A Heavy Prize - A Mr. Wagh story - 11 in Marathi Fiction Stories by Suraj Gatade books and stories PDF | अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 11

Featured Books
  • किट्टी पार्टी

    "सुनो, तुम आज खाना जल्दी खा लेना, आज घर में किट्टी पार्टी है...

  • Thursty Crow

     यह एक गर्म गर्मी का दिन था। एक प्यासा कौआ पानी की तलाश में...

  • राम मंदिर प्राण प्रतिष्ठा - 14

    उसी समय विभीषण दरबार मे चले आये"यह दूत है।औऱ दूत की हत्या नि...

  • आई कैन सी यू - 36

    अब तक हम ने पढ़ा के लूसी और रोवन की शादी की पहली रात थी और क...

  • Love Contract - 24

    अगले दिन अदिति किचेन का सारा काम समेट कर .... सोचा आज रिवान...

Categories
Share

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 11

दि रॅवेलेशन ऑफ द ट्रूथ 


आता तुझ्या मगासच्या प्रश्नाचे उत्तर, की मी रवी पवार, मोहन पाटील आणि शेखरच्या न्यूरॉलॉजिस्टला खोट्या आजारांचे रिपोर्ट्स द्यायला कसे भाग पाडले. त्यांना कसे कॉन्टॅक्ट्स केले; तर ते काम समर नकातेचे!" त्याने आणखी एक बॉम्ब फोडला.

'बास!!!' 
                 माझा मेंदू ओरडत होता...हे सगळं सहन होण्यापलिकडचे होते. पण मला गप्प बसवत नव्हतं.

"म्हणजे समर नकाते तुमच्यासाठी काम करत होता?" 
"नाही. तो त्याचे काम घेऊन माझ्याकडे आलेला."
"कसलं?"
"शक्ती शुक्लाला संपवण्याचं!"
"ते कसं?"
"मी एका वेगळ्या केसवर काम करत होतो. त्यावेळी समर एक समाजसेवक म्हणून पोलिसांकडे आला होता. त्या केसमध्ये वापरली गेलेली '३१५ बोअर देसी कट्टा' ही गन शक्ती शुक्लाने विकली असल्याची टीप त्याने पोलिसांना दिली. पण त्याला ही गोष्ट माहीत नव्हती, की मी गुन्हेगारांचाच इतिहास फक्त बघत नाही. तो माहिती घेऊन आलाय, म्हणजे तो निष्पापच असला पाहिजे असे समजण्या इतका मी मूर्ख नाही. एक आणखी शंका म्हणजे ही माहिती त्याला कशी माहीत?
"मी समरची माहिती काढली आणि तो एक कॉन्ट्रॅक्ट क्रिमिनल असल्याचे माझ्यासमोर आले. तो खुनही यानेच केलेला. हा समर नकाते शक्ती शुक्लाचे व इतरांचे बरेच देणे लागतो. हे मला कळाले. समरला शक्तीला अडकवायचे होते. जेणेकरून तो पैसे देण्यापासून वाचेल. हे सगळं बाबारावांचा मृत्यू होण्याआधी. 
"समरच्या माहितीवरून शक्ती शुक्लाला अटक करण्यातही आली होती, पण पैसे चारून तो सुटला. आणि पुन्हा त्याने समरच्या मागे पैशांचा तगादा लावला. दरम्यान बाबाराव देसाईंचा खून झाला होता. आणि त्या आरोपावरून चौकशीसाठी बाबू सुतारला आत घेण्यात आले होते. आधी सीबीआय नंतर आयबी या केस मध्ये इनवॉल्व्ह झाली. त्यामुळे समरला काही हालचाल करता येत नव्हती. बाबूकडून त्याचे नांव कोणत्याही क्षणी बाहेर पडेल अशी त्याला भीती..."
"एक! एक मिनिट! तुम्ही म्हणताय हा तूमचा सेट अप होता. म्हणजे बाबूचे आणि समरचा संबंध असण्याचे तसे काही कारण नाही. मग..." मी कन्फ्युज झालो होतो...
"त्याचा तसा संबंध होता. बाबू आपली बरीच इल्लीगल कामे या समर नकाते कडून करून घ्यायचा. म्हणून तूर्तास कोणाला मारायचे नाही असे त्याने ठरवले. तो माझ्याकडे आला. पूर्वी त्याने शक्तीच्या अवैध धंद्याची टीप दिल्याने शक्ती शुक्लाकडून त्याला कसा त्रास होत आहे असे सांगून पोलीस ऐकत नाहीत म्हणून तुमच्याकडे आलो असा कांगावा करू लागला.
"मी त्याची रियल आयडेंटिटी मला माहित असल्याचे सांगितले, पण त्याला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही असे सांगून मी शक्ती शुक्लाचा काटा काढायचे त्याला आश्वासन दिले."


"ठिक आहे. पण यासाठी तुला काय हवंय?" समरने मिस्टर वाघला विचारले,
"तुला माहीतच आहे, मी तुला पैसे तर नाही देऊ शकत!" समर म्हणाला.
"पैसे नकोत. तुझ्या कलेक्शन मधले काही विंटेज वेपेंस. बस्स!"
"फाईन! असं असेल, तर मी सांगेन त्या प्रत्येकाला मारशील?"
"वाय नॉट?! पण तुला पण माझे एक छोटेसे काम करावे लागेल."
"ओके!" 
समरने मिस्टर वाघशी हात मिळवणी केली.


"असे आमचे डिलिंग झाले. आणि त्याच्या कडून रवी पवार, मोहन पाटील डॉक्टर व न्यूरॉलॉजिस्टला मी सांगतोय तसे करण्यासाठी धमक्या दिल्या. यामुळे त्यांतील कोणी तक्रार केलीच असती, तर समर नकातेचे नांव पुढे आले असते. माझे नाही! शिवाय तो पोलिसांच्या हाती लागण्याआधीच मरणारही होता!" त्याने कपटी हास्य केले.
"म्हणजे समर नकातेने आत्महत्या केली नाही?"
"अलबत! त्याला गोळी घालून घ्यायला मीच फोर्स केले. त्याने मला गंडवायचा प्रयत्न केला होता. स्वतःला खूप शहाणा समजत होता. साऽऽलाऽऽ"

'किती किचकट आहे हे सगळं...'

"म्हणजे समर नकाते आणि शक्ती शुक्ला यांचा बाबारावांच्या केसशी काही संबंध नव्हता?..."
"तसा तो बाबू सुतारचाही नव्हता!" तो हसून म्हणाला. 
"मग का?..." मी काकुळतीला आलो...
"का? आपल्या धंद्याचा समाजावर काय परिणाम होतोय हे त्याला माहित असूनही तो दुर्लक्ष करत होता. बाबारावांनी सांगूनही त्याने त्यांनाही जुमानले नाही. त्यामुळे त्याला मारणे माझ्यासाठी क्रमप्राप्तच होते! शुक्ला इल्लीगल वेपेन डीलर होता, आणि नकाते एक हिटमॅन! तुला काय वाटतं, मी काय करायला हवं होतं यांच्या बरोबर? यांना कधी ना कधी मी मारलेच असते. पण म्हंटलं यांच आयुष्य निरर्थक होत निदान याचं मरणं तरी कामी येऊ दे म्हणून!
"शक्ती शुक्लाने समर नकातेला माऊसर विकल्याचे रेकॉर्ड्स आणि समर नकातेचे असायनमेंट व देणेकऱ्यांचे रेकॉर्ड्स मीच तयार केले होते. बाबूने बाबारावांना मारण्यासाठी समरला सुपारी दिली असल्याचेही मीच त्या रेकॉर्ड्समध्ये नमूद केले. समर नकातेच्या लॅपटॉपवर एक्सेल फाईल्स माझ्या पेनड्राइव्ह वरून आधी कॉपी केले आणि मग ते मीच डिलीट केले. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांना काही पुरावा सापडू नये म्हणून ते त्यानेच केलेत असे दाखवण्यासाठी."
या प्रकरणात मिस्टर वाघची आणखी एक खुबी मला समजली, की तो कोणाचेही अक्षर अगदी हुबेहूब नकल करू शकतो. असेच त्याने शक्ती शुक्लाच्या वही खात्यात त्याच्याच अक्षरात समर सोबतचे माऊसरचे फेक डिलिंग तयार केले होते.
"लॅपटॉपवर मग तुमचे फिंगरप्रिंट्स का आढले नाहीत. ग्लव्ह्ज्! ग्लव्ह्ज् मुळेच शुक्लाच्या वहीवरही माझे ठसे उमटले नाहीत! त्याला कुणी चेक केले नाही तो विषय वेगळा."
"पण हे सगळं का?" मी केविलवाणा होऊन विचारले.
"मी तुला शक्ती शुक्लाचा अटॉप्सी रिपोर्ट सांगितला का?" 
त्याने माझ्या प्रश्नाला बगल दिली. म्हणजे अजून काही तरी बाकी होते...
"नाही." मी म्हणालो,
"अरे हा! त्यात तुम्ही कसे सापडला नाहीत? खून चाकूने झाला होता ना? मग?" 
         यातून मिस्टर वाघ कसा बाहेर पडला हे मला कळालेच नव्हते.
"मी समर नकातेच्या कलेक्शन मधून जी विंटेज वेपेंस घेतली होती त्यांतील जॅपनिज मेड स्कुबा प्रो डायव्हर्स नाईफ शुक्लाला मारण्यासाठी वापरली होती. शुक्लाला मारून तो सूरा पुन्हा नकातेच्या घरी सोडला. नकातेच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे ज्या गोष्टी सापडल्या त्यात तो सुराही सापडला. माझे फिंगरप्रिंट्स त्याच्यावर येऊ नयेत याची मी पहिल्यापासूनच काळजी घेतली होती. त्यामुळे फोरेन्सिक मध्ये नाईफवर पण समर नकातेचेच फिंगरप्रिंटस आढळून आले. 
"ही केस नवीन, वरुण आणि कार्तिक सॉल्व्ह करतायत असे त्यांना वाटावे म्हणून मी हे नवीनच्या ज्यूरिसडिक्शनमध्ये घडवून आणले!"
"माऊसर? तुमच्याकडे आधी पहिली तेव्हा त्यात एक गोळी कमी होती. म्हणून वाटत होते, की तुम्ही बाबारावांना मारलंय. मग तुम्ही ही घटना सांगताना त्यात समर नकातेचे नांव पुढे आले. त्याच्याकडे माऊसर आणि चारच गोळ्या सापडल्या. म्हणून तो खुनी वाटू लागला. त्याने माऊसर विकत घेतल्याची नोंद पण शुक्लाकडे सापडली. ती पोलिसांनी एव्हीडेन्स म्हणून जप्त पण केली. पण आता तुम्ही म्हणताय की समरने बाबारावांना मारलेच नाही. मग माऊसर त्याच्याकडे कशी?"
"समर नकातेला खुनी ठरवण्यासाठी ही माऊसर त्याच्याकडे सापडणे गरजेचे होते. त्याशिवाय ते विश्वास पात्र कसे ठरले असते? यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा उपयोग करून घेणे माझ्यासाठी गरजेचे होते."
"ते कसे?"
"फॉरेन्सिक डिपार्टमेंट नक्कीच नकातेकडे सापडलेली माऊसर व बाबाराव देसाईंच्या लंबर व्हर्टिब्रेमध्ये झालेल्या डॅमेजला कम्पेअर करून बघणार. माऊसरवर फायर होताना उडालेली गन पावडर आणि बाबारावांच्या शरीरावरील गन पावडरचे परीक्षण करणार. बरोबर? आणि नकातेकडे माऊसर सापडली तरच हे शक्य होणार होते.  बाबारावांना त्याच माऊसरचे गोळी लागली आहे हे त्यातूनच तर सिद्ध होणार होते आणि समर नकाते खुनी ठरणार होता!"
"आणि ती त्याच्याकडे गेली कशी?"
"सांगेन."
"बरं. मग तुमच्याकडे ती कशी? मला माहित आहे, एखाद्या केसमध्ये क्रिमिनलने वापरलेली गन तुम्हाला आवडली तर ती तुम्हीच ठेवून घेता. तशीच ती माऊसर तुमच्याकडे आली असेल, पण ती तुम्ही मिळवली कशी?"
"चौकशी समिती व कोर्टासमोर एव्हीडेन्स सादर केल्यावर मीच ओरिजिनल माऊसर व कार्टेजेस् रिप्लेस करून त्याजागी चायनीज मेड माऊसर व त्याची चार कार्टेजेस् ठेवली. ती इतकी हुबेहूब आहेत, की ओळखली जाणारच नाहीत. कमिशनरच्या विश्वासाचा फायदा दुसरे काय? आणि आता पर्यंत नवीन, कार्तिक आणि वरुणही माझ्याबाजूने निर्धास्त झाले होते. मी त्यांचा विश्वास जो संपादन केला होता."
"यांच्यावरून आठवले. त्या ट्रान्समीटर्सचे काय केलेत, जी यांच्याकडे फिक्स्ड् केली होतीत?" मी विचारले.
"त्या तिघांच्याही समोरच मी ती परत काढून घेतलीत."
"आणि तिघांनी तसं करू दिलं? त्यांना संशय नाही आला?"
"कसा येणार होता? बाबारावांचा खुनी तर त्यांच्या दृष्टीने सापडला होता. सगळे एव्हीडेन्स सुद्धा समोर होते. त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवल्याने ते गिल्टमध्ये होतेच. त्यांनी माझ्यावर संशय घेतला, तसा मीही त्यांच्यावर संशय घेऊ शकतोच एवढेच मी त्यांना बोललो. मग कसला संशय ते घेणार होते?"
"याह! परफेक्ट मास्टर प्लॅन. हं?!"
तो मोठ्याने हसला.
"मी ती बग्स जशी त्यांच्या नकळत इंस्टॉल केली होती, तशीच ती मी काढून घेऊ शकलो असतो. पण त्यांना टीज करण्याची ही संधी मला सोडायची नव्हती." त्याने कपटी स्मित केले,
"वाईट एवढेच वाटते, की नवीन, कार्तिक, वरुण जेन्युअन असून त्यांना मला एवढे फसवावे लागले." तो हसला, त्यांना खरेच वाटत होते, की ते एक खूप मोठी कॉन्स्पिरसी सॉल्व्ह करत आहेत!"
"पण हा सगळा सापळा होता. मिस्टर वाघाचा ट्रॅप!" 
"हा! हो!" तो हसत म्हणाला.
"तुम्हाला कुणी या केस मध्ये इनवोल्व्हच करून घेतलं नसतं, ही असायनमेंट वतुमच्याकडे आलीच नसती तर?" मी विचारले.
"हा! मग तर मला हे सगळं घडवून आणणं अधिकच सोपं गेलं असतं!"
"मग कार्तिकने जायला सांगितल्यावर तुम्ही का नाही गेलात?"
"बघ! एक तर ते माझ्या मागावर होते. मी तसे केले, तर त्यांचा माझ्याविषयीचा संशय पक्का झाला असता!"
त्याचं म्हणणं बरोबर होतं; आणि माझा प्रश्न मूर्खपणाचा...
तो स्मित करत होता. मी मात्र खूप गंभीर होतो,
"या सगळ्यांत तुम्ही लिलावतीबाईंना का नाही वाचवलं? तुम्हाला जर माहिती होतं, विरेन त्यांना संपवणार आहे, तर मग का नाही तुम्ही त्याला रोखले? लिलावतीबाईं तर निष्पाप होत्या ना? मग का नाही?" मी उद्विग्नपणे विचारले.
"एव्हरी वन हॅस टू डाय सम डे! देन व्हाय बॉदर टू सेव देम?! आय डोन्ट सेव पीपल; आय ओन्ली पनिश डिलीग्विन्ट्स!" तो क्रूरपणे म्हणाला,
"आणि तसंही, त्या मरणं हे त्यांच्यासाठी चांगलंच होतं. त्रास सहन करण्यापेक्षा त्यांना मृत्यू आला हे बरेच. शिवाय विरेन बिल भरण्यास असमर्थ झाला असता, तर तुला काय वाटते, हॉस्पिटलने काय केले असते?" 
हा त्याचा मला प्रश्न. त्याचं म्हणणं बरोबर होतं. हॉस्पिटल टेक्निकल प्रॉब्लेम दाखवून लीलावतीबाईच्या मृत्यूचे मार्मिक कारण देऊन यातून सहज सुटू शकले असते! आणि म्हणून विरेनकडे बिल भागवण्यासाठी पैसेच संपले असते, तर त्यांनी लिलावतीबाईंना...
'म्हणजे या जगात मिस्टर वाघ हा एकटाच क्रूर नाही! निदान तो इतरांसारखा स्वार्थासाठी, तरी कोणाला मारत नाही!' मी मनाशीच बोललो.
"मग बाबाराव देसाईंना नक्की मारले कोणी?" माझा मिस्टर वाघला प्रश्न.
"मीच!"
मी चक्रावून गेलो... माझा पुतळाच होणे बाकी होते... 
"ती माऊसर देखील त्यांचीच!" तो उठत म्हणाला,
"ती पहिल्यापासून माझ्याकडेच होती. समर नकातेला अडकवण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर मी ती सोडली होती.
 हा त्याने मला दिलेला आणखी एक धक्का...!
"पण का?"
माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तो उठला. बाजूच्या टेबलवरची एक लाकडी पेटी त्याने उचलली.
"कुठे जाताय?" 
"सुशांत निकम अजून जीवंत आहे!" 
ती पेटी घेऊन तो बाहेर पडलाही.

'म्हणजे आणखी एक खून...?'

मी खूप घाबरलो. शिवाय याच्या घरी एकटे कोण थांबणार?!! निरोपाची चिठ्ठी लिहून टेबलवर ठरवली आणि मिस्टर वाघच्या घरातून बाहेर पडलो. त्याच्या घराला कुलूप घालण्याची काही गरजच नव्हती...