सर्व आपल्या आपल्या कामात व्यस्त होते . आमच्यात डॅनच लग्न लवकर झालेलं .
प्रद्युमन आणि सँडीचा सध्यास लग्न करायचा काही विचार नव्हता . प्रद्युमन तर लग्नाच्या
नावाने नाकतोंडच मुरडायला लागायचा .
प्रद्युमनने मानववंशशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि तो त्याचेच भरीव संशोधन करीत होता . पुरातन काळापासून चालत आलेल्या चालीरीतीचा अभ्यास , तासनतास
लॅबमध्ये बसून तो मानवी कवट्यांचा , जमिनीत पुरवल्या सांगाड्याना आणून त्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करत होता .
त्यासाठी तो कितिकीती दिवस जंगलात भटकायचा . डोंगरीवणातून असो की समुद्राच्या तळाशी साचलेल्या वाळूतून तो काहींना काही शोधून काढायचा . त्या भटकंतीत त्याचा
संबंध तेथील आदिवासी भागातील बांधवासोबतही यायचा . त्यांची समजायला न येणारी भाषा . पेहराव ह्या सर्व वातावरणात प्रद्युमन आठ आठ दिवस कसा रमायचा ह्याचं मला
भलतंच कौतुक वाटायचं .
वाळूबद्दल तर असं वाटायचं भावणीव आणि सलोख्याचे नाते त्यांनी जपलेले असावे
एवढी कृतज्ञता निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आणि त्या निर्जीव मानवी सागड्याबदलही . हे प्रद्युमनच जे काही चाललं होतं ते नुसतं पी. एचडी मिळवण्याकरिता नसून त्याला ह्यात सखोल ज्ञान प्राप्त करायचे होते . प्रत्येक मानवाच्यावंशाला तो जाणून घेऊ पहात होता .
टेकडीच्या पायथ्याशी त्यांनी आपले नवे घर बांधले . घर कसले ते जणूकाही
एखादी टुरिस्ट प्लेसच वाटायचे . उत्तरेच्या मधोमध रांगेत असलेल्या डोंगराळ तो मळा घराच्या व्हरांड्यात उभं राहिल्यावर सिंहगडासारखा वाटायचा . गुलाबी लालसर रंगाची
उधळण आकाशात होताना बघून असं वाटायचं खरचं यार प्रद्युमन तू ग्रेट आहे . हे
वास्तविकतेचे चित्र उभारण्यासाठी त्यांच्यासोबत आधीपासून त्याने नित्याचीच रोवणं केली .
एकदा कॅलिफोर्नियाच्या साहित्य अकॅडेमीने त्याचा सत्कार करायला बोलवलं असता
पठ्याने त्यांना चक्क विरोधच केला ....
आम्ही सर्व त्याला विचारणा केली तू जे काही करतो ते योग्य नाही आहे हा त्यांचा अपमान करणं आहे .. तेव्हा
' मी जे काही करतो ते आत्मसन्मान किंवा पुरस्कार स्वीकारून स्वतःची पाठ इतरांसमोर थोपटून घ्यायला नाही करतं आहे .. आणि तुम्हाला सांगतो माझ्या रिसर्च भांडवल करून
घ्यायला मला नाही आवडतं . मी माझ्या ह्या दऱ्याखोऱ्यात रमणारा एक वेडा अवलिया आहे . '
प्रद्युमन अश्या मानसन्मानापासून नेहमीच दूर राहिला त्याने त्याच्या आयुष्यात .
एखाद्या सन्मान सोहळ्यात जायचा योग स्वतः वर कधीच ओढवून घेतला नाही .
पी.एचडी मिळूनही प्रद्युमनच रिसर्च काही संपलं नाही .
त्याचे डॅड गॉन त्याला सोडून निघून गेले तेव्हापासून तू एकटा पडला होता . पण उदासीनतेने त्याला कधी स्पर्श केला नाही .
आम्ही म्हणायचो त्याला , अरे वेड्या लग्न करून घे ना ! असा एकटा का जगतो
तुझ्यासारख्या देखण्या आणि शिक्षित मुलाला कोण मुलगी नाही देणार ?? उलट ज्या
मुलीचं तुझ्यासोबत लग्न होईल ती स्वतःला भाग्यवानच समजेल . '
पण तो हसत म्हणायचा ,
'हँट् .... एकटा कुठे असतो मी ?? ह्या हजारो वर्षे मातीत मिसळलेल्या मानवीकवट्या असतातच
की माझ्या सोबत बोलायला . '
कधी कधी हा मला महाभारतातल्या चिरंजीवासारखा वणवण एकटाच वेगळ्याच शोधात निघालेल्या जिवासारखा वाटायचा . जो शोध तर घेतो आहे वाटेने चालतो आहे न थकता न शीण येता , पण त्याला स्वतःलाच काय मिळवायचं राहून गेलं हे गवसत नाहीये .
एकदा बोलताना तो म्हणाला देखील .
' मी अजूनही थकलेलो नाहीये , पण तुला एक सांगू कधी मलाच माझं कळतं नाही मी कसला
शोध घेतो माझं रिसर्च संपून वर्ष लोटलीत . फादर गॉनच्या आठवणीत कधीकधी ह्या
दगडावर इथे मी एकटाच जुन्या आठवणीत रमलेला असतो मग माहितीये आहे स्वतः वरच
मोठ्यांनी हसतो . आज सर्व सुखं पायथ्याशी लोळण घेत असतांना ज्याने मला त्या मंदिरातून शंकराच्या पायथ्यावरून उचलून आणलं . माझ्या गळ्यात हिरवं ताविज बांधलेलं असून त्याला कधीच हात न लावता मला वाढवलं स्वतःच नावं दिलं . मोठं झाल्यावर मला कळलं ते ताविज मुसलमान बांधतात मी काढून ठेवलं . तेव्हा गॉनने मला सांगितलं होतं तू कोणत्या जातीतून जन्माला आला हे महत्त्वाचं नाही आहे तू सर्व प्रथम ह्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे माणूस आहे हे महत्त्वाचं आहे . आज माझ्या जवळ सर्व असताना बस्स गॉनची उणीव ह्या कशानेच भरून निघणार नाही . रेवा तुला माहिती आहे अगं जेव्हा आपली माणसं आपल्या सोबत असतात तेव्हा आपल्याला त्यांचं महत्व कळतं नाही . आणि नसल्यावर आपण टाहो फोडूनही त्याच्यासाठी रडलो असता ती परत येत नाहीत . '
त्यादिवशी खरतर प्रद्युनमच्या ह्या बोलण्याने मी निशब्द झाले होते .
भावनांचा विस्तीर्ण गोतावळा खालीमन कुरतडून कुरतडून खायला धावत ह्याचीच पुसटशी जाणीव झाली ...