही का ... सर्च करा सर्च करा तेव्हा कुठे
त्यांना संदेश पोहचल्यावर जमिनीवर येता तशा आहात मॅडम ...! "
मी म्हटलं काय बोलते शलाका हे ?
तर ती म्हणाली ,
" अरे तुझं व्हाट्सएपच बंद होतं तर तुला msg कशी करू मी आणि तू च नाही का
आता म्हणाली बरी आठवण केली आमची ...."
मी हम्म म्हणून msg टाकला ....
आणि ऑफलाईन झाली ....
स्क्रीनवर तिचा msg झळकला ," तुला काही सांगायचं आहे ... "
तिला काय सांगायचं आहे मला ... ह्याच उत्सुकतेपोटी मी ऑनलाईन गेली .
तिचा स्वर जड आणि खूप नाराजीचा ती नाराजी तिच्या प्रत्येक शब्दात
आणि बोलण्यात मला जाणवत होती .... काय झालं असावं तिलाच ठाऊक ...
ती म्हणाली मला कवी ग्रेस च्या कविता सेंड कर ना !
मी म्हटलं ohhk पण , कुठून सेंड करू मला चार ओळी येतात त्यांच्या कवितेच्या
करते तुला सेंड .... ती कर म्हणाली ... तेव्हा " भय इथले संपत नाही ..." ही कविता
मी तिला जेवढी येते तेवढीच type करून पाठवली ... आणि एक मी एडिट करून
ठेवली होती ... " ती गेली तेव्हा पाऊस निनादात होता मेघात अडकली किरणे तो सूर्य सोडवित होता ..."
अशा दोन कविता तिला पाठवल्या तेव्हा न राहून तिला विचारावं वाटलं आज ग्रेसचा
जन्मदिन आहे की पुण्यतिथी ??
पण ,
असो म्हणून मी दुर्लक्ष केलं ...
शलाकाला समजण त्या वेळेला मला खूप अवघड जात होतं ... तिचा
Msg आला ... मुलांची नजरच वाईट ग !
मी म्हटलं का काय झालं ?
बिनसलं का कुणासोबत तुझं ??
तर ती म्हणाली नाही .... मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला .
मग काय झालं यार why are you sad ....
ती सांगायला लागली . अरे आम्ही फ्रेंड सगळे उभे होतो & just बोलत होतो
तो फक्त माझ्याकडे एकसारखा बघत होता ....
मला खूप वाईट वाटलं यार त्याचं असं बघणं ... कसं सांगू मला काहीच सुचत नव्हतं ग ....
डोकं जाम दुखतंय .... नॉर्मलच ड्रेस घातला होता मी . यात माझी कुठे चूक होती .
Matter ड्रेस नाही करत तर त्याची नजर करते .
बस अस नव्हतं बघायला पाहिजे म्हणून ती रडू लागली ...
रात्र खूप झाली तू झोप आता म्हणून मी तिला शांत व्हायला सांगत होती .
पण मुलांचं अस मुलींकडे बघणं त्यांना किती त्रास देऊन जात ह्याचा
जरा पण त्यांना भान नसावं का ??
मुलीकडे लक्ष जाणं ही निसर्गांची किमया पण मुलीकडे त्यांना घुरत एखादया अंधाशासारखं
बघणं ही झाली जंगलातील लांडग्याची वृत्ती .... ह्या वृत्तीचा कुठे तरी अंत व्हावा !
एखाद्या स्थानावरून स्त्रीला एकटीला जाणंही ह्या पुरुषाच्या दृष्टीस खुपतच ...
पुरुषांच्या नजरेत स्त्री बद्दल वाटणारा आदर कधी बर निर्माण होईल ?
घरातील स्त्रिया सोडल्या तर पुरुषांना रस्त्यावरच्या स्त्रिया त्यांची जणुकाही
प्रॉपर्टीच वाटायला लागतात . तिच्यावर एखाद्या पशुसारखी झडप घालायचीही पुरुषी वृत्ती कधी
जाईल ??
आणि मुळात गुन्हेगारी वृत्तीला इथूनच चालना मिळतं आहे . लहान लहान त्यांच्या कृतीतून
स्त्रियांवर अत्याचार करण्याचं सामर्थ्य निर्माण होतं .
हया कृतींना दुर्लक्ष करून कसं चालेल ?? मुलीनं सुद्धा त्वरित आवाज करण्याचा निर्णय घेतला पाहिजे .
अन्यथा आपण केलेल्या दुर्लक्षितपणामुळे कुणाचा तरी जीव भरडल्या जाईल ....
त्यांची हिंमत वाढतच जाईल .....
म्हणून स्त्रियांनी समाजात वावरताना वेळीच ह्या गोष्टींना रोख देत सतर्क राहिला पाहिजे .
सेल्फडिफेंस
गर्दीचा फायदा घेऊन मुलींना स्पर्श करणारे वसवसलेले हातही त्या गर्दीच्या
घोळक्यात तिच्या शरीरा पर्यंत पोहचायला मोक्का बघत असतात ...
वासनेने बरबटलेल्या नजरा त्याच देहात आपली भूक भागवण्यासाठी
शिकार शोधत फिरतात ...
तेव्हा चौदा वर्षाची असेल ती ..... पुरुषात वडीलधारे शोधणारी भाजीवाला
दारासमोरून जाणारा आईस्क्रीमवाला ह्या सर्वाना विश्वासाने दादा म्हणारी ती .
एक दिवस रात्रीच्या जत्रेला घरच्या सोबत गावाकडे जाते .
आईचा हात धरून ती रात्रीच्या झाक्या उंच नजरेने बघू लागते ...
एक हात आईचा हातात पकडूनच त्या भीड मधून समोर जाण्याची वाट ती
काढू लागते तेव्हा अचानक खाली कोणी तरी जबरदस्ती केल्या सारखा
हात लावून गेल्याच तिला जाणवते ...
चौदा वर्षयाची ती चांगला स्पर्श वाईट स्पर्श तिला कोणी सांगितलंच नव्हतं कधी
अस का असत ? कोणी आपल्या शरीराला स्पर्श करून जाणं .
त्या भीड मध्ये तो कुणाचा हात होता ?? तो हात लावून जाणारा कोण होता ??
तिला त्याचा चेहरा त्या गर्दीत नाही दिसला तरी तिने मनाशीच खूणगाठ
बांधली ह्या नीच माणसाला मी कधीच सोडणार नाही म्हणून एकदाच भेटू दे त्याला
एवढी चिड कोणी आपल्या शरीराला स्पर्श करून गेल्याची का येत असावी ? ह्याच
कोड्यात ती कुणाला बोलूनही दाखवू शकत नव्हती ....
वेडी आणि भाबडी तिची आशा ...
आता मोठी झाली ती गुन्हे कसे घडतात ... बलात्कार पब्लीक places मधेही होऊन
कोणी काहीच का नाही करू शकत बलात्कारी वृत्ती जन्माला कशी येते हे त्या
तिच्या भूतकाळत घडलेली घटना तिला सांगून जाते ......
#आये दिन ये घटनाये बढती ही जा रही कोई कुछ नही कर सकता
मासुम सी कलिया मूरझा रही कोई रोक नही सकता उनकी बरबादी को
बचा नही सकता वो बेबस रुह को जलने से .....!!
इन्सान हैवान होते चला जा राहा और इंसानियत हैवानीयत !