Ayushya Badalnara Kavadasa - 1 in Marathi Short Stories by Anuja Kulkarni books and stories PDF | आयुष्य बदलणारा कवडसा...१

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

आयुष्य बदलणारा कवडसा...१

आयुष्य बदलणारा कवडसा...१

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बर्फ काही केल्या थांबत न्हवता. रस्ते ओस पडले होते. रक्तवाहिन्या गोठतील इतकी थंडी पडली होती पण अश्या थंडीत सुद्धा निशा एकटीच रस्त्यावरून चालत होती. निशाला थंडीचं सुद्धा भाग नव्हतं. निशा तिच्याच विचारात मग्न होऊन चालत होती. तिला आपण कुठे जातोय ह्याच सुद्धा भान न्हवत. फक्त रस्त्यावर नाही तर आयुष्यात सुद्धा कुठे जातीये हे तिला कळत नव्हत. फक्त काम,पैसे, नाव हे सोडून तिच्या आयुष्यात काहीच नव्हत. आता निशाला ह्या सगळ्याचा कंटाळा आला होता. तिच्या आयुष्याची दिशा हरवली होती. पण तिला पुढे काय कराव हे सुचत न्हवत. भरपूर पैसे, मनासारख काम सगळंच तिच्या मनाप्रमाणे झाल होत. पण हे सगळ करता करता खूप वर्ष सरली होती. तिच्या हातातून खूप महत्वाचा वेळ निसटून गेला होता. आईच्या मते तिला तिच्या आयुष्यात एका जोडीदाराची गरज तर होती पण तिचा लग्न संस्थेवर खूप विश्वास सुद्धा न्हवता. त्यामुळे आईच्या म्हणण्याकडे तिने सहज दुर्लक्ष केल होत. पण आता निशा आयुष्याच्या अश्या टप्प्यावर पोचली होती की पैसे सोडून तिला अजून काहीतरी हव होत. तिच्यासाठी पैसा दुय्यम झाला होता. पण आपण काय करावं अश्या विवंचनेत निशा होती. आणि आता तिचं वय सुद्धा वाढलं होत. निशा नी तिची पस्तीशी कधीच पार केली होती. तिला कॉलेज संपल्यावर लगेचच जॉब मिळाला आणि त्यानंतर एका मागोमाग एक प्रमोशन्स मिळत गेली. निशा अखंड काम करत राहिली. आणि आयुष्याच्या एका टप्यावर कामासाठी ती अमेरिकेत राहायला लागली. तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. अमेरिकेत राहायला लागून ६ वर्ष झाली होती. सुरवातीला निशा तिच्या बिझी आयुष्यात रमली होती. ती एकटीच रहायची पण हळू हळू तिला त्यातून आंनद मिळेनासा झाला. आपण जे पैसे कमावतो आहे त्यातही खुश होती का नाही ते तिला माहिती नव्हत. पण तरी तिने ते आयुष्य स्वीकारले होते. निशाला काम आवडायचं आणि कामाच्या व्यापात बाकी काही विचार आले तर ती ते विचार टाळत होती. एकट जगण्याचा तिला कंटाळा यायचा तरी ती आयुष्य रेटत राहत होती. पण आता निशाला एका पठडीतल आयुष्य नको होत. त्यासाठी ती काही फर्म स्टेप घेणार होती. तेच तेचपणा तिला आता नको होता. त्याच काळात तिच्या ऑफिसमध्ये तिच्या हाताखाली एक नवीन मुलगा जॉईन झाला. तो मुलगा खूप मोठा नव्हता. २५-२६ वर्षाचा गोंडस चेहरा असणारा मुलगा होता. गौरांग त्याच नाव होत. जेव्हा ऑफिस मध्ये रुजू झाला तेव्हा तो अगदीच नवीन होता..बाहेरच्या देशात काय प्रकारे काम होत ह्याचा त्याला फार अनुभव सुद्धा नव्हता पण त्याच्या हुशारीच्या जोरावर त्याला अमेरिकेत येण्याची संधी चालून आली होती. त्या संधीच सोनं गौरांग ला करायचं होत. गौरांगची स्वप्न खूप मोठी होती आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तडजोड करायला सुद्धा तयार होता. गौरांग ऑफिस मध्ये आला आणि चौफेर नजर फिरवली. ऑफिस मध्ये कोणीही भारतीय नाही ह्या विचारांनी गौरांग थोडा खट्टू झाला खरा पुढच्या क्षणी त्याला त्याची स्वप्न आठवली आणि तो नॉर्मल झाला. त्यानी ऑफिस मधल्या सगळ्यांशी ओळखी करून घेतल्या. सगळेच लोकं चांगले होते पण आपल्या मातीचा ओलावा गौरांग मिस करत होता. तेव्हाच त्याला आपली बॉस भारतीय आहे हे त्याला कळलं आणि तो खुश झाला!! तो निशाला भेटायची वाट पाहायला लागला. निशा या ऑफिसची बॉस होती. साहजिकच सगळ्यांशी बोलायची तिला गरज वाटायची नाही. निशा फक्त तिला वाटेल त्याच लोकांशी भेटायची. गौरांग त्या ऑफिस मध्ये चांगलाच रुळला आणि एके दिवशी निशाला भेटायची संधी त्याच्यासमोर चालून आली. गौरांगनी कमी वेळात खूप मस्त काम केल होत आणि त्यामुळेच निशाला सुद्धा त्याला भेटायचं होत. गौरांग डेस्क वर बसला होता आणि तितक्यात त्याच्या लॅपटॉप वर 'टिंग' असा आवाज आला. त्यानी पाहिलं तर त्याला निशाच मेल आल होत आणि त्यात निशा नी त्याला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. मेल मध्ये पण तिच बोलण एकदम अदबशीर होत. अजिबात फापटपसारा नाही आणि निशा एकदम मुद्द्यावरच आली होती. गौरांगनी निशाच मेल पाहिलं आणि तो मनोमन खुश झाला. गौरांगनी बरेच दिवस वाट पहिली आणि फायनली, तो निशाला भेटणार होता. निशानी त्याला भेटण्यासाठी दुपारी १२ची वेळ दिली होती. निशाच ऑफिस वेगळ्या ठिकाणी होत. त्यामुळे लवकरच निघाला. गौरांग सुद्धा वेळेचा चोख होता त्यामुळे तो वेळेतच निशानी सांगितलेल्या जागेवर पोचला. त्यानी निशा ला पाहिलं. निशा एकदम साधी होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होत. त्या तेजामुळे तिचं वय लपून राहत होतं. गौरांग ला आपल्या बॉस ला पहिल्यांदी भेटून खूप आनंद झाला आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणत त्यानी शेक हँड करण्यासाठी हात पुढे केला. निशा फक्त हसली आणि तिने शेक हँड करणं टाळल. मग गौरांगनी हात मागे घेतला.

"मॅडम.. आय अॅम गौरांग!" गौरांगनी बोलण चालू केल.

"हे गौरांग.. हॅव अ सीट! अँड नाईस तू सी यु! यु आर इंडियन? अॅँड आय थिंक मराठी?" निशा नी प्रश्न केला,

"हो मॅडम.. मी मराठी!"

"ओह.. नाईस! खूप दिवसांनी मराठी मध्ये बोलतीये..आपली माती, आपली माणस, आपली भाषा नेहमीच हवीहवीशी वाटते आणि मी ते सगळ मिस करत होते. आज खूप दिवसांनी मराठीत बोलले. छान वाटतंय.." निशा हसली. "तुला इथे जॉईन होऊन किती दिवस झाले? मी कामासाठी वेगळ्या स्टेट मध्ये गेले होते सो कुड नॉट मिट यु बिफोर.."

"२ मंथ्स मॅडम.. आणि मी आपल्या कलीग्स कडून ऐकलय, तुम्ही काम खूप चोख करता. तुम्ही इथे किती वर्षापासून आहात?"

"६ वर्ष होतील. आणि मला आवडत काम करायला. म्हणजे माझी खूप स्वप्न होती आणि मी सगळी स्वप्न पूर्ण केली. आणि महत्वाच गौरांग... मला मॅडम पेक्षा निशा म्हणलास तर बेटर..आपल्या ऑफिस मध्ये सुद्धा मी सगळ्यांना सांगितलं आहे की मला नावानी हाक मारा."

"मला ऑकवर्ड होईल...तुम्हाला निशा म्हणायला. पण मी प्रयत्न नक्की करेन.."

"ग्रेट... बाय द वे, फर्गोट टू टेल यु दॅट यु हॅव डन अॅन एक्सेलेंट वर्क.. मी इम्प्रेस झाले तू केलेलं काम पाहून आणि तेही इतक्या कमी वेळात..म्हणूनच तुला भेटायला बोलावलं ऑफिस मध्ये. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा तुझ्यासारखीच होते. नवीन पण काम करण्याची जिद्द होती माझ्याकडे आणि खूप पैसे कमवायचं स्वप्न पण होत."

"थँक्यू निशा!! तुमच्याकडून कौतुक ऐकायला छान वाटतंय! आणि वॉव... ६ वर्ष इथे आहात! आता मी सुद्धा तुमचाच आदर्श ठेवणारे. माझा देशाबाहेर येऊन काम करायचा माझा पहिलाच अनुभव आहे. मला काही अडचणी आल्या तर समजून घ्या."

"गौरांग... डोंट वरी! आय विल हेल्प यु बाय ऑल मिन्स. किप डुइंग ग्रेट वर्क.. ऑल द बेस्ट!! ओह.. आय फर्गोट, आय डीड नॉट ऑफर यु एनिथिंग!! सॉरी!!"

"डोंट बी सॉरी मॅडम.." त्याला मधेच थांबवत निशा बोलली,

"अ.. मला निशा म्हण!!"

"हो हो.. निशा!! सॉरी, विसरलोच होतो. मी काय सांगत होतो, डोंट फील सॉरी! मला तुम्हाला भेटता आलं ह्यातचं मला आनंद आहे. खाणं पिणं तर होतंच राहील..तुम्हाला भेटून मला खूप मस्त वाटतंय...मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन उर्जा मिळाली."

"माय प्लेजर गौरांग..." दोघ बराच वेळ गप्पा मारत होते आणि तेव्हा निशानी पिझ्झा विथ कोक ऑर्डर केला होता. दोघ गप्पा मारत होते आणि वेळ कसा गेला हे दोघांनाही कळल नव्हत. दोघांची पहिली भेट गौरांग साठी अनपेक्षित होती आणि अनपेक्षितपणे त्याला नवीन दिशा मिळाली होती. गप्पा झाल्यावर गौरांग गेला पण त्याच्या मनातून निशा काही जात नव्हती. निशा च्या बाबतीत सुद्धा तसचं काहीस झालं होतं. दिवस पुढे सरकत होते आणि दोघांची मैत्री देखील..पाहता पाहता त्यांची ओळख वाढली. निशा गौरांग ची बॉस होती तरी त्यांच्या नात्यात ते कधीच आलं नाही. दोघ कामानंतर नियमित भेटायला लागले. आणि त्याचं हे नातं वेगळ्या लेवल ला पोचलं. आता त्यांच्या नात्यात खूप मोकळेपणा आला होता.

"निशा...दिवस काय पटापट गेले ना?" गौरांग बोलायला लागला.

"हो गौरांग..मला अजूनही आपली पहिली भेट आठवते."

"मला सुद्धा...मला नव्हत माहिती की अमेरिकेत मला इतकी चांगली बॉस आणि इतकी चांगली मैत्रीण मिळेल."

"हो मग आहेच तुझी बॉस.. आणि लक्षात ठेव गौरांग, काही चुका झाल्या तर चुकीला माफी नाही.. आय वॉंन्ट माय वर्क टू बी परफेक्ट! मला चुका झालेल्या खपत नाहीत. कामाच्या वेळ कामच झाल पाहिजे आणि ते काम चोख असेल ह्याकडे मी स्वतः लक्ष घालते."

"हो हो निशा! आय वोंट डू एनी मिस्टेक. डोंट वरी अबाऊट दॅट..."

"आय होप सो..."

"बाय द वे, निशा... एक सांगायचं आहे. पण नाही माहिती सांगू की नको आणि सांगायचं तर कसं सांगू?"

"बोल बोल बिनधास्त.. " निशा हसत बोलली

"बघ ह.. चिडायचं नाही.."

"नाही रे...तू बोल तर खर.."

"विल यु मॅरी मी? मला माहिती आहे तू माझ्यापेक्षा मोठी आहेस. आणि तुला लग्न करायचं नाहीये पण मला इथे सेटल व्हायचं आहे. त्यासाठी ग्रीन कार्ड असलेल्या मुलीशी लग्न कराव असा माझा विचार आहे. तुझ्याशी लग्न करून मला सुद्धा ग्रीन कार्ड मिळेल आणि मी तुला काही बंधन पण घालणार नाही." गौरांग बोलला.

"हे हे गौरांग... आर यु सिरिअस? आपण चांगले मित्र आहोत पण तुला ग्रीन कार्ड मिळाव म्हणून मी तुझ्याशी लग्न करेन? तुला अस वाटलं? आय लाईक युअर कंपनी पण त्याचा अर्थ..." निशा बोलत होती पण गौरांग नी तिला मधेच थांबवल..

"हो निशा..मी तुला पहिल्यांदी भेटलो तेव्हाच तू मला आवडली होतीस. आणि तुझ्याशी लग्न करून मला इथलं ग्रीन कार्ड सुद्धा मिळेल.. मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि त्यासाठी मला इथे राहणं गरजेच आहे. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुझी मदत होईल. काय माहित, आपण एकमेकांसोबत आंनदी असू पण तस झाल नाही, पुढे आपल पटलं नाही तर तुला नातं टिकवण्याची बळजुबरी मी करणार नाही. बघ, तुझ्यासाठी 'विन विन' आणि माझ्यासाठी सुद्धा 'विन विन'.. सो वॉट से?" गौरांग मनातलं बोलून गेला..

"अरे वाह... नाईस थिंकिंग!!! इट्स अ गुड आयडिया.. लग्न टिकू शकत.. आणि टिकल नाही तर कोणी कोणाला अडवणार नाही!! तुझा फायदा आणि माझा सुद्धा! म्हणजे मी पण माझ स्टेटस बदलू शकेन!! माझ्या मनातही लग्नाचा विचार नव्हता पण आता समोरूनच तू विचारतो आहेस मग मी नाही म्हणणार नाही. आणि करेक्ट.. माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सुद्धा 'विन विन' पण सॉरी! माझ्याकडे ग्रीन कार्ड नाही रे."

"ओह.. तुझ्याकडे ग्रीन कार्ड नाही? इथे इतके वर्ष इथे राहून सुद्धा?" गौरांगचा सूर एकदम बदलला

"हो अरे..मिळत होतं ग्रीन कार्ड पण नाही घेतलं मी ग्रीन कार्ड कारण मला इथे आयुष्यभर राहायचंच नाहीये. मी आत्ताच भारतात जायचा विचार करतीये... मला इथे आयुष्यभर राहायचंच नव्हत. मी खूप दिवस एकटी राहिले. आणि घरी आई सोबत राहीन. तिच्या जवळ थांबायचं आहे. तिला कधीच वेळ नाही देता आला.. आता माझा सगळा वेळ तिच्यासाठी.."

"ओह.. मला वाटलं तुझ्याकडे ग्रीन कार्ड असेल..आणि तूला इथेच राहायचं असेल. असो.. तू नाहीतर दुसरं कोणी शोधेन.." गौरांग खरी गोष्ट न लपवत बोलला. तेव्हाच त्याच्या फोन ची रिंग वाजली आणि त्यानी "हो येतो" अस सांगितलं आणि तो फक्त बाय बोलून तिथून निघून गेला.